मॉल ( पार्ट 1 )
मॉल ( पार्ट 2 )
https://marathighoststories.blogspot.com/2019/09/2_30.html
https://marathighoststories.blogspot.com/2019/09/2_30.html
मॉल ( पार्ट 3 )
मॉल मध्ये फिरताना लोकांना अस्वस्थ वाटायचे. सतत आपल्यावर कुणीतरी लक्ष ठेवून आहे असा भास प्रत्येकाला होत असे. प्रत्येक जण भीतीच्या छायेत वावरत असत. महिन्याभराच्या आत मॉल मधील भिंती अचानक काळ्या पडू लागल्या. दुकानदारांना समजत नव्हते नक्की काय चालू आहे. रोज सकाळी दुकान उघडल्यानंतर दुकानदारांना जळका वास येत असे. दुकानदाराना काहीच समजत नव्हते नक्की काय चालू आहे. त्यांनी दुकानात C.C. Tv बसवून घेतले. आणि त्यांनी जे पाहिले त्यावर त्यांचा विश्वास बसला नाही. रात्री अचानक दोन वाजण्याच्या च्या सुमारास काहीतरी जळत असलेले दिसत होते, पण नक्की काय ते समजत नव्हते. ज्या ज्या दुकानदारांनी सीसीटीव्ही बसवून घेतले होते त्या सर्व दुकानदारांना तेच चित्र दिसले होते. रात्री दोन च्या सुमारास अचानक एके ठिकाणी आगीचा भडका लागत असे आणि परत त्या जागेवर काहीच नसे. आता दुकानदारांना ही भीती वाटत होती. त्यांना समजून चुकले होते कि ही काही साधारण गोष्ट नाही. आधीच मॉल मध्ये अस्वस्थ वाटायचे त्यामुळे मॉल मध्ये हवी तेवढी गर्दी होत नसे . मॉल मधील दुकानदारानी भरपूर सेल काढले , डिस्काउंट दिले तरी मॉल म्हणावा तशी गर्दी खेचू शकला नाही . लोक लोकल मार्केट मधून माल खरेदी करत असे पण मॉल मध्ये येत न्हवते . मॉल च्या थिएटर मध्ये तर याहून भयानक परिस्थिती होती आधीच मॉल मध्ये वाटणारी अस्वस्थता आणि त्यात तो थिएटर मधील अंधार . रात्रीचे तर सोडा आता दिवसा चे पण शो त्या थिएटर मध्ये नीट होते न्हवते . एकदा काही तरी तांत्रिक बिघडा मूळे त्या रात्रीचा शो जरा जास्त लांबला . शो संपायच्या वेळीच 2 वाजले आणि अचानक ती आग चालू झाली . लोकांना काहीच समजले नाही . लोक दंगा करू लागले . घाबरून गेले आणि थोड्या वेळानी ती आग आपोआप गायब झाली . त्या दिवसापासून मॉल विषयी लोकांचे मत जास्तच खराब झाले . दुकानदार पण खूप घाबरून गेले होते . एक तर एवढे दुकानासाठी भाडे देऊन पण त्यांचे दुकान चालत न्हवते . त्या मॉल मधील अस्वस्थता , घुसमट आणि आता रात्री 2 वाजता जो भयानक प्रकार होतो तो ह्या सर्व गोष्टी मूळे त्यांचा पण आता विश्वास बसत चालला होता की ह्या वास्तूत नक्कीच काही तरी अमानवीय आहे . असे ही मॉल मध्ये लोक येत न्हवते शेवटी दुकानदारांनी स्वतःच्या दुकानांना कुलुपे घातली . शेवटी त्यांना पण त्यांच्या जीवाची भीती होतीच . मॉल चालू होताच महिन्या भरातच बंद पडण्याच्या मार्गांवर होता . आता मात्र खामकराना खूप टेन्शन आले . काय स्वप्ने बघून मॉल बांधला आणि काय झाले . थोड्या दिवसात मॉल पूर्ण बंद पडला . ज्या ज्या लोकांनी त्या मॉल मध्ये दुकानें विकत घेतली होती ती त्यांनी विकायला काढली . आणि ज्या ज्या लोकांनी दुकानें भाडे बेसिस वर घेतली होती त्यांनी उरलेल्या सर्व महिन्याचे भाडे भरून खामकरान बरोबर झालेले कॉन्ट्रॅक्ट संपवले . एवढी मोक्याची जागा पण आता नुसती रिकामी राहिली होती . लोक दिवसा सुद्धा मॉल च्या एरिया मध्ये जात नसत . हल्ली मॉल चा वॉचमन सुद्धा जॉब सोडण्याच्या तयारीत होता . तो तर मॉल च्या आत पाऊल पण टाकत नसे . वॉचमन मॉल च्या मेन दरवाज्या पासून खूप दूर बसत असे . आणि आज ती तारीख होती ज्या दिवशी पासून हा खेळ चालू झाला होता . रात्रीचे दोन वाजायला आले होते वॉचमन मॉल चे लोखंडी शटर बंद करताना अचानक वॉचमन ला ते दिसले . ती आठ जण मॉल च्या आत होती . ती आठ जण आणि वॉचमन ज्यांच्या मध्ये फक्त काचेच दार होते . ती 8 जण वॉचमन कडे एकटक पाहत होती, त्यांचे हात पाय बंधले होते, आणि वॉचमनच्या डोळ्या समोर त्या 8 जणांना आगीने घेरले , पण आश्यर्य होते की ते 8 जण अजिबात दंगा करत न्हवते का हालचाल करत न्हवते . ते सर्व जण आता वॉचमन च्या दिशेने येऊ लागले आता मात्र वॉचमन घाबरला आणि पळत बाहेर जाऊ लागला . तो पळत पळत अडखळला आणि तिथेच बेशुद्ध पडला . दुसऱ्या दिवशी लोकांच्या आवाजाने उठला . लोकांनी त्याला पाणी दिले . तो खूप घाबरला होता . कुणीतरी खामकराना फोन करून बोलावून घेतले . खामकर पण परिस्थितीचे गांभीर्य पाहून लगेच आले . त्यांनी वॉचमन ला एका साईड ला नेले आणि नक्की काय झाले होते ते विचारले . तेव्हा वॉचमन ने त्यानी जे काही पहिले ते सर्व सांगितले . आता मात्र खामकरांचा चेहरा पांढरा पडला होता . त्यांनी एक फोन लावला व गाडी तडक शहराच्या बाहेर त्या निर्जन ठिकाणी आली . थोड्या वेळानी आणखी एक गाडी येऊन थांबली . आणि त्या गाडीतून ते 4 जण उतरले . अंगयष्टी वरून ते पैलवान दिसत होते . ते 4 जण खामकरांचे गुंड होते . जेव्हा एखादे प्रकरण खूपच हाताबाहेर जात तेव्हाच ते या 4 राखीव खेळाडूंना बोलावत व गेम त्यांच्या बाजूने वळवून घेत असत . हरिभाऊ खिलारे साठी या 4 पैलवान गड्यांची खूप मोलाची मदत झाली होती . आज पुन्हा खामकराना त्यांची मदतीची गरज होती. आणि त्या साठीच त्यांनी त्या 4 जणांना बोलवून घेतले होते . खामकरानी डायरेक्ट मुद्द्यावर यायचं ठरवलं .
क्रमश ....
No comments:
Post a Comment