कथेचे नाव :- मी गिरीजाची मैत्रीन
लेखक :- मंदार साखरकर
भाग :- ८
सुरेखा, खुशीला बोलते थांब जाते कुठे तू. ,आईकडे बघून बोलते हीला लांब ठेवायचे ठरले होते ना मग हिला का आणले.
...
आई बोलते मी कुठे आणले विसरलीस की काय तिच्यात रक्त कोणाचे आहे.
...
सुरेखा बोलते ही सगळे वाटोळे करेल मेली. बाबांची सगळी शक्ती तर गेली आहे आता ते काही करू शकत नाही फक्त. त्यांनी ती शक्ती तिच्यात ठेवली आहे तिला शोधायला लागेल. पण ती कुठे आहे .
....
खुशी बोलते मी जाते ते तू बघ बोलून अदृश्य होते.
...
आई बोलते कंबरडे बरे आहे का नाही म्हंटले स्वतःहा वर वेळ आली की कसे वाटते म्हणून विचारले बोलून गिरीजकडे बघते काय मग. बसा सगळे चहा आणि नाष्टा करून आणते. स्वाती ती गेली कॉफी राहूदे.
...
स्वाती बोलते काय राहूदे पिऊन गेली ती.
...
गिरिजा बोलते सुरेखा एक बोलू का मी.
...
सुरेखा बोलते तेच बोलले तू आजून कशी गप्प तू बोल बाई.
...
गिरिजा बोलते तू सुरेखा म्हणजे लावण्या, खुशी म्हणजे लेखा, मुग्धा ही मुग्धा होती आता ती कोण आहे, रघुनाथ तुझे वडील म्हणजे रघुनाथ चाकण आणि महंत शास्त्री म्हणजे तुम्हचे आजोबा ना ग.
....
तेवढ्यात एक काली आकृती आत येत बोलते चुकली तू बाकीचे बरोबर बोलीस खुशी ही लेखा नाही. ती मी आहे लेखा हिची बहीण.
तू तर पूर्ण वंशावळ काढलीस आहे ग बोलून आपल्या रूपात येत बोलते. काय मग कशी आहेस ग ताई. खुशी ही लहान बहीण आहे म्हणजे तुला नाही समजणार तू पुस्तक वाच.
...
सुरेखा रागात येत बोलते तू का आली इथे, काय काम आहे तुझे.
...
लेखा बोलते मला ही पाहिजे आहे म्हणून आली मी.
...
मुग्धा बोलते आपल्यात रहा समजले नाही तर परत त्या युगात सोडून येते.
..
लेखा बोलते हो का, नवीन रूप चांगले दिले आहे आई आणि खुशीने.
..
लेखा, सुरेखाकडे बघून परत बोलते मला ही दे. नाही तर मी हिच्या मित्राना मारीन संमजले की नाही.
....
आई बाहेर येत बोलते एवढ्या वर्षाने भेटलीस आहे बहिणीला. तर भांडते कशाला घे पोहे खा पहिले आणि काय बोलत होतीस मुलांना मारायचे.
अग गिरिजा राघवला मारायचे बाकी आहेस ना. जा मार त्याला हिला हिच्या भावावर प्रेम नाही वाटत.
....
लेखा बोलते माझा भाऊ, मला हीच एक बहीण आहे. जी माझ्या समोर बसली आहे ती.
जाते मी विचार कर नाही तर त्यांना विसर मी कुठल्या थराला जाते ते तुला माहिती आहे. आई पोहे चांगले होते बोलून अदृश्य होते.
...
घरी
लेखा घरी येत बाबाना विचारते हा राघव कोण आहे.
...
रघुनाथ बोलतात तुझा भाऊ आहे तो त्याला मारून काही दिवस झाले आहे.
..
लेखा हसत बोलते तो जीवित आहे. तिथे कोणी जाऊ शकत नाही तिथे कोण गेलं तर पिशाच्च
आपली शक्ती तातपूरता गमावतो.
...
बाबा एक बोला अशोक पासून लावण्याला.
एक मुलगी झाली होती ती नाही दिसली तिथे बाकीचे होते.
...
हो बरोबर ते कोणालाच माहिती नाही आहे. अशोकच्या रक्तात पण नाही दिसले ते. काय माहिती तिने कुठे तिला ठेवले आहे. तो साहिल पण कुठे गेला आहे ते पण समजत नाही आहे.
सुरेखाच्या रक्तात पण दिसत नाही आहे.
...
बाकीचे कुठे आहेत सारंग, विक्रम, पंकज, रेवती आणि अंशुमान असतील तर बोलवा.
...
मी ह्यांचे आत्मे ह्यांच्यात घालते. नागेश जा तुझे काम कर जास्त नको बनवू.
...
रघुनाथ, लेखाला बोलतात तसे काही करू नकोस मी करार केला आहे मानवाशी.
जर तोडला तर प्रत्येक पिशाच्च मरतील.
..…
लेखा बोलते ते तुम्ही केला आहे मी नाही समजले का आणि आजोबा कुठे आहेत.
...
रघुनाथ बोलतात मला नाही माहिती मी युगानुयुगे त्यांना बघितले नाही आहे.
....
लेखा बोलते जाते मी बोलून अदृश्य होते.
...
इथे घरी
सुरेखा बोलते ही आली तर आहे. ती स्वस्त बसणार नाही.
...
खुशी येत बोलते भेटली का तुझी बहीण काय बोलते आहे.
काय गिरिजा समजले ना मी लेखा नाही ते. बाबा हीला चाकण घराण्या बाबत खूप माहिती आहे हो.
हिला दुसरी पुस्तके पण द्या वाचायला.
....
आई बोलते मुग्धा एक काम कर नागेशवर लक्ष दे.
तू बाई शांत बस एकाचे दोन नको करू बोलून तिच्या गळ्यात माळ घालते.
...
सुरेखा बोलते हे काम मस्त केलेस तू आता बोल. ती कुठे गेली मेली चिरकूट मुग्धा समोर ये पहिली किती दिवस लपशील.
....
गिरिजा, आईला बोलते दोन गोष्टींचा उल्लेख नाही आहे पुस्तकात सुभदा आणि महंत शास्त्री यांचे आणि हो चंद्रकला. मग तुम्ही कोण.
...
गिरुजाची आई कपाळावर हात मारत बोलते. तुझे मगास पासून ऐकते आहे मी. ही कोण लावण्या, ती कोण लेखा काय चालू आहे. कॉलेजला हेच करायची का बोलून कांन पकडत बोलते नशीब ह्यांना नाही बोलीसस ग ह्या चंद्रकला.
चल मेली मदतीला आणि ती दुसरी कुथे आहे.
काय बोलुन गेली ती. रुपाली चल ग मदतीला.
....
मुग्धा किचनमध्ये येत बोलते बोल आई काय मदत करू. एक मिनिट आई आली माझी बोलून तिला भेटायला जाते.
...
बाबा सुरेखाच्या आईला बोलतात जरा बोलायचे आहे मला तुमच्याशी.
...
सुरेखाची आई बोलते बोला.
..
बाबा बोलतात हे कोण रघुनाथ आहेत. ते हरिहरेश्वर चे ना, जंगलात असलेल्या घराच्या विरुद्ध दिशेला बोलणार.
...
तेवढ्यात सुरेखा बोलते बाबा तुम्हाला कसे माहिती ते.
ते फक्त आम्हालाच माहिती आहे. तुम्हाला कसे ते माहिती.
....
रुपाली येत बोलते ते संशोधक पण आहेत. असे बोलून परत किचन मध्येय जाते.
...
बाबा बोलतात सुरेखा मगाशी बोलत होती की त्यांनी तिच्यात ठेवली आहे. तर ती तुमच्या पहिल्या युगात ठेवली असणार ना. मग हिला त्या युगात पाठवून त्या नंतर ती कुठे गेली ते समजेल ना, कालचक्र योग्य वापरून हिला तिथे पाठूयाना. म्हणजे खरच त्यांनी त्यांचा अंश तिच्यात ठेवला आहे का आणि जर त्यांना तुम्हाला कायम स्वरूपी संपवायचे असेल तर हिला त्या युगात पाठवले पाहिजे.
महंत शास्त्री बद्दल, आईला बघून पुढे बोलणार तेवढ्यात बाबा गप्प बसतात.
...
खुशी येत बोलते बोला ना गप्प का बसलात मला बघून.
...
बाबा बोलतात असे काही नाही शास्त्री खरच होते का नाही म्हंटले पुस्तकात मसाला पण लेखक टाकतात ना.
..
मुग्धा जोरात आई बोलून तिला मिठी मारत बोलते बस ना मी पाणी आणते तुला बोलून किचनमध्ये जाते.
..
तेवढतात सुरेखा बाहेर येत बोलते. आई कसे आहात तुम्ही.
..
आई बोलते ठीक आहे मी. ही ने त्रास नाही दिला ना आता तुम्हाला. नाही बोलली ती बघ आली.
आता काय खुशीने शक्ती दिली आहे ना आता काय करेल काय माहिती.
..
सुरेखा कंबरेवर हात ठेवत बोलते ते बरोबर आहे बोलून मुग्धाकडे बघते.
..
मुग्धा बोलते आई हे घे पाणी पी. मी काही करणार नाही बोलून सुरेखाकडे बघते. मी फक्त त्या मुलांना धडा शिकवणार बस.
..
खुशी बाहेर येत बोलते दे शिक्षा त्यांना मी आहे. तुझ्या पाठी हां पण मी आता काही करू शकत नाही ग ही माळ जीत पर्यंत गळ्यात आहे तिथं पर्यंत.
..
मुग्धा बोलते ए डबल ढोलकी नको तुझी मदत मला. बघितले मी मगाशी कशी पलटी मारली ती गिरीजाची आई आली म्हणून नाही तर हे माझे गेले असते.
..
सुरेखा बोलते गप्प बस तू काय धडा शिकवणार त्याला. त्याला खुशीने कधीच पोलिसांच्या ताब्यात दिले आहे.
.
मुग्धा शी बाई बोलून आईला बोलते दे तो ग्लास आणि चल तुला आपली रूम दाखवते अंगोळ कर. मी जाते गिरीजाच्य आईला मदत करायला किचनमध्ये असे बोलून. सुरेखाकडे रागात बघून एक पाय जोरात जमिनीवर आपटून जाते.
..
सुरेखा तीच्याकडे बघत बोलते खुशी हे काय होते ग.
तिचे डोळे तर संपूर्ण काळे झाले होतें. कुठली शक्ती तिला तू दिली.
..
खुशी बोलते काळसूरप ही शक्ती बस.
.
सुरेखा बोलते अरे देवा तू हिला ती शक्ती का दिली. तुला माहिती आहे ना त्या शक्तीने ती काय करू शकते ती.
..
खुशी बोलते थंड घे जरा तिला कुठे माहित नाही आहे. ती शक्ती कशी वापरायची ती.
अग थंडया वरून आठवण झाली.
.
सुरेखा बोलते अजिबात नाही मी काही विसरली नाही आहे. सोड माझा हात पहिले. आईला हाक मारत बोलते अग बाहेर ये लवकर आणि मला सोडावं.
..
खुशी बोलते ताई चल ना किती वर्षे झाले त्या गोष्टीला असे काय करते. त्यांचे लाड पुरवते माझे नाही. मी सोडणार नाही पहिले हो बोल.
..
सगळे सुरेखाचा तो आवाज ऐकून बाहेर येत
बघतात.
..
सुरेखाची आई येत बोलते बरोबर तर ती बोलते आहे. खुशी सोड तिचा हात जाईल तुला घेउन ती आज रात्री मी पण खूप दिवस झाले खाले नाही आहेत.
..
खुशी बोलते तू बोललीस म्हणून सोडते. खुशी हात सोडते.
..
तशी सुरेखा दीर्घ श्वास घेत अदृश्य होते.
..
खुशी बोलते आई मला माहिती होते ही अशीच करणार, काढ ही माळ पहिली माझ्या गळ्यातून पाच मिनिटं. मला माहिती आहे ती कुठे गेली असणार काढ ना.
.
आई बोलते आता तू लहान आहे का हट्ट करायला ह्यांच्या सारखी मी नाही काढणार.
..
गिरिजा बोलते मी काढते थांब बोलून पुढे जाणार तेवढ्यात.
..
आई बोलते ती आहे इकडेच तूझ्या पाठी. त्यांच्या मध्ये नको येऊ नाही तर ती काय करेल. मग मला नको सांगू आणि मी मदत पण नाही करणार.
..
गिरिजा बोलते नंतरचे नंतर बघू बोलून पुढे जाते.
..
आई बोलते कुठल्या युगात सोडून आलीस तिला.
..
सुरेखा बोलते कुठे नाही गावच्या सड्यावर सोडून आली आहे बघूया कशी येते ती.
..
इथे सड्यावर
गिरिजा बोलते हे काय आहे. मी इथे कशी जाऊदे ना बघूया काय आहे ही जागा.
क्रमश
No comments:
Post a Comment