कथा :- नकळत सारे घडले -6
सागरला कधी एकदाचे दोन वाजतात आणि फोन करतोय असे झाले होते. इकडे भावना घरातून उशीर होऊ नये म्हणून वेळेआधीच निघाली होती. बसची वाट न बघता तिने सरळ टॅक्सी केली, पण अर्धा रस्त्यात पोहचली असता पुढे गॅस सिलेंडर वाहून नेणारा ट्रक पलटी झाल्याने ट्रॅफिक झाली होती, पुढील वाहने जागच्या जागीच थांबल्याने भावना वैतागली होती, काय करावे तिला काहीच सुचत नव्हते. या गडबडीमुळे दोन वाजून गेले होते. सागर ने दोन वाजता भावना ची मैत्रीण सायलीच्या घरी फोन केला पलिकडून सायली ने फोन उचलला आणि सागरच आहे हे कळताच अरे सागर.. मी सायली बोलतेय अजून भावना आली नाही रे.. जरा वेळाने फोन करतोस का? असे तिने सांगता ठीक आहे सायली मी.. इथेच आहे करतो नंतर फोन असे सागर म्हणाला आणि फोन ठेवला. अडीच वाजत आले होते, त्यामुळे सागरच्या ओढीने भावना ने टॅक्सी सोडली अन त्या गर्दीतून वाट काढत पुढे जाऊ लागली, जिथे अपघात झाला होता त्या जागी भावना पोहचली होती. खाकी वर्दीतले पोलीस अन ट्रॅफिक हवालदार यांनी जोपर्यंत ते सिलेंडर दुसऱ्या गाडीत चढवून होत नाहीत तोपर्यंत तेवढा परिसर सील केला होता. त्यामुळे भावनाने त्या गर्दीतून पलीकडे जाऊन पुढे चालत जात तिथून पुन्हा टॅक्सी पकडली. इकडे सागर ने बराच वेळ झाल्यानंतर पुन्हा फोन केला असता, सायलीने पुन्हा सांगितले नाही रे आली अजून भावना. पण ती तर वेळेच्या आधीच निघाली आहे रे,.. तिने निघण्यापूर्वी मला फोन केला होता कदाचित ती ट्रॅफिक मध्ये अडकली असावी. येईल ती.. पुन्हा थोड्या वेळाने फोन कर असे सायली म्हणाली.
सागरने ही ठीक आहे कदाचित तू म्हणतेस तसं ती ट्रॅफिक मध्ये अडकली असेल थोड्यावेळाने पुन्हा फोन करतो म्हणत त्याने फोन ठेवला. सागरच्या मित्राने (पवन) ने काय रे सागऱ्या काय झाले अजून वहिनी आल्या नाहीत का? असे विचारले असता होय रे.. अजून ती तिथे आली नाही असे सागर त्याला म्हणाला. इकडे भावना सायलीच्या बिल्डींगच्या खाली आली होती, पटकन टॅक्सी तुन पैसे देत उतरली अन सायलीच्या फ्लॅट च्या दिशेने भरभर चालू लागली. तिच्या डोर समोर येताच तिने बेल वाजवली तसे सायलीने ही पट्कन डोर ओपन केला. भावना आत मध्ये येताच अग भावना.. काय झाले?, इतका उशीर का झाला? अग दोन वेळा त्याने फोन केला पण तू नको काळजी करुस, तो पुन्हा तुला फोन करणार आहे असे सांगताच भावनाचया जीवात जीव आला होता. अग सायली काय सांगू तुला.. गॅस सिलेंडेर चा ट्रक पलटी झाल्याने अर्धा ते पाऊण तास एकाच जागी अडकून पडले होते, शेवटी त्या गर्दीतून वाट काढत कशी बशी मी पुढून टॅक्सी पकडली अन आले आहे. मला जरा पाणी देतेस का? असे भावना म्हणताच अरे हो... तुझं ऐकण्याच्या नादात मी तुला पाणी पण विचारले नाही थांब ह.. देते पाणी म्हणत सायलीने तिला पाणी आणून दिले. पाणी पीत।भावना सागरच्या फोनची वाट पाहू लागली, पण बराच वेळ होऊन ही सागरचा फोन न आल्याने तिनेच सागरने दिलेल्या नंबरवर फोन केला. पवनने फोन उचलला आणि हॅलो कोण म्हणून विचारले असता भावनाने मी भावना बोलतेय सागर आहे का? असे विचारताच त्याने सागरला इशारा करत हो हो...एकच मिनिट ह.. वहिनी देतो म्हणत सागरला त्याने फोन दिला. हाय भावना.. कशी आहेस? असे सागरने विचारता मी ना तुझ्याच आठवणीत रमलेली असते त्यामुळे मी छान आहे, आणि सॉरी रे तुला माझ्या मुळे बराच वेळ थांबावे लागले आणि झालेला सर्व प्रकार सांगितला तसे सागर ☺️ हसतच हो का?.. अग मी तर.. आयुष्य भर थांबलो असतो आणि थांबायची तयारी पण आहे सॉरी कशाला म्हणतेस असे म्हणत बराच वेळ दोघे ही गप्पा मारत बसले होते. प्रेमाच्या गप्पांच्या नादात त्यांना वेळेचे भानच उरले नव्हते. शेवटी त्यांनाच जाणीव झाली आणि एकमेकांना आय लव्ह यू 😘, मीस यू म्हणत इच्छा नसताना ही फोन ठेवले. फोन ठेवताच लाजतच काय ग.. सायली अशी का बघतेस असे भावना म्हणाली तसे ओह.. फोन वरूनच किस करावे लागले ना ग... भावना. समोर असता तर तुला अजून मजा आली असती ना😊😊 असे म्हणत तिने भावनाची मस्करी केली असता ☺️ हसतच ए.. गप्प बस... असं म्हणतात का? म्हणत दोघे ही हसल्या.
अग सायली तुला म्हणून सांगते, आमच्या मधला तो पहिला किस काय तो क्षण होता ग .. आज ही आठवला की अंगावर रोमांच उभे राहतात. हे बघ☺️ रोमांच उभे पण झाले. ए भावना सांग ना.. सांग ना मला कसे तूम्ही जवळ आलात आणि... तो पहिला किस केलात, ए मी खरच खूप आतुर झाले आहे ऐकण्या करिता. अग हो हो... सांगते जरा धीर तर धर. काय तुला सांगू सायली तो किस माझ्या आयुष्यातील पहिला वाहिला आणि रोमांचमय असा आहे. बघ..☺️☺️ बघ तुला सांगता सांगता माझ्या अंगावर रोमांच उभे राहिलेत. अजून ही मला असं वाटलं की मी तो किस.. अनुभवतेय. ए भावना... प्लिज सांग ना लवकर.. मी ऐकायला खुपच आतूर झाले आहे ग. हो तर ऐक मग☺️.. सागर बरोबर मी त्यांचे शेत पाहायला गेले होते तिथेच खऱ्या अर्थाने आमच्यात मैत्री झाली होती. ते पाहिल्यावर आम्ही तिथल्या एका सुंदर अशा स्पॉट वर गेलो होतो छान पैकी एन्जॉय करत असता अचानक जोराचा पाऊस आला, तिथल्या एका पडक्या घरात जे आमच्यापासून जरा लांब असल्याने जाईपर्यंत मी नखशिखान्त चिंब भिजले होते, आणि विशेष म्हणजे☺️ मी साडी नेसली होती, त्या भिजलेल्या साडीने मला स्वतःला सावरता येत नसल्याने आणि माझ्या अंगाला चिपकल्याने एका ठिकाणी मी बसले असता माझ्या पुड्यात काळीकुट्ट पाल पडल्याने तिला घाबरून मी त्याला चिंब भिजलेल्या अवस्थेत क्षणार्धात सागरला घट्ट मिठी मारली असता आम्ही अनावधाने खुपच जवळ आलो आणि कळत नकळत माझ्या ओठांना त्याच्या त्या ओठांचा पहिला स्पर्श झाला. मी माझे डोळे मिटुन घेतले अन त्याने पुन्हा तसे करावे म्हणून मी त्याच्यासमोर तशीच डोळे मिटून उभी होते. त्याने ही माझ्या ओठांना.. त्याच्या ओठांनी पुन्हा स्पर्श केला आणि माझ्या अंगावर रोमांच उभारले होते. माझा श्वास तीव्र झाला आणि जशी माझ्या हृदयाची धडधड वाढली तसे मी त्याला स्वाधीन झाले आणि कितीतरी वेळ आम्ही एकमेकांना किस करत होतो आणि आमचा आमच्या वरचा ताबा सुटून आंम्ही पूर्ण अनुभव घेतला. ए भावना.. पूर्ण म्हणजे.. काय ते पण.. आय मीन त्या गोष्टीचा पण अनुभव घेतला की काय?. ... भावनाने ही लाजतच होय सायली म्हणताच, आई शप्पथ.. कसलं भारी घडलं ना तुमच्या आयुष्यात. माझ्या पण अंगावर ऐकून रोमांच उघे राहिले ग☺️.. ए काय ग भावना.. खूप मजा येत असेल ना, होय सायली ते शब्दात नाही ग व्यक्त करता येणार. पण एक सांगते तुला, पुन्हा तो अनुभव हवा हवासा वाटतो ग. ए भावना.. माझ्या लाईफमध्ये कधी घडणार ग... हे असं सगळं. ए वेडे अस काही करू नकोस एक्ससाईटमेंट मध्ये. त्या साठी प्रियकर धोखा देणारा नसावा आणि खात्री असायला हवी आपल्या प्रियकाराबद्दल. होय ग भावना.. अशी नाही वाहवत जाणार जर मी कोणाच्या प्रेमात पडली तर☺️ ट्रस्ट मी. असे म्हणत दोघांनी ही भरपूर गप्पा मारल्या. आणि सरतेशेवटी ए सायली जे मी तुला सांगितले ते प्लिज कोणाला सांगू नकोस ह.., अग वेडे आहेस का ग?... नाही सांगणार मी कोणाला अशी सायली म्हणाली. भावना तिचा निरोप घेऊन निघाली.
इकडे सागर ने ही फोन ठेवल्यावर पवन बरोबर गप्पा मारल्या. गप्पा मारता मारता ए पवन.. मला तिची खूप आठवण येतेय रे.. मुंबई ला जावेसे वाटतेय रे. जाऊ का? अरे जा की मग, होय रे पवन पण घरी काय कारण सांगायचे?.. तो प्रश्न आहे. ए सागर मी परवा जाणार आहे बघ येणार असशील तर. होय का?पण मी आलो तर मला एखादा दिवस राहावे लागेल रे.. सांगतो तुला विचार करून असे म्हणत सागर तिथून निघाला. घरी पोहचल्यावर सागरने ताईला जाऊन ए ताई.. पवन परवा मुंबईला जाणार आहे मी पण जाऊ का? म्हणजे मला भावनाला भेटता येईल. ओह.. ☺️ माझ्या भावाला किती तीव्र ईच्छा आहे भेटायची. जा ना मग.. पण लगेच ये. होय ताई लगेच येईन पण तिला तू सांगू नकोस तिला मी सरप्राईज देणार आहे. ठीक आहे नाही सांगणार मी. थँक्स ताई.. तर मी परवा पवन सोबत जाईन. असे म्हणत सागर त्याच्या रूम मध्ये गेला. रुम मध्ये जाऊन फ्रेश होऊन परवा भावनाला भेटायचे या आनंदात होता.
भावनाला कसे सरप्राईज द्यायचे आणि दिल्यावर ती कशी रिऍक्ट होईल तसेच तिला किती आनंद होईल ☺️ तिला... काहीच सुचणार नाही या विचारानेच सागर स्वतःशी आपल्याच डोक्यात टपली मारत हसत होता. थोड्या वेळाने सर्वच खाली जेवायला आले मात्र सागर आपल्याच विचारात गुंग असल्याने जेवणाची वेळ झाली हे कळले नव्हते. आईने खालूनच जोराचा आवाज दिला, तसे सागर भानावर आला होता. येतो आई म्हणत सागर खाली आला आणि जेवायला बसला. जेवताना आई बाबा.. मी.. उद्या पवन बरोबर मुंबईला जातोय, त्याच आणि माझं ही काम आहे, काम झाले की आम्ही लगेच निघू असे म्हणता आई बाबांकडून होय ठिक आहे नीट जावा आणि या असा होकार मिळताच सागर ने ताईकडे बघत हलकेच स्माईल दिले. नित्याप्रमाणे गप्पा मारत जेवण उरकले.
No comments:
Post a Comment