💐💐 भाग :- पहिला💐💐
जायती नदीच्या लाटावर भिकुबा आपली नाव पुनवेच्या प्रकाशात वल्हवत होता.नावेत उमाकांतच्या मांडीवर रचना डोकं ठेवुन आकाशाकडे पाहत पहुडली होती.उमाकांत तिच्या बटेतुन हात फिरवायचा तसा तिच्या शरिरात वाऱ्यानं पाण्यात लाटा निर्माण व्हाव्यात तशाच लाटा उठत होत्या व ती धुंद होऊन हात उमाकांतच्या कमरेत अडकवक होती. भिकुबाचं तोंड विरुद्ध दिशेला असल्यानं ते काय करत आहेत काय बोलत आहेत याचं त्याला सोयरं सुतक नव्हतं .पण तरी त्यांचं बोलणं त्याच्या कानावर पडेच, जे वय झाेैल्या भिकुबाला रुचेना पण रात्रीचं भाडं मिळतय ते ही अव्वाच्या सव्वा न मागता म्हणुन भिकुबा दुर्लक्ष करत शांतपणे नाव वल्हवत राही.तरी त्यांनं आज उमाकांत ला सांगितलंच "इंजिनियर साब माझं बुढ्ढ्याचं एक ऐका, तुम्ही होडी वल्हवायचं शिकुन घ्या म्हणजे मी तुम्हास्नी रातीला नाव देऊन देत जाईन मग खुशाल फिरा रातभर" कारण माझीही झोप होईल व तुमची बी कबाबमधली हड्डी दुर व्हईल" ,"हवं तर दोन दिसात मी तुम्हास्नी शिकीवतो.भिकुबाचं म्हणणं रचना बाईसही पटलं .कारण भिकुबा कितीही विश्वासाचा असला तरी नावेत त्याची उपस्थिती त्यांच्या प्रेमात अडचण आणतच असे. भिकुबाचा प्रस्ताव रचना बाईनं आनंदानं स्विकारला.
रात्रीचे अकरा वाजले असतील.होळी पेटवुन गाव झोपण्याची तयारी करत होता.पिठुर चांदण्यात नाव डुलत होती व उमाकांत वायकोळे व रचना आमले बाई भावी सुखस्वप्नात रममाण होता होता जलविहाराचा आनंद लुटत होते.तितक्यात सारा जायतीचा नदीथय थरथरवणारा गणपाच्या हाकाटीचाआवाज घुमला. '"भिकुबा", "भिकुबा" अशा हाका मारतच गणपा गावाकडनं पळतच नदीकाठ जवळ करत होता.भिकुबानं आपल्या भावाचा आवाज ओळखला व काय विपरीत घडलं असावं !म्हणुन नाव काठाकडं वळवली.गणपाच्या आरोळ्या चालुच होत्या व नजिक येत होत्या.नाव काठावर नांगरली तसे रचना व उमाकांत दोन्ही ही काहीतरी झालं पण काय ? हे जाणण्याकरिता तेही खाली उतरले व रेतीवर आले.
गणपा रडतच भिकुबाच्या गळ्यात बिलगला.व जोरजोरानं हमलुन रडु लागला तसा "आरं भावा काय झालं ते तर सांग, की बारक्यावाणी नुसता रडशिलच. "बापु , भावा लई आक्रित पाहिलं रे! यमाच्या दाढेतुनच सुटुन आलोय." भिकुबानं प्रसंगाचं गांभीर्य ओळखत नदीपात्रात असलेल्या खोपटात त्याला नेलं व पाणी पाजुन निस्तवारीनं बसवलं .उमाकांत व रचना बाईस समजेना काय झालय.ते दोघंही खुळ्यागत पाहत राहिले.पाणी पिऊन शांत झाल्यावर गणपानं जे काही सांगितलय त्यानं तिघांच्या अंगाचा थरकाप उडाला.
होळी असल्यानं गणपा नेहमी पेक्षा उशिरानंच गढीवर गेला कारण जेवनानंतरच वैरण घालण्यासाठी तो दररोज जायचाच.गढीच्या मागच्या बाजुला पक्क घर होतं त्यात ज्वारी, गहु , मका, उडीद , मुग , तुवर, तीळ सारं धान्य भरलेलं.व त्यातुन जिना उतरला कि यु आकारात एका बाजुला वाहनाकरिता तळ.त्यात ट्रॅक्टर, ट्रक, महिंद्रा जीप, मोटार सायकली हारीनं उभ्या तर त्याच्यासमोर चाऱ्याचा गोठा व पुढे पुन्हा दरवाजा उघडला कि मग गाई म्हशी भेकड जनावर बांधलेली.नी मग पुन्हा भितीचं कंपाऊंड.गणपा नेहमी प्रमाणं पक्क्या घरातुन दरवाजा उघडुन सरळ चालत आला व जनावराच्या शेडचा दरवाजा उघडला.म्हशी गाईच्या गव्हाणीतली उगार काढली व नविन चारा आणण्याकरिता गोठ्याकडे वळणार तोच कंपाउंडच्या भिंतीपलिकडे कुणीतरी उभं असलेलं सावलीच्या आडोशाला त्याला जाणवलं .तो काय विचारणार तोच "गणपा ..s..s.खराटा दे रे" माझी........" पुढचं काही बोलणार तोच गणपानं वाक्य मध्येच तोडत " चल निघ इतक्या रातीला काहीही मागता " असं केकलतच त्याने कंपाउंडच्या भिंतीचा दरवाजा बंद केला.त्याला वाटलं मागच्या आळीतलं कुणी तरी आलं असावं पण वस्तु मागायची पण एक वेळ असते.अस फणकारत तो गोठ्यात चारा घेेण्यासाठी आला.चारा भरण्यासाठी त्यानं डालं व फावडा हातात घेऊन तो बोलता बोलताच डालं भरु लागला.डालं भरुन डोक्यावर चढवणार तोच गोठ्यात समोर त्याची नजर पडली.नी गणपा थरथर व लटपट करु लागला..डोळे विस्फारुन एकसारखा समोरच पाहु लागला.साडीत आक्कासाब समोरच उभी.मागे जावं कि पुढे हे समजतच नव्हतं नी जागच्या जागी गणप्याची पन्हाळ धोतरातनं पावसाळ्यागत वाहु लागली.तितक्यात" आरं गणपा, एक खराटा दे ना रं का उगाच भाव खातो.माझी सारी सरकटायची बाकी आहे वर्षापासुन .सरकटुन झाली कि बघ लगेच परत करते."हे ऐकल्याबरोबर तर गणपा साप सुंघल्यागत जागच्या जागीच.आक्कासाब हीउत्तराच्या प्रतिक्षेत उभीच.दोघाची नजर एकमेकावरच.गणपा ला नजरही खाली घेता येईना."कारं गणपा तुच ढकललं होतं ना रं मला पाईपानं, मी काय गुन्हा केला होता तुझा.तु जर ढकललं नसतं तर मानगुट सापडलच होतं त्या हरामी परत्याचं.माझ्यासोबतच जाळलं असतं कुत्र्याला" ."बघ याच जिन्यावरनं गरंगळत खाली आली रं मी नी.." तिनं जिना दर्शवण्याकरिता मागं मान वळवली नी संधी साधत गणपानं डालं फेकत शरिरातली सर्व शक्ती एकवटुन उर फुटेस्तोवर धावला.गोठा, शेड, कंपाउंड त्यानं कसं ओलांडलं त्याला कळलच नाही व घरी न जाता थेट आपला भाऊ भिकुबा कडं नदीवरच आला.मागनं आक्कासाब हाका मारत "आरं गणपा ऐक रे माझी रितु कशी आहे ते तर सांग ना रे .अरे पळू नको थांब.बघ एक खराटा तरी दे" असं म्हणत गावबाहेर विसाव्यापर्यंत आली.तरी गणपा आपला पळतोच आहे मागे न पाहता.नी तोच गणपा आता धापा टाकत जायतीच्या पात्रात खोपटात भिकुबाला बिलगुन लहान पोरासारखा हमलुन रडत होता.तशातही भिकुबानं खोपटाच्या बाहेर येत विश्वातिर्थाकडे पाहिलं नी त्याच्या अंगाचा थरकाप उडाला.विश्वतिर्थावर चिता जळत होती व चितेजवळच बाई उभी चांदण्या प्रकाशात स्पष्ट दिसली पण भिकुबानं ते उमाकांत रचना वा गणपा कुणालाच सांगितलं नाही.
गणपाला गोधड पांघरुण झोपवुन उमाकांत व रचनास " चला मी तुमास्नी घरापर्यंत सोडतो" अस भिकुबा सांगु लागला पणआम्ही जाऊ बाबा आमचे आमचे .आधी हे काय ते सांगा बरं.पण भिकुबानं त्यांच काही एक न ऐकता चला निघा सोबत जाऊ व जे घडलंय तेही सांगेन वेळ पडल्यावरअसं म्हणत भिकुबानं दोघांना घरी म्हणजे गढीवर पोचतं केलं.त्याच गढीवर ज्या गढीच्या मागच्या बाजुलाच हे सारं रामायण घडलं होतं पण चार पाच दिवसापुर्वीच रहावयास गेलेल्या उमाकांत रचना बाईस यांचा काडीचाही पत्ता नव्हता.कारण गडीचा मागचा दरवाजा मागच्या होळीपासुन बंदच होता.
भिकुबानं दोघांना पोहोचतं करुन परतल्यावर खोपटात गणपा झोपला होता तिथंच पथारी टाकत तोही पडला.पण झोप काही लागेना.आपला भाऊ लहान असल्यापासुन गढीत काम करतोय नी त्याच गढीत आज गणपावर हि बला यावी.आता पुढं काय? 'आक्कासाब'एक लांब सुस्कारा सोडत भिकुबा भुतकाळाच्या डोहात खोल खोल उतरु लागला.
जायतीच्या उत्तरकाठावर एक मैलावर वलवाडी गाव चार मैलावरील पुर्व पश्चिम पसरलेल्या डोंगररांगातुन वाहत येणारा व जायतीला मिळणाऱ्या मुर नाल्यावर वसलेलं.मुर नाल्याच्या पश्चिमेला वलवाडी व पुर्वेला नविन वसलेली खालवाडी.या वाडीपासुन एक मैल जायतीपर्यंत पुरा उतार.या उतारात जायतीचं खोरं लहान मोठ्या पिवळ्या कसदार मातीच्या टेकाड्यांनी वसलेलं.गावाच्या दक्षिणेला मात्र डोंगररांगापावेतो अतिशय कसदार काळ्या मातीचं रानं जे केळी कापुस ऊस पिकवत असे.याच वलवाडीत आनंदराव सरदेसायाची गढी.आनंदरावांचे दोन कबिले.मोठ्या आवळाबाईस गुणवंतराव सरदेसाई नंतर मुल झालच नाही.गुणवंतराव जिल्ह्याच्या ठिकाणीच शिक्षण घेऊ लागले.ते विस वर्षाच्या लग्नाच्या वयाचे झाले मात्र त्या वेळी त्याच्या ऐवजी आनंदरावच पुन्हा बोहल्यावर चढले व सखुबाई गढीत आल्या.तिकडे गुणवंतराव कायद्याचं शिक्षण करु लागले व इकडे सखुबाईस जुडवा अपत्य झाली व त्यातच सखुबाई दगावल्या.मोठा प्रतापराव सरदेसाई व पाच मिनीटांनी लहान असलेला संपतराव सरदेसाई यांचं पालनपोषण आवळाईच करु लागली.पण सखुबाईच्या पुरत्या कह्यात गेलेले आंदराव नंतर आठ दहा महिनेच जगलै वनंतर सखुबाई मागोमाग त्यांनीही गढीचा व जगाचा निरोप घेतला.गढीचा कुटुंबाचा सारा भार आवळाई पेलु लागली.सारा राबता तिनं माणसाकरवी व भाऊकरवी हाताळला व गुनवंतराव ही शिक्षण पुर्ण करुन जिल्हा न्यायाधीश झाले .आपली मुलं शोभतील इतके लहान असलेले आपले भाऊ त्यांनी शिक्षणाकरिता जिल्ह्यालाच नेले.तिकडे त्याचं शिक्षण झालं गुणवंतराव संसारात रमले व इकडे नव्वद एकराचा ठाव आवळाई सांभाळतच होती.पदवी शाखेपर्यंत प्रतापराव व संपतराव ज्या काॅलेजात शिकत होते त्याच काॅलेजात जिल्हा कोर्टात वकिल असलेल्या दमाजी इनामदाराची मुलगी अलकनंदाही पदवीच्या पहिल्या वर्षाला होती.उत्कृष्ठ खो खो पटु अथलिट असलेली अलकनंदा प्रतापरावाच्या मनात खलु लागली. पण अलकनंदाच्या मनात अबोल शांत पण तल्लख असलेले संपतराव घोळत होते.याची काहीच खबरबात संपतरावास नव्हती.प्रताप राव म्हणजे इरसाल कांडी,खुशालचेंडू.ते सारखे अलकनंदाच्या अवती भवती पिंगा घालु लागले.पण अलकनंदानं स्पष्ट पणे नकार देत प्रतापरावास उडवुन लावलं.तिकडे दमाजी पंतास हे जरी माहित नसलं तरी गुणवंतरावाकडं उठणं बसणं असल्यानं शांत तल्लक संपतराव आपल्या अलके करिता कसे राहतील यांची मनोमन चाचपणी करत होते.वतसा मनोदय त्यांनी गुणवंतरावाकडं बोलुन दाखवला.दमाजीचं प्रस्ताव व इकडे आवळाईचा ही भावाच्या लग्नाचा तगादा यांची एकच गाठ पडली व त्यांनी रुकार भरला.पण दमाजी इनामदार संपतरावाकरिता अलकनंदा म्हणतायेत हे समजल्यावर ते प्रतापरावा करिता सुचवू लागले.कारण जुडवा जरी असले तरी प्रतापराव मोठे असल्यानं आधी त्यांचच होणं सयुक्तिक होतं.व दुसरं म्हणजे आपला लहान भाऊ सोशिक आहे शिवाय प्रतापरावाचे प्रताप गुणवंतरावाच्या कानावर येतच होते पण लहानपणीच आईबापाच छत्र हरपलेली आपली पोरकी भावंड या विचारानं मायाळू गुणवंतराव तंबी देऊन प्रतापरावांच्या चुकावर पांघरुन घालत.इतकं मोठं ऐश्वर्य आपल्या पत व वयामुळं आपल्याला उपभोग घेता येत नाही मग भावांना तरी घेऊ द्यावा या विचारानं ते त्याकडं कधीकधी कानाडोळाही करत. दमाजी संपत करिताच स्थळ सांगतायेत त्यांनी पुन्हा विचार केला कि लग्न सोबत करु तुर्तास हे पक्क तर करु व लगेच प्रतापरावाकरिता ही मुली शोधू .असा विचार करत त्यांनी होकार दिला.दमाजी ला तर कृतकृत्य झाल्यासारखच वाटलं कारन जिल्हा न्यायाधीश गुणवंतरावाचा आब व इभ्रत वेगळीच होती.शिवाय नव्वद एकराचा काळा काळजागत ठाव.
प्रतापरावास हे समजतात त्याची अंगाची लाही लाही झाली पन त्यानं ्साही विचार केला कि मी नीही पण आपल्याच घरात येतेय हे ही काही कमी नाही.असं म्हणत मनातले विचार झटकत तो या लग्नानंतर लग्न न करताच पुढील शिक्षणाकरता दिल्लीला रवाना झाला.इकडे अलकनंदा जिल्ह्यापेक्षा निसर्गरम्य गावातच राहणं पसंद करु लागली संपतरावा_आवळा सहित गढीवरच राहु लागली.व संपतरावांनी ही शिक्षनाचा उपयोग सेतीतच करु असं ठरवत सारा राबता सांभाळु लागला.वयोमानामुळं आवळाीस हल्ली दिसण्याचंव ऐकु येण्याचं प्रमाण कमी हौऊ लागल्यानं गुनवंत रावांनी ही गावकुस सांभाळायलाही कुणी असावं या विचारानं संपतरावाचं शिक्षन थांबवत गढीचं नेत्वृत्व प्रदान केलं.
दिवसा मागुन दिवस जाऊ लागले अलकनंदा हे नाव गावाच्या पचनी पडलंच नाही पण निर्मोही व लाघवी स्वभावानं सारे लोक अलकनंदेस 'आक्कासाब'च म्हणु लागले.व आक्कासाब ने पण आपल्या सालस वागणुकीनं आवळाईची जागा घेतली व आवळाई ही सुखावली.आक्कासाहेबास पहिलं कन्या रत्न झालं.ऋतुजा नामकरण झालं असलं तरी लाडानं सारी गढी रितुच म्हणे.
प्रतापराव दिल्लीत गेले पण वहीणी झाली असली तरी दिलातली अलकनंदा काही केल्या निघेना व तिची जागा अनेक येऊनही कुणी घेईना .मग ते मदिरेला जवळ करु लागले.दिल्ली सोडली .गुणवंतरावाकडं आले.तिथही तेच मग सरळ त्यांनी गढीचा रस्ता पकडला व गडीतच राहु लागले.अलकनंदानं प्रतापरावांना केव्हाच दिर म्हणुन स्विकारुन घेतलं होतं व तिनं मागची भरलेली सारी पाटी पुसुन टाकली होती.निर्मळ मनानं ती प्रतापरावाशी वागु लागली.सारी वलवाडी आक्कासाब ला पाहताच विरगळुन पायाशी मायेनं लीन होई पन प्रताप रावांना का कुणास ठावुक आक्कासाब दिसेच ना , अलकनंदाच दिसे व पाहताच सारा भावनाचा व सुडाचा सागर खवळुन येई.
बऱ्याच वेळा नजरेतलं हे वादळ दिसलं की आक्कासाब त्या वादळास इभ्रतीच्या तेजानं खंबीरपणे पिटाळुन लावत.व प्रताप रावास खजील होऊन मेल्याहुन मेल्यासारखं होई.पण पुन्हा त्याच्यातला ऐश्वर्य संपन्न गढीतला उन्मत मदमस्त सरदेसाई जागृत होई व फुत्कारु लागे.
रितू आता आठ महिन्याची होत आलेली.तशात होळी हुताशिनी पौर्णिमा गडीत अवतरली व कुणाचं दहन करणार होती ते येणारी रात्रच ठरवणार होती.गढीच्या पुण्याई नं प्रतापरावाच्या कुविचाराचं दहन होवो हेच कदाचित आक्कासाबास मनोमन वाटत असावं.
वलवाडीत होळीचं दहन करुन गाव झोपायच्या तयारीस लागला.गणपा भिकुबा करिता होळीचं जेवण घेऊन नदीवर गेला असल्यानं गुरांना वैरणपाणी करायला त्याला उशीरच होणार होता.आवळाई खाली झोपली होती.संपतराव जेवण उरकुन रानात चक्कर मारण्याकरिता नेहमीप्रमाणे निघुन गेले.
आक्कासाब नं सर्व आवराआवर करुन वर गढीवर रितुला घेऊन गढीवर चांदण्या प्रकाशात अंथरुन घातलं व चंद्राकडे पाहत झोपणार तितक्यात वर येनाऱ्या जिन्याची कडी वाजली तशी कोण आलं म्हणुन तिनं जीना उतरत दरवाजा उघडला. प्रतापराव बेधुंद अवस्थेत उभे.अलकनंदानं काय हवं म्हणुन विचारलं व दरवाजा धरुनच सावधतेनं उभी राहिली."रितीला घेऊन जायचं खाली , माझ्याजवळच झोपवायची म्हणुन आलोय" हे ऐकताच आक्कासाब झरझर जिना चढुन गेली व रितुला झोपेतच उचलुन प्रतापरावाकडं दिलीव दरवाजा लावुन पुन्हा वर गढीवर गेली.
प्रतापरावांनी रितुला झोपेतच आवळाई कडं नेलं व देत "मोठाई रितुला मी खाली आणली होती ती झोपलीय आता तुज्याकडंच झोपव तिला." आवळाई ला काहीच दिसेना तरी आलेल्या रितुला कवेत घेऊन झोपु लागली.इकडे काही वेळ जाऊ दिल्यावर प्रतापरावांनी इकडचा तिकडचा कानोसा घेतला.गणपा अजुन आलाच नव्हता.प्रताप रावाच्या श्वासाची गती आता वाढु लागली.डोळ्यात आग व दिलात सुडेची व ज्वानीची मशाल धडाडु लागली.आता नजरेत फक्त काॅलेजातली खो खो च्या मैदानावर धावणारी व आपल्या मर्दानगीला वाटाण्याच्या अक्षता लावणारी अलकनंदाच दिसू लागली.त्या व मदिरेच्या धुंदीत प्रतापराव पुन्हा जिन्याच्या दरवाज्यापाशी येऊन दरवाजा ठोठावु लागले.नुकतीच झोपेनं आळसावलेली अलकनंदा जिना उतरत दरवाजा उघडला.तिला वाटलं संपतराव आले असतील किंवा रितु झोपत नसेल म्हणुन तिला परत घेऊन प्रताप राव आले असतील. तोच प्रतापराव समोर दिसले पण रितु नव्हती." काय राहिलं आता" तिनं जरा त्रासिक सुरातच विचारलं .काही क्षण जात नाही तोच अचानक दरवाजा लावला गेला. अलकनंदातली स्री जागृत झाली.व तिनं जरबेनं " दरवाजा का बंद केला? मुकाट्यानं दरवाजा उघडा व बऱ्या बोलानं खाली जा.पण तितक्यात डालीखाली एखादा भुजंग घुसावा व कोंबडीला त्यानं धरावं तसचं प्रतापरावाची घट्ट पकड अलकनंदेला जखडु लागली.डालीतल्या कोंबडीनं क्व्याॅक क्व्याॅक क्व्याॅकोक केला.भुजंगानं कोंबडीची सारी पिसं उसकाटली.कोंबडी बिचारी ओरडत राहिली.पण तिची ओरड कमी ऐकु येणाऱ्या आवळाईला ऐकुच गेली नाही व गढीचा मोठा विस्तार म्हणा वा आब मोठा म्हणा पण गावातल्याही कुणास ऐकु गेला नाही.भुजंग पिसे उसकाटत राहिला व लचके तोडत राहिला .कोंबडीनं जीव तोडुन प्रतिकार केला.पण आपला प्रतिकार व्यर्थ आहे हे लक्षात येताच.असहायपणे कोंबडी भुजंगाच्या पकडीत गेली.भुजंग आपलं काम करुन आल्या वाटेनं तृप्त होतं निघुन गेला. प्रतापराव यथेच्छ अंघोळु लागले.अलकनंदा उठली.तिच्या शरिरातलं त्राणच गेलं होतं पण तरीही गढीतनं मागचा दरवाजा उघडत ती गोठ्यात आली.वाहनतळात वाहनाकरिता कायम पेट्रोल डिझेलचे ड्रम भरलेले असतात तिला माहितच होत.जवळच पडलेल्या बादलीत पेट्रोल ओतलं व घेऊन गोठ्यात चाऱ्याजवळ येऊन अंगावर भडाभडा शिंपडुन काडी ओढली तोच भडका उडाला.सारा गोठा, चारा ,वाहनतळ कोंबडीसह पेटु लागला.त्या ही स्थितीत आगीनं व सुडाग्नीनं पेटलेली कोंबडी गढीतल्या भुजंगाकडं सरकु लागली.प्रतापराव अंघोळुन येताच त्याला ज्वाला दिसताच तो त्या दिशेन पळत येऊ लागला.कोंबडीची व भुजंगाची गाठ पक्क घरातुन गढीत येणाऱ्या जिन्याच्या दरवाज्यात पडली प्रतापरावाची सर्व नशा खर्रकन उतरली तोच आता कोंबडींनं भुजंगाचं मानगुट पकडलं.अलकनंदेचा सारा धडाडणारा देह प्रतापरावाला मानगुट पकडुन कवेत घेऊ लागला. प्रतापरावानं जिवाच्या आकांतानं दरवाजा लोटला तोच नदीवर गेलेला गणपा वैरण घालण्याकरिता गढीवर येतांना त्याला उजेड दिसताच तोही धावत पळत तिथेच आला.त्याला ही झटापट दिसली पण जळणारा देह कुणाचा हे न दिसता आकांतानं सुटु पाहणारे प्रताप राव मात्र दिसले .क्षणात इकडे तिकडे पाहताच त्याला पाईप दिसताच त्यानं तो उचलला व जळणाऱ्या देहास जोरानं ढकलत जिन्यावरुन खाली पाडलं.कारण कोंबडीचा प्रतिकारही जळाल्यानं कमीच होत होता .क्षणात प्रतापरावांनी विजेच्या वारा तोडुन शार्ट सर्किट घडवुन आणलं व दरवाज्यात अडकल्यानं पुरता भाजुन शिजलेला हात तुटुन पडला होता तो उचलुन गोठ्यात फेकला लगेच गणपास आग आग बोंबलावयास लावलं. गाव गोळा व्हायच्या आधीच गावात नुकताच आलेला लॅंडलाईन घुमवुन शार्टसर्किटची पहिलीच बातमी जिल्ह्याला गुणवंतरावांना गेली.गाव गोठा , पक्क घर वाहनतळ व वाहनाची आग विजवण्यात गुंग होतं तर गुणवंतराव आपल्या पोरक्या भावाला कसं वाचवायचं हे त्याच भावाला फोनवर समजावत होते.
त्या नुसार गुणवंतराव तालुक्याला आले असतील या आडाख्यानं तितक्या उशिरा दामाजी इनामदाराला फोन गेला. तितक्यात इकडे सर्व विझवुन गणपा नं गावात बोभाटा उठवला कि वायरी जळाल्यानं आग लागली .ती आग गोठ्यातल्या चाऱ्यात पसरली ती आग विझवण्याचा आक्काबानं वाघिणीगत प्रयत्न केला पण तितक्यात पेट्रोलच्या ड्रम ने पेट घेतला व त्यात आमची गढीची आक्कासाब वाघिण आम्हास सोडुन गेली.कारण दुसऱ्या दिवसाच्या जिल्हाभरातल्या दैनिकाची हिच हेड लाईन सांगुन गुणवंतराव सरदेसाई वलवाडी कडं निघाले होते.
तालुक्यावरनं कासेवाडीच्या काठावरनं भिकुबाच्या नावेवरुन गढीत आले तोवर संपतराव व प्रतापरावांनी आक्कासाबाचं पुर्ण जळुन कोळसा झालेलं मुटकुळं तयार करुन ठेवलं होतं . गुणवंतराव येताच इनामदाराची वाट न पाहताच मोजक्याच लोकास्नी घेेत जायतीच्या काठावरील विश्वतिर्थास मुटकुळं पोहोचलं गणपा व भिकुबाला ही थांबवलं होतं पण भिकुबाला तिथच नाव आणायला पिटाळलं .नाव जवळ येताच आधीच जळालेलं मुटकुळं पुन्हा आगीच्या स्वाधीन केलं.भिकुबाची नाव विश्वतिर्थाजवळ उभीच राहीली तितक्यात कासेवाडीच्या तिरावर इनामदार उतरले. प्रतापराव संपतराव यांना घेऊन नाव कासेवाडीच्या विपरीत दिशेनं तालुक्याकडं सरकु लागली.जेणेकरुन आक्कासाब जळेेपर्यंत इनामदार कासेवाडीच्या तिरावरच अडकुन पडतील. नाव निघताच तिथं कुणीच थांबलं नाही वलवाडीत येऊन झोपेचं सोंग घेतलं.
भिकुबा दुसऱ्या मार्गानं प्रतापरावांना व संपत रावाना तालुक्याला जाण्याकरिता सोडुन पुर्वेला सूर्यनारायणाची प्रभा फुटली तेव्हाच कासैवाडीच्या तिरावर नाव घेऊन गेला.सारी रात आक्कासाब एकटीच जळत राहिली.नात्यातले गावातच नव्हते.फक्त गुणवंतराव उशिरा आले.व माहेरची माणसं कासेवाडीच्या तिरावरच रात्रभर नावेची वाट पाहत थांबले.कारण भरलेलं जायतीचं पात्र त्यांना आक्कासाब पर्यंत येवुच देणार नव्हतं.

उर्वरीत भाग क्रमश:............
🙏🙏VSDV🙏🙏
No comments:
Post a Comment