***********(भयकथा)
************************************
काढली आणि निघालो.आज अमावस्या,सूर्यग्रहण, संपूर्ण
दिवस उदास गेला.ढगाळ वातावरण.आजचा दिवस काळी
जादू करणारे,चेटके लोक यांच्या दृष्टीने फार महत्वाचा असतो.
हे लोक, जलाशयात एका पायावर उभे राहून त्या विद्येची
आराधना करतात.थोडक्यात काय तर आजचा दिवस वाईट
दिवस म्हणून ओळखला जातो.
मी शिवाजी पार्क कॅडलरोड वरून चाललो होतो.रस्त्यावर
बऱ्यापैकी वर्दळ होतीच पण का कोण जाणे..एक भितीचा
शहारा आला.मी चाललो होतो त्या उजव्या बाजूलाच एक
गल्ली आहे.ती थेट स्मशानात जाते.
मी करकचून ब्रेक दाबला... गाडीसमोर एक वृध्द स्री,,हात
करुन थांबवत होती.कपाळावर एक रूपाया एवढे ठसठशीत
कुंकु,गळ्यात काळी पोत,नऊवार साडी,एकदम सालस,
चांगल्या घरातील स्री वाटत होती...
" काकू काय झाले???"
" बाळा मला घरी सोडतोस का..???"
" तुमचे घर कुठे आहे...???"
ती स्री काही बोलेच ना.पण,तिच्यागळ्यात एक कार्ड होते.
त्यावर पत्ता,फोन नंबर होते...या व्यक्तीला. अल्झायमर
झाला असावा.कारण त्या कार्ड वर स्पष्ट लिहिले होते.
"या व्यक्ती आजारी आहेत.यांना काही आठवत नाही तरी
कृपया खालील पत्यावर सोडावे.."
मी त्यांना दरवाजा उघडून दिला.त्या आत बसल्या.पण
गाडीत एक जळका कुबट दर्प येत होता.जसा स्मशानात
प्रेत जळताना येतो अगदी तसाच...
त्या बोलत होत्या.आज कामवाली येणार नाही.ओटा तसाच
आवरायचा पडलाय.भांडी पडलीत.दूध विरजण लावून ठेवायचे
आहे.अन्न झाकून फ्रीजमध्ये ठेवून द्यायचे आहे.
तुमची सूनबाई असेल की...???
तिला सवय नाही.मीच करते.
मी आरशात बघितले.तर आरशात त्या काकू दिसल्याच नाहीत.एक घाणेरडा दर्प...मला सहनच होत नव्हता..
मी मागे पाहिले तर काकू बसलेल्या होत्या...
एवढ्या रात्री इकडे कुठे गेला होता???
मलाच समजत नाही. मी इकडे कशी काय आले.
मी परत आरशात बघितले...मागे कुणीच नव्हते.. एवढ्यात
त्यांच्या पत्यावर आम्ही पोचलो.तो दर्प,ते आरशात न दिसणे,
मला कसेतरीच वाटले.मी कारचा दरवाजा उघडला...काकू
हळूहळू चालत पुढे निघून गेल्या..मला त्यांच्या मागेच जायची
भीती वाटली..कारण ते चालणे हवेत तरंगत जावे असेच
काहीसे विचित्र....हे नेमके काय आहे.माझ्या लक्षात आलेच.
मला परत जायला पण भीती वाटली..समोरच वाॅचमन
होता..मी त्याला त्या पत्यावरील माणसाला भेटायचे आहे
सांगितले...त्याने फोन लावला...दहा मिनिटे अशीच गेली.
हवेत गारठा होता.. अनामिक भीती होतीच...तो काकूंचा
मुलगा असावा.मी माझी ओळख करून दिली.आणि घडलेला
प्रकार सांगितला...
तर तो बोलला...
ती माझी आईच होती.. अचानक हार्ट ॲटॅक ने वारली...
किचनमध्ये पसारा पडला होता.कामे करत होती.धाडकन
कोसळली..आणि ऑन द स्पाॅट गेली...तिलापण समजले
नसेल...
आता अमावस्या आली की ती स्मशानाच्या गल्लीशी लोकांना
लिफ्ट मागते..इथे आलीकी दिसत नाही...आता तुम्ही हे
सांगणारे तिसरे आहात...मी तरी काय करू सांगा..??
माणसाला मृत्यू न समजताच घेऊन गेला की तो आत्मा
आपले अस्तित्व नाही हे मान्यच करत नाही..भटकत राहतो.
आमच्या घरात सुध्दा रात्रीची भांडी राहिली तर भांड्यांचा
आवाज येतो.. किचनमध्ये कुणीतरी आहे जाणवते...
बघा अंगावर काटा आला...
आम्ही किचन चकाचक करून भांडी घासून पुसून,मगच
झोपतो..मुलेपण घाबरतात..काय करू???
मी हे ऐकून सुन्न झालो..
घरी जायची पण भीती वाटत होती...परत काकू दिसल्या
स्मशानाकडे चल बोलल्या तर???
मी शांतपणे जिप्सी हाॅटेलकडे कार वळवली..खरी
पण
मागून आवाज आला....
माझे घर कुठे आहे....???
मागे बघण्याची हिम्मत नाही...सरळ घरीच आलो.तापाने
फणफणतच...अंग खूप दुखत होते..मी आईला उठवून सांगितले...तिने मला अंगारा लावला...क्रोसीन दिली...
पण
हा प्रसंग मी विसरू शकत नाही... निदान मेल्यावर तरी
आत्म्याने मान्य करायला पाहिजे...की ते या जगात नाहीत..
त्यांच्याबद्दल पण कुणाला प्रेम उरत नाही...अमान्य करुन
तेच भटकत राहतात.
समाप्त
निशा सोनटक्के..
फोटो... Shrinivas Joshi..
No comments:
Post a Comment