पहिल्या भागाची लिंक 👇👇👇
🔸मनोरुग्ण - भाग दोन🔸
येरवडा कारागृह...भारतातील एक प्रसिद्ध आणी सर्वात मोठ्या कारागृहापैकी एक. जेलच्या पार्किंगमध्ये कार पार्क केल्यानंतर गणेश आणी अनंत खाली उतरले.
"गण्या, चल जरा इन्स्पेक्टर घोरपडेकडे जावून येऊ आपण.. संतोषच्या केसचा चार्ज त्याच्याकडेच आहे"
"या तुम्ही जाऊन सर, मी थोडावेळ थांबतो गाडीतच, एक अर्जंट कॉल करायचा आहे मला..थोड्यावेळाने येतो वाटल तर मी आत" गणेशने उत्तर दिले.
शेवटी अनंत एकटाच जेलच्या बाहेर असणार्या मोठ्या पोलीस ठाण्यामध्ये गेला..
तेथे हातात बंदूक धरून उभ्या असणार्या एका पोलीस कॉन्स्टेबलला घोरपडेच्या केबिनची चौकशी करून तो योग्य ठिकाणी पोहोचला. 👮
घोरपडे निवांत त्याच्या खुर्चीवर बसलेला दिसत होता.. समोरच्या टेबलवर ठेवलेल्या फाईलींच्या गठ्यामधील काही जून्या फाईल्स लक्षपुर्वक न्याहाळत होता..अनंतने तेथे जावून घोरपडेच्या हातात हात मिळवला.
तेथे हातात बंदूक धरून उभ्या असणार्या एका पोलीस कॉन्स्टेबलला घोरपडेच्या केबिनची चौकशी करून तो योग्य ठिकाणी पोहोचला. 👮
घोरपडे निवांत त्याच्या खुर्चीवर बसलेला दिसत होता.. समोरच्या टेबलवर ठेवलेल्या फाईलींच्या गठ्यामधील काही जून्या फाईल्स लक्षपुर्वक न्याहाळत होता..अनंतने तेथे जावून घोरपडेच्या हातात हात मिळवला.
"हँलो सर..मी अँड. अनंत...संतोषच्या केससाठी सरकारी वकील म्हणुन मी कोर्टाचे कामकाज पाहणार आहे"
"या, सायेब बसा" घोरपडेने अनंतला समोरच्या खुर्चीवर बसण्याचा ईशारा केला.
"कालच्या घटनाक्रम विषयी थोडक्यात माहिती देता का सर" खुर्चीवर बसल्यानंतर अनंत म्हणाला.
"आता कालच सांगायच म्हणल तर..काल सकाळी साडेसात ते आठ दरम्यान घटना घडली होती ही.. साडेसातला संतोष त्याची बस ताब्यात घेऊन स्वारगेट स्थानकाबाहेर पडला.. स्वारगेट चौक ते पुलगेट सिग्नल आणी नंतर परत सारसबाग चौक असा सुमारे अर्धातास तो मेन रस्त्यावर हैदोस घालत होता..तावडीत घावलं त्याला चिरडत होता, तरी बर झालं, सारसबाग चौकातल्या ट्रँफिकमध्ये त्याची बस अडकल्यावर तिथल्या पोलीसांनी त्याला ताब्यात घेतलं आणी काल संध्याकाळी हित माझ्या हवाली केले.. हिथ आल्याबरोबर मी त्याला कस्टडीत डांबून टाकला..खतरनाक हाये ना तो,थोडा मोकळा सोडला तर परत काहीतरी प्राँब्लेम करायचा." 🙁
घोरपडेंनी थोडक्यात माहिती सांगितली. अनंतची उत्सुकता वाढली होती.
घोरपडेंनी थोडक्यात माहिती सांगितली. अनंतची उत्सुकता वाढली होती.
"मला संतोषला भेटायचय" अनंत शांतपणे म्हणाला.
"काय करणार त्या येड्याला भेटून? साधी आणी सरळ केस आहे ही, लवकरात लवकर कोर्टात खटला दाखल करून त्याचा निकाल लावायच बघा..समाजासाठी घातक आहे तो.. आणी जे काय करायचं ते या आठवड्यातच करा, पुढच्या आठवड्यात सगळी प्रोसेस पुर्ण करून त्याची रवानगी मेंटल कैद्यांच्या जेलमध्ये करणार आहोत आम्ही..परत सांगितल नाय म्हणतान"
"हे बघा घोरपडे, माझे काम कसे करायचे ते मला समजते..आधी संतोषचे पुर्ण फिजीकल आणी मेंटल चेकअप करून तो खरोखरच मानसिक रुग्ण असल्याचा डॉक्टरचा रिपोर्ट दाखवा आणी नंतरच त्याला पोलीस कस्टडीतून मेंटल हॉस्पिटलमध्ये शिफ्ट करा.."
अनंतने सभ्य भाषेत इन्स्पेक्टरला सुनावले. घोरपडेंनी एकदा अनंतकडे रोखून पाहिले आणी नंतर टेबलावरचा फाईलींचा गठ्ठा आवरायला घेतला.
थोड्याच वेळात घोरपडे आणी अनंत दोघांनीही जेलच्या आत प्रवेश केला.. कोर्ट केसचा निकाल पेंडींग असणार्या गुन्हेगारांच्या सेलमध्ये घोरपडे अनंतला घेऊन आला होता..दोन्ही बाजूला एकाला लागून एक अशा अनेक दगडी कोठड्या होत्या आणी मध्ये दहा फुटांचा रस्ता होता.
"ह्या सोळा नंबरच्या कोठडीमध्ये ठेवलाय त्याला..हवालदार, ताला खोल ह्याचा"🔐
हवालदाराने चावीने लॉक खोलून लोखंडी सळ्यांचा दरवाजा ढकलला..इन्स्पेक्टर आणी अनंत दोघेही आत गेले..आतमध्ये आरोपी संतोष एका लोखंडी खुर्चीवर मान खाली घालून बसलेला दिसून येत होता..या दोघांनी त्याच्या खोलीमध्ये प्रवेश केला तरी त्याने ढुंकूनही या दोघांकडे पाहिले नाही..खोलीमध्ये कुबट वास आणी थोडा अंधार पडल्यासारखा वाटत होता..समोरील भितींवर असणार्या एका छोट्या जाळीदार खिडकीतून येणाऱ्या प्रकाशामुळे पुर्ण अंधार जाणवत नव्हता..अनंत त्याच प्रकाशामध्ये आरोपीचे निरीक्षण करत होता..आज सकाळपासून त्याच्या मनात संतोषची जी काही प्रतिमा तयार झालेली होती त्यापेक्षा प्रत्यक्षातील संतोष त्याला काहिसा वेगळा वाटत होता.
"घोरपडे साहेब, मला याच्याशी थोडावेळ एकांतात बोलायचे आहे.. प्लीज तुम्ही थोडावेळ बाहेर जाता का" अनंतने विचारणा केली.
"जशी तुमची मर्जी, पण ह्या माथेफिरूसोबत एकांतात थांबणं मलातरी जरा धोकादायक वाटतय..हे बघा इकडे ह्या भिंतीवर एक बेल लावलेली हाये..तुम्हाला जर काही संशंयास्पद हालचाल जाणवली तर तुम्ही लगेच ती बेल दाबा..दाबल्याबरोबर सायरन वाजून त्या आवाजानं सेलच्या बाहेर तैनात असलेले गार्ड पळत हिथ तुमच्या मदतीला येतील.."
अशी महत्वाची सुचना देऊन घोरपडे त्या कोठडीतुन बाहेर पडून त्यांच्या केबिनकडे परतले.
अशी महत्वाची सुचना देऊन घोरपडे त्या कोठडीतुन बाहेर पडून त्यांच्या केबिनकडे परतले.
कोठडीतल्या कमी प्रकाशातच अनंतने संतोषचे तीक्ष्ण नजरेने निरीक्षण केले..अंदाजे वय तीसच्या जवळपास ,डोक्यावरील काळे पण विस्कटलेले केस , दाढीचे वाढलेले खुंट, आणी शून्यामध्ये रोखलेली नजर..संतोषतर मान हलवून पाहायला ही तयार नव्हता त्यामुळे संवादाची सुरूवात तर अनंतलाच करावी लागणार होती.. त्याने कोपर्यातली दुसरी लोखंडी खुर्ची उचलून संतोषपासून तीन फुटावर ठेऊन त्यावर बसला..एक जांभई देऊन हातातील डायरी उघडली आणी मोठ्या आवाजात वाचू लागला. 📒
"नाव- संतोष xx, मुळगाव- म्हात्रेवाडी, सातारा,
शिक्षण-बी ए, पेशा- एसटी बस ड्रायव्हर, आजवरची वर्तणूक -सामान्य, आजवरचे पोलीस रेकॉर्ड- नाही.
गंभीर गुन्हा - बेदरकार पणे बस पळवून पंधरा लोकांचा खून केला आणी पंचवीस जणांना जखमी केले..
अपेक्षित शिक्षा- फाशीपेक्षा कमी नाहीच.
शिक्षण-बी ए, पेशा- एसटी बस ड्रायव्हर, आजवरची वर्तणूक -सामान्य, आजवरचे पोलीस रेकॉर्ड- नाही.
गंभीर गुन्हा - बेदरकार पणे बस पळवून पंधरा लोकांचा खून केला आणी पंचवीस जणांना जखमी केले..
अपेक्षित शिक्षा- फाशीपेक्षा कमी नाहीच.
तुझ्याबद्दल हे सर्व पॉईंट मी सकाळपासून जमा करून टिपून ठेवलेत..आणी यामध्ये मला अजून भर घालायची आहे..तु सांगणार असशील तर तुझ्याकडून नाहीतर कुठूनतरी मला हवी ती माहिती मिळणारच आहे..बरं आता मला सांग, तु केलेल्या क्रूत्या बद्दल तुला काही पश्चात्ताप वगैरे होतोय का?"
संतोषने पहिल्यांदाच मान वर करून अनंतकडे पाहिले..आणी एक सुस्कारा सोडला.
"बरे झाले ..कोणीतरी माझ्याकडून काहितरी ऐकण्याची ईच्छा दाखवली ते...नाहीतर कालपासून सगळे जण फक्त सुनावतच आले आहेत...बाकी खरं सांगायच तर जे जे आरोप पोलीस माझ्यावर लावत आहेत किंवा ज्या घटनेसाठी मला दोषी धरण्यात येतय त्यातील एकही मला आठवत नाहीये..त्यामुळे हे आरोप खरे आहेत का खोटे आहेत याबद्दल मी काहीही सांगू शकत नाही.."
"बरे झाले ..कोणीतरी माझ्याकडून काहितरी ऐकण्याची ईच्छा दाखवली ते...नाहीतर कालपासून सगळे जण फक्त सुनावतच आले आहेत...बाकी खरं सांगायच तर जे जे आरोप पोलीस माझ्यावर लावत आहेत किंवा ज्या घटनेसाठी मला दोषी धरण्यात येतय त्यातील एकही मला आठवत नाहीये..त्यामुळे हे आरोप खरे आहेत का खोटे आहेत याबद्दल मी काहीही सांगू शकत नाही.."
संतोषचे बोलणे ऐकून अनंतच्या भुवया उंचवल्या होत्या..
"हंम्म..म्हणजे तुला कालच्या घटनेबद्दल काहीच माहिती नाही तर" मिश्कील स्वरात अनंत म्हणाला.🙄
"हंम्म..म्हणजे तुला कालच्या घटनेबद्दल काहीच माहिती नाही तर" मिश्कील स्वरात अनंत म्हणाला.🙄
"पोलीसांच्या चर्चेमधून आणी त्यांनीच आणुन दिलेल्या पेपरमधल्या बातम्यांवरून सर्व घटनाक्रम मला समजला आहे पण हे सगळे मीच केले असे इतरांसारखे तुमचेही ठाम मत असेल तर मग पुढे सांगण्यासारखे माझ्याकडे काही नाही"
संतोषने शांतपणे उत्तर दिले.
संतोषने शांतपणे उत्तर दिले.
"गुड...तुझ्याकडून अशाच उत्तराची अपेक्षा होती मला..कसयं ना, ईथल्या कोणत्याही कस्टडीमध्ये जाऊन विचार..येथे प्रत्येक गुन्हेगार हा स्वतःला निर्दोषच मानत असतो, त्यामुळे तुही स्वतःला निर्दोष मानत असशील तर त्यात काही चुकीचे नाही.."
"नाही सर..! मी निर्दोष आहे असे मी म्हणणार नाही..एक गुन्हा तर मी पण केला होता, आणी तो गुन्हा मी केला नसता तर कदाचित आज माझ्यावर जी वेळ आली आहे ती आली नसती...किंवा त्या माझ्या हातून घडलेल्या चुकीचा भविष्यात एवढा भयानक परिणाम होणार आहे हे जरी मला आधी समजले असते तरी तो गुन्हा मी केला नसता...तुम्हाला खरे वाटेल का ते माहित नाही पण मी पुर्वी असा नव्हतो हो "
संतोष चे बोलणे खरे असो किंवा खोटे पण अनंतला ते पुर्णपणे ऐकून घ्यायचे होते..त्याने त्याची डायरी उघडली आणी महत्वाचे मुद्दे लिहून घेण्यासाठी पेन हातात घेतला.🖊️
"ठिक आहे..तुझे सगळे म्हणणे मला मान्य आहे, आता मला सांग असा कोणता गुन्हा केला होतास तु?"
"ठिक आहे..तुझे सगळे म्हणणे मला मान्य आहे, आता मला सांग असा कोणता गुन्हा केला होतास तु?"
"एक वर्षापुर्वीची गोष्ट असेल ती सर.."
संतोषने त्याची कहाणी सांगायला सुरूवात केली.
त्या खोलीतील अंधूक प्रकाशातही संतोषच्या चेहर्यावरील हावभावावर अनंत लक्ष ठेवून होता आणी त्याची कहाणी लक्षपुर्वक ऐकत होता.
▪️▪️▪️▪️▪️▪️▪️▪️▪️
संतोषने त्याची कहाणी सांगायला सुरूवात केली.
त्या खोलीतील अंधूक प्रकाशातही संतोषच्या चेहर्यावरील हावभावावर अनंत लक्ष ठेवून होता आणी त्याची कहाणी लक्षपुर्वक ऐकत होता.
▪️▪️▪️▪️▪️▪️▪️▪️▪️
सातारा शहरापासून पस्तीस किलोमीटरवर संतोषचे मुळगाव 'म्हात्रेवाडी' हे महामार्गालगत असणारे एक छोटे शहर होते..बीए चे शिक्षण पुर्ण केल्यानंतर संतोषने गावातच एक मोठे दूकान टाकून स्वताचा व्यवसाय चालू केला होता..त्याचा व्यवसाय पण बरा चालत होता... त्याच्याच गावातील 'रेश्मा' नावाच्या तरुणीवर संतोषचे मनापासून प्रेम होते..संतोष आणी रेश्मा दोघेही सातार्याला एकाच कॉलेजमध्ये शिकायला होते.. एका गावातील असल्यामूळे त्यांची ओळख तर आधीपासूनच होती ,पण सातार्याला कॉलेजमध्ये त्या ओळखीचे रूपांतर प्रेमामध्ये झाले.. दोघांच्याही भेटीगाठी वाढल्या, एकत्र जगण्या मरण्याच्या शपथाही खाल्या पण कॉलेज संपले आणी रेश्माच्या घरच्यांनी आता तिच्या लग्नाचे मनावर घेतले होते..👰
क्रमशः..
No comments:
Post a Comment