#मी_तुमची_वाट_पहाते
********************
पानांची नक्षी करून पसरली होती.मी धावतच...काॅरिडाॅर
मी morgue जवळून जाताना बांगड्यांची मंजुळ किणकिण
त्याबरोबर एक मधुर हाक...
"डाॅक्टर sssss
अं sssssssss कोण ...??
मी असे बोलत वळून पाहिले. तर तिथे खुर्चीवर एक स्री
बसली होती.दिसायला खूप गोड,,,हसणे पण गोड...
हा चेहरा कुठेतरी बघितल्या सारखा होता.आठवेचना
ऐका नं... खूप वेळ तुमची वाट पाहिली.मी जनरल वाॅर्डला
ॲडमीट आहे. तुम्ही आलाच नाहीत...
अं...हो आज खूप पेशंट होते.मी दोन दिवस राऊंडला आलोच
नाही.वेळच नाही झाला.आता खूप थकलोय...
हरकत नाही.आता मी घरी चाललेय...
का...??? डिस्चार्ज मिळाला आहे का???
हो.
मग इथे का बसलात बरोबर कुणी नातेवाईक नाहीत का???
येतील सर.. काही प्रोसिजर पूर्ण कराव्या लागतात नं...
अं हो...काळजी घ्या...
आता कसली काळजी करणार डाॅक्टर??
मी हसून तिच्याकडे बघितले.मला ती अतिशय आवडली होती.
उद्या जनरल वाॅर्डला आधीच गेले पाहिजे...मी कपाळावरचे
केस बाजूला सारत ...अरे पण ही उद्या नसणार ओह...
कुठे राहता तुम्ही...???
आता इथेच राहणार...( ती गोड हसतच.. डोळ्यात मिश्कील भाव होते...)
अं.. sssssssss
ती खळखळून हसत होती...तिलाही मी आवडलो होतो तर
Oh ssss very interesting...
(मी हसतच) पण मला हा असा उशीर होतो...मग..( मी डोळे
मिचकावतच...)
मी वाट बघेन तुमची...(ती गोड हसतच...मी तिच्या ओठांवर
असणाऱ्या तिळाकडे बघतच राहिलो...)
अचानक त्या morgue चा वाॅर्ड बाॅय आला...तो गुटका
खात होता...मी त्याला ओरडलो... तिच्यापुढे शायनिंग मारत
होतो.ती मात्र एकटक मला निरखत होती..मला थोडा संकोच
वाटला मी ताडताड निघून गेलो.आज वेगळ्याच धुंदीत होतो.
शिळेवर गात होतो..मागे वळून बघितले तर वाॅर्डबाॅय खुर्चीवर
बसला होता.ती तिथे नव्हती.
मी गाडी स्टार्ट करून शिळेवर गात होतो.
" कितनी हॅंसीन हो तुम....कितनी हॅसीन...कि...त..नी
जाम खूश होतो मी...
सकाळी हाॅस्पिटलमध्ये गाडी घेताना..मध्येच ॲम्ब्युलन्स आडवी...कुणीतरी पेशंटची डेडबाॅडी आत ठेवत होते.
नातेवाईक रडत होते.सहज गाडी बाजूला घेताना लक्ष गेले
तर ती डेडबाॅडी तिचीच होती...जी मला रात्री भेटली...
मी गाडीतून खाली उतरलो...
चौकशी केली...
तिचा भाऊ माझ्या अंगावर धावून आला...तीन दिवस वेळ
झाला नाही रोज आम्ही वाट बघत होतो तुमचीच...पेशंट
वाचला असता हो...तो मला मारायला लागला...मला कसलेच
भान नव्हते.मी तिच्या चेहऱ्याकडे बघत होतो.
वाॅर्डबाॅयने...प्रकरण सावरले... ॲम्ब्युलन्स चे दार बंद झाले.
आज माझ्या चुकीमुळे पेशंट गेला...हा पेशंट वाचायला हवा होता.मी खूप दु:खी झालो...पण मी एकटा कुठे कुठे बघणार??
शांतपणे ॲम्ब्युलन्स निघून गेली...पण ती माझ्या ह्रदयात
कुठेतरी वेदना देऊन...
आजही मला उशिरापर्यंत पेशंट होतेच... साडेबाराच्या सुमारास
मी पेशंट संपवून घरी जाताना... morgue जवळ...
तोच मधुर आवाज
" डाॅक्टर....
हो तीच...ती तर expired झाली मग...???
ती हसून बघत होती....बोलली
सांगितले नं मी तुम्हाला...मी आता इथेच तुमची वाट पहाणार.
मेडिकल सायन्स ने मला जोराचा झटका दिला... आजपर्यंत
इतकी प्रेते फाडली ठाम विश्वास होता...पण आज...हो
आज...भुते असतात...
मी पळतच सुटलो....
मागून खळखळून हसण्याचा आवाज...
मी गेटपाशी आलो...त्या जनरलवाॅर्डची नर्स मला भेटली.
मी तिला सांगितले....ती बोलली...
सर...ती तुमची खूप वाट पहात होती.तुम्ही एकदाच तिला
वरवरच बघितलेत...उद्या येतो म्हणून निघून गेलात...ती
वाचली असती हो..तुमची खूप वाट बघत होती...कालच
दुपारी वारली...
का. Sssssssss य..????
म्हणजे काल रात्री पण मला morgue जवळ,????
सर काल तिची डेडबाॅडी morgue मध्ये होती...
ओह...नो...
मी कसाबसा घरी पोचलो...
पण आता प्रत्येक रात्री बाराच्या नंतर मी तिथून जाताना
हाक येतेच...
,डाॅक्टर....मी तुमची वाट बघते हो....
आता मी लवकरच घरी जातो...
पण...
काहीतरी आहे... नक्कीच आहे....
समाप्त
निशा सोनटक्के
No comments:
Post a Comment