कथेचे नाव :- ,मी गिरीजाची मैत्रीन -भाग :- ९
लेखक :- मंदार साखरकर
गिरिजा त्या सड्यावर वाट काढत पुढे पुढे जात असते.
..
तेवढ्यात पाठून आवाज येतो तू कोण आहेस आणि इथे काय करते आहेस. बोलून तिच्या मानेत दात घुसवून बाहेर काढतो.
..
तशी गिरिजा आईग बोलून मानेवर हात ठेउन बेशुद्ध पडते.
..
इथे घरी
सुरेखा मानेवर हात ठेवत बोलते गिरिजा बोलून अदृश्य होते.
..
खुशी, गिरीजाच्या आईला बोलते लवकर काढा ही माळ. मी सांगते आहे ना तुम्हाला.
..
आई बाहेर येत गिरीजाच्या आईला बोलते नका काढू ती माळ. तू गप्प बस एका जागेवर. मुग्धा बघ जाऊन काय झाले आहे सड्यावर जा आणि रागावर नियंत्रण ठेव.
..
तशी मुग्धा अदृश्य होऊन परत येत बोलते तिथे तर कोणी नाही आहे आई. मला फक्त जाणवले की तिथे पिशाच्च पण कारण तिथे पिशाच्चला खेचत एका झाडाच्या पाठी नेले होते. त्याच्या हाताच्या नखांचे खुणा होत्या आणि की तिथे ताईने चुटकी वाजवली आहे. म्हणजे ताईने स्मृती घालवली आहे कोणाची तरी नक्की.
.
खुशी बोलते, मी बोलत होती ना काढा ही माळ. पण नाही कोणी ऐकले माझे आता ती कधी येणार काय माहिती. कोणत्या पिशाच्च होते आणि ते मानवावर कसा हमला करेल ग आई म्हणजे.....
आता कोणाला घेउन येईल, ते पण माहिती नाही बोलून आईकडे बघत बोलते.
.
सुरेखाची आई बोलते जेवण झाले असेल तर बसूया का जेवायला.
गिरीजाच्या आईकडे बघत बोलते काळजी करू नका ती नीट असणार.
.
मुग्धाची आई किचनमधून बाहेर येत बोलते बसा सगळे जेवण तयार आहे. चला मुलींनो आत या आणि घ्या ते सगळे ताट आणि जेवण.
..
सगळे एकत्र जेवण करून उठतात.
..
संध्याकाळी ६.०० ला सुरेखा गिरिजाला घेऊन येत आईला बोलते घ्या तुमची दिवटी. त्या सड्यावर पण आपले उद्योग चालू होते.
..
खुशी बोलते आलीस चला सगळ्यांनी तयार व्हा आपल्याला शहरात जाऊन आइस्क्रीम खायचे आहे. असे बोलून हात पकडून एकदा सुरेखाकडे बघून आईकडे बघते.
..
सुरेखा बोलते हो जाऊया आपण शहरात. पण एक सांग पैसे कोण देणार.
..
खुशी हात सोडून आईकडे जात बोलते पाचशे दे मारते हिच्या तोंडावर प्रत्येक वेळा पैसे मागत असते.
..
आई बोलते मी देणार नाही.
..
बाबा बोलतात हे घे हजार रुपये. जा मुलींनो खाऊन या आणि उरले तर आम्हाला पण आना काय.
..
सुरेखा, खुशीला रागात बघत बोलते ते पैसे बाबाना परत दे कोणी जाणार नाही आहे.
..
गिरिजा बोलते चल ना मला पण खायचे आहे ना.
..
ठीक आहे चला, आज तर माजी काढणारच आहे असे वाटते. हा पण तुम्ही दोघी नीट खायचे बकासुर फक्त आइस्क्रीमच समजले.
..
खुशी आईला बोलते बघितले तिने सांगितले तर लगेच हां बोलली. मी सांगितले तर बोलते पैसे कोण भरणार हिचे लाड पुरवते आणि माझे नाही. बहीण असावी तर अशी.
हिची डिटेल काढतेच मी ही माळ फक्त आई काढुदे बस.
.
सुरेखा बोलते गप्प ए काही पण बोलू नको. तुझे नाही का लाड केले आठव जरा. काही नाही केले तुझ्यासाठी बोलते मोठी, मरण्याच्या दारावरून आणले तुला. मला बोलायचे नव्हते हे पण तू भाग पाडले आणि काय ग कॉलेजला जायची तेंव्हा पर्स मधून नेहमी २०० घेऊन जायची ते, तुला काय वाटले मला समजणार नाही. आणि हो प्रत्येक वेळेस गिरगावला गेली की काय करायची ग आठव जरा म्हणे मी लाड नाही केले. आता चल गप्प का उभी आइस्क्रीमच बरे झाले. इथे हॉटेल जास्त नाहीत नाहीतर होती माझी.
तू काय बघते आहे चल माझ्या रूममध्ये जा आणि माझी पर्स आन मुग्धा जा आता.
.
मुग्धा बोलते ही कॉलेजला जायची, हिच्याकडे बघून वाटत नाही. ताई कुठल्या वर्षाची ही मॉडेल आहे ग.
.
आई बोलते सुरेखा शांत हो ती लहानच आहे. मुग्धा ती २०१६ ची मॉडेल आहे.
लेखा नाही का लहान असूनही आजून सुदारली आहे का, करते आहे ना अजून तेंच.
.
सुरेखा बोलते चल आता, पिशाच्च तोंड भूगवत नाही.
.
खुशी बोलते हो पिशाच्च तोंड फुगवत नाही म्हणे. पिशाच्यांना पण सॉफ्टकॉर्नर असतो ह्या मानवांनी आम्हाला बदनाम केले आहे.
लहान मुलांना घाबरवण्यासाठी कथा बनवतात आणि त्यांना घाबरवतात आणि ते लेखक पण म्हणे भूत आले की हवा काय सुटते, विजा काय चमकतात, लाईट काय डिस्को होते, पिशाच्च दिवसा निघत नाही. काही पण खरे कधी बघितले आहे का मेले लेखक जात. काय ग गिरिजा बरोबर ना पुस्तक वाचते ना तू असेच लिहितात ना लेखक.
खुशी रागात बाहेर निघत मुग्धाला बोलते चल. कदमच्या हॉटेलमध्ये फाडते हिला.
.
मुग्धा बोलते झाले प्रवचन एकदाचे, नाही तर हीने तिचे मन बदलले असते.
बाबान कडे बघत बोलते तुम्ही हिचे प्रवचन ऐकले ना आम्ही जातो. चल ग फटका येते ना तू की नाही. ताई चल ग आपण जाऊ बोलून सुरेखाचा हात पकडते.
.
तशी सुरेखा बोलते काय बोलून गेली ही मुग्धा कुठल्या हॉटेलमध्ये.
.
मुग्धा बोलते मी नाही ऐकले ते बोलून पळत बाहेर जात. मनात बोलते मी कशाला बोलू, मी पण खूप दिवस खाल्ले नाही आहे चमचमीत.
.
रात्री ८.०० वाजता घरात येत सुरेखा, खुशीला आणि मुग्धाला ओरडायला चालू होते. बाबाना बोलते तुम्हाला हिने पैसे परत दिले नाही का.
.
बाबा बोलतात जाऊदे ना, काय झाले ग.
..
सुरेखा बोलते शी बाई हे पण तसेच आहेत हिच्या बाबान सारखेच. बकासुर हात धुवा जा. स्वातीला हाक मारत बोलते हे घे दे सगळ्यांना मी आलेच. तू पहिली जा हात पाय धुऊन तुझ्या रूममध्ये जा. मेली ही तर त्यांच्या पेक्षा खतरनाक बोलून गिरीजाच्या आईकडे बघत बोलते तुम्ही का हसतात आहेत. ती रुपाली कुठे आहे.
..
हां मी इथे आहे बोल काय बोलते आहे.
..
आई बोलते रुपाली हे काय आहे. जा पहिली हात धुऊन ये. काय मेले एक एक सगळ्यांच्या पदरी टाकले आहेय.
काय हो असे पण पिशाच्च असतात आइस्क्रीम खानारे.
.
मुग्धा बोलते हो असतात ना. जरा ते बघा पाठी वळून माय लेकी कसे खातात आहे. असे बोलुन आपल्या रूपात येत बोलते कोणी तरी येत आहे खुशी.
मला भास होतोय बलाढ्य आहे ते.
..
आई खात बोलते येउदे त्यांना कधी न कधी त्यांना यायचेच होते. तू आवर स्वतःला बस. खुशी इकडे ये बाजूला. मुग्धा सामन्य हो आणि आई जवळ उभी रहा. गिरिजा तुझ्या आई जवळ जा. स्वाती किचन मध्ये जा आणि शिरा कर जा लवकर.
..
तेवढ्यात एक आकृती उभी राहत बोलते. चंद्रकला चांगले सांभाळले आहे लेकीला युगाणं युगे. पण माझी नात दिसत नाही आहे. हिने कुठे ठेवली आहे. तुला तरी कसे माहिती असणार जेंव्हा हिने टिचकी वाजवली तेंव्हा तू पण होती ना.
काय खुशी कशी आहे. मला नाहीती आहे तुला मी पाहिजे आहे ना. साची बाहेर ये तुझ्या बहिणीला नाही भेटणार का शिरा बनतो आहे, तिथं पर्यंत बहिणीला भेट.
..
तशी किचनमधून बाहेर येत बोलते सुरेखा ताई कशी आहे. काय बघतात आहे मला. जे घडायचे आहे ते घडले खुशी ताई.
..
आई बोलते बाबा का आलात आहे एवढया वर्षाने तुम्हाला माहिती आहे ना लावण्या शोधत आहे तुम्हाला.
तरी तिच्या समोर आलात का आणि ती पण तुम्हाला शोधत आहे ना.
.
आपल्या रूपात येत बोलतात हो माहिती आहे, मला ह्या दोघी मला शोधतात आहे. मी फक्त हिला हिच्या बहिणीकडे सोडायला आलो आहे.
खुशी मला माफ कर, तेंव्हा ते करणे मला भाग होते नाही तर लावण्या पण तुला वाचू शकता नव्हती, म्हणून मला तसे करावे लागले.
लावण्या तुला परत त्या युगात जावे लागेल. कारण जर तू त्याला इथे मारले तर तो परत त्या काळात जाणार. पण तू त्याला खंजिराणेच त्याला मार म्हणजे तो त्या युगात जाणार.
फक्त तू त्यांनी सांगितल्या प्रमाणे तू लहान पणीच्या युगात जा.
...
आजोबा मला माहिती आहे तुम्ही इथे नाही आहेत. शरीर आणि आत्मा एकत्र करा आणि समोर या आणि बोला.
साची जा शिरा तयार झाला आहे खा जा आणि सगळ्यांना आण.
.
समोर महंत शास्त्री येत बोलतात, हुशार आहे ओळखले लगेच. हो मीच तो जे तुम्ही विचार करत आहे तो मीच पुस्तकात उल्लेख नाही तो.
..
पुढे येत एक अंगठी मुग्धाला, खुशीला, आणि एक लावण्याला देत बोलतात मी गेल्या वर उघडा.
गिरीजाकडे जात बोलतात. तुझ्या मुळेच हे घडू शकले नाही तर हे युगानुयुगे असेच घडले असते.
..
सुरेखा बोलते लांब व्हा तिच्या पासून. गिरिजा इकडे ये माझ्या जवळ.
बाबा ही घ्या तुमची अंगठी आणि तुम्ही पण द्या.
..
गिरीजाच्या बाबाना बोलतात गिरिजा तुम्हाला कुठे भेटली होती.
मला माहिती आहे ही तुमची मुलगी नाही आहे बरोबर ना.
...
गिरिजा पुढे येत बोलते मी त्यांची मुलगी आहे. त्यांना मी कुठे पण भेटली असेल ते तुम्हाला काय करायचे आहे.
तुम्ही तुमचे काम करा माझ्या घरातल्या विषया मध्ये येऊ नका समजले.
तुम्ही तेंव्हा पण होतात काय नाव होते महंत बरोबर ना.
आईला माहिते होते तुम्ही त्या टेकडीवर आणि हो तुमचे मोहरे आजून जीवित आहे.
चुकी युक्ताची झाली होती. त्याचे फळ खुशीला भोगावे लागले काय बरोबर ना का आजून ऐकायचे आहे.
म्हणून बोलते माझ्या घरात नाक घुसवू नका जे आपल्या मुलीला त्रास देताना विचार नाही केला. तर दुसऱ्यानच्या घरात कशाला बघतात.
हो शेवटचे तुमचे बाबा म्हणजे आईचे आजोबा, संतोजी शास्त्री आणि राघिणी संतोजी शास्त्री आराम करतात आहे त्यांची वेळ झाली आहे उठायची दोघे येतील पौर्णिमेच्या दिवशी तेंव्हा या म्हंटले.
...
गिरीजाची आई पुढे येत गिरिजाचा हात पकडून पाठी आणत बोलते तिच्या बोलण्यावर लक्ष देऊ नका.
..
साची बाहेर येत बोलते झाले असेल गिरिजा तुझे बोलून. बसा सगळे शिरा खायला, शास्त्री मुलीच्या घरी आलात आहेत खूप युगा नंतर खाऊन जा शिरा.
बकासुर खा शिरा मला कुठे आहे आईसक्रीम ग. सुरेखा तुला माहिती होते ना मी आली आहे.
क्रमश
No comments:
Post a Comment