चकवा की मृतात्मा -(सत्यकथा)
ब-याच वर्षापुर्वीची गोष्ट आहे ऐंशीच्या दशकातले .त्यावेळेला नागपूरचा एवढा विस्तार झालेला नव्हता. सक्करदरा, मेडिकल कॉलेज इकडे आजूबाजूला जंगलच होते. अगदी विरान वस्ती
त्या वेळेला पोलीस दलात एक गिरी बाई होत्या. त्या शाम टाकीच्या मागे म्हणजे चिटणीस पार्क कडे राहायच्या. तेव्हा नागपूर एवढं दाट नसल्यामुळे त्या शॉर्टकट मारून मेडिकलच्या आतूनच घरी जायच्या. त्या सक्करदरा पोलीस स्टेशनला होत्या अगदी निडर बाई आणि धिप्पाड पोलीस शोभेल अशीच. तिची कधी कधी नाईट ड्युटी ही असायची. ती माझ्या मोठ्या काकुं ची मैत्रीण होती. त्यामुळे आमच्याकडे नेहमी यायची एकदा ती नाईटला अकरा वाजेपर्यंत पोलीस स्टेशनला होती. दुसऱ्या दिवशी सोमवार होता.म्हणजे तीचा उपवास होता. तेव्हा रिक्षा आटो रात्री सहज वगैरे रस्त्यावर मिळत नव्हते.रात्रीची वेळ असूनही घाईघाईत शॉर्टकट मारून मेडिकलच्या आतून निघाली.तशी ती खूप धाडसी होती. तिला वाटलं बारा च्या आधी घरी पोहोचू व जेवण करू.पण जशी ती मेडिकल च्या गेट जवळ आली तिला समोर रस्ताच दिसेना ही चालतच राहिली तरी घर दिसेना. उलट तिला जंगल धन दाट होत आहे असा भास झाला. तेवढ्यात एक पुरुष समोरून जाताना तिला दिसला तिला जरा बरं वाटलं पण थोड्या अंतरावरून तो कुठे वळला तिला कळलं नाही मग दुसराच एक जण समोर दिसला तोही नंतर गायब झाला झाडीत. मग तिसरांदा एक जोडपं समोर जातान दिसले. ती त्यांच्या मागून चालत राहिली .पण तीला अचानक लक्षात आले हा रस्ता तर शवागृहाकडे जातो.आपल्याला जाळ्यात ओढलं आहे हे ती समजली.ती तशीच धावत मागे फिरली.खुप भटकली.पण घराचा रस्ता काही आला नाही आणि जंगल संपलं नाही ती घाबरली तिने घड्याळात बघितलं साडेबारा वाजले म्हणजे दीड तासात ती नुसती भटकत होती. पोटातल्या भुकेने व्याकुळ झालेली पाय थकलेले भ्रमिष्ठा सारखी अवस्था झाली होती. अचानक तिला आठवलं आता तर सोमवार लागलाय तिने शिवशंकरला मनापासून डोळे मिटून हात जोडले म्हणाली या संकटातून वाचव. एवढी वर्ष मी तुझी भक्ती करते आता फळ दे आणि डोळे उघडले तर काय आश्चर्य ती मेडिकलच्या गेटवरच उभी होती.
म्हणजे एवढा वेळ जी भटकत राहीली तो नुसता भास होता की सत्य. तीला काही आठवेना.मग तिने शॉर्टकट न मारता दूरच्या रस्त्यावर पण सुरक्षित रोड वरून धावतच घरी गेली. ती घरीही कुणाला काही सांगण्याच्या मनस्थितीत नव्हती.देवाजवळ उदबत्ती दिवा वगैरे लावला. दुसऱ्या दिवशी त्या आमच्याकडे आल्या आणि त्यांनी रात्री घडलेला सर्व वृत्तांत सांगितला बिचार्या सुखरूप परतल्या ईश्वर कृपेने.
डाॅ.सुलेखा सरोदे.
नागपूर.