https://bhutkatha.blogspot.com/2019/09/blog-post_97.html |
मानवाला नेहमीच गूढ , अनाकलनीय , अतर्क्य गोष्टी घटनांचं कुतूहल वाटत राहिलंय .पण मला यांबद्दल जराही उत्सुकता आणि कुतूहल वाटत नाही .कारण डॉक्टरी पेशाला गूढ आणि अर्तक्य घटनांवर विश्वास ठेवण शोभत नाही .माझ्यासाठी विज्ञान म्हणजेच सर्वश्रेष्ठ . पण, बेलाला मात्र गूढ आणि अर्तक्य गोष्टी , घटनांचं कुतूहल आहे .तिचा देव , दैवीशक्ती , भूत , आत्मा यांवर प्रचंड विश्वास आहे .पण मी तिला याबद्दल कधीही टोकल नाही .मग ते मला आणि माझ्या प्रगल्भ बुद्दीमत्तेला कितीही बोथट आणि निरर्थक वाटलं तरीही ....कारण...माझं तिच्यावर खूप प्रेम आहे
बेला .माझी मैत्रीण , प्रेयसी , बायको माझं सर्वकाही .

आजकाल ती एका स्वामीच्या आश्रमात जाते .स्वामी योगेंद्र असं काहीतरी त्याच नाव आहे .काय तर म्हणे त्याच्याकडे दैवी शक्ती आहे .मेलेल्या माणसांच्या आत्म्याला बोलावून लोकांची समस्या सोडवतो .हं नॉन्सेन्स ..कसं शक्य आहे ? ..आणि काय, तर तो याबद्दल कसलेही पैसे घेत नाही .दर गुरुवार दादरच्या आश्रमात येतो .खूप गर्दी असते त्याला भेटायला .आणि त्या गर्दीत माझी बेला ......माझी बेला खरंच खूप भोळी आहे .एवढी भोळी की तिने त्या स्वामीचा फोटो देवघरात आणून ठेवलाय आणि दुर्दैवाने मला तो फोटो रोज पहावा लागतोय ....
फोटोवरन तसा तो तरुणच दिसतो.म्हणूनच तर भीती वाटते कारण, माझी बेला म्हणजे मादक सौंदर्यशास्त्राचे जणू एक उत्कृष्ठ जिवंत शिल्पं.नक्षीदार, रेखीव आणि रसरशीत .
शिफॉनच्या लाल साडीत तर तिचं सौंदर्य मादकतेच्या सगळ्या सीमारेषा पार करतं .तंग आणि अरुंद ब्लाऊसमधून दिसणारी तिची पाठन म्हणजे सौंदर्याची खाणंच .ह्या सौंदर्याच्या हव्यासापोटी कुठलाही पुरुष स्वतःच्या तत्वांचा, नैतिकतेचा आणि संस्कारांचा बळी देऊ शकतो.तर मग हा स्वामी काय चीज आहे?त्याचीही नियत कधीही बिघडू शकते.कारण नियत ही बिघडण्यासाठीच असते.आणि प्रत्येक पुरुषाची नियत ही बेलासारख्या लावण्यवतीच्या बाबतीत बिघडतेच .....म्हणूनच मी ठरवलंय कि कसंही करून बेलाला तिथं जाण्यापासून परावृत्त करायचं .त्यासाठी मला त्याच्या दैवीशक्तीची परीक्षा घ्यावी लागेल.मला पहायचंय अशी कसली दैवीशक्ती आहे आणि त्या शक्तीने काय चमत्कार करू शकतो.आणि जर तो नापास झाला तर तु तिथं कधीच जायचं नाही.....आश्चर्य म्हणजे बेला कोणतीही आडकाठी न करता सहज तयार झाली .एवढा विश्वास ?..........आता तर जावंच लागेल ....

वहिनी तु बेलाबरोबर बाहेरच थांब.मी आत एकटाच जातो.तुम्ही कुणीही यायचं नाही .
काय आश्चर्यय, ह्या एवढ्याशा कुटित ना इथे पंखा आहे ना ac तरीही एवढं थंडगार ?बाहेर तर ह्या एप्रिलच्या गर्मीत हैराण झालो होतो.नुसत्या घामाच्या धारा वाहत होत्या .आणि इथे गर्मीचा कसलाही लवलेश नाही.का कुणास ठाऊक पण इथे खूप प्रसन्न वाटतंय .तिथे , समोर कोण बसलंय ?किती प्रसन्न चेहरा, तेजस्वी डोळे आणि त्याचं किती सुंदरआणि निखळ स्मित हास्य आहे.एक मिनिट... हा तर स्वामी ....स्वामी योगेंद्र .पण, मला ह्याला पाहून राग का येत नाहीये? .मला आतून याच्याबद्दल आदर का वाटतोय ?मला असं का वाटतंय की मी याच्याकडे ओढला जातोय?माझा स्वतःवरचा ताबा सुटत चाललाय.
नाही, नाही मी इथे याची काकड आरती किंवा याचे चरणस्पर्श करायला आलेलो नाहीये.मला ह्याची परीक्षा घ्यायचीय, मला याच्या खोट्या आणि अस्तित्वात नसलेल्या दैवीशक्तीची परीक्षा घ्यायचीय .मला याचा मुखवटा फाढायचाय.
तर, तू आहेस योगेंद्र .ओह, स्वामी योगेंद्र.ह ?...काहीच reaction नाही. तसाच प्रसन्न चेहरा , तेजस्वी डोळे आणि तेच निखळ स्मितहास्य.
मी इथे तुझ्या पाया पडायला किंवा मदत मागायला आलो नाहिये.मी तुझी परीक्षा घ्यायला आलोय.तुझ्या खोट्या दैवीशक्तीची परीक्षा......अरे हा स्मितहास्य करत फक्त होकारार्थी मान काय हलवतोय.स्वाभिमान दुखला गेल्याचा किंवा अहंकाराचा, गर्वाचा कुठलाच भाव नाही .तोच प्रसन्न चेहरा, तेजस्वी डोळे आणि निखळ स्मितहास्य ..... ठीक आहे , मी आता माझ्या मनात तुला जे सांगेन ते तू मला करून दाखवायचं .आणि ते जर तुला नाही करता आलं तर ही भोंदूगिरी सोडून द्यायची आणि इथून निघायचं .काय आहे ?... याच्यात काहीच बदल नाही .तोच प्रसन्न चेहरा , तेजस्वी डोळे आणि तेच निखळ स्मितहास्य ...
हं , डोळे बंद करतोयस ?कर कर जेवढी नाटकं करायची आहेत तेवढी कर .बाकी चेहऱ्यावरचे भाव अजूनही तसेच ठेवले आहेस .योगेंद्र याबाबतीत तुला मानला .पाच मिनिट झाली .तुझ्या दैवी शक्तीचा चमत्कार कुठंय ?काही घडतंच नाहिये ? .अरे हे अचानक असं गरम का व्हायला लागलंय ?अचानक तापमानात हा बदल का होतोय? आणि याचा चेहरा असा वेडा वाकडा आणि चेहऱ्यावरचे भाव एवढे त्रासिक का होत आहेत ?टक , टक , टक , टक , टक , टक दरवाजा कोण ठोकतोय ?
अहो भाओजी लौकर बाहेर या .बेला ला बघा काय झालंय .बेला ...काय झालं बेलाला ?आलो , आलो .

एक वर्षांनंतर
मानवाला नेहमीच गूढ , अनाकलनीय आणि अतर्क्य गोष्टी , घटनांचं कुतूहल वाटत राहिलंय .आणि आता मलाही ..........

माझ्या बेलाला जावून आज वर्ष झालं .आजही लोकांसाठी तिचा मृत्यू एक गूढ रहस्य बनून राहिलंय .अजूनही तो काळा दिवस आठवतो .अचानक चक्कर येऊन जमिनीवर थंडगार पडलेली मृत बेला ...
हा आकस्मिक मृत्यू नव्हताचं तर तो नकळतपणे घडलेला खून होता .आणि तो मीच केलाय .......

आतलं तापमान प्रचंड वाढलं होतं.वाळवंटात आलोय की काय असं वाटत होत .आणि तो ....तो योगेंद्र घामाने मेणासारखा वितळत होता .त्याला तसं पाहून माझं शरीरच सुन्न पडू लागलं .पुढे जे घडलं ते फारच भयाण . माझ्या सम्पूर्ण शरीराची हालचालच थांबली होती आणि तो बसल्या बसल्या प्रचंड वेगात थरथर कापू लागला .मी माझे डोळे घट्ट बंद केले आणि अचानक सगळं थांबलं .मी हळूहळू डोळे उघडले तर तो योगेंद्र समोर शांत दिसत होता.बाहेर कुणीतरी दरवाजा बडवत होतं .टक टक टक टक टक .पण माझं लक्ष स्वामी योगेंद्र कडे .आणि त्याने डोळे उघडले ........पाहतो तर काय, ते डोळे ती नजर त्याची नव्हतीच .पण ते डोळे ती नजर माझ्या ओळखीची वाटली .पण त्या नजरेत एक त्रासिक भाव होता.आम्ही दोघं एकमेकांकडे बघत होतो आणि योगेंद्र जे बोलला ते ऐकून मी अवाक झालो .कारण ते शब्द त्याचे नव्हतेच ..."कौ हे काय केलंस ?".......तेवढ्यात वहिनीचा आवाज आला .भाओजी लौकर बाहेर या बेलाला बघा काय झालंय .
बाहेर येऊन पाहतो तर बेला जमिनीवर मरून पडलीय .

मला "कौ" या नावाने फक्त बेला म्हणायची .तेही आम्ही दोघं एकांतात असताना .आणि तेच नाव तीच हाक स्वामी योगेंद्रच्या मुखातून निघालं.पण त्यात एक प्रश्ण होता.कौ तू हे काय केलंस ?
खरचं , त्याने अविश्वसनीय , मनाला न पटणार , गूढतेच्या पलीकडंल अतर्क्य असं करून दाखवलं....

ठीक आहे, मी आता माझ्या मनात तुला जे काही सांगेन ते तू मला करून दाखवायचं आणि ते जर तुला नाही करता आलं तर तू ही भोंदूगिरी सोडून इथून निघायचं ....तर ऐक ..मला तीन वर्षापूर्वी मृत्यू झालेल्या माझ्या बायकोला भेटायचंय.....
त्याच्याकडे एवढी शक्ती होती की त्याने माझ्या जिवंत बेलाच्या आत्म्याला बोलवलं होतं .........

लेखन
K sawool
K sawool
No comments:
Post a Comment