✍️✍️✍️✍️✍️✍️✍️✍️✍️✍️✍️✍️✍️✍️✍️
या कथेचा भाग - २ ची लिंक खाली दिलेली आहे
👇👇👇👇👇👇👇👇👇👇👇👇👇👇👇
👇👇👇👇👇👇👇👇👇👇👇👇👇👇👇
( "https://marathighoststories.blogspot.com/" ह्या ग्रुप मधील माझ्या प्रत्येक वाचकाला , मित्रांना, मैत्रिणींना , ज्येष्ठ-श्रेष्ठ व्यक्तींना नवरात्रौत्सवाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा. . . आई भवानी तुम्हाला उदंड आयुष्य देवो , हीच प्रार्थना. जय भवानी . . . 🙏🙏🙏🙏🙏🙏!! )
💀💀💀💀💀💀💀💀💀💀💀💀💀💀💀
दोघंही विचारात होते अस का ? प्रश्न वाढत होते उत्तर मिळत नव्हती.... तीच त्यांना शोधायची होती.... ते नवीन दिवसाची वाट बघू लागले.... थंडी वाढली.... मध्यरात्र झाली........ आणि......पुन्हा वारा घुमू लागला.. दोघेही जागेच होते. दोघांनी जाऊन येशुकडे प्रार्थना केली . गुढग्यावर बसून जेन आणि मेरी त्यांच्या देवाला विनवणी करू लागले. काही क्षणांनी वारा थांबला.
दिवस लोटत होते , काम भरभर गतीने पुढे पुढे चालले होते , कामगार माणसे त्या खोलगट रेघेत जवळ जवळ 35 फूट खाली पोहोचले होते, काहींचे मृत्यू ओढवले होते पण काम थांबत नव्हते, 100 फूट खोली निर्माण झाली होती. अजून बरच अंतर खाली जाणे बाकी होते. दिवस ढकलत चालले होते. रोज नवनवीन अनुभव येत होते. जेन आणि मेरी दोघेही त्रस्त झाले होते. रोज एकेक असे अनुभव यायला प्रारंभ झाले होते की, त्याने त्यांचे मस्तक काम करणे बंद व्हायचे.
कधी अचानक रात्री गुर्गुरण्याचा आवाज येई , कधी रात्री अपरात्री असंख्य चमचमनारे दिवे त्या खोलगट रेघेतून बाहेर येई, कधी एखाद्याचे ओरडणे, कींकाळणे , एकाएकी असंख्य कीटक तंबूत शिरकाव करणे. विंचू , साप , खेकडा , नागीण असे अनेक विषारी प्राणी दिसू लागले. अधी मधी मेरी दचकून उठायची, जेनच्या चेहऱ्यावर रक्ताचे डाग उमटायचे , कधी अख्खा तंबू कोणी हलवून टाकी , कधी अचानक फक्त ह्या दोघांच्या तंबूतच आग लागे , कधी काम करता करता अनेक सावल्या दिसत , त्या मेरी कडे धावत येई असे तिला वाटे, अश्या कितीतरी घटना दिवसेंदिवस वाढत चालल्या होत्या.... ह्यातच साधारण 20 दिवस लोटले......
मग, "अतिगंड" योग असलेली , "पंचकातली पाप दृष्टी ग्रहांची" अमावस्या आली होती.. किर्र.. काळोख पसरला होता. संध्याकाळ होऊन, काम आटपून जो तो आपापल्या तंबूत विसावा करीत होता. जेवण खावन झालं. निद्रेची वेळ होत आली तरी, मेरी आपल्या खुर्चीत बसून हेलकावे घेत होती. जेन कधीचाच झोपला होता. मेरी एकाएकी उठली , तंबूच्या बाहेर पडली, अमावस्या त्यात थंडीचे थैमान , किर्र काळोख , निपचित शांतता अश्या वातावरणात मेरी बेधुंद अवस्थेत त्या खोदकाम चाललेल्या ठिकाणी आली. वारा बेभान होऊन त्या तळावर विहरत होता. मेरी एकाएकी थांबली, तिच्या पायाला काहीतरी लागले. ठेचकाळत ती खाली वाकली आणि तिच्या हाताला एक गोल गरगरीत वस्तू लागली. अंधारात दिसतही नव्हते. तिने हात त्या वस्तूवर चहूबाजूने फिरवला. वस्तू उचलून हातात घेतली. ती घेऊन ती तंबूत आली. तीने पाहिले ही नव्हते काय वस्तू होती ती. . . .
तंबूत येऊन तिने ती वस्तू टेबलवर ठेवली आणि तिची मती गुंग होऊन गेली.... ती वस्तु होती माणसाची कवटी...!! ती क्षणात मागे सरली, आता काय करावे कळेना म्हणून तिने ती वस्तू हातात घेतली आणि धावत पुन्हा त्या जागेवर गेली... आणि भर जोराने ती त्या खड्ड्यात फेकून दिली. ती पुन्हा धावतच मागे वळुन पळत सुटली तंबूच्या दशेने इतक्यात मागून गुरगुरण्याचा आवाज चालू झाला. मेरी खूपच घाबरली , ओरडली पण तिचा आवाज कोणालाही पोहचत नव्हता. संपूर्ण तळ शांत निद्रेत होतं. मेरी धावत सुटली, हातपाय झाडत, खाच खळग्यातून , पडत, झडत धावत होती , तिने धावताना मागे पाहिले तर , त्या खोलगट भागातून एक विचित्र काळपट सावली वर आली आणि भलीमोठी होत जाऊन नाहीशी झाली. तंबूत पोहोचताच मेरी बेशुध्द पडली. तिच्या त्या प्रकाराने जेन धडपडून जागा झाला. त्याने तिला सावरलं , तोंडावर पाणी मारले, ती कशीबशी उठली. तिने तो झालेला संपूर्ण प्रकार त्याला सांगितला. जेन ही घाबरला.त्यालाही काही सुचेनासे झाले.... विचारा अंती काही ठरवून दोघेही झोपी गेले...... गुर गुरण्याचा आवाज मंद गतीने येतच होता पण तो फक्त मेरीला ऐकु येत होता....
सकाळ झाली. दोघेही उठले आणि त्यांच्या हेड कडे गेले. सविस्तर हकिकत त्यांनी त्यांना सांगितली. पहिल्यांदा त्यांना विश्वास बसला नाही पण त्या दोघांच्या खातर त्यांनी एका प्रख्यात स्त्री ला तळावर बोलवायचे ठरवले , जी ह्या गोष्टीत निपुण होती . तीच नाव होतं " रेजीका". रेजीका साधारण रात्री 10 वाजता तळावर आली. तिने विशिष्ट पद्धतीचे कपडे परिधान केले होते , गळ्यात काळ्या मण्यांच्या माळा सोडल्या होत्या, हातात कवटी च्या अंगठ्या होत्या, डोळ्यात जळजळ होती. रेजिका ने पहिल्यांदा मेरी शी पंधरा मिनिटे चर्चा केली मग ती बाहेर आली आणि त्या खोलगट जागेकडे जायला निघाली, पोहोचली . तिथे जाऊन डोळे बंद करून तिने काही जाणवून घेण्याचा प्रयत्न केला. तिला काहीतरी दिसले होते पण ती सांगू शकत नव्हती म्हणून "फक्त मेरीला माझ्यासोबत तंबूत ठेवा, तुम्ही बाहेर जावा, जवळ राहू नका" अस म्हणाली. त्याप्रमाणे हेड, जेन दोघेही बाहेर दूर जावून बसले... तंबूत फक्त मेरी आणि रेजिका दोघीच होत्या.
रेजिका ने हातात एक येशूचे क्रॉस घेतले. आणि आपल्या दोन्ही हातांनी गच्च दाबून धरले आणि प्रार्थना करून ते मेरी च्या हातात दिले. तिला गच्च दाबून धरायला सांगितले. मेरी ने ते हातात धरून गच्च धरले. रेजिका ने आपला उजवा हात मेरीच्या डोक्यावर ठेवला आणि दोन वेळा डावीकडून आणि दोन वेळा उजवीकडून डोक्यापासून जमिनीपर्यंत उतरवला. हळूहळू मेरी थरथरू लागली. तिचे थरथरणे वाढत चालले होते. बघता बघता मेरी जागेवरची उडू लागली. हातपाय झाडू लागली. हातातला क्रॉस तिने कुठच्या कुठे फेकून दिला. मेरीने वर ठेवलेला येशूच्या फोटोकडे नुसते पाहिले तर फोटो खाली कोसळून पडुन फुटला. चक्काचूर होऊन गेला. रेजीका बघतच राहिली कारण, तिला अपेक्षा होती की अस केल्याने त्या तंबूत ज्या हालचाली होतात त्या पुन्हा होतील. मग तिला त्यावर उपाय काढता येइल, पण घडत होतं भयानक. स्वतः मेरी गदगदून, सारं विनाशकारी करत होती. मेरीने डोळे उघडले नव्हते. अचानक ती थरथरायची थांबली, धडपड थांबली. सार शांत झाली आणि मेरी डोळे उघडायला लागली. रेजीका ने सुटकेचा निःश्वास सोडला आणि मेरीकडे पाहिले. पाहताच ती नखशिखांत हादरली. मेरी चे डोळे रक्ता सारखे लालेलाल झाले होते. इतके भयानक, विकृत डोळे रेजीका प्रथमतः पाहत होती.... रेजीका एकाएकी मागे उडवली गेली, ती ओरडली , किंचाळत बाहेर धावत सुटली पाठून मेरी सुध्दा धावत होती. दोघीही धावत त्याच खोलगट भागा जवळ आल्या . . . . .
रेजीका अगदी टोकावर थांबली जरा पाय घसरला असता तर आत कोसळली असती. मेरी तिची रक्ताची नजर रोखून तिच्या मागून तिच्या जवळ पोहोचली. पाठून येऊन मेरी ने रेजीका ला धक्का मारला. रेजीका पुढे कोसळली. ती किंचितशी वाचली आत पडताना. जमिनीवर पडली. तेव्हा तिच्या हाताला झटकून चमक बसली. काहितरी सर्रकन झटका लागल्या सारखे झाले. तिने डोळे बंद केले आणि काही जाणवतंय का ते बघायचा प्रयत्न करत असताना बाजूला मेरी बेशुध्द पडली. रेजीका ने डोळे बंद केले आणि काही दिसतंय का ते पाहू लागली....
तिला दिसले काहीतरी भयानक.... काय .? ती घामाने चिंब झाली. भर रात्रीत थंडीत तिला दरदरून घाम फुटला. तिने पाहिले. . . . . . ..
भाग - ४ पुढील टप्प्यात
👇👇👇👇👇👇👇👇👇👇👇👇👇👇👇
( माझ्या भयकथे व्यतिरिक्त इतरही कथा वाचण्यासाठी खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करा , आनंद घ्या ...)
(अमर्याद रचना वाचा , मित्रांसोबत शेयर करा )
No comments:
Post a Comment