✍️✍️✍️✍️✍️✍️✍️✍️✍️✍️✍️✍️✍️✍️✍️
लेखकाचे शब्द :-
( कथेसोबत दिलेला व्हिडिओ हेडफोन्स वापरून ऐकावा )
नमस्कार, कसे आहात सगळे ? घाबरत आहात ना , घाबरायलाच पाहिजे कारण, आपण वाचत आहात भयकथा. जवळ जवळ आठ-दहा महिन्यांच्या दीर्घ काळानंतर पुन्हा एकदा तुमच्यासमोर सादर करीत आहे , माझी नवीन भयकथा. . . . !!
निसर्ग आणि मानव ह्यांच्या संबंधामधील हेवेदेवे वाढतच चालले आहेत. मानव म्हणून आपण कधीकधी खूपच निर्दयी वागतो , हे आपणा सर्वांस ठावूक आहेच. ऐतिहासिक काळापासून गुप्त राहिलेल्या आणि भयाण कभिन्न अंधारात लपून बसलेल्या अशा अज्ञात सत्याची ही कथा.....!!
जसा माझ्या प्रत्येक कथेला प्रतिसाद दिलात तसाच याही कथेला तुमचा उदंड प्रतिसाद मिळो ही अपेक्षा. ज्यावेळी अंधाराचे साम्राज्य सुरू होते अशा वेळेला म्हणजेच संध्याकाळी 6 नंतर, माझ्या कथेचा प्रत्येक भाग पोस्ट केला जाईल.
ही कथा देखील पूर्णतः काल्पनिक असून त्याचा जिवीत अथवा मृत व्यक्तीशी किंवा वस्तूशी तीळमात्रही संबंध नाही पण योगायोगाने तसा संबंध आढळल्यास तो मनोरंजनाच्या दृष्टिकोनातून पहावा ही विनंती .
आपली भेट कथेच्या समाप्तीच्या भागात
तोपर्यंत नमस्कार
🙏
तोपर्यंत नमस्कार
🙏
☠️☠️☠️☠️☠️☠️☠️☠️☠️☠️☠️☠️☠️☠️☠️
स्थळ - वेंटरबर्ग ( साऊथ आफ्रिका )
वेळ- मध्यरात्री 3 वाजता
वेळ- मध्यरात्री 3 वाजता
नवीन घेतलेले घड्याळ खाली पडून कचकन फुटले. "जेन" ने चोळत डोळे उघडले, बिछान्यात उठून बसला. एकंदरीत काहीतरी भयानक होत आहे , हे त्याला उमगले होते पण नेमक काय घडतंय हे कळत नव्हतं. झोपेतून घाबरून किव्वा गडबडीत दचकून सेकंदात उठलो तर आपला मेंदू हा काही क्षण बधीर असतो , तो निद्रेतून बाहेर यायला काही क्षण घेतो. जेनचे तेच झाले होते. त्याने त्याच्या बाजूला झोपलेल्या "मेरी" ला उठवले... ती देखील गडबडीत उठली....
रात्र किन्न अंधारात आपल्या आवेगात होती पण , कसल्याशा घोंगट आवाजांनी , कर्कश किंकाळ्यानी रात्रीच्या आवाजात भग्न पडत होता. रस्त्यावरील झाडे इकडे तिकडे होऊ लागली होती. रस्त्यावरील सिग्नल मोडून तोडून कुठल्या कुठे भिरकावले गेले होते. मोठमोठ्या झाडांची मुळासकट कत्तल झाली होती. उन्मळून बेवारस पडली होती ती सारी. रस्त्यावर माणसे इतरत्र धावत सुटली होती. कोणी रडत होतं,कोणी आक्रोश करीत होतं , कोणी कोणाला उचलून घेऊन धावत होतं तर कोणी फतकल घालून पडून रडत होतं. हे सारं काय चाललंय हे दोघांना कळायच्या आतच , जोरात दणका बसला. उभ घर दणक्यात हललं. जेन आणि मेरी दोघेही जमिनीवर कोसळले. मेरी जेन पासून दोन हात लांब पडली आणि जेन टेबलाच्या टोकावर आपटला..... जेन ने खिडकीबाहेर पाहिले आणि त्याला कळायला सेकंद सुध्दा नाही लागला की , "भूकंप होतं होता"...!!
जेन ने मेरी ला टेबलाखाली येण्यास सांगितले . दोघेही एकमेकांना धरून त्या खाली बसून राहिले. काही क्षणानंतर भूकंप थांबला.जेन ने भिंतीवरील घड्याळ पाहिले ,त्यात 3 वाजून 3 मिनिटे झाली होती. म्हणजे तो महाकाय भूकंप 3 मिनिटे चालू होता. सगळं स्थिर झाल्यावर दोघेही बाहेर आले. घराची काय दशा झाली होती ते पाहून दोघेही अवाक् झाले आणि त्यांना कल्पना आली की किती भयानक स्वरूपाचा तो भूकंप होता. दोघेही आवरायला लागले.....
आता कथेत पुढे जाण्याआधी या कथेतील नायक आणि नायिकेची ओळख करून देणे गरजेचे आहे. "जेन" हा मुख्यतः भारतात जमलेला भारतीय नागरिकत्वाचा मुलगा होता. नंतर शिक्षण आणि नोकरी करिता तो कायमचा साऊथ आफ्रिका येथे स्थित झाला. तिथलं नागरिकत्व स्वीकारून तिथलाच होऊन गेला. तो EAOSA ( Earthquake Agency Of South Africa ) येथे नोकरीला लागला. भारतीय असला तरी त्याच्या संस्कारांनी सुध्दा उचल खाल्ली होती. त्याने सुध्दा व्यभिचार केला होताच. भारतात त्याची प्रेयसी होती पण, इथे आल्यावर नोकरीत त्याची ओळख "मेरी" शी झाली. दोघांनी एकमेकांना पसंती दर्शवली. दोघांची जवळीक इतकी झाली की, दुसऱ्या भेटीतच दोघांनी बेड शेअर केला होता. अजूनही ते "live in relationship" मध्येच राहत आहेत.आता पाहुयात पुढे नेमके काय झाले.....
पहाट झाली , आवरता आवरता कधी त्यांना झोप लागली होती त्यांनाच कळले नव्हते... सकाळचे 8 वाजले... घर पूर्णतः आवरून झाले होते.. दोघेही कॉफी घेत टेबलवर बसले होते . इतकी मोठी घटना झाली आणि एजन्सी मधून फोन कसा नाही आला असा प्रश्न दोघांनाही पडला असताना ,जेन च लक्ष फोनकडे गेलं तर त्याची वायर बाजूला पडली होती.. जेन ने ती वायर त्याला लावली आणि दुसऱ्या सेकंदाला फोन खणखणत वाजला..जेन ने उचलला....
समोरून :- heloo , dont tell me anything ,just drive your car fast because, you both have to reach at "welkom"...
स्थळ :- वेलकौम ( साऊथ आफ्रिका )
वेळ :- सकाळी 10.30 वाजता.
वेळ :- सकाळी 10.30 वाजता.
काही बोलायच्या आत समोरून फोन ठेवला. दोघेही आधी घाबरून गेले. नेमके झाले काय आहे हे न सांगितल्यामुळे विचार करण्यात ही वेळ नव्हता. ते दोघेही घर लॉक करून गाडीत बसून निघाले... तरी एक तास गेला. "वेंटरबर्ग" वरून "वेलकौम" जायला. ते वेलकौम ला पोहोचले... तिथलं वातावरण बघून डोकं गांगरून गेलं. नागरिकांच्या रडण्याने तो परिसर द्रावून गेला होता. जो तो आक्रोश करून रडत होता. कोण मृत व्यक्ती मांडीवर घेऊन रडत होतं, कोण आपल्या मुलांना शोधत होतं. सगळीकडे नुसता हाहाकार माजला होता. ते दोघे जाऊन त्यांच्या टीम ला भेटले. टीममधील त्यांचे सर त्यांना घेऊन एका ठिकाणी गेले आणि हात दाखवून म्हणाले "See...!!"
समोरच दृष्य बघून दोघेही गांगरून गेले. हातपाय गळून आले , डोळ्यांपुढे अंधारी यायला लागली , बधीर बधीर होऊन गेलं सारं , तो क्षण इतका भयानक भासला की ताबडतोब धावत जाऊन घरात बसावं पण ते दृष्य पाहू नये असे वाटू लागले....समोर पाहिले तर एक भलीमोठी खोलगट रेघ त्या शहराला पडली होती. जवळ जवळ 100 मीटर लांब आणि 100 फूट खोल ती रेघ होती... त्या लांब पल्ल्याच्या रेषेने त्या शहराचे दोन भाग करून टाकले होते. त्या खोलात कित्येक माणसे, छोट्या मोठ्या गाड्या , भलीमोठी झाडे, मोठं मोठया १०-१२ मजल्याच्या इमारती पडून आत खोल नाहीश्या झाल्या होत्या. त्यांचे नामोनिशाण सुध्दा दिसत नव्हते........
दिसत होते फक्त मुडदे , निपचित पडलेल्या इमारती , आक्रोश करणारा निसर्ग..... आणि निसर्गाचा रुद्रावतार....!!
भाग - 2 पुढील टप्प्यात
👇👇👇👇👇👇👇👇👇👇👇👇👇👇👇
( माझ्या भयकथे व्यतिरिक्त इतरही कथा वाचण्यासाठी खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करा , आनंद घ्या ...)
No comments:
Post a Comment