#कथा :- Annexes
#लेखक :- चेतन साळकर
#भाग :- ४
#©सर्व हक्क लेखकाकडे बांधील आहेत
✍️✍️✍️✍️✍️✍️✍️✍️✍️✍️✍️✍️✍️✍️✍️
या कथेचा भाग - ३ ची लिंक खाली दिलेली आहे
👇👇👇👇👇👇👇👇👇👇👇👇👇👇👇
https://marathighoststories.blogspot.com/2019/10/annexes_42.html
💀💀💀💀💀💀💀💀💀💀💀💀💀💀💀
तिला दिसले काहीतरी भयानक.... काय .? ती घामाने चिंब झाली. भर रात्रीत थंडीत तिला दरदरून घाम फुटला. तिने पाहिले. . . . . . .
भारदस्त काळ्या कुट्ट अंधारातून बाहेर येत होत्या कित्येक लालेलाल विचित्र सावल्या. प्रत्येकाच्या चेहऱ्यावर अग्निसम ज्वाळा उफाळून येत होत्या. चित्कार करीत करीत, त्या इतरत्र धावत सुटल्या होत्या. रेजीका घाबरली. ती धडपड करू लागली. तरी डोळ्यांसमोरून ते चित्र जात नव्हते. शेवटी खूप प्रयासाअंती रेजीका ने डोळे उघडले. समोर पाहिले तर त्याच सावल्या तिला दिसल्या. तेव्हा प्रत्यक्ष डोळ्यांनी पाहताना तिची चाळण उडाली.त्या सर्व सावल्या मेरीच्या दिशेने येत होत्या. रेजीका घाबरली तिने क्षणाचाही विलंब न करता मेरीला आपल्या पाठीवर मारले आणि धावत, ओरडत तंबुकडे पळाली. तिच्या आवाजाने तोपर्यंत ग्रुप हेड आणि जेन तिथे पोहोचले. . . .
तंबूत तेव्हा फक्त हेड, जेन , रेजीका आणि मेरी च होते. मेरी ला शुद्धीवर आणण्याचा प्रयत्न चालू असताना मेरी एकदम किंचाळत उठली. बेडवर उभी राहून जोरजोरात हसायला लागली. दात विचकत , वाकुल्या दाखवत हसू लागली. इतकं भयानक आणि विदारक हास्य ऐकून तिघेही जागीच खिळले.... जेन ने तो अवतार पहिल्यांदाच पाहिला म्हणून, तो तुटून पडला. रेजीका ने पुन्हा तो येशूचा क्रॉस घेतला आणि तिच्या डोक्यावर ठेवला. तशी तिथल्या तिथे मेरी बेडवर कोसळली आणि बेशुध्द झाली पण लगेचच दुसऱ्या क्षणाला उठली आणि एकच गगनभेदी किंकाळी फोडली... जेन ने प्रश्नार्थक नजरेने रेजीका कडे पाहिलं... येशूच्या क्रॉस ने ही फरक का पडत नाही ? असा प्रश्न त्याच्या नजरेत रेजीका ला दिसला....
रेजीका - अशी केस मी आजवर पाहिली नव्हती. येशु चे पावित्र सुध्दा लागू पडत नाही म्हणजे हे काहीतरी भयानक असले पाहिजे .
जेन - मग आता उपाय काय ?
रेजीका ने डोळे बंद केले आणि त्या कोणत्या आत्म्याला तीने मुदतीवर जबान दिली. तशी मेरी पुन्हा बेशुध्द झाली.. बेडवर शांत पडली... मेरी शांत झाली पण रेजीका समोर प्रश्न होता त्या काळ्या शक्तीच्या मुळात काय असेल ह्याचा . त्यातच ती उठली. बाहेर आली. तिला एक शंका होती ती म्हणजे , काही वेळापूर्वी दिसलेल्या त्या लाल सावल्या, ज्या त्या खोलगट भागातून वर येत होत्या , त्या नेमक्या मेरिकडे का येत होत्या ? तिथे ती सुध्दा होती पण मेरी च का ? प्रश्न तसेच कायम ठेवून ती मनाच्या चबुतऱ्यावर रेंगाळत होती.रात्र वाढत होती ,भर वेगाने पुढे पुढे सरकत होती.काजव्यांच्या मिणमिणत्या प्रकाशात लपला होता तो काळा सैतान आणि खेळत होता जीवघेणा खेळ. खेळ होता सत्य असत्याचा.ज्यात भरडले जात होते मानवी शरीर. पण कोण ? कुठे होता तो ? डोळ्यांनी दिसत नव्हता ? मग खरंच तो होता की भ्रम ? असे बरेच प्रश्न एखाद्या भल्यामोठ्या पिसाळलेल्या हत्ती सारखे चित्कारत होते. जेन आणि रेजीका दोघे विचार करीत होते.
रेजीका - आपल्याला मेरी ला खूप जपावं लागणार. ती जी शक्ती आहे, ती तिच्याच मागे आहे.
जेन - पण का ? तिच्याच मागे का ?
रेजीका - even I have also don't know that answers.
जेन पुरता घाबरल होता. तो मेरीला अश्या अवस्थेत बघू शकत नव्हता. त्याने व्यभिचार केला होता पण तो मेरीच्या शरीरावर नाही तो होता मनाचा, निस्सीम प्रेमाचा. तिची खालावत चाललेली दशा तो बघू शकत नव्हता. त्याच्या डोळ्यात आलेल्या पाण्याच्या थेंबाला आपल्या बोटाने पुसत रेजीका म्हणाली "don't cry Jen. god is the great. no anyone greatest and biggest than God".
आणि अचानक त्या काळोखात कोणीतरी जोरात ओरडल. काळोखात फारसे नीट दिसतही नव्हते, पण आवाजाच्या दिशेने दोघेही पळाले.जागेवर पोहोचले. त्यांच्यातला एक कर्मचारी ओरडत होता आणि हात दाखवत होता खाली जमिनीवर.. कारण जमिनीवर रक्ताच्या थारोळ्यात पडला होता त्यांचा दुसरा कामगार मित्र. तो मेला होता. काय झालं ? कसं झालं ? कोणीच पाहिले नव्हते. त्यामुळे काहीच अंदाज लागत नव्हता. ते प्रकरण संपत नाही तोच तळावरील दुसऱ्या एका तंबूला आग लागली.आग क्षणात इतकी पसरली की दोन तीन कामगार संपूर्ण जळतच बाहेर येऊन पडले. ते सुध्दा जागीच ठार झाले... ते होतं नाही तोच दुसऱ्या तंबूत कर्मचाऱ्यांना खाण्यातून विषबाधा झाली.ते देखील झोपेतच मरण पावले. ते सारं एकेक बघून दोघांचही डोक काम करणं बंद करायला लागलं. कोणाला , किती आणि कस वाचवायचं ? हेच त्यांना कळत नव्हतं. साधारण 1 तास झाला , ती सगळी प्रकरणं थांबली....
स्थळ - तंबुंचा तळ.
वेळ - रात्रीचे 3
रेजीका आणि जेन दोघेही काही जाणवतंय का हे पाहायला खोलगट जागेवर गेले. मेरी तंबूत झोपली होती. रेजीका त्या खोलगट भागाच्या किनाऱ्यावर खाली गुढग्यावर टेकली. तिने पूर्ण शरीर जमिनीला टेकले.कान जमिनीला लावले. आणि काही जाणवतंय का ? कसला आवाज येतो का ते निरखायला लागली. स्पष्ट काही जाणवत नव्हते पण तिला अस्वस्थ होऊ लागलं. त्या खोलात किन्न अंधार होता .ती त्यात बघण्याचा प्रयत्न करू लागली. आत तिला लाल जळजळीत रंग दिसले जे बाहेर येण्याचा प्रयत्न करीत होते. तिने हातात येशूचा क्रॉस घेतला आणि त्या खड्ड्यात अलगद सोडून अंगठ्याने धरला. तसे खड्ड्यातील वातावरण अचानक गरम झाले.गरम ज्वाळा बाहेर फेकल्या जाऊ लागल्या. त्याने रेजीका च्या हातावर झळा बसू लागल्या. तिने हात काढता घेतला. क्रॉस बाजूला झाल्यावर पुन्हा ज्वाळा थांबल्या. ती उठली आणि ठामपणे जेन कडे बघून म्हणाली " जेन. . . ह्या खाली काहीतरी. .."
एवढं बोलणार इतक्यात तिचा पाय कोणीतरी खेचला. जोराने ती खाली कोसळली . अगदी आतल्या भागातील कडेला तिने तिचे हात अडकवले... ती कळून चुकली की ती शक्ती तिला आता सोडणार नाही.. कारण आतलं वास्तव तिने ओळखलं होतं.जेन घाबरला, दचकला . तो पुढे आला त्याने आपला हात देऊ केला. रेजीका देखील हात पकडून वर येण्याचा प्रयत्न करू लागली ,पण खालून खेचनारी शक्ती जास्त शक्तीची होती. त्यासमोर माणसाची शक्ती ती काय चालणार ? रेजिका किंचाळत होती, धडपडत होती. जगणं किती किमती असतं ते प्रात्यक्षिक जेन उघड्या डोळ्यांनी पाहत होता. रेजिका जिवाच्या आकांताने ओरडत होती. काळ्या शक्तींना आवर घालणं हे मनुष्याचा हातच काम नाही. त्याला दैवी शक्तीची जोड लागतेच. वेळ जवळ जवळ येत होती.. रेजीका पूर्ण स्वताला सार्थ ठरवत होती. जेन ही तिला वर खेचायचा प्रयत्न करीत होता. ओरडून ओरडून रेजिकाच्या तोंडातून रक्त येऊ लागल, ती दमली , थकली , अवसान गळून ती शरीराने शमुन गेली , तिचे हात साथ देईनासे झाले.. जेन पूर्ण ताकदीनिशी खेचत होता. रेजिका पूर्ण संपली होती... तिला कळून चुकले की आपल काही खरं नाही. तिने हात वर केला आणि जेन ला दाखवू लागली. तिने बोटाने खाली इशारा केला आणि डोळ्यात अश्रूंचा बांध घेऊन तिने हात सोडले......
उंचावरून वस्तू पडून जशी आपटत ठेचकाळत भर वेगाने खोल जाऊन क्षणात नाहीशी होते तशी रेजिका क्षणात त्या खड्ड्यात नाहीशी झाली.. जेन नुसता काठावर बसून रडत राहिला. हाती घेतलेल्या कामात इतके विचित्र अनुभव , इतकी मरण , इतका विध्वंस पाहून तो खचला.... त्या कोण , कुठल्या विचित्र शक्तीबद्दल प्रचंड राग त्याच्या मनात उफाळून आला होता. त्याचा सोक्षमोक्ष लवायचाच असा निर्धार करून तो तंबूत परतला..... आणि येऊन मेरी जवळ बसून रात्रभर रडत राहिला.... अश्रुबरोबर निर्धाराची ज्वलंत आग त्याच्या सर्वांगात धुमसत होती. त्याला आता पेटून उठायचे होते .. तो दुसरा दिवस उजाडन्याची वाट पाहू लागला. . . . त्याला सूड घ्यायचा होता. . . . .!!
भाग - ५ पुढील टप्प्यात
👇👇👇👇👇👇👇👇👇👇👇👇👇👇👇
( माझ्या भयकथे व्यतिरिक्त इतरही कथा वाचण्यासाठी खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करा , आनंद घ्या ...)
https://marathighoststories.blogspot.com/
(अमर्याद रचना वाचा , मित्रांसोबत शेयर करा )
💀💀💀💀💀💀💀💀💀💀💀💀💀💀💀💀
@_by_Chetan_Salkar

No comments:
Post a Comment