भाग दोनची लिंक 👇👇👇
https://marathighoststories.blogspot.com/2019/09/blog-post_25.html
🔸मनोरूग्ण - भाग तीन.🔸
अनेक वर्षांपासून सुरू असलेले संतोष आणी रेश्माचे प्रेम आता संकटात सापडले होते...शेवटी समाजापासून आजवर लपवलेले त्यांचे प्रेमाचे गुपित त्यांनी आपापल्या घरी उघड केले..वेगळ्या जातीचा प्रश्न उपस्थित झाला.. संतोषच्या घरच्यांनी कशीबशी संमती दर्शवली पण रेश्माच्या घरून या संबंधाना कडाडून विरोध झाला..तिला घराबाहेर पडण्यास बंदी घालण्यात आली आणी काही महिन्यामध्येच गावात कोणताही गाजावाजा न करता गुपचूपपणे सातारा शहरात स्थायिक असणार्या दूरच्या नातेसंबंधातील एक तरुण 'सागर'' सोबत तिचा विवाह लावून दिला..
रेश्मा मनाविरुद्ध लग्न करून सातार्यात राहायला गेली आणी इकडे संतोष दूखीः झाला त्याचे मन कशातच रमेनासे झाले..नेमकी तशीच अवस्था रेश्माचीपण झाली होती..सागर कंपनीमध्ये चांगल्या जॉबला होता, त्याचे स्वताचे घर होते, स्वभावाने प्रेमळ होता पण रेश्मा ला त्याच्यामध्ये इंटरेस्ट वाटत नव्हता.. तिच्या मनातुन संतोषच्या आठवणी काही केल्या हटत नव्हत्या..शरीराने जरी ती सागरसोबत असली तरी मनाने मात्र संतोष बरोबरच होती..अखेर जे व्हायला नको होते तेच झाले.. संतोष आणी रेश्मा चोरून एकमेकांना फोन करू लागले.. कधी वेळ मिळालाच तर गुपचूप भेटायला लागले..इकडे सागर मात्र ह्या सर्व प्रकारापासून अनभिज्ञ होता..पण काही दिवसांनी त्याला या प्रकरणाची खबर लागली.💑
एके दिवशी त्याने रेश्माला फोनवर संतोष सोबत बोलत असताना पकडले आणी दोघांमध्ये बाचाबाची झाली..सागरला खूप वाईट वाटले तरीही त्याने हा विषय पुढे जास्त वाढवायचा नाही असे ठरवले होते...त्याने एकांतात रेश्माला चार गोष्टी समजावून सांगितल्या.. लग्नाच्या आधी जे काही असेल ते असो पण आता आपले लग्न झालेले आहे तर यापुढे तरी आपण एकमेकांशी एकनिष्ठ राहायला हवे अशी त्याने अपेक्षा व्यक्त केली.. रेश्मानेपण होकार दिला..पण हा ठराव तिने फक्त दीड दोन महिनेच पाळला आणी नंतर परत पहिल्यासारखेच सुरू झाले...संतोष पण चांगल्या वाईटाचा विचार न करता रेश्माच्या प्रेमात आकंठ बुडाला होता. आपण दोघांनी आता असे चोरून भेटण्याऐवजी कायमस्वरूपी एकत्र राहावे असे त्यांना वाटायला लागले होते..आणी त्यांच्या या विचारामध्ये प्रमुख अडसर असणार्या सागरवर त्या दोघांचाही राग दिवसेंदिवस वाढत चालला होता.. सागरलापण रेश्मा आणी संतोषच्या प्रकरणाविषयी बरेच काही समजून चूकले होते.. रेश्मासोबत आता त्याचे भांडणतंटे ,वादावादी दिवसेंदिवस वाढत चालले होते..रेश्मापण संतोषजवळ सागरविषयी सतत काहिना काहि भरवत राहायची.. त्याच्याकडुन होत असलेल्या, नसलेल्या छळाबद्दल तिचे सतत रडगाणे चालुच राहायचे.. संतोषला आता या सगळ्या गोष्टींचा एकदाच सोक्षमोक्ष लावून टाकायचा होता..
अखेर एक दिवस रेश्मा आणी संतोषने मिळुन एक भयंकर प्लँन तयार केला..आपल्या प्रेमाच्या मार्गात काट्यासारखा रूतणार्या सागरचाच कायमचा काटा काढण्याचा निश्चय त्या दोघांनी केला..
आणी त्यादिवसापासून अचानकच सागरसोबत रेश्माचे वागणे, बोलणे बदलून गेले..ती आता सागसोबत हसून खेळून राहू लागली होती..प्रेमाचे आणी पतिव्रता असल्याचे नाटक रंगवू लागली होती.. सरळ स्वभावाचा सागर तिचा कावा ओळखू शकत नव्हता..काही दिवस असेच गेले, एके दिवशी तिने लाडात गळ घालून सागरला ऑफिसला सुट्टी घ्यायला लावली..शहरापासून काही अंतरावर एकांतात असणार्या 'शंखेश्वराच्या' ऊंच डोंगरावर सागरला फिरायला जाण्याच्या बहाण्याने घेऊन गेली. ⛰️
निसर्गरम्य अशा शंखेश्वराच्या डोंगरमाथ्यावर एक छोटेसे महादेवाचे दगडाचे मंदीर होते..आसपास दाट झाडे झूडपे होती..त्या डोंगरावर फक्त विकेंड सुट्टी च्या दिवशीच तुरळक लोक फिरकत असत..इतर दिवशी सगळीकडे बर्यापैकी साससुम असायची.. सगळीकडे फिरून झाल्यानंतर संध्याकाळच्या वेळी फोटोसेशनच्या बहाण्याने रेश्मा सागरला घेऊन मंदीराच्या मागील बाजूच्या डोंगराचा उंच कडा असलेल्या टोकाजवळ घेऊन गेली..आधीच ठरलेल्या प्लँनिगप्रमाणे तेथे काहीवेळापुर्वीच संतोष येऊन थांबलेला होता..एका आडोशाला त्याने त्याची बाईक पार्क केली होती आणी स्वत कड्याजवळच्या झूडपांमध्ये हातामध्ये एक धारदार हत्यार घेऊन लपून बसलेला होता..संध्याकाळचा अंधार पडायला लागला होता..संतोषला आता त्या दोघांची चाहुल लागली होती आणी तो मानसिक तयारी करत होता.🗡️
कड्याजवळ येताच रेश्माने वेगवेगळ्या पोजमध्ये फोटो काढण्यास सुरवात केली..सागर मोबाईलमध्ये तिचे फोटो काढण्यात दंग होता..पुढे काय होणार होते याची त्याला कल्पना नव्हती.. रेश्मा त्याला बोलण्यामध्ये आणखी गुंतवून ठेवत होती आणी संतोष संधी साधून सागरच्या जास्त जास्त जवळ येत चालला होता.. अखेर संतोष सागरच्या पाठीमागे अगदी जवळ येऊन थांबला आणी सागरला अचानक काहीतरी जाणवले ..त्याने झटकन मागे वळून पाहिले पण तोपर्यंत उशीर झाला होता.. संतोषच्या हातातील धारदार हत्याराचा वार त्याच्या मानेवर बसला आणी रक्ताची चिळकांडी उडाली..एक किंकाळी ठोकून हातातल्या मोबाईल सहीत सागर खाली खडकाळ जमीनीवर कोसळला.. मानेतून रक्तश्राव चालू झाला होता..संतोषने चपळाईने त्याच्या बाईकच्या बँगेतून पेट्रोलने भरलेली बाटली घेऊन आला.. खाली जमीनीवर पडलेल्या सागरला फरफटत उंच कड्याच्या टोकाजवळ नेले… इकडेतिकडे पाहत घाईघाईने पेट्रोलची बाटली सागरच्या अंगावर रिकामी केली..रेश्मा कावरीबावरी होऊन इकडेतिकडे पाहत होती. प्रचंड भितीमुळे रेश्मा आणी संतोष दोघेही घामाघूम झालेले होते.. संतोषने काही अंतरावरून माचिसची काडी ओढून सागरच्या अंगावर टाकताच आगीचा भडका उडाला.. अजूनही अंगात थोडा प्राण शिल्लक असलेला सागर अग्नीदाहाने पेटत्या शरीरासह उठून उभा राहिला..दरीच्या टोकावरच इकडे तिकडे हेलकावे खाऊ लागला… ते भयंकर द्रूश्य पाहुन रेश्मा भितीने संतोषच्या पाठीमागे जावून लपली.. घामाघूम संतोषने जवळ पडलेले एक लाकडाचे लांबलचक दांडके उचलले आणी सागरला त्या उंच कड्यावरून खाली लोटून दिले..सागर एक शेवटची जीवघेणी आरोळी देऊन त्या उंच कड्यावरून पेटत्या शरीरासोबत खोल दरीमध्ये कोसळला..😨
ह्रुदयाचा थरकाप उडवणारे हे द्रुश्य पाहून रेश्मा आणी संतोषच्या काळजाचा ठोका चूकला होता.. पुढे कित्येक रात्री संतोष आणी रेश्माला झोप लागणार नव्हती.
▪️▪️▪️▪️▪️▪️▪️▪️
"म्हणजे याचा अर्थ असा की, ज्या गुन्ह्यासाठी तु सध्या जेलमध्ये आहेस तो तुझा पहिला गुन्हा नाही तर याआधीपण तु असे कारनामे केलेले आहेस..स्वताच्या स्वार्थी प्रेमासाठी तुम्ही दोघांनी बिचार्या सागरला जीवे मारून टाकले..अरेरे..!"
संतोषची कहाणी मध्येच थांबवून अनंत म्हणाला.
"प्रेमामध्ये आंधळे होऊन आम्ही खूप मोठी चूक करून बसलो होतो..पुढे कित्येक रात्री भितीमुळे आम्हाला झोप सुद्धा लागली नव्हती..खूप दिवस वेगवेगळे भास होत राहिले आणी या घटनेच्या वर्षभरानंतर तो सागर पुन्हा आमच्या आयूष्यात आला.. आम्ही केलेल्या त्याच्या हत्येचा बदला घेण्यासाठी"🗿
"काय..! तुम्ही ज्याचा खून केला होता तो सागर परत आला?" अनंतने चमकून विचारले.
"होय सर...रेश्मा मला सांगायची, ती एकातांत असली की तिला सागर दिसायचा, त्रास द्यायचा म्हणुन पण मला वाटायचं हा तिचा फक्त भास असेल..पण ज्यादिवशी तो मला भेटला तेव्हा मला समजले ती खोट बोलत नव्हती ते.."
अनंतने त्याच्या डायरीमध्ये काहीतरी महत्वाचे नोट करून घेतले, संतोष आरोपी होता याविषयी त्याच्या मनात शंका नव्हती पण तरीसुद्धा त्याचे म्हणणे पुर्णपणे ऐकणे त्याला भाग होते. संतोषने त्याची कहाणी पुढे सांगायला सुरूवात केली.
▪️▪️▪️▪️▪️▪️▪️▪️▪️▪️
त्या संध्याकाळी सागरचा खून करून संतोष आणी रेश्मा दोघेही आपापल्या घरी परत गेले..रेश्माने घरी जावून रडत रडत "आम्ही डोंगरावर फिरायला गेलो असताना आम्हाला एकांतात काही बदमाशांनी अडवले आणी पैसे व वस्तुंची लूटमार केली..तसेच माझी इज्जत लूटण्याचा प्रयत्न केला..सागरने प्रतिकार केल्यानंतर त्यांनी त्याच्यावर हल्ला करून खून केला..मी कशीबशी जीव वाचवून निसटून आले" अशी खोटी कहाणी रचून सांगितली.
या घटनेमुळे सागरच्या आई वडीलांवर दूखाःचा डोंगर कोसळला.. पोलीस तपासणीमध्ये अनेक उलटसुलट प्रश्न विचारूनही रेश्मा तिच्या मुळ जबानीवर कायम राहिली आणी पोलीसांनी अज्ञात बदमाशांवर सागरच्या हत्येचा आरोप लावून पुढील तपासास सुरूवात केली.🕹️
दरम्यान घडलेल्या घटनेबद्दल कोणालाही संशय येऊ नये म्हणुन संतोष आणी रेश्मा दोघेही पुर्ण काळजी घेत होते..त्यांना अजून दोन वर्षे तरी असेच घालवून सर्व वातावरण शांत झाल्यानंतर विवाहबद्ध होण्याचा प्लँन पुर्ण करायचा होता..पण संतोषला मनातल्या मनात खूप भीती वाटायला लागली होती..पोलीसांनी थोड्याशा पुराव्यावरून अनेक शातीर गुन्हेगारांना गजाआड घातल्याच्या सुरस कथा त्यानेही ऐकलेल्या होत्या..आणी त्यामुळेच त्याला आता त्याच्या मुळ गावामध्ये राहायचे नव्हते..'किमान दोन वर्षे कुठेतरी बाहेर राहून पुन्हा गावाला परत येईल आणी नंतर आपण आपला संसार सुरू करू' असे त्याने रेश्माला सांगितले.
गावामध्ये चांगला चालत असलेला त्याचा व्यवसाय तोट्यात जात असल्याचा त्याने बनाव केला आणी त्यानिमित्ताने त्याचे दूकान बंद करून तो नोकरीच्या शोधामध्ये पुणे शहरामध्ये आला.🏰
संतोष एक उत्तम ड्रायव्हर होता..आणी त्याचबरोबर एस टी महामंडळामध्ये त्याच्या एका नातेवाईकाचा वशिला पण होता.. त्याच वशिल्याच्या जोरावर तो परिवहन खात्यामध्ये कंत्राटी ड्रायव्हर म्हणुन जॉबला लागला.. सुरूवातीला एक दीड महिना लोकल फेर्यांच्या गाड्यांवर चालकाचे काम केल्यानंतर त्याला 'पुणे स्वारगेट ते सातारा' एशियाड बस वर ड्रायव्हरचे काम मिळाले.. आणी जवळपास सहा महिने त्याने ते काम उत्तमरित्या पार पाडलेही होते..त्याला अजून किमान वर्षभर तरी हे काम आवडीने पार पाडायचे होते आणी नंतर परत गावाकडे जायचे होते.
पण त्या दिवशी..?
#क्रमश..

No comments:
Post a Comment