The mama
ह्या भय चित्रपटात नावाप्रमाणे भूत पण प्रेमळ आहे.परंतु एका आईची आणि आपल्या बाळाची झालेली ताटातूट पुढे ती आई मातृत्वाच्या ओढीने भटकत असते..
चित्रपटाची सुरुवात अशी होते, त्यात एक मनुष्य आपल्या पत्नी चा आणि व्यवसायिक पार्टनर चा खून करून घाबरलेल्या अवस्थेत घरी येतो...
घरी त्याच्या दोन मुली असतात व्हिक्टोरिया आणि अगदी लहान पाळण्यात असलेली लिली ह्यांना घेऊन निघतो, आपल्या कारमधून जात असताना विचाराच्या तंद्रीत तो जास्त वेगाने गाडी चालवू लागतो, हायवेला जमलेल्या बर्फामुळे त्याचा स्टिअरिंग वरचा ताबा सुटतो आणि त्याची गाडी. रस्त्या लगत एका दरीत कोसळते...
देवाच्या कृपेने तिघे सुखरूप असतात ते तिघे एका पडक्या घराजवळ येतात...एकांतात असलेले ते घर खूप भयानक दिसत असते...तिथं गेल्यावर त्या मुलीं च्या पित्याला त्याने केलेल्या गुन्ह्याची जाणीव होते. आणि खूप नैराश्यातून तो बंदूक घेऊन आपल्या मुलींना आणि स्वतःला संपवू पाहतो...भावनिक होऊन त्या मुलींना शेवटचं जवळ घेऊन त्यांच्यावर गोळी चालवणार तेवढ्यात भुताची एन्ट्री होते mama भूत त्या माणसाला खेचून हवेतच मारून टाकते...
व्हिक्टोरिया ते दृश्य नीट पाहू शकत नाही कारण तिच्या चश्म्याच्या काचा अपघातामुळे फुटून गेलेल्या असतात...आता त्या दोघीच तिथे असतात भुकेने व्याकूळ होऊन थंडीत कुडकुडत त्या घरात त्या दोघी बहिणी बसतात...
तेवढ्यात अंधारातून घरंगळत एक बेरी(फळ) त्यांच्या जवळ येते...
आणि तिथून पुढे पाच वर्ष mama त्यां दोघींचा आपल्या मुलासारखा सांभाळ करते,
आता त्या मुलींमध्ये आणि mama भुतामध्ये एक अतूट नाते निर्माण झालेले असते.आईची माया त्यांना त्या भुताकडून मिळत असते.
इकडे त्या मुलींचे काका आणि अॅना त्यांना शोधत असतात...
गेले पाच वर्ष पोलीस तपास सुरू असतो...आणि एक दिवस त्या मुलींचा पत्ता लागतो जेव्हा तपास अधिकारी त्या मुलींना घ्यायला जातात तेव्हा त्यांची अवस्था खूप भयानक असते त्या मुली अगदी एखाद्या जंगली प्राण्यांसारखे वावरत असतात,चार पायांवर चालत असतात इकडे तिकडे माकडासारख्या उड्या मारत ह्या अधिकाऱ्यांना घाबरून लपून बसतात...
किडे खातात...
त्या पूर्णपणे एखाद्या जंगली हिंस्र जनावरा प्रमाणे दिसत असतात...
त्यांना तिथून बाहेर आणले जाते आणि डॉक्टरी सल्ल्याने त्यांना मानसोपचार तज्ञांच्या देखरेखीत ठेवले जाते...
काही दिवसानंतर त्या दोघींना कोर्टाच्या आदेशाने त्यांच्या काकांकडे पाठवण्यात येते पण त्यांची खूप जबाबदारीने काळजी घेण्याची गरज असते...
व्हिक्टोरिया थोडीफार बोलत असते ती आता अॅना सोबत ती चांगली वागू लागते पण लिली मात्र पूर्णपणे mama च्या सोबतीत लहानाची मोठी झाल्याने तिला शब्दोच्चार बोलायला खूप अडचणी येतात...
पण ह्या सगळ्यात धक्कादायक भयाण वास्तव म्हणजे mama ती भूत सहजासहजी ह्या मुलींना सोडणारी नाही...तीही ह्यांच्या मागे त्या घरात वावरत असते...
ही mama भूत म्हणजे एक मेंटल पेशंट असते...
आणि हॉस्पिटल मधून ती निसटते आणि चर्च मध्ये जाऊन ती तिच्या बाळाची काळजी घेणाऱ्या नर्स ला चाकूने वार करून आपल्या बाळाला घेऊन तिथून पळून जाते ..
तिचा शोध घेणारे मेंटल हस्पिटलच्या कर्मचाऱ्यांना चुकवत ती एका उंच टेकडीवर जाते आणि तिथून आपल्या बाळासह खोल दरीत उडी मारते,
पण ते बाळ दरीतील एका तुटक्या झाडाला टांगून लटकले जाते आणि त्याची आई म्हणजे mama भूत खाली दरीत कोसळते पण तिचा आत्मा आपल्या मुलासाठी व्याकुळ होतो त्यामुळे ती एका भयंकर अमानवी अतृप्त आत्मा बनून आपल्या बाळास कित्येक वर्ष शोधत भटकत असते...
पुढे काही वर्षांनी त्या घरात तिला लिली आणि व्हिक्टोरिया दिसतात त्यांच्यात तिला आपले बाळ दिसते आणि ती त्यांच्या सोबत राहू लागते...
लिली ला ममाची सवय झालेली असते,
आणि त्यामुळेच कदाचित तिचे वागणे पूर्ण वेगळे असते...अमानवी स्वरूपाचे,
चित्रपटात बरेच थरारक प्रसंग दाखवले आहेत mama भुताचे पात्र खूपच भीती दायक दाखवले आहे. आणि तिचे अस्तित्व काळ्या जंगली फुलपाखरांच्या माध्यमातून दाखवणे,अंधारातून त्या अतृप्त शक्तीचे घरात वावरणे तसेच झाड वेलींचे घरात येणे सगळेच खूप विचित्र अनुभव असतात..
पुढे mama त्याच टेकडीवर त्या दोघींना घेऊन जाते जिथं तिने आधी आत्महत्या केली होती...
आणि त्या दोघींना घेऊन ती तिथून पुन्हा एकदा उडी मारणार असते...
त्याचवेळी तिथे त्या मुलींचा काका आणि अॅना तिथे येतात mama च्या मुक्ती साठी एक कारण होते ते म्हणजे तिच्या बाळाच्या अस्ती
mama तिच्या एका बाळाला घेऊन जाणारच होती.
पण लिली ला mama आवडत होती त्यामुळे ती तिला हाक मारते
लीलीला पूर्णतः mama च्या असण्याची सवय होती म्हणून कदाचित ती नसती राहू शकली mama ला सोडून आणि mama ची मुक्ती पण थांबली होती त्यामुळे.... mama तीच्या हातात असलेल्या तिच्या बाळाच्या सांगाड्याकडे पाहते आणि लिली कडे पाहून पुन्हा भावनिक होते आणि चिडून विक्राळ रूप घेऊन अॅना ला जखमी करते आणि पुन्हा त्या दोघींना घेऊन जाऊ लागते...
तेव्हाच व्हिक्टोरिया च्या पायाला अॅना घट्ट पकडून ठेवते...
आणि ती न जाण्याबद्दल व्हिक्टोरिया ला सांगते...
Mama लिली ला घेऊन पुन्हा त्या दरीत उडी मारते आणि त्याच झाडाच्या खोडाला अडकून त्या खाली पाण्यात पडतात..
Mamaच्या मऊ केसात लिली गुरफटलेली असते तेव्हा जणू प्रचंड प्रकाशाच्या अवतीभवती त्या दोघी एकमेकींसोबत खूप आनंदी असतात..
त्या दोघी मृत होतात आणि त्यांचे असंख्य जंगली फुलपाखरांच्या रुपात उडत संपूर्ण दरीत फिरतात...
एक फुलपाखरू उडत येऊन व्हिक्टोरिया च्या बोटावर बसते तिथंच चित्रपट संपतो...

No comments:
Post a Comment