अघोर..
अंतारंभ
लेखक : कनिश्क हिवरेकर .....
जयदेवने आपल्या नजरेसमोर अडवलेला हात बाजूला काढला तसा त्याच्या नजरेसमोर काळजाचा ठोका चुकवणार दृश्य होत...साक्षात अघोऱ्याच पोकळ सैतानी शरीर आपला भाजणार हात हातात घेऊन तडफडत उभ होत जयदेवने आपल्या उभ्या आयुष्यात अस काहीच पाहिलं नव्हत. त्या दृश्याने जयदेवच्या अंगाला कंप सुटला...भीतीने , धास्तीने त्याच काळीज घश्यात येऊन अडकल होत...परंतु हे काय घडले ? कसे घडले...अदृश हवेत उपस्थित गोविंदपंताच्या क्रोधाग्नीची ज्वाला संपूर्ण खोलीत जाणवू लागली...पाहता पाहता अक्षरशः भिंतीच्या कान्याकोपऱ्यामधून झळया निघू लागल्या वाफा निघू लागल्या...आजवर ज्या सैतानासमोर कुणीही टिकू शकले नाही त्याने जयदेवला एक साधारण स्पर्श केला त्याचा संपूर्ण हात राख राख झाला...जयदेवने आपल्या स्वतःच्या अंगावर शरीरावर एक नजर टाकली....दुसरा हात पाहण्यासाठी जयदेव मागे वळला...जाळ्या, कोष्ट्या सर्व बाजूला होऊन जी गोष्ट जयदेवच्या हातामध्ये आली होती ती गोष्ट...ती जागा होती....देवाच देवघर....ज्याच्या चारीही बाजूनी साखळदंड होते. मधोमध काळ्या कापडामध्ये काहीतरी गाठ बांधून ते ठेवण्यात आल होत. जयदेवने परत वळून समोर पाहिले...तो सैतान तिथेच तडफडत होता...जयदेवाला कळून चुकले.....परमेश्वराने जणू कौल दिला... “मी आहे...!माझ अस्तित्व अजून हि आहे...!”
“पsss...र....” त्या खोलीच्या कंपनात गोविंदपंताचा दबका आवाज येऊ लागला त्याला ते नाव घ्यायचं होत परंतु सैतानाला बधीत करणार परमेश्वराच नाव हे त्याच्या मुखात येत नव्हत....रागारागात देवाच नाव हि त्याच्या जिभेला चटके बसवत होत... “तू...! तू पुन्हा.... मध्ये येऊ नकोस ...माझ्या...! तुझे मंत्र , तुझी लीला ,तुझी क्रीडा सर्व उच्चारून या कंठात आता विष भरल गेलय.....बहिष्कार आहे तुझा माझ्या राज्यात तिथेच सडून रहा तू....! तिथेच सडून रहा तू....! हsssट्ट...” जयदेवाच्या कानांवरती तो अदृश हुकुमी आवाज पडू लागला होता जयदेवला समजले आपण यावरून जराहि हात बाजूला काढला तर मृत्यू निश्चित आहे... जयदेवामध्ये जणू परमेश्वराच्या पवित्रस्पर्शाने हिंमत भरली गेली...जयदेवास शब्द फुटले...त्याचा हि आवाज त्या खोलीमध्ये गरजू लागला... “तू...! तू जो कोणी असशील...! तुझ्या नजरेसमोर सर्व उघड आहे...! देवाची शक्ती तेव्हाही प्रबळ होती आणि आज हि आहे...तुला भय आहे तुझ्या विनाशाच ....पहा तुझ्या प्याद्याची तुझ्या गुलामाची काय अवस्था आहे... तुझा अंत जवळ आला आहे....तुझा अंत जवळ आला आहे...ऐकतोयस ना...” जयदेवपुढे काही बोलणार कि तेवढ्यात “ ह्याsss...” एका क्षणात असा जोरदार हवेचा झपटा त्या खोलीत जो पसरला त्या झपाट्याने एक विचित्र गोष्ट घडली...जयदेवला त्याचक्षणी संवेदना जाणवल्या जसे कि त्याच्या हाताच्या स्पर्शात असलेला तो देवाचा देव्हारा तिथून नाहीसा झाला होता. आणि बघता बघता खोलीच्या प्रत्येक कोपऱ्यामधून आगीचे लोट न लोट उठून येऊ लागले होते. “खीहिहीईsss....कुठेय रे तो....ह्याहाहाहाsss....कुठ य तुझा तो...द्द ...द्दे...बोलव त्याला... आगीच्या जळणाऱ्या लोटीचा प्रकाश भिंतीवरती पडला जयदेवची नजर एका भयंकर प्रदीर्घ आकाराच्या सावलीने आपल्यावर खेचून घेतली...जिचा मृत्यू तांडव त्या ज्वालेच्या आरपार त्या भिंतीवरती थैमान घालताना दिसून येऊ लागला होता.
***
“सध्या..वेळ नाहीये पोरी माझ्या स्पष्टीकरणास...आता एकमात्र उरल आहे ते म्हणजे तुमचा जीव वाचवणे..संध्या पोरी त्याचा क्रोध आता अनावर झाला आहे....तो कुठल्याहि क्षणी तुम्हाला मला किंवा जयदेव इतर कुणालाही वाटेत जो येईल त्याला मृत्यूच्या दारात तो ढकलून देईल....आपल्याला लवकरात लवकर इथून निघायला हवय...चला माझ्या सोबत आता वाड्यात थांबणे धोकादायक आहे...चला लवकर इथून...मी याचा नंतर बंदोबस्त करेन...”
“ तुम्ही....? तुम्ही माझे बाबा आहात आणि...आजवर मी हेच समजत राहिले कि माझे वडील माझ्या लहानपणीच....” संध्या जड पावलांनी जखोबाच्या दिशेने येत आसवे भरलेल्या डोळ्यांनी पाहत अगदी हुंदक्याच्या आवाजातच उद्गारली... “पोरी...! मी तुझा खूप मोठा गुन्हेगार आहे...तुझ्या सर्व प्रश्नांना मी उत्तरे देईन....मी माझी सावित्री गमावून बसलो आहे पण मला माझी माझ्या सावित्रीची शेवटची आठवण तिचा शेवटचा अंश नाही मला गमवायचा...चला विश्वासराव...ऐका माझ...लवकरात लवकर या वाड्यातून बाहेर चला...”
“संध्या ते म्हणतायत ते अगदी बरोबर आहे...!” अनुला उचलत विश्वास म्हणाला... “चल...! हि योग्यवेळ नाहीये...” डोळे पुसत संध्या उत्तरली... “हं...ठीक आहे चला...” तसे जखोबा त्यांना पुढे घालत स्वतःमागून निघाला...जसे ते तिघेही त्या खोलीमधून बाहेर निघाले... “ थांबा ! आपण काहीतरी विसरतोय...! जयदेव कुठे राहिला ? तो कुठेय ?”
तोच समोरून ते दोन्ही राखणदार जखोबाजवळ धावत आले... “ मालक....! आव त्ये...! त्येsss...”
“त्ये साहेब....त्या येड्या गंग्याच्या माग माग गेले हत...आम्ही त्यांची इथ वाट बघतोयसा पण अजून त्यांचा काय पत्त्या नाय...” त्यांच्या पैकी एकजण म्हणाला... “कायsss? गंग्या आणि जयदेव दोघेही नाहीसे झाले ? कसे ? कुठे ?” विश्वास त्यांच्यावरती ओरडला... “साह्येब आवsss...आम्ही त्यांना नको म्हणल पण त्यांनी काय ऐकल नाय...अन त्या तिकड त्या अंधारान त्या कोपऱ्यात गेले कंदील हातात घेऊन....” जखोबा विश्वास दोघेही त्या दिशेनी अंधारात कोणी दिसते का ते पाहू लागले तोच जखोबा त्या दोघांना म्हणाला... “ए ह्ये बघा ! आत्ताच्या आता तुमच्या पैकी कोणतरी गावात जा! अन सरपंचाला कळवा के जखोबान निरोप धाडलाय...अन बस एवढच म्हणा...
“वेळ आलीया...जखोबान शेवटची मदत मागलीया...” तेवढ आपल्या ध्यानात ठेऊन तो गडी वाड्यातून बाहेर निघाला पावसात चिखलात विजांच्या कडकडाटीतच तो गावाच्या दिशेनी सरपंचाकडे धावत निघाला...
धावता धावता त्याला जाणवले कि त्याच्या मागावर अगदी त्याच्या मागोमाग एखाद्या पिसाळलेल्या जनावरांसारख ते त्याच्यावर धावा बोलून जात होत. परंतु त्याने आपले पाय मात्र थांबवले नाही...उरात आग होत होती, घश्याला कोरड पडली होती पोटरीत गोळे येत होते पायात काटे बोचत होते पण तरीदेखील तो थांबला नाही...कारण काही अंतरावर मदत होती. त्याचाच जोडीदार इथेच वाड्यातच जखोबाजवळ थांबला होता... “ जयदेवsss...?” विश्वास जखोबा दोघेही मिळून जयदेवच्या नावाने त्याला पुकारत होते. पण जयदेव जमिनीवरती आगीच्या भडकत्या धगधगत्या ज्वालेमध्ये होरपळून बेशुद्ध पडला होता. “जयदेवsss....! जयदेव..!” जयदेवच्या कानावरती तो आवाज पोहोचू शकत नव्हता... त्याच्या शरीरातदेखील कसलाच त्राण उरला नव्हता...अंगावर जागोजागी होरपळून निघाल होत. तोच कोणीतरी अलगद त्याच्या पाठीवरती आपला हात ठेवला...त्या स्पर्शामध्ये एक थंडावा होता. बंद पडलेल्या त्याच्या मस्तकाच्या सर्व चेतना तिथेच जणू तडतडून जाग्या झाल्या त्याला आपले शरीर जाणवू लागले..हाताची बोटे पाय मान खांदे सर्वकाही अशक्तपनामुळे जयदेवच्या नजरेत फरक पडला होता आजुबाजूच सर्व त्याला अंधुक दिसत होत... “उsssठ...!” जयदेवला त्याच्या कानावर एका लहान मुलीचा आवाज ऐकू आला... “क...कोण...?” जयदेव थरथरत्या ओठांनी उद्गारला... “ उठ...तुझ कर्म इथच नाय र संपत गड्या...” जयदेवच्या डोळ्यांवरची झाक उतरली त्याने समोर पाहिलं कि एक लहान मुलगी आणि एक माणूस त्याच्या समोर उभे त्याला पाहत होते... “माझी पोर भेटली मला...माझी पोर भेटली...” समोर दोन पांढरक्या सावल्यामध्ये दोन पवित्र आत्मे जयदेवच्या नजरेस पडले....तो गंगाराम आणि त्याची मुलगी छ्की होती “तुम्ही दोघ ? कसे...?” त्यावर छकु त्याला म्हणाली... “आमास्नी त्या बाईनी पाठवल हाय...”
“काय? कोण बाई ?कुणी पाठवल ?” जयदेव धापा टाकतच त्या दोघांशी बोलण्याचा प्रयत्न करत होता परंतु गंग्याने त्याच्याकडे पाहून बस एवढच म्हटल “त्या भेटतील तुम्हाला...जे व्हायचं ते होऊन जाईल....” मुक्त होण्याच्या शेवटच्या क्षणी त्यांनी जयदेवला आधार दिला...त्या दोघांनीही जयदेवला पाहून आपले हात जोडले व शेवटचा निरोप घेत गंगारामने छ्कीचा हात आपल्या हाती घेतला. ते दोघेही पांढऱ्याशुभ्र धुराच्या वलयात विरघळून गेले...त्या सोबतच आगीच्या ज्वालाही विरळ होऊ लागल्या... विझू लागल्या... “जयदेवsss....?” त्या आगीचे लोट कमी होताच जयदेवला विश्वासचा आवाज ऐकू आला... “ विश्वास ??” जयदेव हाताच्या आधारेच जागेवरती उठून उभा राहिला..एकवेळ त्याने मागे वळून पाहिले पण तिथे तो देव्हारा नव्हता...आतामात्र धोका वाढला होता. लवकरात लवकर विश्वास संध्या अनु तिघानाही या वाड्यातून बाहेर घेऊन जायला हव...जयदेवच्या मनात तो विचार आला जयदेवने खाली पडलेला अर्धा फुटलेला कंदील हातात घेतला त्याची ज्योत आणखीहि जळत होती त्याने तो तसाच उचलला व हेलकावे घेत भिंतीच्या आधारे दरवाजे उघडून त्या दोन्ही खोल्यामधून बाहेर निघाला... “वव...विश्वासsss...?” विश्वासची नजर त्या कोपऱ्यात असलेल्या दाट काळोखात पडली तिथून प्रकाश बाहेर पडत होत त्या उजेडातच हेलकावे घेतच जयदेव दरवाज्यातून बाहेर पडला... “जयदेव....जयदेवsss....” विश्वास धावतच जयदेवच्या जवळ गेला आणि त्याने त्याला आपल्या खांद्यावरती झेलले... “काय झाले तुला जयदेव ? हेय ? तू ठीक आहेस न ? जयदेव ?” जयदेवाने विश्वासला इथून निघण्याचा इशारा केला... “चल...स्स्सहः...चल विश्वास...इथे धोका....इथे धोका आहे आपल्या सर्वांच्या जीवाला....लवकर चल...”
“विश्वासराव घाई करा...जयदेव अगदी बरोबर म्हणतायत आपण लवकरात लवकर इथून निघायला हव नाही तर...” जखोबा आपल वाक्य पूर्ण करणार होताच कि संपूर्ण वाड्याच्या दाही दिशांना एक क्रूर भयंकर अस छद्मी हास्य घोंगावले....
आपापल्या जागेवर उभे विश्वास जयदेव जखोबा संध्या सर्वांच्या नजरावाड्यामध्ये चारीही बाजूनी त्या आवाजाच्या दिशेने घुमल्या... पाहता पाहता वाड्याचा मुख्य दरवाजा त्या चौघांच्याहि डोळ्यासमोर...
“क्र्रर्र्रsss क्र्रर्र्र्र......” आवाज करीत बंद झाला....आमावस्येची मध्यरात्र झाली होती...एक एक करत वाड्याच्या अवतीभवती नाना तऱ्हेचे श्वापदे जमून मृत्यूची विव्हळ घालू लागले....
“परमेश्वरा...!” जखोबाच्या तोंडून भीतीने भरपूर्ण असे देवाच स्मरणकरणारे उद्गार बाहेर पडले... “ बा...! जखोबा...काय आहे हे ?” अनुला छातीशी कवटाळून संध्या जखोबास बाबा म्हणणार होतीच कि तिने आपले शब्द अडवले... जखोबाचे जणू कान तरसून गेले होते ते ऐकायला पण सध्या काळ वेगळाच होता...
“आपण अडकलोय... त्याच्या जाळ्यात...सोबत रहा....काहीही झाले तरी वेगळे होऊ नका...जखोबाने आपल्या खिशातून काही अंगाऱ्याच्या पुड्या बाहेर काढल्या...आणि एक एक सर्वांच्या हातामध्ये दिल्या...
“ हि सर्वांकडे चिमुटभरच आहे...याचा वापर अत्यंत गरज पडेल तेव्हाच करा...! व्यर्थ घालवू नका...आणि अनुची काळजी घ्या..या सर्व घेराव करून उभे राहा...” जखोबा म्हणाले...तसे विश्वास जयदेव संध्या आणि तो राखणदार सर्व जखोबाच्या मागे एकमेकांच्या पाठीला पाठ लाऊन उभे राहिले विश्वास आणि संध्या दोघांनीहि अनुचे हात घट्ट धरले होते.... “पप्पा...! ,मला भीती वाटतेय...!” अनु म्हणाली... “ नाही बाळा ! काही नाही होणार हं...तू बस डोळे बंद करून रहा बर...मम्मा आहे न जवळ....” संध्या अनुला म्हणाली व तिने चिंतेच्या नजरेने विश्वासकडे पाहिले...
“याला संपवण्यासाठी काहीही मार्ग नाहीये का जखोबा ? याच्या पासून सुटकाहि नाहीये का होणार...?”
“याला संपवण्यासाठी आपल्याला सर्वप्रथम त्या देवांना त्या काळ्याकपड्यामधून बाहेर काढावे लागेल...जेणे करून त्यांच्या उपस्थितीमध्ये त्याची शक्ती कमजोर पडेल अशक्त होईल...तेव्हाच मला माझ कार्य कराव लागेल...पोरी तुझ्या आईपासून झालेल्या विरहामध्ये मी माझ आयुष्य देवचरणी घालवले...पंडिताची पदविका एक वेगळच पवित्रसिद्ध प्राप्तीच शिक्षण मी घेतल...पण तिथे काही दिवस त्या सेवेत त्या लोकांच्या आश्यात राहिल्यावर मला अचानक समजले कि गावामध्ये असा असा प्रकार घडतो आहे...त्याचा छडा लावण्यासाठी मी इथे परत आलो...पण तोपर्यंत मला खूप उशीर झाला होता....”
“थांबा ! तुम्ही आत्ता काय म्हणालात ?” जयदेवच्या चेहऱ्यावर अचानक आश्चर्याच एक प्रश्नचिन्ह उभे राहिले... “होय जयदेव बरोबर ऐकलत तुम्ही....” जखोबा म्हणाला.... “ नाही नाही त्याच्या आधी ते काळे कापड त्यातील देव...असच काहीतरी म्हणालात तुम्ही हो न ?” “हो ! पण तुम्हाला त्या बद्दल काही माहिती ?” तोच जयदेवला त्याच्या डोळ्यासमोर काही क्षणापूर्वी घडलेला प्रसंग आठवला....
“मी त्या देवाऱ्यास स्पर्श केला होता. ज्या मध्ये ते काळ गाठोड होत....” जयदेव तो प्रसंग आठवतच उद्गारला... “काय ? कुठे ?” जखोबा जयदेवकडे पाहत म्हणाला... “त्याच अंधारात पाहिलं होत मी..जिथे मी बेशुद्ध पडलो होतो...पण आता ते देवघर तिथे नाहीये...तिथून त्या नराधमाने ते नाहीस केल...” जयदेव बोलता बोलता थांबला आणि त्याच्या एकट्याच्याच नजरा वाड्याच्या भिंतीवरती फिरू लागल्या...कारण एक एक कोपरा कोपरा घेत...वाड्यातल्या सर्वच्या सर्व मशाली दिवे हळू हळू विझत होते...त्याची ज्योत आपोआप कमी होत गेली... “विश्वास...? HE is here...!” बघता बघता वाड्याच्या चारीही कोपऱ्यातून काळोख एखाद्या मायावी जाळ्याप्रमाणे त्या सर्वाना घेरू लागला.. “मी म्हणेन त्यावेळी तुम्ही सर्वजण वाड्याच्या दरवाज्याच्या दिशेनी धावत जा...आणि चुकूनहि मागे वळू नका...” जखोबा म्हणाला... “ मालक...मी तुम्हाला सोडून जाणार नाय...! आजवर स्वतासाठी लय केल...पण आता दुसऱ्यासाठी करायची वेळ आली हाय..मी इथच थांबेन तुमच्याजवळ...” तो गडी जखोबाच्या सोबत राहण्याचा हट्ट करून बसला.... “बर..ठीक आहे...! जयदेव , विश्वास संध्या ? मी जेव्हा म्हणेल त्याचवेळी दरवाज्याकडे धावायला सुरुवात करा...जखोबा म्हणाला...जखोबाने आपले दोन्ही डोळे मिटून घेतले... “ओंम...नमः रक्षाय भवती सिधसौ..नमः तस्से...पिशाच्च वीरधौर” जखोबाच्या मंत्रांच्या उच्चारामधून निर्माण होणारी उर्जा जणू त्या काळोखाच्या वेढ्याला झुंज देऊ लागली होती त्यामंत्रांनी अक्षरश: त्या कालोखास रोखून धरले होते. चर्रर चर्रर झ्र्र्र झ्र्र्र करतच त्या काळोखातून दरवाज्यापर्यंत जाणारी वाट अगदी उजळून निघाली... *** “सरपंचsss...??सरपंचsss.... ? वाचवा...वाचवा...” जंगलाच्या मार्गाने त्याने गावाच्या दिशेने धाव घेतली होती. परंतु वाटेत ते भयंकर उपद्रव त्याच्या पाठीमागेच होते धावता धावता त्या सैतानाने याच्या शरीरवरती पंज्याने असंख्य वार केले होते त्याच संपूर्ण शरीर रक्ताने माखून गेले होते...धावतधावतच तो सरपंचांच्या पायरीशी येऊन धाडकन कोसळला...सरपंच नाना तत्काळ उठून बाहेर आले आणि त्यांनी पाहिले कि त्यांचाच एक माणूस अगदी भयंकर जखमी अवस्थेत पायरीवरती पडला होता..सरपंचानी त्याला पाणी पाजले...पाहता पाहता त्याचा आवाज ऐकून गावातले लोक तिथे जमा झाले.... “कोणी केल हे तुझ्या सोबत ? काय म्हणायचंय तुला ?”सरपंच त्याच्या इथे येण्याच कारण विचारत होते कि तोच म्हणाला...
मला जखोबान पाठवलय...अन त्येनी हे बी म्हटल हाय...कि हि शेवटची वेळ आलीय...मदत करा...”
“निघा ! निघा इथून...मी याला जास्त वेळ थांबवू शकणार नाही. निघा जा इथून जाsss...” तसा समोरचा दरवाज त्या काळोखास न जुमानता परतएकदा उघडला गेला...विश्वास जखोबाला चालण्याचा आग्रह करत होता परंतु जखोबा त्यां स्थिर मंत्रोच्चारमुळे धरणीद्वारे आपली शक्ती मिळवून तिथेच घट्ट उभा राहिला होता...तोच विश्वास, अनु, संध्या आणि जयदेव चौघेही धावत त्या दरवाज्याच्या दिशेने जाऊ लागले तसे विश्वासने प्रथम संध्याला बाहेर ओढत घेतले आणि स्वतःहि बाहेर पडला पाठोपाठ जयदेवहि बाहेर निघणार होताच कि तोच इकडे जखोबाच्या पायचा कसल्यातरी काळ्याभोर गोष्टीने आपल्या सुळ्यानी मांसात रुतवून चावा घेतला आणि तोच जखोबाचे ध्यान भरकटले आणि त्यांचे दोन्ही हात सुटले मंत्रामध्ये भंग पडला...आणि यावेळी जो दरवाजा बंद झाला तो पुन्हा न उघडण्यासाठीच... “no....! जयदेव ? जयदेव ? जखोबा...?” विश्वास दारावारती जोरजोरात थापा मारु लागला..परंतु दरवाजा काही उघडण्याचे नाव घेत नव्हता... “shitt..! shitt !! ते तिघेही आतमध्येच राहिले....संध्या...आपल्याल ा काहीतरी कराव लागेल...”
विश्वास दरवाज्यावरती थाप मारून थकला “आपण बाहेरून त्यांची काहीच मदत करू शकत नाही संध्या....काहीच नाही...आपण जयदेव आणि जखोबा दोघांनाही गमावून बसलो आहोत...” विश्वास निराश होऊन खाली तिथेच पायरीवरती डोक्याला हात लावून बसला होता कि संध्याला काहीतरी आठवले “विश्वास तुला आठवत जखोबा त्या देवाबद्दल त्या काळ्या कपड्यात बांधलेल्या देवाबद्दल काहीतरी सांगत होते कि जर ते देव मुक्त झाले तर...काहीतरी मदत होऊ शकते त्यांना...बाबाना !!” अखेरीस संध्याने जखोबाचा आपले पिता म्हणून स्वीकार केला होता विश्वासने नजर उचलून भरल्या डोळ्यांनी तिच्याकडे पाहिले... “संध्या...! तू...! हं...ते गाठोड...पण ते कस शक्य आहे ? त्याबदल आपल्याला काहीएक कल्पना नाहीये कि ते कुठे असेल, तसेही जखोबा म्हणाले होते कि ते या वाड्यातच त्याने कुठेतरी दडवून ठेवले असणार...पण कुठे ?आतमध्ये जायचा आपला मार्ग मात्र बंद झाला आहे...कुठे असेल ते ?” विश्वास विचारात पडला...विजांच्या जोरजोरात होणाऱ्या लखलखाटीमध्ये संध्याची नजर थेट त्या विहिरीवरती पडली...जिच्या आसपास जरी गेल तरी ती मायावी विहीर आपली माया दाखवत असे... तोच संध्याने विश्वासच्या खांद्यावरती हात ठेवला...विश्वासने वळून संध्याकडे पाहिले तेव्हा संध्याने तोच हात उंचावत बोटाने ती विहीर दर्शवली आणि म्हणाली... “तिथे...! तिथे असू शकतात ते बंदिस्त देव...!” विजेंच्या चमकणाऱ्या प्रकाशात ती विहीर अगदी स्पष्ट नजरेस पडत होती. “मला वाटत मी तिथे जायला हव...! हाच एक शेवटचा मार्ग आहे आपल्याकडे संध्या...!” विश्वास संध्याच्या खांद्यावरती हात ठेवत म्हणाला कि तोच वाऱ्याच्या घोंगाव्यासकटच त्याच्या कानी एका गोंगाट्याचा, लोकांच्या जमावाचा आवाज ऐकू आला..विश्वास आणि संध्या दोघांनीहि त्या आवाजाच्या दिशेने पाहिले तेव्हा मशालीच्या लवलवत्या भडकत्या ज्योतिनी संपूर्ण जंगल पिवळ्या तांबड्या प्रकाशानी उजळून निघाल होत... हीच ती मदत होती शेवटची मदत होती जी जखोबाने सरपंचाकडे मागितली होती. परंतु त्या सर्वाना यायला ते अंतर पार करयला आणखीही वेळ लागत होता. आणि मरण अगदी तोंडाशी येऊन ठेपल होत.
क्रमश: मित्रहो काही कारणास्तव कथा पूर्ण होऊ शकली नाही...उर्वरित अंत उद्या नक्की पोस्ट होईल माफी असावी .
अंतारंभ
लेखक : कनिश्क हिवरेकर .....
जयदेवने आपल्या नजरेसमोर अडवलेला हात बाजूला काढला तसा त्याच्या नजरेसमोर काळजाचा ठोका चुकवणार दृश्य होत...साक्षात अघोऱ्याच पोकळ सैतानी शरीर आपला भाजणार हात हातात घेऊन तडफडत उभ होत जयदेवने आपल्या उभ्या आयुष्यात अस काहीच पाहिलं नव्हत. त्या दृश्याने जयदेवच्या अंगाला कंप सुटला...भीतीने , धास्तीने त्याच काळीज घश्यात येऊन अडकल होत...परंतु हे काय घडले ? कसे घडले...अदृश हवेत उपस्थित गोविंदपंताच्या क्रोधाग्नीची ज्वाला संपूर्ण खोलीत जाणवू लागली...पाहता पाहता अक्षरशः भिंतीच्या कान्याकोपऱ्यामधून झळया निघू लागल्या वाफा निघू लागल्या...आजवर ज्या सैतानासमोर कुणीही टिकू शकले नाही त्याने जयदेवला एक साधारण स्पर्श केला त्याचा संपूर्ण हात राख राख झाला...जयदेवने आपल्या स्वतःच्या अंगावर शरीरावर एक नजर टाकली....दुसरा हात पाहण्यासाठी जयदेव मागे वळला...जाळ्या, कोष्ट्या सर्व बाजूला होऊन जी गोष्ट जयदेवच्या हातामध्ये आली होती ती गोष्ट...ती जागा होती....देवाच देवघर....ज्याच्या चारीही बाजूनी साखळदंड होते. मधोमध काळ्या कापडामध्ये काहीतरी गाठ बांधून ते ठेवण्यात आल होत. जयदेवने परत वळून समोर पाहिले...तो सैतान तिथेच तडफडत होता...जयदेवाला कळून चुकले.....परमेश्वराने जणू कौल दिला... “मी आहे...!माझ अस्तित्व अजून हि आहे...!”
“पsss...र....” त्या खोलीच्या कंपनात गोविंदपंताचा दबका आवाज येऊ लागला त्याला ते नाव घ्यायचं होत परंतु सैतानाला बधीत करणार परमेश्वराच नाव हे त्याच्या मुखात येत नव्हत....रागारागात देवाच नाव हि त्याच्या जिभेला चटके बसवत होत... “तू...! तू पुन्हा.... मध्ये येऊ नकोस ...माझ्या...! तुझे मंत्र , तुझी लीला ,तुझी क्रीडा सर्व उच्चारून या कंठात आता विष भरल गेलय.....बहिष्कार आहे तुझा माझ्या राज्यात तिथेच सडून रहा तू....! तिथेच सडून रहा तू....! हsssट्ट...” जयदेवाच्या कानांवरती तो अदृश हुकुमी आवाज पडू लागला होता जयदेवला समजले आपण यावरून जराहि हात बाजूला काढला तर मृत्यू निश्चित आहे... जयदेवामध्ये जणू परमेश्वराच्या पवित्रस्पर्शाने हिंमत भरली गेली...जयदेवास शब्द फुटले...त्याचा हि आवाज त्या खोलीमध्ये गरजू लागला... “तू...! तू जो कोणी असशील...! तुझ्या नजरेसमोर सर्व उघड आहे...! देवाची शक्ती तेव्हाही प्रबळ होती आणि आज हि आहे...तुला भय आहे तुझ्या विनाशाच ....पहा तुझ्या प्याद्याची तुझ्या गुलामाची काय अवस्था आहे... तुझा अंत जवळ आला आहे....तुझा अंत जवळ आला आहे...ऐकतोयस ना...” जयदेवपुढे काही बोलणार कि तेवढ्यात “ ह्याsss...” एका क्षणात असा जोरदार हवेचा झपटा त्या खोलीत जो पसरला त्या झपाट्याने एक विचित्र गोष्ट घडली...जयदेवला त्याचक्षणी संवेदना जाणवल्या जसे कि त्याच्या हाताच्या स्पर्शात असलेला तो देवाचा देव्हारा तिथून नाहीसा झाला होता. आणि बघता बघता खोलीच्या प्रत्येक कोपऱ्यामधून आगीचे लोट न लोट उठून येऊ लागले होते. “खीहिहीईsss....कुठेय रे तो....ह्याहाहाहाsss....कुठ
***
“सध्या..वेळ नाहीये पोरी माझ्या स्पष्टीकरणास...आता एकमात्र उरल आहे ते म्हणजे तुमचा जीव वाचवणे..संध्या पोरी त्याचा क्रोध आता अनावर झाला आहे....तो कुठल्याहि क्षणी तुम्हाला मला किंवा जयदेव इतर कुणालाही वाटेत जो येईल त्याला मृत्यूच्या दारात तो ढकलून देईल....आपल्याला लवकरात लवकर इथून निघायला हवय...चला माझ्या सोबत आता वाड्यात थांबणे धोकादायक आहे...चला लवकर इथून...मी याचा नंतर बंदोबस्त करेन...”
“ तुम्ही....? तुम्ही माझे बाबा आहात आणि...आजवर मी हेच समजत राहिले कि माझे वडील माझ्या लहानपणीच....” संध्या जड पावलांनी जखोबाच्या दिशेने येत आसवे भरलेल्या डोळ्यांनी पाहत अगदी हुंदक्याच्या आवाजातच उद्गारली... “पोरी...! मी तुझा खूप मोठा गुन्हेगार आहे...तुझ्या सर्व प्रश्नांना मी उत्तरे देईन....मी माझी सावित्री गमावून बसलो आहे पण मला माझी माझ्या सावित्रीची शेवटची आठवण तिचा शेवटचा अंश नाही मला गमवायचा...चला विश्वासराव...ऐका माझ...लवकरात लवकर या वाड्यातून बाहेर चला...”
“संध्या ते म्हणतायत ते अगदी बरोबर आहे...!” अनुला उचलत विश्वास म्हणाला... “चल...! हि योग्यवेळ नाहीये...” डोळे पुसत संध्या उत्तरली... “हं...ठीक आहे चला...” तसे जखोबा त्यांना पुढे घालत स्वतःमागून निघाला...जसे ते तिघेही त्या खोलीमधून बाहेर निघाले... “ थांबा ! आपण काहीतरी विसरतोय...! जयदेव कुठे राहिला ? तो कुठेय ?”
तोच समोरून ते दोन्ही राखणदार जखोबाजवळ धावत आले... “ मालक....! आव त्ये...! त्येsss...”
“त्ये साहेब....त्या येड्या गंग्याच्या माग माग गेले हत...आम्ही त्यांची इथ वाट बघतोयसा पण अजून त्यांचा काय पत्त्या नाय...” त्यांच्या पैकी एकजण म्हणाला... “कायsss? गंग्या आणि जयदेव दोघेही नाहीसे झाले ? कसे ? कुठे ?” विश्वास त्यांच्यावरती ओरडला... “साह्येब आवsss...आम्ही त्यांना नको म्हणल पण त्यांनी काय ऐकल नाय...अन त्या तिकड त्या अंधारान त्या कोपऱ्यात गेले कंदील हातात घेऊन....” जखोबा विश्वास दोघेही त्या दिशेनी अंधारात कोणी दिसते का ते पाहू लागले तोच जखोबा त्या दोघांना म्हणाला... “ए ह्ये बघा ! आत्ताच्या आता तुमच्या पैकी कोणतरी गावात जा! अन सरपंचाला कळवा के जखोबान निरोप धाडलाय...अन बस एवढच म्हणा...
“वेळ आलीया...जखोबान शेवटची मदत मागलीया...” तेवढ आपल्या ध्यानात ठेऊन तो गडी वाड्यातून बाहेर निघाला पावसात चिखलात विजांच्या कडकडाटीतच तो गावाच्या दिशेनी सरपंचाकडे धावत निघाला...
धावता धावता त्याला जाणवले कि त्याच्या मागावर अगदी त्याच्या मागोमाग एखाद्या पिसाळलेल्या जनावरांसारख ते त्याच्यावर धावा बोलून जात होत. परंतु त्याने आपले पाय मात्र थांबवले नाही...उरात आग होत होती, घश्याला कोरड पडली होती पोटरीत गोळे येत होते पायात काटे बोचत होते पण तरीदेखील तो थांबला नाही...कारण काही अंतरावर मदत होती. त्याचाच जोडीदार इथेच वाड्यातच जखोबाजवळ थांबला होता... “ जयदेवsss...?” विश्वास जखोबा दोघेही मिळून जयदेवच्या नावाने त्याला पुकारत होते. पण जयदेव जमिनीवरती आगीच्या भडकत्या धगधगत्या ज्वालेमध्ये होरपळून बेशुद्ध पडला होता. “जयदेवsss....! जयदेव..!” जयदेवच्या कानावरती तो आवाज पोहोचू शकत नव्हता... त्याच्या शरीरातदेखील कसलाच त्राण उरला नव्हता...अंगावर जागोजागी होरपळून निघाल होत. तोच कोणीतरी अलगद त्याच्या पाठीवरती आपला हात ठेवला...त्या स्पर्शामध्ये एक थंडावा होता. बंद पडलेल्या त्याच्या मस्तकाच्या सर्व चेतना तिथेच जणू तडतडून जाग्या झाल्या त्याला आपले शरीर जाणवू लागले..हाताची बोटे पाय मान खांदे सर्वकाही अशक्तपनामुळे जयदेवच्या नजरेत फरक पडला होता आजुबाजूच सर्व त्याला अंधुक दिसत होत... “उsssठ...!” जयदेवला त्याच्या कानावर एका लहान मुलीचा आवाज ऐकू आला... “क...कोण...?” जयदेव थरथरत्या ओठांनी उद्गारला... “ उठ...तुझ कर्म इथच नाय र संपत गड्या...” जयदेवच्या डोळ्यांवरची झाक उतरली त्याने समोर पाहिलं कि एक लहान मुलगी आणि एक माणूस त्याच्या समोर उभे त्याला पाहत होते... “माझी पोर भेटली मला...माझी पोर भेटली...” समोर दोन पांढरक्या सावल्यामध्ये दोन पवित्र आत्मे जयदेवच्या नजरेस पडले....तो गंगाराम आणि त्याची मुलगी छ्की होती “तुम्ही दोघ ? कसे...?” त्यावर छकु त्याला म्हणाली... “आमास्नी त्या बाईनी पाठवल हाय...”
“काय? कोण बाई ?कुणी पाठवल ?” जयदेव धापा टाकतच त्या दोघांशी बोलण्याचा प्रयत्न करत होता परंतु गंग्याने त्याच्याकडे पाहून बस एवढच म्हटल “त्या भेटतील तुम्हाला...जे व्हायचं ते होऊन जाईल....” मुक्त होण्याच्या शेवटच्या क्षणी त्यांनी जयदेवला आधार दिला...त्या दोघांनीही जयदेवला पाहून आपले हात जोडले व शेवटचा निरोप घेत गंगारामने छ्कीचा हात आपल्या हाती घेतला. ते दोघेही पांढऱ्याशुभ्र धुराच्या वलयात विरघळून गेले...त्या सोबतच आगीच्या ज्वालाही विरळ होऊ लागल्या... विझू लागल्या... “जयदेवsss....?” त्या आगीचे लोट कमी होताच जयदेवला विश्वासचा आवाज ऐकू आला... “ विश्वास ??” जयदेव हाताच्या आधारेच जागेवरती उठून उभा राहिला..एकवेळ त्याने मागे वळून पाहिले पण तिथे तो देव्हारा नव्हता...आतामात्र धोका वाढला होता. लवकरात लवकर विश्वास संध्या अनु तिघानाही या वाड्यातून बाहेर घेऊन जायला हव...जयदेवच्या मनात तो विचार आला जयदेवने खाली पडलेला अर्धा फुटलेला कंदील हातात घेतला त्याची ज्योत आणखीहि जळत होती त्याने तो तसाच उचलला व हेलकावे घेत भिंतीच्या आधारे दरवाजे उघडून त्या दोन्ही खोल्यामधून बाहेर निघाला... “वव...विश्वासsss...?” विश्वासची नजर त्या कोपऱ्यात असलेल्या दाट काळोखात पडली तिथून प्रकाश बाहेर पडत होत त्या उजेडातच हेलकावे घेतच जयदेव दरवाज्यातून बाहेर पडला... “जयदेव....जयदेवsss....” विश्वास धावतच जयदेवच्या जवळ गेला आणि त्याने त्याला आपल्या खांद्यावरती झेलले... “काय झाले तुला जयदेव ? हेय ? तू ठीक आहेस न ? जयदेव ?” जयदेवाने विश्वासला इथून निघण्याचा इशारा केला... “चल...स्स्सहः...चल विश्वास...इथे धोका....इथे धोका आहे आपल्या सर्वांच्या जीवाला....लवकर चल...”
“विश्वासराव घाई करा...जयदेव अगदी बरोबर म्हणतायत आपण लवकरात लवकर इथून निघायला हव नाही तर...” जखोबा आपल वाक्य पूर्ण करणार होताच कि संपूर्ण वाड्याच्या दाही दिशांना एक क्रूर भयंकर अस छद्मी हास्य घोंगावले....
आपापल्या जागेवर उभे विश्वास जयदेव जखोबा संध्या सर्वांच्या नजरावाड्यामध्ये चारीही बाजूनी त्या आवाजाच्या दिशेने घुमल्या... पाहता पाहता वाड्याचा मुख्य दरवाजा त्या चौघांच्याहि डोळ्यासमोर...
“क्र्रर्र्रsss क्र्रर्र्र्र......” आवाज करीत बंद झाला....आमावस्येची मध्यरात्र झाली होती...एक एक करत वाड्याच्या अवतीभवती नाना तऱ्हेचे श्वापदे जमून मृत्यूची विव्हळ घालू लागले....
“परमेश्वरा...!” जखोबाच्या तोंडून भीतीने भरपूर्ण असे देवाच स्मरणकरणारे उद्गार बाहेर पडले... “ बा...! जखोबा...काय आहे हे ?” अनुला छातीशी कवटाळून संध्या जखोबास बाबा म्हणणार होतीच कि तिने आपले शब्द अडवले... जखोबाचे जणू कान तरसून गेले होते ते ऐकायला पण सध्या काळ वेगळाच होता...
“आपण अडकलोय... त्याच्या जाळ्यात...सोबत रहा....काहीही झाले तरी वेगळे होऊ नका...जखोबाने आपल्या खिशातून काही अंगाऱ्याच्या पुड्या बाहेर काढल्या...आणि एक एक सर्वांच्या हातामध्ये दिल्या...
“ हि सर्वांकडे चिमुटभरच आहे...याचा वापर अत्यंत गरज पडेल तेव्हाच करा...! व्यर्थ घालवू नका...आणि अनुची काळजी घ्या..या सर्व घेराव करून उभे राहा...” जखोबा म्हणाले...तसे विश्वास जयदेव संध्या आणि तो राखणदार सर्व जखोबाच्या मागे एकमेकांच्या पाठीला पाठ लाऊन उभे राहिले विश्वास आणि संध्या दोघांनीहि अनुचे हात घट्ट धरले होते.... “पप्पा...! ,मला भीती वाटतेय...!” अनु म्हणाली... “ नाही बाळा ! काही नाही होणार हं...तू बस डोळे बंद करून रहा बर...मम्मा आहे न जवळ....” संध्या अनुला म्हणाली व तिने चिंतेच्या नजरेने विश्वासकडे पाहिले...
“याला संपवण्यासाठी काहीही मार्ग नाहीये का जखोबा ? याच्या पासून सुटकाहि नाहीये का होणार...?”
“याला संपवण्यासाठी आपल्याला सर्वप्रथम त्या देवांना त्या काळ्याकपड्यामधून बाहेर काढावे लागेल...जेणे करून त्यांच्या उपस्थितीमध्ये त्याची शक्ती कमजोर पडेल अशक्त होईल...तेव्हाच मला माझ कार्य कराव लागेल...पोरी तुझ्या आईपासून झालेल्या विरहामध्ये मी माझ आयुष्य देवचरणी घालवले...पंडिताची पदविका एक वेगळच पवित्रसिद्ध प्राप्तीच शिक्षण मी घेतल...पण तिथे काही दिवस त्या सेवेत त्या लोकांच्या आश्यात राहिल्यावर मला अचानक समजले कि गावामध्ये असा असा प्रकार घडतो आहे...त्याचा छडा लावण्यासाठी मी इथे परत आलो...पण तोपर्यंत मला खूप उशीर झाला होता....”
“थांबा ! तुम्ही आत्ता काय म्हणालात ?” जयदेवच्या चेहऱ्यावर अचानक आश्चर्याच एक प्रश्नचिन्ह उभे राहिले... “होय जयदेव बरोबर ऐकलत तुम्ही....” जखोबा म्हणाला.... “ नाही नाही त्याच्या आधी ते काळे कापड त्यातील देव...असच काहीतरी म्हणालात तुम्ही हो न ?” “हो ! पण तुम्हाला त्या बद्दल काही माहिती ?” तोच जयदेवला त्याच्या डोळ्यासमोर काही क्षणापूर्वी घडलेला प्रसंग आठवला....
“मी त्या देवाऱ्यास स्पर्श केला होता. ज्या मध्ये ते काळ गाठोड होत....” जयदेव तो प्रसंग आठवतच उद्गारला... “काय ? कुठे ?” जखोबा जयदेवकडे पाहत म्हणाला... “त्याच अंधारात पाहिलं होत मी..जिथे मी बेशुद्ध पडलो होतो...पण आता ते देवघर तिथे नाहीये...तिथून त्या नराधमाने ते नाहीस केल...” जयदेव बोलता बोलता थांबला आणि त्याच्या एकट्याच्याच नजरा वाड्याच्या भिंतीवरती फिरू लागल्या...कारण एक एक कोपरा कोपरा घेत...वाड्यातल्या सर्वच्या सर्व मशाली दिवे हळू हळू विझत होते...त्याची ज्योत आपोआप कमी होत गेली... “विश्वास...? HE is here...!” बघता बघता वाड्याच्या चारीही कोपऱ्यातून काळोख एखाद्या मायावी जाळ्याप्रमाणे त्या सर्वाना घेरू लागला.. “मी म्हणेन त्यावेळी तुम्ही सर्वजण वाड्याच्या दरवाज्याच्या दिशेनी धावत जा...आणि चुकूनहि मागे वळू नका...” जखोबा म्हणाला... “ मालक...मी तुम्हाला सोडून जाणार नाय...! आजवर स्वतासाठी लय केल...पण आता दुसऱ्यासाठी करायची वेळ आली हाय..मी इथच थांबेन तुमच्याजवळ...” तो गडी जखोबाच्या सोबत राहण्याचा हट्ट करून बसला.... “बर..ठीक आहे...! जयदेव , विश्वास संध्या ? मी जेव्हा म्हणेल त्याचवेळी दरवाज्याकडे धावायला सुरुवात करा...जखोबा म्हणाला...जखोबाने आपले दोन्ही डोळे मिटून घेतले... “ओंम...नमः रक्षाय भवती सिधसौ..नमः तस्से...पिशाच्च वीरधौर” जखोबाच्या मंत्रांच्या उच्चारामधून निर्माण होणारी उर्जा जणू त्या काळोखाच्या वेढ्याला झुंज देऊ लागली होती त्यामंत्रांनी अक्षरश: त्या कालोखास रोखून धरले होते. चर्रर चर्रर झ्र्र्र झ्र्र्र करतच त्या काळोखातून दरवाज्यापर्यंत जाणारी वाट अगदी उजळून निघाली... *** “सरपंचsss...??सरपंचsss....
मला जखोबान पाठवलय...अन त्येनी हे बी म्हटल हाय...कि हि शेवटची वेळ आलीय...मदत करा...”
“निघा ! निघा इथून...मी याला जास्त वेळ थांबवू शकणार नाही. निघा जा इथून जाsss...” तसा समोरचा दरवाज त्या काळोखास न जुमानता परतएकदा उघडला गेला...विश्वास जखोबाला चालण्याचा आग्रह करत होता परंतु जखोबा त्यां स्थिर मंत्रोच्चारमुळे धरणीद्वारे आपली शक्ती मिळवून तिथेच घट्ट उभा राहिला होता...तोच विश्वास, अनु, संध्या आणि जयदेव चौघेही धावत त्या दरवाज्याच्या दिशेने जाऊ लागले तसे विश्वासने प्रथम संध्याला बाहेर ओढत घेतले आणि स्वतःहि बाहेर पडला पाठोपाठ जयदेवहि बाहेर निघणार होताच कि तोच इकडे जखोबाच्या पायचा कसल्यातरी काळ्याभोर गोष्टीने आपल्या सुळ्यानी मांसात रुतवून चावा घेतला आणि तोच जखोबाचे ध्यान भरकटले आणि त्यांचे दोन्ही हात सुटले मंत्रामध्ये भंग पडला...आणि यावेळी जो दरवाजा बंद झाला तो पुन्हा न उघडण्यासाठीच... “no....! जयदेव ? जयदेव ? जखोबा...?” विश्वास दारावारती जोरजोरात थापा मारु लागला..परंतु दरवाजा काही उघडण्याचे नाव घेत नव्हता... “shitt..! shitt !! ते तिघेही आतमध्येच राहिले....संध्या...आपल्याल
विश्वास दरवाज्यावरती थाप मारून थकला “आपण बाहेरून त्यांची काहीच मदत करू शकत नाही संध्या....काहीच नाही...आपण जयदेव आणि जखोबा दोघांनाही गमावून बसलो आहोत...” विश्वास निराश होऊन खाली तिथेच पायरीवरती डोक्याला हात लावून बसला होता कि संध्याला काहीतरी आठवले “विश्वास तुला आठवत जखोबा त्या देवाबद्दल त्या काळ्या कपड्यात बांधलेल्या देवाबद्दल काहीतरी सांगत होते कि जर ते देव मुक्त झाले तर...काहीतरी मदत होऊ शकते त्यांना...बाबाना !!” अखेरीस संध्याने जखोबाचा आपले पिता म्हणून स्वीकार केला होता विश्वासने नजर उचलून भरल्या डोळ्यांनी तिच्याकडे पाहिले... “संध्या...! तू...! हं...ते गाठोड...पण ते कस शक्य आहे ? त्याबदल आपल्याला काहीएक कल्पना नाहीये कि ते कुठे असेल, तसेही जखोबा म्हणाले होते कि ते या वाड्यातच त्याने कुठेतरी दडवून ठेवले असणार...पण कुठे ?आतमध्ये जायचा आपला मार्ग मात्र बंद झाला आहे...कुठे असेल ते ?” विश्वास विचारात पडला...विजांच्या जोरजोरात होणाऱ्या लखलखाटीमध्ये संध्याची नजर थेट त्या विहिरीवरती पडली...जिच्या आसपास जरी गेल तरी ती मायावी विहीर आपली माया दाखवत असे... तोच संध्याने विश्वासच्या खांद्यावरती हात ठेवला...विश्वासने वळून संध्याकडे पाहिले तेव्हा संध्याने तोच हात उंचावत बोटाने ती विहीर दर्शवली आणि म्हणाली... “तिथे...! तिथे असू शकतात ते बंदिस्त देव...!” विजेंच्या चमकणाऱ्या प्रकाशात ती विहीर अगदी स्पष्ट नजरेस पडत होती. “मला वाटत मी तिथे जायला हव...! हाच एक शेवटचा मार्ग आहे आपल्याकडे संध्या...!” विश्वास संध्याच्या खांद्यावरती हात ठेवत म्हणाला कि तोच वाऱ्याच्या घोंगाव्यासकटच त्याच्या कानी एका गोंगाट्याचा, लोकांच्या जमावाचा आवाज ऐकू आला..विश्वास आणि संध्या दोघांनीहि त्या आवाजाच्या दिशेने पाहिले तेव्हा मशालीच्या लवलवत्या भडकत्या ज्योतिनी संपूर्ण जंगल पिवळ्या तांबड्या प्रकाशानी उजळून निघाल होत... हीच ती मदत होती शेवटची मदत होती जी जखोबाने सरपंचाकडे मागितली होती. परंतु त्या सर्वाना यायला ते अंतर पार करयला आणखीही वेळ लागत होता. आणि मरण अगदी तोंडाशी येऊन ठेपल होत.
क्रमश: मित्रहो काही कारणास्तव कथा पूर्ण होऊ शकली नाही...उर्वरित अंत उद्या नक्की पोस्ट होईल माफी असावी .
MARATHI HORROR STORY ALL PARTS ,BHAYKATHA AGHORI,
No comments:
Post a Comment