या कथेचा भाग -१ ची लिंक खाली दिलेली आहे
👇👇👇👇👇👇👇👇👇👇👇👇👇👇👇
👇👇👇👇👇👇👇👇👇👇👇👇👇👇👇
💀💀💀💀💀💀💀💀💀💀💀💀💀💀💀
दिसत होते फक्त मुडदे , निपचित पडलेल्या इमारती , आक्रोश करणारा निसर्ग..... आणि निसर्गाचा रुद्रावतार....!!
टीमच्या सरांनी त्या दोघांना जवळ बोलावले आणि दोघांनाही सांगितले कि. . . . . . . . .
"भूकंपाची क्षमता 6.1 होती. खूप जीवितहानी त्याच बरोबर पर्यावरण हानी झालेली आहे. त्यामुळे काल झालेल्या भूकंपाने नेमके काय नुकसान केले हे पाहण्यासाठी "एन-जी-ओ" ची टीम थोड्याच वेळात पोहोचेल. ती टीम त्याचं कार्य करेल पण आपल्याला मात्र "गवर्नमेंट ऑफ आफ्रिका" येथून आदेश आलेले आहेत , की ह्या पडलेल्या मोठ्या रेषेतील आतल्या भागातील सर्वेक्षण करणे, त्याच्या मुळा पर्यंत जाणे गरजेचे आहे. इतक्या मोठ्या इमारती, गाड्या, आत पडल्या त्या नेमक्या कुठे गेल्या ? जर आत तळाला गेल्या असतील तर मग तळाला आहे तरी काय ? आत ज्वालामखी आहे की अन्य काही ? या सर्व गोष्टींचा पडताळा आपल्याला करायचा आहे... त्यामुळे आजपासून उत्खननासाठी तयारीला लागा... तुमच्या दोघांच्याही हातात ही मोहीम सोपवत आहोत.... बेस्ट ऑफ लक. . . !!
त्या दोघांनीही कंबर कसली. आता तयारीला लागायचे म्हटल्यावर तिथेच राहावे लागणार...... त्या दोघांनी आपल्या हाताखालच्या माणसांना त्या त्या अनुषंगाने ऑर्डर्स देऊन घर गाठायच ठरवलं.जवळ जवळ वीस दिवस बाहेर राहावे लागणार या अंदाजाने दोघांनी आपल्या बॅग भरल्या आणि पुन्हा वेलकौम गाठलं..... एव्हाना तोपर्यंत सर्व ताफा तयार होता.. वीस जेसीबी , वीस मोठे - छोटे डंपर, लॉरी, ट्रक, टेम्पो , क्रेन , पन्नास ड्रिल मशीन आणि जवळजवळ साठ-सत्तर माणसांचा ताफा सज्ज होता. त्यात प्रत्येक संघाचा प्रमुख असे पंधरा प्रमुख होते , प्रत्येकाला ते ते काम वाटप करून देण्यात आलेले होते. जेवणावळी करण्यासाठी वेगळे तंबू, आचारी ठेवण्यात आले होते. झालं...... सारं सज्ज झाल होत.. त्या सगळ्या जमवाजमव करण्यात तो दिवस मावळतीला आला... आणि रात्र अंधारून आली....
दुःखाची वेगळी सीमा पार करून आता एका रहस्यमयी वातावरणाने वळण घेतल होते. काय असेल खाली ? ज्वालामुखी की जमीन ? संपूर्ण वेलकौम शहरात एकाच विषयाची चर्चा सुरू झाली. EAOSA काय शोध लावणार ? ती वार्ता बघता बघता मीडिया द्वारे संपूर्ण साऊथ आफ्रिका मध्ये पसरली. जशी साऱ्या जगाला उत्सुकता होती तशीच उत्सुकता तिकडे तंबुमधील प्रत्येक माणसाची झाली होती. संघा संघाला तंबू बांधून दिले गेले. राहणं- खाण सगळं होऊ लागलं. जेन आणि मेरी आपल्या वैयक्तिक तंबूत बसले होते. जेवण झाले होते.
साधारण रात्रीचे 12 वाजले होते.आपल्या तंबूत मेरी ने प्रभू येशूचा फोटो लावून त्यासमोर मेणबत्ती प्रज्वलित केली होती. शांत,धीर गंभीर वातावरण थंडीने माखून गेलं होतं. जेन दुसऱ्या दिवशीच्या कामाच्या योजनेत मग्न असताना मेरी ने त्याला हाक मारली. जेन ने तिच्याकडे पाहिले .
ती म्हणाली :- हे बघ, मी या लॉकेट मध्ये आपल्या दोघांचा फोटो लावला आहे...( लॉकेट दाखवत म्हणाली )
जेन :- हे खूप छान... मस्त....!!
मेरी वेगळ्याच मुड मध्ये होती ते जेन ने ओळखले. मग जेन ने ही काम बाजूला ठेवलं. तो ही रंगात आला. मेरी ने आपल्या हातातील वस्तू बाजूला ठेवल्या , केस मोकळे केले , गळ्यातील चांदीचे लॉकेट येशूच्या फोटो जवळ ठेवले... आणि ती जेन ला साथ द्यायला सज्ज झाली.... तंबू मधील दिवे मालवले.....
साधारण मध्यरात्र झाली. बाहेर दिमाखी काजव्यांनी आपली बंधन तोडून अख्खी रात्र उजळून टाकली. घड्याळी 2.30 वाजले होते. जेन आणि मेरी दोघेही गाढ झोपले होते. अचानक वारा जोरजोरात वहायला लागला. तंबू खडखड करून हलायला लागला. तंबू चे पडदे फडफड करून आदळाआपट करून इकडे तिकडे फर-फरायला लागले. जेन हळूहळू जागा व्हायला लागला ,इतक्यात वरून येशूचा फोटो जोराने भिरकावून खाली पडला आणि सतरा तुकडे होई पर्यंत फुटला, चकाचुर झाला. त्या आवाजाने ते दोघेही दचकून उठले. बघितले तर काचांचे तुकडे इतरत्र पसरले होते. बाहेरील वारा थांबला होता. दोघेही ते सारं आवरू लागले. एक अर्ध्या तासानंतर पुन्हा दोघे झोपले. हळूहळू पहाट होत होती.....
सकाळ झाली, कामाला सुरवात झाली. जो तो आपल्या कामात मग्न झाला. प्रत्येक जण आपल्या ध्येयापर्यंत पोहोचायच या कल्पनेने झपाटून काम करीत होता. जेन पुढे पोहोचला होता. जेनी ते लॉकेट शोधत होती पण कालच्या त्या प्रकारात कुठे गेलं ते तिला सापडत नव्हत. शेवटी अगदी त्या बेड खाली हात घातल्यावर ते तिच्या हाताला लागलं.तिने ते उचललं आणि पुन्हा गळ्यात घातलं.. आणि ती जेन ला शोधायला गेली....शोधत शोधत ती निर्जन जागी जाऊन पोहोचली. त्यांचा कर्मचारी संघ खूप मागे दिसत होता.... ती एकटीच तिथे गेली होती.... डोळ्यांना दिसेल ते सारं टिपून घेत होती...अचानक तिला पाठीमगुन काही हालचाल जाणवली... ती मागे वळली तर वटवाघूळांचा मोठा थवा तिच्याकडे चित्कारत येत होता. ती घाबरली , ओरडली , किंचाळली , मागे मागे सरकू लागली, सरकताना पाय पायात अडकला आणि खाली कोसळली. जेन ला हाका मारू लागली.... तो थवा जवळ जवळ आला आणि त्या असंख्य वटवाघूळांनी मेरी वर हल्ला केला..... हातापायाच्या चावा घेत घेत ती वटवाघूळ पुढे निघून गेली.....
सर्वांनी तिला उचलून तंबूत नेले . जेन ला बातमी कळली तसा धावत तो तंबूत आला. मेरी ची औषध तपासणी झाली. तिला आराम करायला सांगितलं गेलं. तिला थोडावेळ आराम करायला देऊन जेन पुन्हा बाहेर कामात गेला. त्यातच तो दिवस संपला. रात्र झाली.. मेरी आपल्या खुर्चीत बसून डायरी वाचत होती.....
जेन ने विचारलं :- कसली डायरी आहे ? काय वाचते आहेस ?
मेरी :- माझ्या आजीची डायरी आहे ही. ती लिहायची... काही कविता आहेत..
जेन ने ती डायरी घेतली आणि चाळायला लागला. एकेक कविता वाचून काढू लागला. वाचता वाचता त्याच्या हाताला एक पान लागलं ज्यात काय लिहिले होते ते त्याला नाही वाचता आले. त्याने डायरी उलटी सुलटी करून पाहिली पण काही उपयोग नाही.
शेवटी मेरी म्हणाली :- मीच किती दिवस झाले त्या चिन्हांचा अर्थ लावायचा प्रयत्न करतेय... पण नाही लागत आहे.
ओके , म्हणत जेन ने डायरी फळीवर ठेवली समोर त्यादिवशी नवीन मागवलेल्या येशूचा फोटो पुन्हा ठेवला. मेणबत्ती प्रकाशित केली. दोघांनी जेवण करून घेतले आणि झोपायला बेड मध्ये गेले.... त्यादिवशी पुन्हा रात्री वादळ सुटल पण तंबू मधील एकही वस्तू इकडची तिकडे झाली नाही फक्त येशूचा फोटो पुन्हा खाली पडला, पुन्हा त्याच्या तुकड्यांचा ढीग रचून पडला, पुन्हा मेणबत्ती विझली , पुन्हा तंबूत काचा पसरल्या, पुन्हा वारा लगेच शांत झाला, पुन्हा दोघे उठले, असे सलग तीन चार दिवस त्यांनी नवीन मेणबत्ती , नवीन येशूचा फोटो आणून नवीन पूजा केली पण प्रत्येक रात्री वादळ यायचं आणि फक्त ती फळी, फळीवरील मेणबत्ती, येशूचा फोटो, तेवढं विस्कटून जायचं..... आणि वादळ शांत व्हायचं.....
दोघंही विचारात होते अस का ? प्रश्न वाढत होते उत्तर मिळत नव्हती.... तीच त्यांना शोधायची होती.... ते नवीन दिवसाची वाट बघू लागले.... थंडी वाढली.... मध्यरात्र झाली........ आणि......
भाग - 3 पुढील टप्प्यात
👇👇👇👇👇👇👇👇👇👇👇👇👇👇👇
( माझ्या भयकथे व्यतिरिक्त इतरही कथा वाचण्यासाठी खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करा , आनंद घ्या ...)
(अमर्याद रचना वाचा , मित्रांसोबत शेयर करा )
💀💀💀💀💀💀💀💀💀💀💀💀💀💀💀💀
@_by_Chetan_Salkar
No comments:
Post a Comment