#संगम_लॉज -1
"भाऊ एक रूम पाहिजे..पण माझ्याकडे काही ओळखपत्र नाही"
ह्या वाक्याने खाली काहीतरी लिहत असलेल्या लॉज मॅनेजरची नजर त्या आवाजाकडे गेली...तोंडाला रुमाल बांधलेला तरुण...आणि बाजूला उभी असलेली तोंडाला स्कार्फ बांधलेली तरुणी बघून त्याने आपल्या तोंडातील मावा खिडकीतून बाहेर थुकला....तिच्याकडे वरून खाली बघत तो हसला आणि खिश्यातून दुसरी माव्याची पुडी काढून ती पुडी चोळत त्या पोराकडे बघत तो म्हणाला
"आरं ए....संजयभैयाचा लॉज आहे ह्यो...तू दोन हजार टेकव आणि बिनधास्त मजा मार...कुणाच्या बा ची हिम्मत नाय इथं धाड टाकायची....काय"
त्या मुलाने खिशातून दोन हजाराची नोट काढली आणि त्या तगड्या माणसाच्या हातात ठेवली....त्याने ती नोट ड्राव्हर मध्ये फेकली आणि त्या स्कार्फ बांधलेल्या तरुणीकडे बघत तो त्याला म्हणाला
"जा मज्जा करा....काय लागलं तर हाक मारा...आमी हाय हितच"
संगम लॉजवर अश्या अनेक जोडप्यांची ये जा असायची...शहरात जोडप्यांना तीच एक जागा सुरक्षित वाटायची...आसपास असलेल्या चार पाच कॉलेज मधील तरुण तरुणींच्या सतत च्या वावरामुळे हा लॉज सतत हाऊसफुल्ल असायचा....कुणी स्वतःच्या इच्छेने येत असे तर कुणी आपल्या नवप्रेम टिकवण्यासाठी आपल्या प्रेमाची प्रामाणिकता म्हणून आपलं शरीर आपल्या प्रियकराच्या स्वाधीन करत होतं......अनेकांनी काही अल्लड मुलींना आपल्या प्रेमाची शपथ देऊन फक्त एकांत आणि बोलायच्या हेतूने इथे आणलं असे पण प्रेमाची शपथ देऊन ती शपथ आणि तिचे कपडे इथेच सोडले जायचे...दारू पार्टी..गांजा...अनैतिक सेक्स...ह्या अश्या अनेक गोष्टीनी बरबटलेला हा लॉज....पण कुणाची तक्रार करायची हिम्मत नसायची कारण लॉज मालक संजयभैया हे त्या जिल्ह्याचे नावाजलेले पुढारी होते....दोन तीन तक्रारदारांना त्यांनी कुठल्याकुठे गायब केलं होतं....पोलिसांना त्यांचा हप्ता वेळेवर मिळत होता त्यामुळे त्यांचेही सपशेल दुर्लक्ष असायचं लॉजवर.....असा हा लॉज.... महिन्यांपूर्वी कमालीचा चर्चेत आला होता....एका मुलीचे नग्न फोटो आणि क्लिप इथूनच वायरल झाली होती....तिला ते सहन झालं नाही आणि ह्याच लॉजवर रूम नंबर 16 मध्ये तिने फॅन ला ओढणी बांधून फास लावून घेतला होता...अजून त्या घटनेचा पोलीस तपास चालू आहे....त्यात ती मुलगी गरीब घरची....लॉज मालक संजयभैयानी पैसा सारून ते प्रकरण तिथेच दाबून टाकलं होतं....परत तिथे अवैध धंद्याची रेलचेल चालू झाली...परत तिथे तोंडाला रुमाल बांधलेले तरुण तरुणी दिसू लागले...पण रुम नंबर 16 अजून बंदच होत...कारण ती मुलगी मेल्यापासून तिथे विचित्र घटना घडू लागल्या कोणीतरी रडत असल्याचा आवाज येऊ लागला...कधी कधी एक मुलगी त्या खोलीत दिसायची....त्या खोलीत काहीतरी आहे ही बातमी सगळीकडे पसरली त्यामुळे आता ह्या लॉजकडे येणाऱ्यांची संख्या बऱ्यापैकी कमी झाली होती.....त्यातच रूम नंबर 16 पूर्णपणे बंदच होती....रूम मधून समोरचा गजबजलेला रस्ता दिसायचा त्या रस्त्यावरून खिडकीत कोणी तरी उभं आहे असा दावा अनेकांनी केला होता त्यामुळे भागात भीतीचे वातावरण होते.....मालकांनी अनेक उपाय केले अनेक मांत्रिक आणले पण ती आकृती त्या खोलीत दिसायचीच....त्यामुळे नाईलाजास्तव ती रूम अनेक महिन्यापासून बंदच होती
आपले मळकट कपडे घेऊन तो आपले समान ओढत तो लॉज मध्ये शिरला आपल्या दबक्या आवाजात त्याने डुलकी घेत असलेल्या मॅनेजरच्या दिशेने बघून
"मालक एक रुम पाहिजे??"
ह्या वाक्याने मॅनेजरची झोप मोड झाली....त्याची वाढलेली दाढी वाढलेले केस मळकट कपडे बघून मॅनेजर आश्चर्य चकित झाला....पॉश कपड्यात परफ्यूम मारून येणारी मुलं मुली बघायची सवय असणाऱ्या मॅनेजरला तो मळकट पुरुष अनपेक्षित होता...मॅनेजरची नजर आजूबाजूला फिरू लागली....त्याच्याकडे बघत तो बोलला
"एकटा आला का?? तुझी आयटम आता येणार हाय की नंतर??"
ह्या प्रश्नाने तो एकदम बावरला...त्याच्या जवळ जात तो बोलला
"नाही ओ साहेब..माझी आई बाजूच्या इस्पितळात ऍडमिट आहे...15 दिवस इलाज करायचा हाय तिचा...दवाखान्यात डास फोडून खात आहेत म्हणून आलो बघा इथं....सुशांत......सुशांत नाव लिवा माझं रजिस्टर वर"

मॅनेजरच्या तोंडून हसू आलं...त्याने रजिस्टर मध्ये मान घातली आणि एन्ट्री करू लागला....
"ही घे रूम नं 16 ची चावी....हां जरा घाण आहे ती रूम पण तू गरीब दिसतोस म्हणून देतोय....तिथं रहा कुणाला त्रास न देता...आता काढ 15 दिवसाचे हजार रुपये"
मोठ्या शहरात ते सुद्धा इतक्या कमी किंमतीत खोली भाड्याने मिळते म्हणून त्याच्या चेहऱ्यावर लगेच समाधानाचे भाव आले...त्याचा हात सर्रकन पाकिटाकडे गेला....शोधून खोदून त्याने पाकिटातले हजार रुपये काढले आणि मॅनेजरच्या हातात टेकवले....मॅनेजरने हसत त्याच्या हातात रूम नं 16 ची चावी दिली आणि ते हजार रुपये गल्ल्यात न ठेवता आपल्या खिशात घातले.....सुशांत आपल्या पिशव्या घेऊन मॅनेजर ने सांगितल्या प्रमाणे वरच्या मजल्याकडे जाऊ लागला.....पायरीवर सिगरेट ओढत बसलेले तरुण तरुणी.....कुणाच्या हातात चिलीम असायची त्यांच्याकडे बघत तो वर चालला होता..हे सगळं त्याला अनपेक्षित होत...त्याने रुमालाने आपलं तोंड दाबलं...सिगरेट चा तो उग्र वास त्याला असह्य झाला होता....समोर त्याला कुणाची धडक बसली....त्या धडकेने तो भानावर आला समोरच्याने सिगरेटचा झुरका त्याच्या तोंडावर मारला....सुशांत खोकू लागला...हाताने तो धूर बाजूला करू लागला....समोर उभारलेल्या एका धिप्पाड तरुणाने ती जळती सिगरेट त्याच्या अंगावर फेकली

"दिखता नही क्या xxxx"
अस बोलून त्याने सुशांतला बाजूला ढकललं आणि निघून गेला...सुशांत स्वतःला सावरत पुढे पुढे चालू लागला....तो आपली 16 नंबरची रुम शोधत होता....दुरूनच एका कोपऱ्यात त्याला तो आकडा दिसला.....त्याची पावले त्या दिशेने चालू लागली....त्याची मान मात्र खाली होती...प्रत्येक खोलीजवळ उभे असलेले तरुण तरुणी आणि त्यांचे ते बिनधास्त चालणारे चाळे सगळं सगळं तो पहिल्यांदा बघत होता....अखेर त्याने गडबडीत कुलपू उघडलं....आणि रुम मध्ये शिरून जोरात धडकून दार लावून घेतलं......त्याची छाती उडत होती....त्या खोलीत अंधार होता....सुशांतचे चाचपडणारे हाथ लाईटीचा स्विच शोधू लागले.....खूप दिवसापासून बंद असलेल्या खोलीतून कुबट वास येत होता....त्या अंधारात सुशांत स्विच शोधू लागला....चाचपडत असणाऱ्या त्याच्या हाताला काहि तरी लागलं....त्याने बोटांनी त्यावर हाथ फिरवायला सुरवात केली....त्याच्या काळजात धस्स झालं....कुणाचे तरी पाय लटकत होते....तो प्रचंड घाबरला आणि खाली कोसळला.....सरपटत तो इकडे तिकडे फिरू लागला....."कोण हाय??....कोण हाय तिथं???"
तो एका कोपऱ्यात येऊन त्या अंधारात आवाज देत होता...मागे भिंत होती....त्या भिंतीवर तो स्विच शोधू लागला.....त्याच्या हाती काहीतरी लागलं
"खट्टsssssss"
अश्या स्विचच्या आवाजाने पूर्ण रूम मध्ये प्रकाश पडला.....त्यात त्याची नजर काहीतरी शोधत होती...पण ती पूर्ण खोली रिकामी होती....त्याने बाथरूम टॉयलेट सगळीकडे चेक केलं....पण अंधारात त्याच्या हातांना स्पर्श झालेले ते थंडगार पाय कुठेच दिसत नव्हते......त्याने आपल्याच डोक्यात एक टपली मारली आणि आपल्या कामाला लागला....त्याने आपले कपडे आपले समान तिथल्या कपाटात ठेवले....आजूबाजूला पडलेली धूळ त्याला स्वस्थ बसू देत नव्हती...त्याने आपल्या हातात झाडू घेतला आणि साफसफाई चालू केली....बेड खालून झाडू फिरवताना दोन दारूच्या रिकाम्या बाटल्या घरंगळत बाहेर आल्या...त्या बघून त्याने झाडू बाजूला ठेवला आणि त्या बाटल्या उचलून समोरच्या डस्टबिन मध्ये टाकण्यासाठी तो बाहेर आला....त्याची नजर परत त्या व्हरांड्यात गेली....त्याच्यासमोरचं एका जोडप्याचे किसिंग चालू होते....ते बघून सुशांत ताडकन आपल्या खोलीत शिरला

"अरे...देवा...काय चालू आहे इथ??काय ही आजकालची पोरं...ह्यांच्या आईबापांनं काबाडकष्ट करून ह्यांना शाळेत हॉस्टेलवर पाठवलं असलं...आणि इथं येऊन हे..हे असले धंदे....माझी ऐपत नाही भारीतल्या लॉज वर जाऊन राहायची नाहीतर........."
स्वतःशी पुटपुटत तो झोपी गेला.....सकाळी मॅनेजरला "हॉस्पिटलात आईला भेटून येतो" अस सांगून तो बाहेर पडला......रात्री तो रूम मध्ये आला तेव्हा सगळं समान अस्ताव्यस्त पडलं होतं....
"कुणी केला हा खोडसाळपणा??"
त्याने मॅनेजर कडे चौकशी केली पण त्याने ह्याबद्दल सांगायला टाळाटाळ केली....तो तसाच निघून आला "काय सापडणार आपल्यासारख्या फाटक्या माणसाकड" ह्या विचाराने तो झोपी गेला.....मध्यरात्र झाली.....6 चा गजर लावून तो झोपी गेला....वाजले असतील साडे तीन... अचानक त्या खोलीतले ते घड्याळ गजर करू लागले...सुशांत ताडकन उठला....त्याने ब्रश हातात घेतला त्याची नजर या घड्याळाकडे गेली साडेतीन वाजलेले...तो घड्याळाजवळ गेला....झोपमोड झाल्यामुळे त्याला प्रचंड राग आला होता...त्याने त्या घड्याळावर जोराचा हाथ मारला....सुशांत समोर आरसा होता....त्यात आपला चेहरा तो बघत होता....काहीतरी विचित्र वाटत होतं...तो आरश्याच्या जवळ जाऊ लागला....त्यात केस सोडलेली कुणीतरी मुलगी आपल्या मागे आहे असं त्याला दिसलं त्याने झटकन मागे बघितलं मागे कुणीच नव्हतं....त्याला काहीच सुचत नव्हतं....तो तसाच परत झोपी गेला....अचानक त्याला रडण्याचा आवाज येऊ लागला...तो ताडकन उठला आणि इकडे तिकडे शोधू लागला.....खिडकीतून बाहेर बघितलं तिथेही कुणीच नव्हतं....सुशांत परत बेड वर आडवा झाला....त्याची नजर अचानक वरती गेली.....पंख्याला एक मुलगी लटकत होती.....तो अक्षरशः किंचाळत उठला.....त्याचे डोळे बंद झाले सुशांतने आपला चेहरा पांघरुणात लपवला....तो थरथरत होता.....त्याने हळूहळू ते पांघरूण खाली घेतलं.......समोर कुणीच नव्हतं.....त्याचं डोकं प्रचंड दुखू लागलं.....त्याचे चार पाच दिवस तसेच गेले...त्या रूम मधून नेहमी विव्हळण्याचा आवाज येऊ लागला...कुणीतरी त्या आरश्याववर काहीतरी लिहून जायचं..अंधाऱ्या कोपऱ्यात दोन लकाकणारे डोळे त्याला दिसायचे....कधी तरी अचानक "आई...आई....बाबा मला वाचवा" अशी जोराची किंचाळी ऐकू यायची..हळव्या सुशांतला हा आवाज असह्य झाला.....त्या रात्री तो झोपला होता....परत तो रडण्याचा आवाज आला....सुशांतने आपल्या डोक्यावर पांघरूण घेतले होते.....त्या त्रासाने त्याने कित्येक रात्री जागून काढल्या होत्या.....त्या रडण्याचा आवाज तीव्र झाला.....सुशांत पांघरुणात हुंदके देऊन रडत होता.....त्याने आपले डोळे पुसले त्याने डोके पकडलं.... तो ओरडत उठला त्याने इकडे तिकडे बघितलं

"आsssss.......कोण आहेत तुम्ही??? का तरास देताय मला?? काय पाहिजे तुम्हाला???फाटका माणूस हाय मी...आई....आई आजारी आहे म्हणून आलोय तुमच्या गावात....माझ या जगात कुणीच नाही माझी आईच माझं सगळं आहे....तिच्या काळजी पोटी आलोय मी तिला घेऊन आलोय मी इथल्या इस्पितळात"
सुशांत हुंदके देत होता....डोळे पुसत त्याने बघितलं की तो आवाज पूर्णपणे बंद झाला होता...त्याची नजर बाजूच्या कोपऱ्यात गेली....पांढऱ्या कपड्यात कोणीतरी उभं होतं...त्या अंधारात ते लकाकणारे डोळे सुशांतची हवा टाईट करत होते......तो एकटक तिकडे बघत होता....ती आकृती जवळ जवळ येत होती....सुशांत इकडे तिकडे काहीतरी शोधू लागला...त्याची नजर समोर पडलेल्या काठिकडे गेली...त्याने ती उचलली....ती आकृती अंधारातून बाहेर येत होती....झिरो बल्ब च्या उजेडात अजूनही ती अस्पष्ट दिसत होती....सुशांतने भिंतीवरचा लाईटचे स्विच दाबले ....रुम मध्ये प्रकाश पडला.....समोर एक मुलगी उभी होती....उभी नव्हतीच हवेत तरंगत होती...तिचे पाय जमिनीवर नव्हते.....तिच्या अंगातून एक वेगळाच प्रकाश पडत होता...तिच्या अंगावर हातावर ओरखडे होते....कपडे कुठे कुठे फाटले होते....एकदम स्वच्छ गोऱ्या सुंदर चेहऱ्याची ती.....पण तिच्या चेहऱ्यावर सुद्धा जखमेच्या खुणा दिसत होत्या...सुशांत समजून चूकला की ही कोणीतरी अमानवी शक्ती आहे...त्याच्या हातातून ती काठी गळून पडली....तो दरवाज्याकडे धावला....पण अचानक दरवाजा खाडकन बंद झाला...सुशांत प्रचंड घाबरला होता.....तो ते दार उघडण्याचा आटोकाट प्रयत्न करत होता....."वाचवा....वाचवा" म्हणून ओरडत होता....तो खिडकीकडे पळाला...खिडकीसुद्धा बंद झाली...तो आता हतबल झाला....तिने तिच्यापुढे हाथ जोडले
"जाऊ द्या ओ....जाऊ द्या मला....मी काय बिघडवलय तुमचं....माझी आई आहे ती माझी वाट बघत असेल ओ....जाऊ द्या मला"
सुशांत रडत होता....त्याने तिच्यासमोर गुडघे टेकले होते आणि डोकं जमिनीवर ठेवून तो रडत होता
अचानक तिचे पाय जमिनीवर आले सुशांतने मान वर काढली
"मी सुद्धा अशीच रडायचे....अशीच गयावया करायचे....माझी सुद्धा आई वाट बघत होती तेव्हा....वडील सुद्धा अजून वाट बघत असतील...लहान भाऊ सुद्धा....पण मी खूप दूर गेलेय त्यांच्यापासून"
तिच्या त्या जखमी चेहऱ्यावरचे ते दुःख सुशांतला स्पष्ट दिसत होते....तो उभा राहिला आणि मोठ्या धाडसाने तिला बोलला
"म्ह.....म्हणजे......काय झालं तुम्हाला....कशी दशा कशी झाली तुमची??"
तिने त्या पंख्याकडे बघितले..
"इथेच संपवलं होतं मी मला.....खूप स्वप्न घेऊन आले होते ह्या शहरात....छोट्या शहरातली मी...अंजली नाव माझं...पण गावाकडे सगळे अंजूचं म्हणायचे.... शिकायची खूप इच्छा होती मनात....वडिलांना सुद्धा माझ्यावर खूप विश्वास होता...त्यांनी तर आपलं शेत विकून मला ह्या शहरातील मोठ्या हॉस्टेल मध्ये ऍडमिशन करवून दिलं....इथे रमताना जरा कठीण गेलं...सगळे मॉडर्न आणि मी मात्र साधी खेडवळ...पण जमवून घेत होते सगळं....कॉलेजच्या अनेक मैत्रिणी बॉयफ्रेंड सोबत फिरायचा पण मी फक्त "शिकून मोठं व्हायचं..बाबांचा आपल्या वरील विश्वास खरा ठरवायचं" ह्या एकाच उद्देशाने जगत होते...मला सुद्धा त्या स्वप्नातील राजकुमाराची स्वप्नं पडायचीत पण माझ्या करियरच्या शेतात ते स्वप्नं मी कधीच दफन केलं होतं तिथं मेहनत करून मला माझं करियर घडवायचं होतं....त्या दिवशी मला तो भेटला....संदीप त्याचं नाव....हँडसम रुबाबदार...पिळदार शरीरयष्टी....कित्येक पोरी त्याच्यावर फिदा होत्या पण माझ्यात त्यानं अस काय बघितलं काय माहीत...त्या दिवशी त्याने मला प्रपोज केलं...मी सपशेल नकार दिला होता....पण त्याने माझा पाठलाग सोडला नव्हता...किती त्रास द्यायचा एखाद्याला.....एक दिवस तर त्याने कहरच केला...त्याने मला त्याच्या रक्ताने चिट्ठी लिहली होती....त्या दिवशी मला रडूच कोसळलं अक्षरशः त्याच्या मिठीत रडले मी....संदीप सुद्धा मला आवडू लागला...आमचे चॅटिंग....बागेत भेटणे चालू झालं....खूपच प्रेमळ होता तो....माझे सगळे हट्ट पुरवायचा...एकदिवस संदीपने त्याचा खास मित्र जॉन ची ओळख करवून दिली....आता आम्ही तिघेही बेस्ट फ्रेंड होतो....कधी कधी एकांतात संदीप माझ्या अंगावर हात टाकायचा...कधी कधी त्याचा हात माझ्या त्या भागावरून फिरायचा पण मीच त्याला दूर करत होते...खूप चिडचिड करायचा "तुझं माझ्यावर प्रेमच नाहीय" अस बोलून रुसून बसायचा...मग मीच त्याची समजूत काढायचे माझं शरीर त्याच्या स्वाधीन करायचे....पण त्याच्या डिमांडस वाढतच होत्या....त्याच्या डोळ्यातील तेंव्हाचं ते प्रेम कधी वासना बनलं ते मला सुद्धा कळलं नाही....कधी बागेत..कधी कॉफी शॉप मध्ये कधी माळावर तो माझ्या प्रेमाची परीक्षा घेत होता....आणि मला सुद्धा इच्छा नसताना त्या पेपरला बसावं लागतं होतं....त्याच्या प्रेमाच्या पेपरचे एकच उत्तर होतं....ते म्हणजे माझं शरीर......एक दिवस त्याने मला कॉफी शॉप मध्ये बोलावलं....त्या दिवशी कॉफी पिल्यानंतर मला गरगरल्या सारखं होऊ लागलं...संदीपने मला सावरलं...बाहेर एक फोर व्हीलर उभी होती....त्या गुंगीत मी त्या गाडीतून ह्या लॉजवर आले....शुद्ध नसली तरी ते हसण्या खिडळण्याचे आवाज मला स्पष्ट ऐकू येत होते....तो घाणेरडा स्पर्श मला जाणवत होता...जेव्हा जाग आली तेव्हा फाटक्या कपड्यानी ह्याच बेडवर होते....संदीप आणि जॉन इथेच होते...मला तर रडू कोसळलं...तेव्हा त्या दोघांनी मला पकडून काहीतरी जबरदस्ती मला पाजवल....मी पुन्हा बेशुद्ध व्हायचे.....शुद्धीवर यायचे ती परत नवीन जखमा घेऊनच....ह्या खोलीत माझा आवाज ऐकणार कोणीच नव्हतं....मी संदीप जवळ गयावया करायचे पण तो मला माझे ते नग्न व्हिडिओ दाखवून ब्लॅकमेल करायचा...नेट वर अपलोड करून बदनामी करीन अशी धमकी द्यायचा.....रात्री परत तो घोट पाजयचा परत सकाळी नवीन जखमा...नवीन दुखणं....सगळं सगळं असह्य....कोण आणि कितीजण येत होते ह्या खोलीत काहीच माहीत नाही.....ह्या रोजच्या मरणाला कंटाळले होते मी...त्या दिवशी रात्री मी शुद्धीत आले....दारूच्या नशेत जॉन आणि संदीप पडले होते...मला नीट चालता सुद्धा येत नव्हतं....जगून तरी काय करणार होते....बदनामी कुणाची फक्त माझी....नाही....माझ्या देवासारख्या आईवडिलांची....मग मला हे सगळं माझ्या डोळ्यांनी बघणं मान्य नव्हतं म्हणून त्या रात्री मी ओढणीने गळफास लावून घेतला....अरे ते नराधम इतके नीच होते की मेल्यावर सुद्धा त्यांनी माझी बॉडी रेल्वे खाली टाकली.....आता ह्या जागेत कैद आहे...त्या नराधमांना जगायचा अधिकार नाही....सुटले असतील ते आतापर्यंत..तो पुढारी संजयभैया...त्याचीच खास माणसं आहेत दोघे..त्याने आतापर्यंत त्यांना सोडवलं असेल..मला इथून दुसरीकडे जाता येत नाही...फक्त ह्या रुम वर सत्ता आहे माझी......नाहीतर........नाहीतर....."

अचानक गंभीर बनलेल्या अंजुच्या आवाजाला थांबवत सुशांत मोठ्या धीराने म्हणाला
"नाहीतर.....नाहीतर......काय???????"
अंजुने एकनजर सुशांतवर टाकली....तिच्या मुठ्या आवळल्या गेल्या....मोठ्या रागाने ती आपलं मगाच अर्धवट वाक्य पूर्ण करत म्हणाली
"नाहीतर.... त्या दोघांची मुंडकी कापून लटकवली असती इथे"
आपले डोळे पुसत सुशांत अंजु जवळ गेला
"ठीक आहे....मी तुझं हे काम करीन....त्यांना मी इथे घेऊन येईन...खरोखर बाईला वस्तू समजणाऱ्या लोकांना जगायचा अधिकार नाही...मी हाय तुझ्या बरोबर.....उद्या त्यांचा शेवट दिवस असेल...तू तयार रहा"

सुशांतच्या वाक्याने अंजुच्या चेहऱ्यावर हसू आलं...आपला बदला पूर्ण होणार हे समाधान तिला वाटू लागलं....ती सुशांत कडे बघत परत त्या अंधारात गायब झाली...आणि सुशांत उद्याच्या कामासाठी तयार झाला......................(क्रमशः)
(ह्या कथेतील हे स्थळ पूर्णपणे काल्पनिक आहे याची नोंद घ्यावी...पूर्ण कथा लिहून तयार आहे....उद्या रात्री पुढचा भाग मिळेल...कथे संबंधित सूचना कमेन्ट बॉक्स मध्ये नोंदवाव्यात.......धन्यवाद🙏)
No comments:
Post a Comment