मॉल ( पार्ट 1)
https://marathighoststories.blogspot.com/2019/09/1_30.html
https://marathighoststories.blogspot.com/2019/09/1_30.html
मॉल (पार्ट 2 )
खामकराचा मोबाईल वाजला आणि त्यांचे लक्ष मोबाईल कडे गेलं . आलेला फोन कट करून त्यांनी परत वर पहिले पण ती 8 जण तिथं न्हवती . खामकरांच्या मनात शंकेची पाल चूकचूकली . आता त्यांना ही तिथे घुसमट होते . ते कसे तरी तो कार्यक्रम संपेपर्यंत तिथे थांबले . सर्व मान्यवर जाताच ते आधी त्याच्या गाडीत बसून त्यांच्या घरी गेले . घरी जाताच ते त्यांच्या रूम मध्ये गेले . ड्रिंक चा ग्लास भरला आणि एका झटक्यात तो ग्लास रिकामा केला . दुसरा ड्रिंक चा ग्लास भरून घेतला आणि त्यांचा आराम खुर्चीत बसले . काही तरी मनाशी पक्क ठरवून घेतलं त्यांनी . ड्रिंक चा तो ग्लास संपवून न जेवताच ते झोपायला गेले . त्यांना झोप लागणे अवघड होती पण ते तसेच डोळे मिटून पडून राहिले . डोळ्या समोर तोच भूतकाळ वर्तमान बनून समोर उभा राहिला होता आणि आता ह्या वर्तमाना साठी ते काहीच करू शकणार न्हवते . आपण जी कर्म करतो त्याचा हिशोब ह्याच जन्मी फेडावा लागतो . आता आपली नक्की कुठली कुठली कर्मे आपल्याला काय काय फेडायला लावतात ह्याच खामकराना टेन्शन येत होते . खूप उशिरा त्यांना डोळा लागला .
नवीन दिवस , नवीन सुरवात असं म्हणून खामकर कामाला लागले . कालच्या घटना हा फक्त आपल्या मनाचा खेळ होता असं म्हणून ते आज वावरत होते . त्यांच्या मोठया ऑफिस मध्ये बसून S.K. मॉल च्या पुढील कामाची चर्चा करत होते . एवढा मोठा मॉल, मेन रोड ची जागा त्यामुळे आपलें सर्व दुकाना गाळे लवकरच बुक होतील असा त्यांचा विश्वास होता . त्यांनी त्यांचा ऑफिस मधील असिस्टंट माने ना त्यांच्या केबिन मध्ये बोलवून घेतले .S.K. मॉल मधील दुकान गाळे भाड्याने देताना जास्तीत जास्त भाडे आकारायचे अशी सक्त ताकीद त्यांनी माने ना दिली . आता लवकरच S.K. मॉल मधील सर्व गाळे बुक होतील असं त्यांना वाटत होते . त्यांच्या मनाप्रमाणे S.K.मॉल मधील सर्व गाळे बुक झाले होते . मॉल च्या उदघाटनाच्या वेळी जे झाले तो भास होता याची त्यांना खात्रि झाली . आणि ते निर्धास्त झाले . पण आता कुठे खेळाला सुरुवात झाली होती. मॉल मेन रोड वर होता , हवा वारे दिवसभर भरपूर असायचे पण तरी सुद्धा मॉल मध्ये दिवसा उजेडी पण खूप उकडत असायचे . मॉल बाहेरचे वातावरण प्रस्सन , शांत असायचे पण मॉल मध्ये आत पाऊल टाकले की अस्वस्थ वाटायचे . ज्या लोकांनी त्या मॉल मध्ये दुकानें घेतली होती त्यांची तर अवस्था खूप वाईट होती एक तर दुकानाचे जास्त भाडे आणि वरून अशी अस्वस्थता , मॉल मध्ये एवढी गरमी वाटायची की सर्व दुकान मालकनी दुकानात A.C बसवून घेतले . मॉल अगदी मेन रोड वर असून एवढा हवेशीर असून पण मॉल मध्ये एवढे का उकडते आणि का घुसमटते याचे कारण मात्र कुणालाच समजत न्हवते . मॉल मधील सर्व दुकानदारांनी आज खामकराना मॉल मध्ये बोलावले होते . खामकरानी पूर्ण मॉल मध्ये A.C. बसवून द्यावा अशी ते त्यांना विनंती करणार होते कारण त्या गरमी मुळे मॉल मध्ये कस्टमर येणार नाहीत आणि कस्टमर च आले नाहीत तर मॉल चालणार कसा म्हणून ते सर्व दुकानादार एकत्र आले व त्यांनी तो निर्णय घेतला . खामकर आधी त्या मॉल मध्ये येण्यास तयारच न्हवते पण तस करणे त्यांना शक्य न्हवते . मनात नसताना पण ते तिथे आले . त्यांनी मॉल च्या समोर येऊन मॉल कडे पहिले आणि अचानक त्यांना 5 व्या मजल्यावर त्या ऑफिस च्या खिडकीत ते 8 जण परत दिसले . तोंडात कोंबलेले कापड , बांधलेले हात खामकराना स्पष्ट दिसत होते . खामकराना 2 मिनिट विश्वासच बसत न्हवता . ते 8 जण खामकरान कडे निर्विकार पण भेदक नजरेने बघत होते . आता मात्र खामकराना घाम सुटला . ते 8 जण अजून तिथेच होते आणि खामकराना बघत होते . खामकर आहे त्या जागी तशेच थांबले . अचानक खामकराना पण अस्वस्थ वाटू लागले . त्यांनी तेथून जाण्याचा निर्णय घेतला . ते परत गाडी कडे जाण्यासाठी वळले . चार पाऊल जातात तोच त्यांना पाठीमागून कुणी तरी हाक मारली . ते वळले त्यांनी पहिले त्यांच्या मॉल मध्ये दुकान विकत घेतलेले शहा त्यांना हाक मारत होते . शहा खामकरान जवळ आले आणि त्यांना आत जाण्यासाठी विनंती केली . पण खामकर तयार झाले नाहीत. आता त्यांना भीती वाटत होती. मॉल मधील दुकानदारांच्या बोलण्याकडे खामकर यांचे लक्ष नव्हते. त्यांना तेथून लवकर बाहेर पडायचे होते. टेन्शन मध्ये त्यांनी दुकानदारांच्या नक्की कुठल्या मागण्या मान्य केल्या हे सुद्धा त्यांना आठवत नव्हते, त्यांना फक्त तेथून लवकर बाहेर पडायचे होते. खामकरानी त्यांच्या P.A.ला फोन करून संपूर्ण मॉल मध्ये A. C. बसवून देण्यास सांगितले आणि गडबडीत तेथून निघून गेले. खामकर ऑफिसमध्ये आले. केबिन मध्ये बसले त्यांच्या डोळ्यासमोर तो दिवस दिसू लागला. घाबरून खामकर ऑफिसमधून निघाले आणि तडक घरी गेले. मॉल चालू होऊन आता आठवडा झाला होता. पण म्हणावी तशी गर्दी मॉल मध्ये होत नव्हती. एवढे एसी बसवून सुद्धा मॉल मध्ये उकडत होतेच.
क्रमश ....
No comments:
Post a Comment