काहीतरी भयानक करावं अशी खूप दिवस इच्छा होती आणि मला इंटरनेट वर एक game सापडली. या game च नाव होत 'एकट्याने खेळाला जाणारा लपंडाव '.
खरेतर ही एक जपानी game आहे जिला 'hitori kakurenbo' अस म्हटलं जात.
कृपया कोणीही हा game खेळण्या चा प्रयत्न करू नका ही विनंती.
तर झाल अस कि ही game पाहताच ती खेळून पाहावं अशी माझी खूप इच्छा झाली. ती खेळण्या साठी मी खूप आतुर आणि वेडी झाले होते.
या game ची अशी अट आहे कि घरात कोणीही नसताना हा गेम तुम्ही खेळू शकता. माझे आई -बाबा एका लग्नासाठी रविवारी गावी गेले होते. घरात मी एकटी च होते. ही खूप चांगली संधी आली होती game खेळण्याची. त्यासाठी लागणारे सगळं साहित्य म्हणजे बाहुली, सूरी, मीठ,कुंकू आणि पाणी हे घेतले आणि रात्री ची वाट पाहू लागले.
घरात कोणीच नव्हते म्हणून थोडी घाबरून मी त्यासाठी लागणारा विधी करायला लवकर म्हणजे रात्री 8 वाजताच सुरुवात केली. (या वेळेस कोणाचीही मदत मिळू शकेल जर काही विचित्र झाले तर याकरिता ). मी सर्व लाईट बंद केल्या. घरात फक्त बाहेरच्या रस्त्यावर च्या ट्यूब लाईट चा थोडासा प्रकाश पडत होता. Game साठी लागणारे सगळे विधी आणि नाम उच्चारण त्या बहुळीवर मी केले आणि ती बाहुली बाथरूम मध्ये नेऊन ठवली. झाले आता मला थोडी भीती वाटायला लागली होती. हे सर्व करून मी घरातल्या छोटया मंदिराच्या मागे जाऊन पुढे काय होतंय हे पाहण्यासाठी लपून बसले. मी जरा घाबरलेच होते. हृदयाची धडधड वेगाने होत होती. साधारण अर्धा तास काहीच झाले नाही आणि अचानक मला काही आवाज ऐकू येऊ लागले. कोणीतरी जमिनीवर सरपटत आहे, कोणीतरी हसत आहे ,कोणीतरी माझ्याकडे रोखून बघत आहे, किचन मध्ये भांड्यांचा जोरजोरात आवाज येऊ लागला. मी प्रचंड घाबरून गेले होते भीतीने थंडी मधेही मला घाम फुटला होता. हृदय बंद पडायच्या मार्गांवर होते. आपण हे काय करून बसलो अस वाटायला लागले. आता हे थांबवलं पाहिजे म्हणून साऱ्या शक्तीनिशी उठले आणि ही game बंद करण्यासाठी मी बाथरूम कडे धावले (बाथरूम मधे त्या बाहुली ची पूजा विधी मी केला होता ) आणि पाहते तर काय, बाहुली बाथरूम च्या बाहेर आडवी पडलेली दिसली. खूप धाडस करून मी त्याला बाहुली वर मीठ आणि पाणी ओतले जेणेकरून ही game थांबेल. (गेम जर थांबवायची असेल तर बहुलीवर मीठ आणि पाणी ओतावे अस गेम च्या माहिती पत्रकात लिहिले होते)
घरातील सर्व लाईट मी ऑन केल्या. Game च्या माहिती मध्ये दिल्या नुसार जर बाहुली जळाली तर सर्व दुष्ट शक्ती निघून जातात म्हणून मी ती बाहुली जाळायला निघाले. आणि इतक्यात दाराची बेल वाजली. तेव्हा रात्रीचे 9:30 वाजले होते. मी दार उघडून पहिले तर बाहेर कोणीच नव्हतं. माझे शरीर घामाने ओलेचिंब झाले होते.. घरात कोणीतरी आहे असं सारखं जाणवत होत. मी दार लावून बाहुली जाळन्या साठी परत आत आले तर बाहुली गायब झाली होती. मी खूप शोध घेतला पण ती काही मिळाली नाही. जसं काही ती हवे मधे विरून गेली होती. खूप शोधूनही बाहुली मला मिळाली नाही. शेवटी मी रात्री १२ वाजता झोपण्यासाठी माझ्या खोलीत गेले पण त्या रात्री मला झोप आली नाही. त्या दिवसापासून
ती बाहुली रोज माझ्या स्वप्नात येते. मी एकही दिवस त्यानंतर झोपू शकले नाही.. यावर उपाय शोधण्यासाठी मी एका मोठ्या मंत्रिका ना हे सगळं सांगितलं. ते म्हणाले यावर एकच उपाय आहे ज्यामुळे त्या दुष्ट शक्तीचा परिणाम कमी होईल.
मला ही गोष्ट जास्तीत जास्त लोकांना सांगावी लागेल जेणेकरून जे ही गोष्ट वाचतील किंवा ऐकतील ते यामध्ये माझे साथीदार होतील आणि जे मी भोगतेय ते हे लोक ही भोगतील...
धन्यवाद ही माझी कथा ऐकून माझे साथीदार झाल्याबद्दल! 😈
समाप्त!
कथा : काल्पनिक
हे कथा मी एका वेबसाईट वर वाचली आहे.
No comments:
Post a Comment