काल्पनिक कथा
शहरामध्ये कस रोज रात्री १२ वाजले की सोसायटीचे,ब वॉचमन शिट्टी वाजवत काठी आपटत लोकांना सावध करत असतात. पन गावाकडे अस काही नसतं रात्री ९ वाजले की सगळं कसं चिडीचूप होतं.
असच माझं एक सुंदर अस गाव चारही बाजूने डोंगर आणि मध्ये खड्डयामध्ये आहे माझ गाव. गावच्या पूर्वेककडून एक रस्ता गावात येतो. तो तेवढाच एक रस्ता गावात यायला आणि जायला.
आणि माझं घर होत ते गावच्या मुख्य रस्त्याच्या बाजूला होतं. पूर्वी गावी कस वेगवेगळ्या भागांना नाव द्यायचे तसच माझं घर होत तो परिसर होता मठाचा वाडा. रस्त्यावरून वर्दळ चालू असायचीच.
डोंगर असल्यामुळे सगळ्यांची गाईगुरे घेऊन एक गुराखी गावातुन डोंगरात जायचा. दिवस मावळतीला आला की गाई गुरे परत आपापल्या गोठयात परत यायची.
असंच माझ्या हसत्या खेळत्या गावावर संकट कोसळलं होतं. मार्च च्या आसपास थंडीचे दिवस होते ते. चोऱ्यामाऱ्या होऊ नयेत म्हणून गावात जे लोक गस्तीला असायचे ते रोज गायब होऊ लागले. कोणालाच काहीच कळत नव्हतं काय घडत होतं ते. गावात शिरल्यावर समोर एक देवीचं मंदिर आहे. एक हनुमान मंदिर आहे. त्या हनुमानाच्या मंदिराला लागून एक रस्ता जायचा तो थेट मोडक्या पुलाकडे. आणि त्याच मोडक्या पुलाला लागून होती गावची स्मशानभूमी. तिकडे दिवसा पण कोणी जात नसत.असं म्हणायचे ती जागा झपाटलेली आहे. काही मृत व्यक्तीचे विधी असतील तर आणि तरच लोक तिकडे फिरकत असायचे. आता गायब झालेल्या लोकांना शोधन तर काम होतं. म्हणून तो परिसर न निवडता बाकी इतर गावचा भाग जसकी मुंजा,कडजाई सगळं शोधून झालं. पण त्या लोकांबद्दल काहीच कोणालाच सुगावा लागला नाही. शेवटी सगळे लोक हनुमान मंदिरापाशी जमले आणि आमचे गावचे सरपंच बोलले आता फक्त स्मशानभूमी कडे जायचा राहिलंय,माझ्यासोबत कोण कोण येणार. हा नाही हा नाही करत १५ मधले ५ जण तयार झाले. निघाले सरपंच साहेब आणि पाच लोक सोबत,होळी होऊन गेली उन्हाळा चाहूल देत होता. वरती ऊन वाढत होतं. ते तसेच गेले केली शोधाशोध पण काही मागमुस लागला नाही. पोलिसांमध्ये तक्रार नोंदवून पण काही फायदा झाला नाही ते गावाकडे फिरकलेच नाहीत. गायब झालेले लोक आज येतील उद्या येतील या आशेवर त्यांचे घरचे लोक बसले होते. उन्हाळा सुरू झाला होता. आणि गावी घराला बाहेर ओटा असे. उन्हाळ्याचे त्या ओट्यावर लोक झोपत असत. असच एक दिवशी लोक झोपले असताना,माहिती नाही त्या दिवशी अमावस्या होती की पौनिर्मा होती की आणखी काही. कोणीतरी एक काळी सावली हनुमान मंदिराच्या शेजारच्या गल्लीतून बाहेर आली. हळूहळू ती आमच्या मठाच्या वाड्यामध्ये येऊ लागली. आणि त्या सावलीपासून येत होता घुंगरांचा आवाज. बाहेर आमच्या वाड्यात जे ओसरीवर झोपले होते त्यांना घुंगरांचा आवाज आला. आमचे आळीचे गडी लय शूर, घाबरून तोंडावर पांघरून घेऊन निपचित पडले. तो आवाज आता जवळ येत होता. हळूच एकाने पाहिलं तर तो एक म्हातारा होता. काठीचा आधार घेत तो चालला होता,पण त्याचा चेहरा मात्र दिसला नाही. पण बाकी एकंदर बाकी हालचालीवरून तो म्हातारा वाटत होता. अंगावर काळी घोंगडी पांघरलेली होती. हातात काठी आनि त्याला घुंगरू बांधलेलं. नुसता आवाज ऐकला तर कोणालाही वाटेल बाहेरून बैलगाडी जातीय कोणाचीतरी. तो कुठेही न थांबता सरळ चालत गेला वेताळाच्या दिशेने. आता वेताळ म्हणजे गावच्या थोडस बाहेर एक वेताळाचे मंदिर आहे,त्याच्यापलीकडे आंबी नावाचा परिसर मध्ये एक ओढा आणि ओढ्याच्या पलीकडे भुताचा माळ. दुसऱ्या दिवशीपुन्हा रात्र झाली तो म्हातारा पुन्हा आला,आणि तसाच वेताळाकडे गेला. अस एक आठवडा चालू राहील. आणि एकाने ग्रामपंचायतमध्ये तक्रार केली. कारण तो म्हातारा जायचा खरा पण परत येताना कोणाला दिसला नाही. लोक गायब होतात म्हनून गस्त घालणे बंद झाली होती. सरपंच स्वतः बोलले आपण आज पाठलाग करू. असे म्हणत सहा जण तयार झाले सरपंच सोडले तर सगळी तरणीबांड पोरच होती. त्यांनी ठरवलं आज त्या माणसाचा पाठलाग करायचा,कुठे जातो काय करतो बघायचं. अस म्हणत सगळे मठाच्या वाड्यात दबा धरून बसले होते. १२ च्या आसपास तो म्हातारा आला. हळूहळू काठी टेकीत गेला. घुंगरांचा आवाज शांतता भंग करत होता. तो पुढेगेला आणि हे लोक त्याच्या मागे गेले. हळूहळू त्याच्या मागे वेताळापर्यंत गेले. दुसऱ्यादिवशी सकाळी गावात एकच हाहाकार सरपंचांसोबत सहा तरणीबांड पोर बेपत्ता........

भाग 2 लवकरचं.............
No comments:
Post a Comment