पायवाट -भाग: दुसरा
संभाजीराव आणि धनाजी ह्यांची वाचाच बसली होती. 'ते तिघे' एवढे भयानक दिसत होते की त्यांना बघून त्या दोघांचे डोळे पांढरे पडले होते. 'त्या तिघांना' शीर नव्हत, त्या जागी झाडाची खोड होती. त्यात डोळ्यांच्या ऐवजी कोणीतरी रक्ताळलेल मांस कोंबल्या सारख काही होत. तोंडातून काळ रक्त बाहेर पडत होता. अंगाला कित्येक वर्ष न भरलेल्या जखमेतून पिवळा किळसवाणा द्रव निघत होता. अंगावर अश्या अगणित जखमा होत्या. त्यांच्या हातांची लक्तर झाली होती. ते तिघे तसेच बसुन कसला तरी मंत्र म्हणत होती.
धनाजी ने अंगातली शक्ति काडुन बोलला, "तात्या, चला पळुया हात्न. ही तीच भूताटकी हाय. चला हीतन." धनाजी आपल्या बापाचा हात घरून त्यांना ओढू लागला. तात्या उठणार तेवढ्यात चंद्र झाकोळला जाऊ लागला. हळू हळू काळाकुट्ट अंधार पसरू लागला. गावकऱ्यांच्या मशाली आपोआप बंद पडू लागल्या. पण त्या तिघांचा मंत्रोच्चार अजून ही चालूच होता. चंद्र आता पूर्ण झाकला गेला होता. आज ग्रहण होत. आज 'ती' पौर्णिमा होती. आज 'त्या तिघांच्या' भोक्ता उठणार होता. ते तिघे त्याचे अघोरी पुजारी होते. 'तो' त्या तिघांना अगणित शक्ति देणारा स्त्रोत होता. धनाजी आणि संभाजीराव त्याचे बळी होते.
दोघे मार्ग मिळेल तिथून पळत चालले होते. अंधारात चाचपडत, रस्ता शोधत ते पळत होते. खूप वेळ पळून ते एका देवळात येऊन पोहोचले. दोघांना थोडासा दिलासा मिळाला. आम्ही दूर आलो आहोत आणि देवळात कोण मरायला भूत येतय? तस म्हणुन ते गाभार्या कडे चालू लागले. पण त्या देवळाला गाभारा नव्हता. देवळाच्या मागच्या बाजूला फक्त एक उघडा दरवाजा होता. ग्रहणाच्या काळोखात दाराबाहेर नीट दिसत नव्हत. भीतीने आता जीव जायची वेळ आली होती. काळीज ठोका चुकत होत. ह्या देवळात ही आपल्याला सुरक्षा नाही हे त्यांना कळले होते. ते परत फिरून बाहेर पडणार तोच त्यांचे पाय कोणीतरी घट्ट धरल्याचा त्यांना आभास होऊ लागला. तो तिढा घट्ट होत चाललेला. देवळाबाहेर ते तिघे उभे होते. संभाजीरावांना हे सगळ सहन नाही झाल. त्यांनी छातीला धरून किंकाळी फोडली. त्यांनी आपला जीव तिथच सोडला. "तात्या!!" धनाजी किंचाळला. आपले वडील डोळ्यादेखत जीव सोडत आहेत हे बघून त्याचा अंगात दैवी शक्ती संचारली. त्याने मारुतीच नाव घेत पायाला पडलेला तिढा मोडून काढला आणि त्या अघोरी पुजारींवर हल्ला करणार तोच एकाने खंजीर धनाजीच्या छातीत गाडली अन् तो तिथेच तडफडत पडला. त्यांच्या छातीतल रक्त काढून त्यातल्याच एकट्याने आपले कमंडल भरले. एकट्याने आपली मोडकी नख धनाजीच्या छातीत खुपसली आणि त्याच काळीज बाहेर काढल. तळहातावर धरून ते वरती ग्रहणाला दाखवल आणि चित्कार केला. धनाजीन काही बोलायचा वायफळ प्रयत्न केला. अखेर तडफडत त्यान आपला जीव सोडला.
ग्रहण आपल्या उच्च बिंदू वर पोहोचले होते. त्या अघोरींनी 'त्याच' आवाहन करायला सुरुवात केली. देवळाच्या बाहेर लोक जमा तर होती, पण कोणी ही काहीच पाहू शकत नव्हता कारण सगळ्यांचे डोळे झाकले गेले होते. 'त्याला' कोणताही जीवात्मा जिवंत पाहू शकत नव्हता. अचानक विजेचा मोठा कडकडाट झाला आणि एक आकृती त्या देवळाच्या मागच्या दरवाज्यातून आत यायचा प्रयत्न करू लागली. ती आकृती म्हणजे एक महाभयानक आणि प्रचंड अशी सावली होती जिच आकलन मानव करूच शकत नव्हता. तो सैतान नव्हता. त्याचा ही पलीकडे जाऊन जी दुष्ट शक्ति सैतानात आपली क्रुरता आणि द्वेष भरते, ही तीच शक्ति होती. सैतान ही ज्याचा पुढे आपल डोक टेकवतो ही तीच शक्ति होती. त्या तिघा पुजार्यांनी आपले गुडघे टेकवले आणि मंत्र म्हणत दोन्ही हात वर केले, जसे काही ते तिघे त्या शक्ति कडून दान मागत आहेत. परत भयंकर मोठा कडकडाट झाला. ग्रहण समाप्त झाल होत. आता देवळात मागे होती ती फक्त राख, जी वाऱ्यामुळे हळूच उडूत देवळा मागच्या दाट जंगलात विखुरली गेली.
**************************
साल: 2019
स्थळ: एडिनबर्ग, स्कॉटलंड
संध्याकाळची वेळ. नुकताच पाऊस पडून गेला होता. वातावरण अजून तस गारच होत. "हा पाऊस पहिला तर मला माझ्या आईची आठवण येते. ती सांगायची की हे स्कॉटलंडचा पाऊस म्हणजे निव्वळ मस्करी आहे. पाऊस म्हणजे कसा, धो-धो पडायला पाहिजे. एका दमात सगळ क्लिअर करून जाणारा. हे काय उगाच वरुन पाणी शिंपडल्या सारखं पडतो. डोक्याला ताप आहे नुसता." अनन्याबाई आपल बोलण त्यांच्या 'ह्यांना', म्हणजेच डॉ. अनिकेत यांना खिडकीत बसून सांगत होत्या. पण डॉक्टर आपल्याच जगात मशगूल होते. मागच्या आठवड्यात पूर्ण झालेल्या संशोधन पत्रात आपले योगदान कसे उठून दिसणार, यावर विचार करत होते. त्यांच्या बटलरने रोजच्या प्रमाणे त्यांना "अर्ल ग्रे" आणून दिली. डॉक्टर कप हातात घेऊन खिडकीकडे गेले आणि बाईंना म्हणाले, "आमच्याकडे कसा धो-धो पाऊस पडतो तसा इथे का पडत नाही कुणास ठाऊक. एका दमात सगळ क्लिअर." बाई त्यांच्याकडे बघून खुदकन हसल्या.
"काय झाल ग? अस का हसलीस?"
"हसू नाहीतर काय करू. माझ वाक्य मलाच परत ऐकवताय आणि उलट मलाच विचारता काय झाल म्हणुन? इतके वेंधळे कसे हो तुमी?" अस म्हणत परत हसायला लागली. डॉक्टर ही जरा ओशाळले, मग तेहि हसायला लागले.
डॉ. अनिकेत हे एडिनबर्ग यूनिवर्सिटी मधून डॉक्टर होणारे त्यांच्या गावातले पहिलेच गृहस्थ होते. खरतर त्यांच्या गावातले देशाबाहेर बाहेर जाऊन डॉक्टर होणारे ते पहिलेच होते. लंडन मध्ये खूप काळ प्रॅक्टिस करून त्यांनी भरपूर पैसा आणि प्रसिद्धि कमावली होती. पन्नाशीनंतर त्यांना एडिनबर्गला परत यावस वाटल. तेव्हाच त्यांना एडिनबर्ग यूनिवर्सिटी मध्ये गेस्ट लेक्चररच आमंत्रण आले. त्यांनी एक दिवस ही न घालवता लगेच आपला होकार कळवला. काही महिन्यातच ते एडिनबर्ग साठी निघाले. त्यांचा मुलगा, शशांक, हा ही खुश होता. कारण अस की त्याला आपल्या वडिलांच्या यूनिवर्सिटीत शिकायची खूप जबरदस्त ईच्छा होती. अनन्याबाई, म्हणजेच त्याचा आईचा त्याला कडाडून विरोध होता, आणि कारण ही तसच होत. शशांकला "पॅरासायक्लोजी आणि पॅरानॉर्मल" मध्ये डॉक्टरेट करायची होती. या साठी त्याच्या वडिलांच्या कॉलेज पेक्षा अधिक चांगल कॉलेज पूर्ण जगात कुठे ही नव्हत. काही कारणामुळे त्याच्या आईचा ह्या अभ्यासाला खूप विरोध होता. पण शेवटी जय झाला तो शशांकचाच! त्याने डॅडनां आपल्या गोटात सामिल करून घेतले. मग काय, मॉम तयार झाली.
ऑगस्ट महिन्याचे दिवस होते. शशांकचे शेवटचे वर्ष सुरू होणार होते. शेवटच्या वर्षासाठी त्याला "पॅरानॉर्मल ऐक्टिवीटीज ईन एॅन ओकल्ट" या थीसिसवर संशोधन करून मांडायचे होते. या साठी त्याला एक भारी असा सब्जेक्ट ही मिळाल होता. ह्याच विषयावर तर त्याला ही डॉक्टरेट घ्यायची होती. ह्यात त्याला इयन आणि डॅनियल ह्यांची मदत होणार होती. हे तिघे तशे खास ओळखतीले नव्हते, पण एकाच वर्गात असल्यामुळे त्यांचे थीसिसचे विषय ही सदृश होते. म्हणुन त्या तिघांना एकमेकाची मदत होणार होती. त्यांच्या वर्गात सर्वांनी ठरवलेले की कोणत्या तरी भन्नाट ठिकाणी जाऊन, तिकडच्या अलौकिक घटना आणि त्या कशामुळे आणि कोणत्या आधारावर खर्या किंवा खोट्या आहेत याच्यावर आधारित आपला प्रबंध सादर करायचा. बहुतेक सगळ्यांनाच अश्या भन्नाट आणि भयानक जागा भेटल्या होत्या, एका शशांकला सोडून. त्याने पूर्ण इंटरनेट पालथ घातल तरी ही अशी गूढ, अगम्य आणि शाश्वत अश्या दुष्ट शक्ति बदल कसलीही माहिती कुठे ही भेटली नाही. एक अश्याच दिवशी शशांक आपल्या कामात असताना त्याला इयनचा फोन आला, "ब्रो, व्हेर आर यु? आम्हाला आत्ताच भेटायचय. लगेच. डॅनियललाही बोलावलेय मी. लगेच नीघ आणि स्पोर्ट्स बार मध्ये भेट आम्हाला."
"श्युर. मी आत्ताच निघतो" अस म्हणत तो ही लॅपटॉप घेऊन निघाला. पंधरा मिनिटात तिघे ही स्पोर्ट्स बार मध्ये पोहोचले.
"हे! वॉस्सप? काय झाल? एवढ्या तातडीने का बोलावलस?" शशांकने विचारले. इयनने लगेच आपला लॅपटॉप उघडून त्या दोघांना दाखवला. शशांक आणि डॅनियल यांचे चेहरे कुतूहलातून बाहेर पडून आता रोमांचच्या दिशेने जात होते. लॅपटॉपवरचा लेख वाचून डॅनियल म्हणाला, "धिस इझ ब्रिलियंट! आम्हाला जसा पाहिजे होता तसाच जागा आम्हाला भेटलाय. व्हॉट यू थिंक शशांक?"
"ऑफ कोर्स! इंडिया विल बी परफेक्ट! मी सगळ मेनेज करेन." शशांक उत्साहात म्हणाला. त्या तिघांनी लगेच आपल्या मॅन्टॉरनां याबद्दल ईमेल पाठवले.
"डॅड, आम्ही तिघे आमच्या थीसिस वर रिसर्च करायला इंडियाला जाणार आहोत. तुमची परवानगी आहे ना?" शशांकने रात्री जेवताना आपल्या वडिलांना विचारल.
"अरे जा की. एवढ फॉर्मल होऊन का विचारतोस?" डॉक्टरांनी विचारल.
"तुमचा इंडियात कोणी ओळखीचा आहे का? जो आम्हाला आमच्या कामात मदत करेल?"
"आय एम नोट शुअर. तुमचा विषय खूप वेगळा आहे आणि असल्या गोष्टी तिथे टॅबू मानतात. मी विचारून बघतो. बाय द वे, कुठे जाणार आहात तुम्ही?"
"गावाच नाव आता ठीक आठवत नाही आहे, पण कोल्हापूरच्या पुढे कुठे तरी आहे. सह्याद्रीच्या माउंटेन्सच्या आसपास."
हे ऐकताच अनन्याबाईनां ठसकाच लागला. त्यांचे डोळे उघडेच पडले होते.
"काय? कुठे म्हणालास तू?"
"काय झाल मॉम?"
"तू जाणार नाहीस तिथे. यू डोन्ट नो व्हॉट योर डीलिंग विथ. तू तुझा प्लॅन कॅन्सल कर." अस म्हणत अनन्याबाई जेवणावरुन उठल्या.
"पण झाल काय मॉम? सांग तरी? अशी अचानक का रिएक्ट झालीस तू?"
"हे बघ. तुझ आता पर्यंतच मी सगळ ऐकुन घेतले पण आता नाही. नो मीन्स नो!"अस म्हणत त्या आपल्या बेडरूम मध्ये गेल्या. शशांकने सर्व उपाय करून झाले तरी ही त्या ठाम होत्या. त्यांना माहित होत की शशांक कशाच्या मागावर जाणार होता. ते जे काही होत त्याने अनन्याबाईंच्या पूर्वजांनां छळल होत. त्यांनीही अनुभवल होत. शशांकलाच असली उपरी बुद्धि का सुचावी असल काही विशुद्ध शिकायची? तोच का? हे सगळे विचार त्यांना भांबावून सोडत होते. त्यांना घोरपडे घराण्याचे नाव विसरायचे होते. तो गाव, ते देऊळ, ती माणस, सगळ काही त्यांना विसरायचं होत. पण नियती आपला डाव साधून घेते, हेच खर.
जवळ जवळ सहा महिने विनंती करून जेव्हा त्या विरघळल्या नाहीत, म्हणुन शशांक आणि त्याच्या मित्राने घरी न सांगताच जायची आखणी केली. ही बातमी डॉ. अनिकेतनां कळाल. काही भानगड नको म्हणुन त्यांनी शशांकला मदत करायच ठरवल. त्यांच्या खास ओळखीतल अस कोणी ही नव्हत भारतात, फक्त भरत सोडून. हा भरत म्हणजे अनन्याबाईंचा मामे भाऊ. त्याच्या मुळेच तर त्यांच लग्न जमल होत. डॉकनी त्याचा फोन नंबर आणि पत्ता शशांकला दिला. तो अनन्या बाईंच्या गावातच रहायचा. डॉकनी त्याला कॉल करुन सांगितल की हे तिघे भारतात येणार आहेत, पण अनन्याबाईंनां सांगायच नाही अस ठरल. आता शशांक खुश होता. या उत्साहात त्याची झोपही उडाली होती. कधी एकदा भारतात लॅन्ड करतो अस वाटत होत. तो ज्याच्या समोर जाणार होता, तो ही त्याचीच वाट बघत होता.
क्रमशः
लेखक: © विनय चव्हाण
No comments:
Post a Comment