,..........आई विना भिकारी (सत्यकथा)
बाळ जिवाच्या आकांताने रडत होतं.तो सर्व प्रयत्न करुन थकला होता.शेवटी निराश होऊन खाली बसला.बाळाला पाळण्यात घातलं.बाळ रडतच होती.तेवढ्यात पाळणा हलु लागला.आणि चमत्कार झाला बाळाचं रडणं थांबलं.
नागपूर जवळच खापरखेडा नावाचं छोटंसं गाव आहे.पण तेथे औष्णिक विद्युत केंद्र.(एम.एस.ई.बी) असल्यामुळे ते सर्वांच्या परिचयाचे आहे.गावापासुन दोन किमी.वर काॅलनी आहे. काॅलनीला लागुनच काही कामवाल्या बाईंच्या झोपड्या होत्या
अंदाजे १९८७ सालची गोष्ट आहे.त्यावेळला खापरखेडा छोटंसं गाव होतं.आणि काॅलनीतही इंग्रज काळातील च काॅर्टर होते.छोटीशी काॅलनी होती.सायंकाळी सहा नंतर तर काॅलनीत कोल्हेकुई ऐकु यायची.आजुबाजुला दाट जंगल झाडे होती.कुणीही बाहेर पडत नव्हते अंधार पडल्यावर.म्हणुनच सुविधा साठी तीन चार मोलकरणीला तेथेच झोपड्या बांधून दिल्या होत्या.केव्हाही आवाज दिला की त्या कामाला हजर असायच्या.
तेथेच मीना आपल्या नवऱ्यासोबत राहातं होती.
ती आमच्याकडे धुणीभांडी करायची.छान होती.निटनेटकी राहायची.नुकतच लग्न झालेली.पण नवरा दारुडा होता.खुप भांडण व्हायची रोज त्यांची.तशात ती गरोदर होती.तरीही काम करायची.
नंतर तिला मुलगा झाला.छान गुटगुटीत.पण नवरा सुधारला नाही.बाळ दोन महीण्याच होत.तशात तीची सासुही आली होती.ती ही मुलांची चीच बाजु घ्यायची.आता तिघांचाही भांडणाचा आवाज ऐकू यायचा.
शेवटी त्रासुन मीनानी स्वत:ला जाळुन घेतलं.पण तिचा नवरा तिथेच राहायचा.काही दिवस सर्व ठिक होतं पण नंतर लहान बाळाला सांभाळन त्यांना कठीण जाऊ लागलं.बाळ खुप रडायचं.पण नंतर ती यायची.
बाळाला झोपवायची.आणि निघून जायची.
काॅलनीत कुजबुज सुरु झाली.लोक घाबरु लागले.
एकाला ती झोपडी च्या भोवताल गोल फिरताना दिसली.
तीच्या सासुने मोहरी झोपडी च्या सभोवताली टाकली.
तीने चिडुन सासुला मारहाण केली.सासु घाबरुन पळवुन गेली.पण आता ती दिवसात अनेक वेळा जाणवायची.कधी पाळणा आपोआप झुलायचा.कधी बाळाच्या तोंडाला दुध लागलेलं दिसायचं.लोक तिकडुन जायलाही घाबरायचे.
शेवटी त्यांना तिथुनच दुसरीकडे जायला सांगितले.
पण मीना कधीं कधीं लोकांनां नंतरही दिसायची.
आई मरुन ही बाळासाठी जिवंतच होती.तिच्या आत्म्याला मुक्ती नव्हती.

डाॅ.सुलेखा सरोदे.
No comments:
Post a Comment