मॉल ( पार्ट 4 )
आपल्याला ते खिलारे च प्रकरण भारी पडलय , तेव्हा हरामखोर बऱ्या बोलाने ऐकला नाही , किती समजावून सांगितलं होत पण ते बेणं काही केल्या ऐकेना . काय झाले शेवटी , पण आता तेच भारी पडतंय असं वाटत आहे . तिथं काही तरी आहे , सारा मॉल बंद पडलाय . एवढे पैसे गुंतवून बसलो आहे .
अनिल , रमेश , सचिन , किशोर मागच्या वेळी खिलारे चे प्रकरण संपवायाला जेवढे पैसे दिले त्याच्या तीन पट पैसे देतो आता पण आता मॉल मध्ये जे काही चालू आहे त्याचा सोक्षमोक्ष लावा आणि ते पण लवकरात लवकर .
खामकर कसे आहेत ते पूर्ण गावाला माहित होते अगदी त्यांच्या कुटुंबातील सर्वाना , पण कोणी काही करू शकत न्हवते . त्यांच्या एकुलता एक मुलाला सर्वेश ला पण स्वतःच्या वडिलांचे ते वागणे पटत नसे . सर्वेश ची बायको संध्या आणि त्याचा छोटा मुलगा नमित आणि खामकराची बायको आशा सर्व जण खामकराना घाबरत असत . खामकरांचे स्वतःच्या नातवावर खूप मनापासून प्रेम होते . त्या घरातील नमित ही एकच व्यक्ती होती जी त्यांच्याशी स्वतःहून बोलत असे . बाकी सर्व जण फक्त खामकरांचा आदेश मान्य करत . मग तो अगदी मनाविरुद्ध असला तरी .
अनिल , रमेश , सचिन , किशोर हे गावातील वाया गेलेले आणि कुणालाच न घाबरणारी तरुण मंडळी . पैश्या साठी काही वाटेल ते करणारी . खामकरानी नेमके हेच हेरले , मग काय त्यांना हवे तेव्हा पैसे पुरवून त्यांच्या कडून स्वतःची कामे करून घेणे हे समीकरण च बनले . प्रकरण जास्तच अंगावर येत आहे असे दिसले की वर लगेच फोन जात असे आणि ते प्रकरण स्वतःला हवे तसें घडवून आणले जात असे . त्या मूळे आपल्या डोक्यावर खामकरांचा हात जो पर्यंत आहे तो पर्यंत आपल्या केसाला पण धक्का लागू शकत नाही याच्यावर अनिल , रमेश , सचिन , किशोर यांचा ठाम विश्वास होता . त्या मुळे खामकरान साठी वाटेल ते काम करायची त्यांची तयारी होती . खिलारे च प्रकरण पण असेच मार्गी लावलं होत त्यांनी .
आज परत खामकरांचे काम आले होते आणि तिप्पट पैसे पण मिळणार होते . त्या रात्री अनिल , रमेश , सचिन , आणि किशोर यांनी भरपूर दारू पिली आणि मॉल कडे गेले . हसत दंगा करत मॉल पाशी आले . वॉचमन तर आधीच जॉब सोडून पळून गेला होता त्यामुळे मॉल मध्ये लाईट न्हवती . मेन रोड वरच्या street लाईट चा उजेड पडला होता मॉल मध्ये पण तो सुद्धा पुढच्या भागात . मागचा भाग अंधारातच होता .
"आपला सायब बी येडाच है , कशाला बी घाबरतय ,अरे त्या खिलारे ला बघून कुत्र्याचं पिल्लू घाबरायचं नाय आणि आपला सायब त्याला घाबरतोय आणि ते भी तो मेल्यावर "अनिल हसत हसत म्हणाला .
"व्हय रे खिलारे लई सज्जन बाबा , बाप भी तसा आन पोर भी तशीच . नाका समोर चालणारी . एखादा असता तर गप पैसे घेऊन जागा सोडला असता पण त्याला आणि त्याचा घरच्यांना हितचं मारायचं होत त्याला आपण तरी काय करणार " सचिन बोलला .
" पण आपण त्या पोटुशी बाय ला मारायला नको होत रे " , किशोर बोलला .
"अरे किश्या येडा का खुळा तू , तिला मारली नसती तर गेली असती पोलिसाकडे , आणि आपण दानाला गेलो असतो . खिलारेच्या घरच्यांना असं गायब केल की कुणाच्या बापाला भी समजलं नाय आणि ते भी एका रात्रीत "रमेश बोलला .
चला बस झालं , सायबान सांगितलं ते काम करू . आपण प्रत्येक जण एका एका मजल्या वर थांबू , काही प्रॉब्लेम आला तर फोन करू एकमेकांना अनिल बोलला .
ठरल्याप्रमाणे प्रत्येक जण एका एका मजल्या वर थांबला . अनिल पहिल्या मजल्यावर , रमेश दुसऱ्या मजल्यावर , सचिन तिसऱ्या मजल्यावर तर किशोर चौथ्या मजल्या वर थांबला . 11 ते 1 कसे तरी सर्व जण जागे होते पण नंतर त्यांचे डोळे मिटू लागले . अचानक थोड्या वेळानी गरमी जाणंवू लागली . ती गरमी अचानक एवढी वाढू लागली की असं वाटत होत की तिथे आग लागली आहे . चौघाना पण समजत न्हवते की नक्की काय चालू आहे , त्यांनी एकमेकांना फोन केला चौघाचे फोन कॉन्फरन्स मध्ये चालू होते आणि अचानक प्रत्येकाला समोर एकच चित्र दिसत होते . ती 8 जण प्रत्येक मजल्या वर उभी होती . हात पाय बांधले होते , तोंडात कापड कोंबलेले होते . अनिल च्या समोर तीच आठ जणांची फॅमिली उभी होती , रमेश च्या समोर पण तीच आठ जण त्याला बघत उभी होती . सचिन समोर तीच फॅमिली आणि किशोर समोर पण तीच आठ जण . असं वाटत होते ती 8 जण त्यांचे अस्तित्व त्या चौघाना एकच वेळी दाखवत होती . ती 8 जण काहीच करत न्हवती . फक्त त्यांची नजर काम करत होती . ती भेदक नजर . त्या चौघाना तेथून पाळायचे होते पण असं वाटत होते की त्यांचे पाय त्या जागी चिटकुन बसले आहेत . आता ती आठ जण प्रत्येकाच्या जवळ येत होती . शेवटी त्या 8 जणांनी त्या प्रत्येकाला प्रत्येक मजल्या वर घेरलेच . ते 8 जण काहीच करत न्हवते फक्त त्या 8 जणांची ती भेदक नजर त्या चौघाना नुसती जाळत होती . आणि अचानक त्या 8 जाणाना आग लागली , ते जळू लागले .
क्रमश .....
मॉल ( पार्ट 1 )
https://marathighoststories.blogspot.com/2019/09/1_30.html
https://marathighoststories.blogspot.com/2019/09/1_30.html
मॉल ( पार्ट 2 )
https://marathighoststories.blogspot.com/2019/09/2_30.html
https://marathighoststories.blogspot.com/2019/09/2_30.html
मॉल ( पार्ट 3 )
https://marathighoststories.blogspot.com/2019/09/3_30.html
https://marathighoststories.blogspot.com/2019/09/3_30.html
No comments:
Post a Comment