🙏वेड लावी बावरी नजर🙏
💃 भाग::---तिसरा💃
दुसऱ्या दिवशी डाँ. सुर्वे अचानक नाशिक ला निघुन गेले.मागणी केल्याप्रमाण आरोग्य विभागाकडून पिलाणी ग्रामीण रुग्णालयाला तरंगत्या दवाखान्याकरिता बार्ज मंजुर करण्यात आली होती. त्या संदर्भात कागदपत्रांची पुर्तता करण्यासाठी डॉ. सुर्वेंना तात्काळ नाशिक ला जावं लागलं.तेथून त्यांना भुसावळ ला जावं लागलं.विशाखापट्टणम हुन भुसावळ जंक्शन व तेथून पिलाणी असा मार्ग होता.नाशिक, भुसावळ ,पिलाणी करता करता व त्यात भुसावळ ला पुन्हा दोन दिवस थांबावं लागल्याने सुर्वेना पिलाणीला चार दिवस लागले.इकडे डाँ. करिश्मा शिर्केला पहिल्या दिवशी डाँ सुर्वेची अनुपस्थिती जाणवली नाही. त्या कामातच व्यस्त होत्या.पण दुसऱ्या दिवशी ही सुर्वे नाहीत हे पाहुन चलबिचलता वाढली.कारण डाँ. सुर्वे नाशिक ला गेलेत हे कळालं होतं पण का गेलेत हे मात्र माहित नव्हतं. आपण रात्री नकार दिला त्यामुळं तर कदाचित ...... नको नको ते विचार त्यांच्या मनात येत होते. मोबाईल वरून संपर्क करण्याचा प्रश्नच नव्हता कारण पिलाणीला नेटवर्कच नसायचं.तदनंतर तर डाँ. सुर्वेविना एक एक क्षण तिला युगासमान भासु लागला.एरवी तिला काहिच वाटायचं नाही कारण तशी तिची भावनिक गुंतवणुक नव्हतीच सुर्वेत.पण त्या रात्री सुर्वेनी भावना व्यक्त केल्या व आपण नकार दिल्यानं सुर्वे दुखावुन काही बरंवाईट विचार केला तर.....या विचारानंच ती बिथरली होती .चौथ्या दिवशी बार्ज घेऊन डाँ सुर्वे परतले.समोर दिसताच करिश्मानं काळजी मिश्रीत संतापानं असं काही पाहिलं कि डाँ. सुर्वेनी खाली मान घातली.तिचा पाहण्याचा मतितार्थ 'निदान माणसानं जातांना सांगावं तरी 'असा होता तर डाँ. सुर्वेना वाटलं कि त्या दिवसाचा राग आला असावा व तो अजुन गेला नसावा.
सकाळीच डाँ. सुर्वे सिदाजीरावांना बार्ज नदीत उतरवुन जलपुजनाचे उदघाटन करण्याचं आमंत्रण देऊन आले. पण निलेश व उन्मेशच्या दुखःतुन सावरलेच नसल्याने उदाजीमार्फत करुन घेण्याचं सुचवलं. तो पुर्ण दिवश बार्जवर सामग्री ठेवण्यातच गेला.बार्जचं सुसज्ज तरंगत्या दवाखान्यात रुपांतर करण्यात आले. दुसऱ्या दिवशी सर्व डाँ. ,आरोग्य सहायक, नर्सेस सर्व ताफा नर्मदेच्या काठावर जमला. दिलेल्या वेळी गढीतले उदाजी परमार जिल्ह्यातील अधिकारी समवेत आले. मोठ्या धुमधडाक्यात जलपुजनाने उदघाटन झाले. साऱ्या नर्मदा काठाला आनंद झाला. कारण प्रवासाच्या सोई नसल्यानं बऱ्याच रुग्णांना उपचाराअभावी प्राणास मुकावे लागे.आता हा तरंगता दवाखाना काही दिवसाच्या अंतराने का असेना पण काठावरील गावापर्यंत येणार.
कार्यक्रमानंतर अधिकारी व प्रमुख डाँ. ना चहापानासाठी गढीवर बोलावलं. सुर्वेंसोबत डाँ. शिंदे व डाँ. करिश्मा शिर्केही नकार देत होत्या पण सुर्वेंनी निदान गढीवरील लोकांच्या आग्रहाखातर तरी चला असं म्हणताच शिर्के गढीवर गेल्या.परमाराची गढीची भव्यता संपन्नतेची साक्ष देत होती. तिथलं वैभव पाहणाऱ्यांच्या डोळ्यांचे पारणे फेडत होता.तटबंदीतल्या दोन बुरुजामधला उंच दरवाजा पार केल्यावर दोन्ही बाजूला देवळ्या होत्या. मग रस्त्यानं पुढं गेल्यावर मोठा प्रशस्त दिवाणखाना(हाँल).तेथेच सिदाजी,उदाजी परमार सर्वासोबत बसलेले. एका कोपऱ्यातुन मुदपाकखान्यात जाण्यासाठी दरवाजा. त्याच्याजवळच पाठमोऱ्या डाॅ. शिंदे व शिर्के बसल्या.घरातल्या मंडळींना घरातुन फक्त शिर्के व शिंदेच बसलेल्या दिसत होत्या.
आज रावांचा(निलेशरावांना गढित राव याच नावानं संबोधत)पलंग खोलीतुन नेमका किचनमध्ये हवापालट व जागापालट करिता आणलेला होता.दोन माणसं कायम त्याच्या दिमतीला असत .आजही एकजन हातपंख्यानं तोंडावर हवा घालत होता.
दिवाणखान्यात सिदाजीराव अधिकारी व नविन डाँ. चा परिचय करून घेत होते.डाँ. शिर्के परिचय बसुनच करायला लागताच सुर्वेंनी खुण करत उभं केलं.सिदाजीरावांनी नाव विचारलं.त्यांची बैठक लांब असल्यानं शिर्के जोरानं "करिश्मा शिर्के"असं बोलताच हाँल मध्ये नाही पण कोमात गेलेल्या निलेशच्या कानात निरव शांततेत पहाटेला शिवमंदिरातला घंटानादानं आख्ख्या हिमालय घाटीला जाग यावी त्याप्रमाणं तो आवाज घुमू लागला. खोल खोल मेंदुतल्या घडीत कंप उठू लागला.नसा तडतड उडत जागृत होऊ लागल्या.दोन अडिच वर्षाच्या चिर निद्रेला भंगवत "करिश्मा",करिश्मा"हे बोल पुन्हा पुन्हा धडका देऊ लागले.सर्वात पहिली धडक हाताच्या बोटात बसू लागली.बोटं सरसर हलू लागली.त्याच वेळी करिश्माची नजर हाॅलमध्ये लावलेल्या दोन लहान मुलाच्या तसबिरीवर गेली व तिच्या अंगावर सरकन काटा गेला.तसबिरीत तिन चार वर्षाची दोन मुलं व त्यात एकाचे डोळे तिच्यासारखेच निळे होते.ते पाहिल्याबरोबर तिला निलेशची आठवण दाटुन आली व त्या सरशी ती तडक उठली व देवळीजवळ येऊन थांबली.तिने 'निलेश' म्हणत उसासा टाकला डोळ्यात टचकन थेंब तरळले.
तिकडे हाॅल मधून सर्वजण उठून निघू लागले.तोच किचनमध्ये गलका वाढला.कारण निलेशरावाजवळ बसलेल्या माणसाचा आधी डोळ्यावर विश्र्वासच बसेना.त्याला आधी भास वाटला.कारण दोन अडिच वर्षांपासून निलेशराव नुसते पडलेलेच होते.त्यामुळं बोटं हालतांना पाहताच तो पुन्हा पुन्हा खात्री करू लागला.जशजशी करिश्मा उठून बाहेर गेली तसतसी हालचाल वाढत गेली.गढीतल्या सगळ्या लोकांना आनंद झाला.पण हि बाब सिदाजी परमारांनी तिथच थांबवली.गढीच्या बाहेर कुणालाच कळली नाही.
रुग्णालयात आल्यावर डाॅ. शिर्के मॅडमांना आतुन गलबलुन आलं.आपणास आजच निलेशची आठवण का यावी?
दरड अपघात नंतर आपण कोलमडूनच पडलो होतो.मेडीकल शिक्षण ही सोडलं व स्वत;ला कोंडुनच घेतलं होतं पण ताईनं सहा महिन्यात डाॅ.कडून काऊंसिलींग करून त्या गर्तेतुन बाहेर काढलं.व आपण ही निलेशच्या आठवणीतच कायम अविवाहित जिवन घालवत समजोता करायचं ठरवलं व पुन्हा मेडीकल शिक्षण पुर्ण केलं.ताई किती समजावयाची,"पोरी मी जिवन वाया घातलं पण तु नको वाया घालुस.कारण भावनेच्या भरात माणुस निर्णय घेतो पण तो निभावतांना खुप यातना होतात गं म्हणुन अजुनही विचार कर व लग्न कर.पण आपण ठाम.नंतर नंदुरबार चा आदेश आपण स्विकारला त्यामागं निलेशच्या जिल्ह्यात सेवा करायला मिळेल हाच उद्देश.ताईनं "अगं इतक्या दुर्गम व दुर जाऊ नको"म्हणुन किती समजावलं.आपणनंदुरबारहुनच पिलाणी मिळाल्याचं कळवलं व त्याच वेळी हार्ट अॅटॅक नं ताई गेल्या. व आपला शेवटचा आधार ही गेला.काळ जातोय.निलेश अजुनही ह्रदयातुन जात नाही पण पुढं काय?हा विचार करत ती रात्रभर तळमळत होती.कि डाॅ. सुर्वे सराच्या मागणीनं आपण बावरलोय.कारण चार दिवस सुर्वे सर दिसले नाही तर आपण किती नर्वस झालोय.का?का?व्हावं असं.कि निलेश ची जागा सुर्वे सर घेत आहेत?
सकाळी सकाळी च डाॅ. सुर्वेंना गढीवर जावं लागलं.मात्र हे कुणालाच माहीत पडलं नाही.कमालीची गुप्तता पाळण्यात आली. सुर्वेनी निलेशरावांना पुन्हा पुन्हा तपासलं.त्यांच्या होकारानंतर निलेशरावांना लगेच मुंबई ला हलवण्यात आलं .सोबत सुर्वेही गेले.पाच सहा दिवस सर्व तपासण्या झाल्या व डाॅक्टरांनाही आश्चर्यच वाटलं.त्यांनी बोटात त्राण केव्हापासून आला व त्यावेळेस नेमकं काय घडलं हे सविस्तर विचारलं.बदलामागे नेमकी काय प्रेरणा हे कुणाच्याच लक्षात येईना.पण तीच घटना वा त्या घटनेस जबाबदार व्यक्तीच निलेशरावांना दुरुस्त करणार होती.
पाच सहा दिवसांपासून डाॅ. सुर्वे विना करिश्मा ला चैनच पडेना.ती रात्रंदिवस तोच विचार करी कि आपल्यामुळं सुर्वे नाराज झालेत .. कदाचित त्यामुळच ते रुग्णालयात येणं टाळत असावेत.
डाॅ.सुर्वे परत आले.रुग्णालयातील राहिलेली कामं निपटू लागले त्यातच संध्याकाळ झाली.संध्याकाळी त्यांनी डाॅ.शिंदे, शिर्के व इतरांना बोलवत मिटींग घेतली.त्यात डाॅ.शिंदे व मी बार्ज (तरंगता दवाखाना)घेऊन नर्मदा काठावर जाऊ.डाॅ.शिर्के मॅडम रुग्णालयात थांबतील.प्रा.आ.केंद्रातल्या डाॅ. ना ही स्पाॅटवर थांबण्याच्या सुचना दिल्या. हे ऐकल्याबरोबर करिश्मा काय ते समजली. व ती रुमवर निघुन गेली.बऱ्याच उशिरा सुर्वे रुमवर परतल्यावर ती रूमवर गेली."सुर्वे सर काय चाललंय हे!नकाराची शिक्षा देत आहात काय?"तिनं थेट तोफ डागली.
"कुठं काय मॅम!काय चुकलं का पुन्हा माझं?"सुर्वेनी विचारताच
"काय चुकलंय?,सतत सोबत काम करण्यासाठी किती आसुसलेले असायचे तुम्ही!,नी चार चार दिवस न सांगता निघून जाता.निदान एका शब्दानंही सांगणं नाही.,का?मी तुमच्या प्रेमास नकार दिलाय म्हणुन."
करिश्माला रडवेली पाहून,"नाही मॅम अचानक जाणं झालं "इतकच सुर्वे कसंबसं बोलले.
"मि. सुर्वे अचानक!माहितीय मला.नी हो बार्जवर रुग्णाकरिता एक डाॅ. म्हणुन शिंदे पेक्षा माझी गरज असतांना तुम्ही मला टाळण्यासाठी शिंदे ना नेता आहात हे मला कळत नाही का."
........."मॅम,तसं काहीच नाही हवं असल्यास उद्या शिंदे मॅमला कॅंसल करुन तुम्हाला नेतो "
त्यांना मध्येच थांबवत
"निशांत तुझं किती प्रेम आहे कळतंय रे मला,पण मी आता नाही करू शकत प्रेम पुन्हा!,प्लिज ऐक माझं,त्या दिवशीही मी तुला हेच सांगितलं"
पण प्लिज बोलणं थांबवुन मला पुन्हा मारु नकोस."
"करिश्मा! लक्षात ठेव तु प्रेम कर अथवा नको कर,तो तुझा प्रश्न आहे. तु साथ दे अथवा नको ,मी ती मागणारही नाही पण तझ्या आठवणीतच मला वेडं व्हायचंय,बस्स हिच अखेरची मागणी सरणावर जळणाऱ्या दिलाकडुन"
हे ऐकल्याबरोबर करिश्मा हमसून हमसून रडत तिथंच बसली व"हे देवा !कसल्या खोड्यात अडकवून गेलास जाणारा!त्याच्यासाठी मी मरत मरत जगतेय तर हा बाजिंदा माझ्यासाठी जगत जगत मरतोय.
निशांत ही बराच वेळ अश्रु ढाळत उभा राहिला.
सकाळी डाॅ.सुर्वे एकटेच बार्जवर निघाले. त्यांनी शिंदे डाॅ.ना रुग्णालयातच थांबण्यास सांगितलं.तोच शिर्के मॅडमांनी त्यांचं न ऐकता सुर्वेसोबत निघाल्या.नर्मदा काठानं बार्ज पुढे पुढे सरकू लागली.पुर्ण भरलेल्या पात्रात बार्ज हेलकावे खात खात एकेक वाडी करू लागली.विविध रुग्णावर उपचार करत तर कधी काही रुग्णांना प्रा.आ.केंद्राच्या मदतीनं रुग्णालयात पोहोचतं केलं जाऊ लागलं.दिवसभर करिश्मा सोबत असल्यानं निशांत लाही हुरुप आला होता. रात्री उशिरा ते परतले.आठ दिवस हाच दिनक्रम चालला.का कुणास ठाऊक पण सोबतीत निशांत व करिश्मा ही आनंदी राहु लागले.करीश्माला हे कोडे उलगडेना. एकीकडं मन नकार देतय तर दुसरीकडे त्याचा सहवास मिळावा म्हणून आसुसतंय. व सहवासात आनंदीत होतंय. काय चाललंय तिला काहीच कळेना.
दिवसामागुन दिवस जाऊ लागले. तशी करिश्मा सुर्वेकडं वळत चालली.
सिदाजी परमार विचार करु लागले.त्या दिवशी काय काय घडलं कि ज्यानं रावाची चेतना परत आली व त्यात दिवसेंदिवस फरक पडतोय.पण म्हणावा तितका नाही.काय झालं होतं त्याचा विचार करतांना त्याना रुग्णालयातल्या लोकांना बोलवलेलं लक्षात आलं.त्यांनी त्याच लोकांना बोलवायचं ठरवलं.पण रावांचा पलंग जिथं होता तिथुन दिसेल असं जवळ फक्त डाॅक्टरच होते.मग त्यांनी त्यांनाच बोलवण्याचं निश्चीत केलं.पण या वेळेस त्यांना रावाना सर्व दिसतील पण राव कुणाला दिसणार नाही अशी बैठक व्यवस्था केली.
बार्ज वरील तरंगत्या दवाखान्यानं चांगलं यश मिळवलं म्हणुन सत्काराचं प्रयोजन दाखवुन बोलावण्यात आलं.शिर्के ,शिंदे मॅडम पण आल्या आडोशाला टेकवून बसवलेल्या निलेशरावांना दिसताच हालचाल वाढली.सिदाजी परमारांनी मुद्दाम बोलण्यासाठी डाॅ.ना बार्जबद्दल विचारणा केली .आधी सुर्वे बोलले मग करिश्मा बोलू लागली.तोच निलेशरावांचे हातासोबत पाय ही हलू लागले.डोळ्याची हालचाल होऊन डोळे पाणावले.करिश्मा बोलण्याचं थांबताच पुन्हा हालचाल जोरात.
सारे गेल्यावर सिदाजीना धागा सापडला.त्यांना मनातुन खुपच आनंद झाला पण तो त्यांनी दर्शवला नाही.तदनंतर तर निलेशराव आठच दिवसात व्हिलचेअर वर बसु लागले .माणसं त्यांना गढीत फिरवू लागले. बोलल्यावर नजर फिरवून प्रतिसाद देऊ लागले.आता मुंबई हुन डाॅक्टराचं खास पथक आलं.त्यांनी जोरानं माॅलीश व औषधोपचार सुरू केला.प्रतिसाद वाढु लागला थरथरत राव उठण्याचा प्रयत्न करू लागले.
आता उन्हाळा संपुन पावसाळा सुरु झाला.निसर्गात पुन्हा नवचेतना पालावली. डाॅ. निशांतला खात्री होती कि एक ना एक दिवस करिश्मा आपल्याकडं वळेलच. पण तो त्या प्रसंगानंतर मात्र त्याने प्रेमाबाबत कधीच विचारणा केली नाही मात्र दिलखुलास बोलू लागला.करिश्माला मात्र आपण नकार देऊनही निशांतनं आपल्याला त्रास न देता स्विकारलं यातच ती त्याच्याकडं झुकु लागली.तिला 'पोरी भावनेच्या भरात घेतलेले निर्णय नंतर खुप त्रासदायक ठरतात गं,उभी हयात काढायची आहे तुला'ताईचे शब्द आठवु लागले.
त्या रात्री बार्जवर नर्मदा काठावर बऱ्याच लांब आल्यानं इंधनच संपलं व रुग्णांचीही गर्दी असल्यानं ते एका वाडीच्या काठावर बार्जमध्येच मुक्कामाला होते.सोबतीचे कर्मचारी जेवणानंतर वाडीत मुक्कामाला निघुन गेले.निशांत व करिश्मा बार्जवरच थांबले.
रात्रीचे अकरा वाजले असतील .बार्ज संथ लाटावर डुलत होती.निशांत च्या मनात मात्र विचारांचं वादळ थैमान घालत होतं.आकाशात चुकार मेघ नवमीच्या चंद्रास झाकण्याचा खट्याळपणा करत होता.मंद वारा त्याला साथ देत होता.तर अल्लड पावसाची सर मध्येच त्यात बाधा आणत होती.बार्जच्या मागील बाजुस कनातीचं पार्टीशनानं दोन भाग केलेले होते.एका बाजुला करिश्मा तर दुसरीकडे निशांत तळमळत होता.करिश्मा उठली पाणी घेतलं तोच निशांतची चाऊल लागली.तिची पाऊले आपसुक त्याच्याकडे वळली.निशांतला सुखद धक्का बसला.मनसोक्त सारी रात्र चंद्र चांदणीचा गप्पाचा फड रंगला.निर्मळ सुवासिक चंदनाप्रमाणं.
आषाढ संपला नी पिलाणीत गावदेवीचा उत्सव आला.उत्सव दरवर्षापेक्षा ही धुमधडाक्यात करण्याचं गढीनं ठरवलं.कारण देवीचीच कृपा असावी कि राव मृत्यूच्या दाढेतून सुटले,अशी गढीची समजुत होती.
गाव उत्सवात रुग्णालयानं आरोग्य विषयक स्टाॅल लावुन लसीकरणाचाही कार्यक्रम ठेवला.दुपारी पुजेला गढी आली सोबत रावांना ही व्हिलचेअरवर आणलं.मंदिराजवळच स्टाॅलवर करिश्मा होती.अचानक तिला मागून कुणीतरी आपला हात धरलाय हे जाणवलं.ती गरर्कन वळाली नी तिनं मागं पाहिल्याबरोबर जागेवरच थरथरू लागली.तिला जोराचा हुंदका दाटला .कसाबसा श्वास फेकत "निले$$$$$$श!,"आणि जोरानं ती त्याला घट्ट बिलगली.तिचं घट्ट आलिंगण बसताच तीन वर्षांपासून बोलणच बंद असलेल्या निलेशनं कंठातुन आवेगानं "करिश्मा","करिश्मा"म्हणुन टाहो फोडला.दोन्ही एकमेकांना बिलगुन बिलगुन रडू लागली.सिदाजीला डाॅ.शिर्के व निलेशचा संबंध काय हे कळेना पण मुलगा बोलायला लागला हेच त्याच्यासाठी महत्वाचं होतं.
सर्व वृत्तांत कळताच सिदाजी परमार करिश्माच्या मुळगावी लासुरला जाऊन तिची माहिती घेतली .आपल्याच मामेभावाची मुलगी म्हटल्यावर तर पुढचे सर्व मार्ग मोकळे झाले.काही दिवसातच करिश्माला राजीनामा द्यायला लावला.सिदाजीनं करिश्माचा व निलेशचा वाॾ.निश्चय करून काश्मिरला पाठवलं.
डाॅ. निशांत शिर्के महिन्याच्या आतच नर्मदेच्या पात्रात निळे डोळे शोधत फिरायला लागले.करिश्माची निळाई डोळ्याची भुक त्यांना स्वस्थं बसू देत नाही.अंगावरच्या कपड्याच्या चिंध्या झाल्यात. बावरी नजरेचा भोवरा त्यांना नर्मदा काठ व सातपुडा पर्वतरांगेत गोल गोल फिरवतोय.

समाप्त
🙏🙏VSDV🙏🙏