भाग सातची लिंक 👇👇👇
🔸मनोरुग्ण - भाग आठ🔸
"ठिक आहे अनंत, तुला जर सर्व सिस्टीमच्या विरोधात जाऊनच काम करायचे असेल तर तु करू शकतोस. पण जर उद्या कदाचित तुझ्यावर एखादे संकट आले किंवा एखाद्या प्रकरणामध्ये तू अडकलास तर त्यावेळी मात्र तु माझ्याकडे येऊ नकोस, मी तुझी कोणतीही मदत करू शकणार नाही" किल्लेदार नाराजीच्या स्वरात म्हणाले.
"जशी तुमची ईच्छा, चला सर, रात्र खूप झालीय, येतो मी.. गुडनाईट" अनंत त्याच्या चेअरवरून ऊठून जाऊ लागला.
"गुड नाईट, बघ अनंत, मी सांगितलेल्या गोष्टींवर थंड डोक्याने विचार कर..आणी तुझा निर्णय बदलला तर मला लगेच कॉल कर"
किल्लेदारांनी त्यांच्या चेअरवरूनच अनंतला निरोप दिला आणी नवीन सिगारेट पेटवली.🚬
किल्लेदारांनी त्यांच्या चेअरवरूनच अनंतला निरोप दिला आणी नवीन सिगारेट पेटवली.🚬
अनंत त्याच्या कारमध्ये बसून बंगल्याच्या बाहेर पडला..आता रात्रीचे बारा वाजून गेले होते..दिवसभर गजबजलेल्या रस्त्यांवर आता शुकशुकाट पसरला होता..अनंत हळू स्पीडमध्ये त्याची कार घेऊन घराकडे निघाला होता.. आधीच संतोषच्या प्रकरणाच्या तपासामुळे त्याची मनस्थिती बिघडत चालली होती आणी त्यातच किल्लेदारांच्या भेटीमुळे तर तो आणखीनच डिस्टर्ब झाला होता.. अशा महत्वाच्या केसमध्ये इतर कोणी नसले तरी कमीत कमी आपले सिनीयर आणी सहकारी तरी आपल्या सोबत आहेत असा त्याला विश्वास होता पण किल्लेदारांसोबत झालेल्या चर्चेनंतर आता मात्र तो स्वतःला खूप एकटा एकटा समजू लागला होता..
या केससंदर्भात सुरुवातीला असणारा त्याचा उत्साह आता मावळला होता..पण जे खरे असेल तेच कोर्टात मांडायचे हा त्याचा निर्णय मात्र अजूनही ठाम होता.
या केससंदर्भात सुरुवातीला असणारा त्याचा उत्साह आता मावळला होता..पण जे खरे असेल तेच कोर्टात मांडायचे हा त्याचा निर्णय मात्र अजूनही ठाम होता.
विचारात गुंग होऊन गाडी चालवत असताना एकदम त्याला समोरील मोकळ्या रस्त्यावर स्ट्रीटलाईट च्या खांबाखाली कोणीतरी ऊभे असल्याचे जाणवले..अनंत निरखून पाहु लागला, डोक्यापासून ते पायापर्यंत असणारा काळा रेनकोट, रात्रीच्या वेळीपण डोळ्यावर लावलेला गॉगल आणी काळ्या रूमालाने बांधलेला चेहरा, अशा पेहरावात ऊभ्या असलेल्या त्या व्यक्तीला पाहुन अनंतचा थरकाप उडाला.🗿
त्या व्यक्तीला असे सुनसान रस्त्यावर ऊभे पाहून त्याला संतोषने सांगितलेली संपुर्ण हकीकत एका क्षणातच आठवली..तेवढ्यात जवळ जवळ येत असलेल्या अनंतच्या कारला पाहून त्या रेनकोटधारीने लिफ्ट मागण्यासाठी हात केला..भयभीत झालेल्या अनंतने त्याच्याकडे पाहुनही न पाहिल्यासारखे केले आणी तेथून लवकरात लवकर निघून जाण्यासाठी कारचा स्पीड वाढवण्याचा प्रयत्न केला खरा, पण एक्सीलेटर वर पाय दाबूनही अर्जंट ब्रेक दाबल्यासारखी अनंतची कार आपोआपच त्या रहस्यमयी व्यक्ती जवळ येऊन थांबली.
"थँक यू व्हेरी मच " कारचा दरवाजा बाहेरून उघडून आत येत तो व्यक्ती म्हणाला...त्याला आपल्या शेजारच्या सिटवर बसलेले पाहून अनंतच्या कपाळावर घाम जमा झाला होता..त्याची कारपण एकाच जागेवरच थांबलेली होती.
"काय झालं वकील? चल की पुढे, जाता जाता बोलू आपण"
अंगाला कापरे भरवणारा थंडगार आवाज होता त्याचा. अनंतने मुकाट्याने हळू हळू कार पुढे चालवण्यास सुरूवात केली...अधूनमधून तो चोरून शेजारी बसलेल्या रेनकोटधारीवर कटाक्ष टाकत होता.
अंगाला कापरे भरवणारा थंडगार आवाज होता त्याचा. अनंतने मुकाट्याने हळू हळू कार पुढे चालवण्यास सुरूवात केली...अधूनमधून तो चोरून शेजारी बसलेल्या रेनकोटधारीवर कटाक्ष टाकत होता.
"तुम्हांला कुठे ड्रॉप करू सर" अनंतने बळेच त्याला विचारले.
"येरवडा जेल, तिथे माझा मित्र संतोष माझी वाट पाहतोय"
"येरवडा जेल, तिथे माझा मित्र संतोष माझी वाट पाहतोय"
"सागर.! सागर आहेस ना तु?" अखेर अनंतने न राहवून त्याला विचारले.
उत्तरादाखल सागरने त्याच्या डोळ्यावरचा गॉगल, आणी चेहर्यावरचा रूमाल काढला..त्याचा जळालेला विद्रूप चेहरा आणी डोळ्यांचे अर्धवट खड्डे पाहून अनंतला दरदरून घाम फुटला पण मनातली भिती चेहर्यावर दिसू नये याची पुरेपुर काळजी तो घेत होता.😨
"माझा हा असा भयावह चेहरा पाहून तुला भिती नाही वाटली का?" सागरने अनंतला विचारले.
"खरं सांगायच म्हणल तर नाही, कारण मला विश्वास आहे की, काहीही कारण नसताना तु मला त्रास देणार नाहीस"
अस बोलून अनंत सागरसोबत जवळीक करू पाहत होता.. त्याच्यापासून वाचण्याचा हाच एक मार्ग त्याच्याकडे होता..पण अनंतचे बोलणे ऐकून सागरच्या तप्त चेहर्यावर विचित्र हास्य उमटले.
अस बोलून अनंत सागरसोबत जवळीक करू पाहत होता.. त्याच्यापासून वाचण्याचा हाच एक मार्ग त्याच्याकडे होता..पण अनंतचे बोलणे ऐकून सागरच्या तप्त चेहर्यावर विचित्र हास्य उमटले.
"संतोषच्या अंगात घुसून ज्या तीसेक जणांना मी बसखाली चिरडले त्यांचे मत पण माझ्याविषयी असेच असेल का वकील?...तुला सांगतो, काल तर घाटामध्ये गंमतच झाली, काल पहाटेच्या वेळी एका कारमध्ये काही फँमीली मेंबर दूर कुठेतरी फिरायला निघाले होते..मी असाच माझा चेहरा उघडा करून एका टर्निंग पॉईंट वर रस्त्याच्या मधोमध थांबलो होतो..कारच्या ड्रायव्हरने जेव्हा अचानक मला समोर पाहिले ना, भितीने त्याची बोबडीच वळली, वेडा कुठला.. गाडीवरचा ताबा सुटल्याने त्याने कार रस्ता सोडून थेट दरीतच घातली, ती कार खोल दरीत कोसळताना आणी त्या कारमधील लोकांच्या किंकाळ्या ऐकताना एवढे भारी वाटले म्हणून सांगू.."
सागर स्वतःचा कालचा किस्सा अगदी रंगवून सांगत होता, बोलताना त्याच्या तोंडाची हालचाल होत असताना गरम वाफा बाहेर निघत होत्या.😤
सागर स्वतःचा कालचा किस्सा अगदी रंगवून सांगत होता, बोलताना त्याच्या तोंडाची हालचाल होत असताना गरम वाफा बाहेर निघत होत्या.😤
"ओह माय गॉड! आजवर किती लोकांना मारले आहेस तु ? कशासाठी करतोस पण तु हे सगळे? काय मिळते तुला निर्दोष लोकांना ठार करून? ज्या लोकांना तु मारलेस किंवा अपघातामध्ये जखमी आणी अपंग केलेस त्यांनी तुझे काय बिघडवले होते?"
"खर सांगु का वकील, खूप आनंद आणी समाधान मिळते मला, संसारामध्ये सुखी असणाऱ्या लोकांना त्रास देऊन.."
"दुसर्यांच्या दुखामध्ये आनंद वाटतो तुला? मनोरुग्ण झालायसं तु सागर"
"हंम्म.! बरं मग? मनोरूग्ण बनण्याचा अधिकार काय फक्त तुम्हां जिवंत लोकांनाच असतो का? मेलेल्यांना नाही?" सागरच्या चेहर्यावर संताप वाढत चालला होता, चेहरा आणखी लालभडक होत चालला होता.
"मान्य आहे संतोष आणी रेश्माने तुझा घात केला..पण त्यांनी केलेल्या कुक्रुत्याबद्दल तु पण त्यांना चांगली अद्दल घडवलीस, त्याबद्दल मी तुझे समर्थनच करतो, पण एक सांगू, संतोष आणी रेश्मा यांनी एका वेगळ्याच भावनेच्या आहारी जाऊन तुझा खून केला असला तरी पण ते जातीवंत दुष्ट गुन्हेगार नाहीत..मी त्यांचे समर्थन बिलकुल करणार नाही.. आपण कायदेशीर मार्गाने त्यांना आणखी शिक्षा देऊ, पण तु आता तुझा राग सोडून द्यावा असे मला वाटतेय..तु जिवंत असताना तुझा स्वभाव असा खूनशी नव्हता सागर... मी तुझ्या घरी जाऊन आलो, आईंची पण भेट घेतली..
अजूनपण ती तुझ्या चांगल्या स्वभावाचे गुणवर्णन करत असते.. आणी आता जर तिला तुझे असे कारनामे समजले तर तिला किती दुखः होईल, याचापण एकदा विचार कर..विनाकारण कोणाला यातना देणे, ठार करणे हा तुझा मुळ स्वभाव नाहीये..तु तुझ्या मुळ स्वभावामध्ये परत ये सागर" 😦
अनंतने सागरला समजावून सांगण्याचा पुरेपुर प्रयत्न केला होता, आणी त्याच्या बोलण्याचा थोडाफार का होईना पण सागरवर परिणाम होत असल्याचे जाणवत होते.
अजूनपण ती तुझ्या चांगल्या स्वभावाचे गुणवर्णन करत असते.. आणी आता जर तिला तुझे असे कारनामे समजले तर तिला किती दुखः होईल, याचापण एकदा विचार कर..विनाकारण कोणाला यातना देणे, ठार करणे हा तुझा मुळ स्वभाव नाहीये..तु तुझ्या मुळ स्वभावामध्ये परत ये सागर" 😦
अनंतने सागरला समजावून सांगण्याचा पुरेपुर प्रयत्न केला होता, आणी त्याच्या बोलण्याचा थोडाफार का होईना पण सागरवर परिणाम होत असल्याचे जाणवत होते.
"तु म्हणतोस ते पण खरे आहे वकील, कधीकधी मी पण असाच विचार करतो..पण जेव्हा जेव्हा मला त्या दोघांची आठवण येते ना..तेव्हा माझ्या हातून आपोआप अशा घटना घडतात..तरी पण ठिक आहे चल, यापुढे मी निर्दोष लोकांना त्रास देणार नाही..पण संतोष आणी रेश्मा या दोघांचा बदला मात्र अजूनही पुर्ण झालेला नाही..त्यांना कायदेशीर शिक्षा होईल किंवा ना होईल ,पण मी मात्र त्यांना शिक्षा देणारच..आणी या कामासाठी तु माझी मदत करणार आहेस" सागरने स्पष्ट केले.
"मी..माझ्याकडून काय हवे आहे तुला?" अनंतला थोडे आश्चर्यच वाटले.
"फार जास्त काही सांगणार नाही मी तुला..आता थोड्या वेळापुर्वी तु किल्लेदारने दिलेली ऑफर नाकारली होतीस ना त्याचा स्वीकार कर.. संतोष हा मनोरुग्ण असल्याची केस कोर्टात मांडुन लढायचीस, त्याचबरोबर त्याला फाशी न होता जन्मठेप होईल याची पण काळजी घ्यायचीस.. एवढ्या लवकर सहजासहजी मरू शकत नाही तो"
सागरच्या अटी ऐकून अनंत विचित्र कोंडीत सापडला होता.. आजवर जपलेल्या तत्वांशी तडजोड करून आपण असत्याच्या बाजूने कोर्टात केस लढवायची? अपघातामध्ये जीव गमावलेल्या व जखमी झालेल्या दूर्दैवी जीवांची थट्टा करायची? केसकडे , निकालाकडे डोळे लावून बसलेल्या सर्व समाजाची दिशाभुल करायची? एवढे सगळे कशासाठी? तर फक्त स्वताचा जीव वाचवण्यासाठी?
"हे माझ्याकडून होणे शक्य नाही सागर, काही झाले तरीपण" अनंत कापर्या आवाजात म्हणाला, आणी त्याचा नकार ऐकून सागरच्या डोळ्यांचे खड्डे संतापामुळे लालभडक व्हायला लागले..😡
"मरायची भिती नाही वाटत का तुला?" सागरच्या प्रश्नावर अनंत शांतच बसला.
तेवढ्यात अचानक रस्त्यावर अनंतच्या कारसमोर एक भटके कुत्रे धावत आडवे आले..अनंतने लगेचच जोरात ब्रेक दाबला, पण ब्रेक दाबूनही त्याची कार थांबलीच नाही.. गाडीचा एक टायर कुत्र्याच्या अंगावरून गेला.. मोठ्याने आवाज काढत कुत्र्याच्या तोंडातून रक्त बाहेर आले आणी ते डांबरी रोडवरच तडफडू लागले.🐕
"ओह..शिट, कारचा ब्रेक का लागला नाही" असे म्हणून त्याने पुन्हा एकदा ब्रेक दाबताच यावेळी मात्र टायर रोडवर घासून कार बरोबर जागेवर थांबली, अनंत आश्चर्यचकीत होऊन सागरकडे पाहू लागला.
"काळजी करू नकोस वकील, कुत्र्याला गाडीखाली चिरडल्यावर कोणतीही शिक्षा होत नाही तुमच्या कायद्यानुसार..पण दरवेळी गाडी समोर फक्त कुत्रे येणार नाही बरका..ते बघ जरा त्या बाजूला फुटपाथवर" 👉
सागरने बोट दाखवले तिकडे अनंत पाहू लागला..तिकडे एकाला लागून एक लांबलचक दुकानांची लाईन होती आणी त्यासमोरच्या फुटपाथवर आठ ते दहा गरीब बेघर महिला, पुरुष आणी लहान मुले थंडीमध्ये कुडकडत अर्धवट पांघरूण घेऊन झोपलेले दिसत होते..
"तुच ठरव आता वकील, तुला माझ्या सांगण्याप्रमाणे केस लढवायची.. का ह्या फुटपाथवर झोपलेल्या गरीब निर्दोष लोकांना वेगाने धावत्या कारखाली चिरडवून आयूष्यभर संतोषच्या शेजारी लॉकअपमध्ये जाऊन बसायचे ते?" 🚗 सागरच्या तोंडातील धुरासारखेच त्याचे हे शब्दही विषारी होते.
#क्रमश..