#कथा :- Annexes
#लेखक :- चेतन साळकर
#भाग :- ५
#©सर्व हक्क लेखकाकडे बांधील आहेत.
✍️✍️✍️✍️✍️✍️✍️✍️✍️✍️✍️✍️✍️✍️✍️
या कथेचा भाग - ४ ची लिंक खाली दिलेली आहे
👇👇👇👇👇👇👇👇👇👇👇👇👇👇👇
https://marathighoststories.blogspot.com/2019/10/annexes_52.html
💀💀💀💀💀💀💀💀💀💀💀💀💀💀💀
अश्रुबरोबर निर्धाराची ज्वलंत आग त्याच्या सर्वांगात धुमसत होती. त्याला आता पेटून उठायचे होते .. तो दुसरा दिवस उजाडण्याची वाट पाहू लागला. . . . त्याला सूड घ्यायचा होता. . . . .!!
दिवस उजाडला. काळी रात्र संपवून सूर्यनारायणाने आपली सुवर्ण किरणे थोपवून काळ्या शक्तीचा नायनाट केला होता. उजाडल असल तरी रात्रीची काळी आठवण विसरता येणारी नव्हती. दिवस पुढे पुढे सरकत होते किंबहुना पळत होते. रात्र रात्र झोप लागत नव्हती.कधी काय होईल ह्याचा नेम नव्हता. मेरी त्यादिवशी सकाळी काहीशी चांगली वाटली. जेन ही त्यामुळे थोडा निर्धास्त वाटला. त्याला काहीही करून त्या सर्व गोष्टींचा सोक्षमोक्ष लावायचा होता. वीस दिवस कधीच उलटले होते. जेवढे वाटलेले तेवढे सोप्पे नव्हते काम. अंदाजा पेक्षा कितीतरी दिवस पुढे चालले होते काम. एव्हाना कामगारांनी मिळून 50 फूट खोली गाठली होती...पण त्यांनी खोदलेल्या भागातून खाली जाता येणं शक्य नव्हतं. म्हणून पुन्हा व्यवस्थित खोली करावी लागणार होती. आणखीन पन्नास झाले की काय समोर दिसेल ह्या विचारांनी जो तो भारावून त्याचबरोबर घाबरून हि गेला होता. जेन धावत खोदकामाकडे गेला. तिथे सर्व कामगारांना "दोन दिवसात उरलेले पन्नस फूट खणून काढण्यास सांगितले." शक्य त्या करड्या आवाजात त्यांना ऑर्डर्स देऊन तो आपल्या कामाला लागला . . . . तो दिवस गेला,रात्र झाली . . . .
वेळ - रात्रीचे 12
मग रात्रीचेही काम सुरू ठेवण्याचे आदेश दिले. दिवसरात्र खोदकाम चालू झाले. कामगारांची संख्या वाढवली , मशीन वाढविल्या. जोमाने काम चालू झाले..... रात्रीचे 12 वाजले होते. अचानक मध्ये कामगारांच्या घोळक्याने ओरडा ओरड सुरु केली. मेरी आणि जेन धावत गेले. पाहून दोघांचेही हातपाय गळून पडले.तिथे एका कामगाराला सापडला माणसाचा हाडांचा पिंजरा. तो बघे पर्यंत दुसऱ्या कामगाराला सुध्दा सापडला. पुन्हा तिसऱ्या , चौथ्या .. जवळजवळ पाच-सहा कामगारांना माणसाचे हाडांचे सापळे सापडले.. कामगार घाबरले. काम तिथेच टाकून ते आपल्या तंबूत परतले. एकेक असे प्रकार घडायला लागले ज्याने कोणाचही मग कामात लक्ष लागत नव्हतं. प्रत्येकाच्या मनात अनामिक भीती बसली होती.
जेन ने एक युक्ती केली... त्याने प्रभू येशूचा फोटो , मेणबत्ती घेतली आणि ती सर्व तंबूत फिरवून खोदकाम केलेल्या जागी ठेवली. कामगार लोकांच्या मनातील भीती जाऊन सकारात्मक ऊर्जा निर्माण व्हावी हाच त्यामागचा हेतू होता. जेन, मेरी आणि सर्व कामगार येशूच्या फोटो समोर बसले. प्रार्थना करू लागले. प्रार्थना करता करता मेरी सहजच जेन ला म्हणाली "आपण आज खाली उतरून बघुया का ? ते ऐकून जेन जागीच स्तब्ध झाला.. त्याला सुचेना अचानपणे मेरी अस का म्हणाली ते ? त्याने होकारार्थी मान हलवली...
रात्र वाढली. येशूच्या प्रार्थनेने बराच सकारात्मक बदल संपूर्ण तळावर दिसून आला. सर्वजण काम करीत होते. जेन आणि मेरी सज्ज झाले. कामगारांनी 50 फूट खाली खोदून मार्ग काढला होता. तेवढं अंतर कापायच होतं. पहिल्यांदा जेन खोलगट भागात उतरला. मागून मेरी उतरली. कामगार मंडळींना योग्य सल्ले देऊन त्यांना आपआपली कामे नेमून दिली होती. काही कामगार वर थांबणार होते आणि काही कामगार त्या दोघां बरोबर खाली जाणार होते. निघाला ताफा. जेन, मेरी आणि बरोबर आठ कामगार. त्यांनी टॉर्च, दोरी, गॅस ची टाकी घेतली होती. पृथ्वीच्या पृष्ठभागापासून जर वर वर गेलो किंवा खाली भू गर्भात गेलो ,तर तापमानात होणाऱ्या कमी-जास्त, उष्ण-गरम बदलाने आपत्ती ओढवू शकते म्हणून. निघाले, दोरीचे साहाय्याने सर्व जण खाली उतरू लागले. दगडांवर पाय कधी सटकत होता , कधी अंग खरचटून निघत होतं पण प्रवास थांबत नव्हता. हळूहळू प्रत्येक जण स्वतः बरोबर दुसऱ्याला सुध्धा जपत खाली खाली सरकत होता. करता करता सर्वजण जवळ जवळ दोन- अडिज तासांनी 50 फूट खाली आले. पूर्ण काळोख , असंख्य किडे, कीटक, रात्रीचे विचित्र पक्षी, वटवाघळे , ओलसर चिखल ह्यांचे साम्राज्य सुरू झाले...
कामगारांनी टॉर्च डोक्याला लावून ठेवल्या होत्या. त्यातल्या एक - दोन टॉर्च खराब होऊन बंद पडल्या.रात्री 12 ची वेळ , किर्र काळोख , मंद मंद गतीने ते सारे झाली उतरू लागले. "जर असे गेलो तर खूप कठीण पडेल कारण , जमिनीचा गर्भ खोदणे मानवी बळाचे काम नाही , आपल्याला काहीतरी युक्ती लावावी लागणार" अस मनात आणून जेन अचानक ओरडला "go back". पुन्हा वर जाण्याच्या त्याने ऑर्डर्स दिल्या. सर्व जण अर्ध्या तासात पुन्हा वर पोहोचले.... जेन म्हणायला लागला. . . . .
जेन - आपल्याला अजून खाली खोली गाठायची असेल तर भूमी सुरंग लावायला हवा...
कामगार - सर, मग हे आपण कामाच्या पहिल्याच दिवशी का नाही केलं , एवढ्यात काम संपलं असत. आताच का ?
जेन - सुरंग लावला तर ,जमिनीला हादरे बसतात. त्यामुळे पुढे जाऊन या स्थानाची भौगोलिक परिस्थिती विषयी आपत्ती येऊ शकण्याची शक्यता असते,पण आता आपल्यासमोर काही पर्याय नाही. जर लवकरात लवकर खोदून खाली नाही गेलो तर , ह्या ज्या अघटीत घटना घडत आहेत त्याचा निकाल नाही लागणार...!!
कामगार - पण ह्याने कितीसे फूट खोदले जाईल ?
जेन - हा सुरंग लावल्याने साधारण 40 फूट खोल खोदले जाऊ शकते ! इतक्या ताकदीचा सुरंग लावायला लागणार, तरच लवकर आपण 100 फूट खोल पोहचू शकू आणि काय आहे ते बघू शकू !!
सर्वजण तयार झाले. काही कामगारांनी जावून भूमी सुरंग आणला. तो दोरीच्या साहाय्याने 50 फूट खोलतळापर्यंत सोडला. सर्वजण लांब उभे राहीले. मेरी आणि जेन ही वीस तीस पावले मागे जाऊन उभे राहीले. एका कामगाराने बटन दाबले... एकच धडम्ss धूमss.... आवाज त्या रात्रीत घुमला . जमिनीला हादरा बसला. सर्व कीटक , वटवाघळे फडफडत बाहेर पडली. त्यांच्या चित्कारत बाहेर येण्यानं आसमंत दुमदुमून गेला. भयानक अक्राविक्राळ सैतान जागा झाला की काय असे क्षणभर वाटले. जो जागा झाला असेल , तर आपल्या तीक्ष्ण नखांनी जखमी करायला तयार झाला असेल साऱ्या सजीव जीवांना. हादरा बसताच सर्वच जण क्षणभर जागच्या जागी हलले. आवाज क्षणात त्या रात्रीत विरून गेला.सर्वजण जवळ आले. त्यांनी एकेक करून आत प्रवेश केला. दोऱ्या सोडल्या गेल्या. एकेक जण उतरू लागला.कामगार मग जेन आणि मेरी उतरले. त्यांचा प्रवास चालू झाला 50 फुटाकडे. . . .
जसजसे खाली जात गेले तस जेन ला एक गोष्ट जाणवली , की पृष्ठभागापासून खाली आलो तरी तापमानात जराही बदल नाही. भू गर्भात उष्ण तापमान असायला हवं तिथे थंड ही नाही आणि उष्ण ही नाही. ह्याच काय कारण ? मेरी ने गळ्यात घातलेला क्रॉस अलगद तुटून खाली पडला. तो खाली पडताना प्रत्येकाला स्पष्ट दिसला होता. तो खाली पडता पडता मधेच हवेत जाळून भस्म झाला. ते देखील प्रत्येकाने पाहिले. मग जेन ने उगाच विषय मारून नेला काहीतरी कारण सांगून नाहीतर पुन्हा कामगार घाबरले असते. साधारण 20 मिनिटात ते खाली पोहोचले.50 फूट अंतर त्यांनी पार पाडलं होत. खाली खूपच काळोख होता निपचित शांतता होती. घड्याळात रात्रीचे 3.30 वाजले होते. आणखीन 10 फूट खाली खोदले की ते सत्य जगासमोर येणार ह्या कल्पनेने सर्वांना बरं वाटले होत. जेन मात्र आता त्या सत्याच्या मागे नव्हता, त्याला वचपा काढायचा होतं रागाचा. जी काय शक्ती होती ती तुला शोधायची होती आणि तिचा नायनाट करायचा होता. रेजिका ने जाताना खाली बोट करून इशारा केला होता म्हणजे काहीतरी नक्कीच असणार . . .!!
खाली उतरून पाहिले तर चहू बाजुंनी दरड, काळे जांभळे दगड, मोठेमोठे दगड असे खायला उठतात की काय असे मेरीला झाले. ती थोडीशी दचकली. जेन टॉर्च घेऊन इकडे तिकडे काही दिसतंय का ते पाहत होतं इतक्यात मेरी कान गळा चिरेपर्यंत ओरडली. सर्वजण चटकन फिरले. मेरी निमिषात मागे हटली होती.. जेन पुढे झाला आणि सर्वांना दिसला एक माणसाचा सापळा. सगळे दचकले. मागे मागे जाऊ लागले पण जेन मात्र पुढे सरसावला. त्या दिसले होते काही वेगळेच. त्या सापळ्याच्या कवटी जवळ पडली होती काळ्या मण्यांची माळ.... जेन ने त्वरित ओळखले की तो सापळा "रेजिका" चा होता....
सर्वांना धक्का बसला. जेन आणि मेरी त्या जवळ गेले . डोळ्यातल्या अश्रूंना दोघांनी वाट मोकळी केली. तिच्या हाडांवर होत होता पुन:मिलनाचा अभिषेक. सर्वच भावविवश असताना घडली एक अशी घटना जिने सर्वांचे लक्ष तत्क्षणी वेधून घेतले. . . . . . .
ती घटना होती. . . . . . !!!!
भाग - ६ पुढील टप्प्यात
👇👇👇👇👇👇👇👇👇👇👇👇👇👇👇
( माझ्या भयकथे व्यतिरिक्त इतरही कथा वाचण्यासाठी खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करा , आनंद घ्या ...)
https://marathighoststories.blogspot.com/
(अमर्याद रचना वाचा , मित्रांसोबत शेयर करा )
💀💀💀💀💀💀💀💀💀💀💀💀💀💀💀💀
@_by_Chetan_Salkar

No comments:
Post a Comment