टास्क... भय कथा
By Sanjay Kamble
******
टास्क... भय कथा Task -Marathi horror story By Sanjay Kamble |
रविवारची दुपार होऊन गेलेली, बाहेर पावसाची रिपरिप सुरु होतीच त्यात साप्ताहिक सुट्टी असल्याने तशी या हाॅस्पिटलमधे वर्दळ कमीच होती.. बाहेर बाकड्यावर रूग्णांचे नातेवाईक बसले होते..
बीप.... बीप... बीप....डाव्या बाजूला असणाऱ्या त्या मशिनमधून एकसारखा आवाज येत होता... बेडच्या बाजुलाच एक आॅक्सिजनच सिलिंडर उभं होतं , रुग्णालयाच्या एका I.C.U. रूम मधील बेडवर पडलेल्या त्या शरिरात अजुन दुगदुगी होती... तोंडावर लावलेल्या त्या पांढ-या पारदर्शी मास्कवर श्र्वासांमधुन येणार बष्प सांगत होतं की अजून जीवंत आहे... वडिल डाॅक्टरांशी बोलत होते तर आई शेजारी बसली होती...डोक्यावरून हात फिरवताना तीच्या डोळ्यातुन एकसारखे अश्रु ओघळत होते... इतक्यात आईच्या लक्षात आलं की तो शुद्धीवर येतोय...हो.. खरच तो शुद्धीवर येत होता... आईने अक्षरशः देवाला हातचं जोडले... इतक्यात बाजुच्या मशिनमधून येणारा तो बीप बीप बीप आवाज आता अधीक वेगाने येऊ लागला तशी आई घाबरली..
" डॉक्टर....?" आई जीवाच्या आकांताने ओरडल्या तसे
दरवाजा उघडून डॉक्टर आणी मागोमाग त्याचे बाबा ही आले..
डॉक्टरांनी आत येताच त्याच्या हाताची नाडी पाहीली आणि बेडच्या बाजुला असणा-या एका ट्रेमधून एक पाण्यासारखी दिसणा-या औषधाची बाटली घेऊन ती एका इंजक्शन मधे भरली आणि एका लोखंडी स्टॅंडवर अडकवलेल्या पारदर्शी सलाईनच्या बाॅटलमधे इंजेक्ट केली..
बीप.... बीप... बीप....डाव्या बाजूला असणाऱ्या त्या मशिनमधून एकसारखा आवाज येत होता... बेडच्या बाजुलाच एक आॅक्सिजनच सिलिंडर उभं होतं , रुग्णालयाच्या एका I.C.U. रूम मधील बेडवर पडलेल्या त्या शरिरात अजुन दुगदुगी होती... तोंडावर लावलेल्या त्या पांढ-या पारदर्शी मास्कवर श्र्वासांमधुन येणार बष्प सांगत होतं की अजून जीवंत आहे... वडिल डाॅक्टरांशी बोलत होते तर आई शेजारी बसली होती...डोक्यावरून हात फिरवताना तीच्या डोळ्यातुन एकसारखे अश्रु ओघळत होते... इतक्यात आईच्या लक्षात आलं की तो शुद्धीवर येतोय...हो.. खरच तो शुद्धीवर येत होता... आईने अक्षरशः देवाला हातचं जोडले... इतक्यात बाजुच्या मशिनमधून येणारा तो बीप बीप बीप आवाज आता अधीक वेगाने येऊ लागला तशी आई घाबरली..
" डॉक्टर....?" आई जीवाच्या आकांताने ओरडल्या तसे
दरवाजा उघडून डॉक्टर आणी मागोमाग त्याचे बाबा ही आले..
डॉक्टरांनी आत येताच त्याच्या हाताची नाडी पाहीली आणि बेडच्या बाजुला असणा-या एका ट्रेमधून एक पाण्यासारखी दिसणा-या औषधाची बाटली घेऊन ती एका इंजक्शन मधे भरली आणि एका लोखंडी स्टॅंडवर अडकवलेल्या पारदर्शी सलाईनच्या बाॅटलमधे इंजेक्ट केली..
आई काही बोलणार तोच डॉक्टर म्हणाले.
" घाबरू नका.. आता काळजी करण्यासारखं काही नाही.."
" घाबरू नका.. आता काळजी करण्यासारखं काही नाही.."
त्यांच बोलणं संपत न संपत तोच कोणीतरी मागुन दरवाजावर टकटक असा आवाज केला.. सर्वच मागे वळून पाहू लागले...
तसे डॉक्टर म्हणाले...
" हो या ना... पन पेशंटला त्रास होणार नाही याची काळजी घ्या.."
तसे डॉक्टर म्हणाले...
" हो या ना... पन पेशंटला त्रास होणार नाही याची काळजी घ्या.."
डॉक्टरांनी परवानगी आणी विनंती एकाच वेळी केली...
" Thank you doctor साहेब.." म्हणत खाकी वर्दी घातलेले एक पन्नाशीच्या आसपासचे पोलिस इन्स्पेक्टर आत आले, सोबत एक त्यांच्या पेक्षा जरा जाडच कांन्स्टेबल हातात पॅड आणी त्यावर लावलेले पांढरे कागद नीट करत संकेत कडे पाहू लागले...
"हम्म... बरं वाटतंय ना आता...?" त्यांनी संकेतची अवस्था पहातच विचारलं...
"हो... ठीक आहे.."
बाजुला अडकवलेली रिपोर्टची फाईल उचलून इन्स्पेक्टर साहेब एक एक रिपोर्ट पहात ते त्याची अवस्थाही पहात होते...
त्याला हृदयविकाराचा झटका येऊन गेलेला... म्हणजे रिपोर्ट मधे तरी असंच लिहिलं होतं... एक दिलखुलास, बोलका तरूण आणी हृदयविकाराचा झटका...? तसं अशक्यच पन रिपोर्ट तरी हेच दाखवत होते.. आणी आता तो शुद्धीवर आला होता... १२ तासांनी...
इन्स्पेक्टर साहेबांनी आपली मान मागे वळवली...
" आम्हाला काही प्रश्न विचारायचे आहेत, तेव्हा आपण थोडावेळ सर्व बाहेरच थांबा..."
त्यांच बोलणं ऐकताच आई बाबा त्याच्याकड पहात बाहेर जाऊ लागले ..
" आम्हाला काही प्रश्न विचारायचे आहेत, तेव्हा आपण थोडावेळ सर्व बाहेरच थांबा..."
त्यांच बोलणं ऐकताच आई बाबा त्याच्याकड पहात बाहेर जाऊ लागले ..
" 'संकेत'.... बरोबर ना...?" इन्स्पेक्टर साहेबांनी विचारलं
" होय साहेब..." तो बेडवर पडूनच त्यांच्या प्रश्र्नांची उत्तर देऊ लागला...
" आता नाव कसं खरं सांगितलस तसं सगळं खरखर नीट सांग... हे कसं झालं... कारण तुझ्या स्टेटमेंटवर त्या सगळ्या दोषींना शिक्षा होईल . नाहीतर आणखी एक बळी.. मग दुसरा आणी हे असंच सुरू राहिलं..."
इन्स्पेक्टर साहेबांनी त्याला थोडा धीर दिला...
"सांगतो साहेब... खरंतर 'ती' मला सांगत होती की आपन पोलिसात जाऊया.." संकेत शांतपणे सांगू लागला तसं इन्स्पेक्टर साहेबांनी काॅन्स्टेबल ला रिपोर्ट लिहिण्यासाठी खुणावले...
"ती , म्हणजे..?" इन्स्पेक्टर साहेबांनी आपल्या भुवया आकसुन विचारलं
" सांगतो साहेब.." बोलतच सारं काही त्याच्या नजरेसमोर उभ राहिल्यावर.
******
दोन दिवसांपूर्वी
" तुला एक सांगू...?" तीच्या मांडीवर डोक ठेऊन तो हिरव्यागार मखमली गवतावर विसावला होता. वा-याच्या मंद झोक्यासरशी तीच्या चेहऱ्यावर आलेले काळेभोर रेशमी केस बाजूला करून तीच देखणं रुप आपल्या डोळ्यात साठवत त्याच्या ओठांमधून बाहेर पडलेले ते शब्द ऐकताना ती आपल्या भुवया किंचित आकसल्या...
" सांग ना रे... कसला विचार करतोयस.?"
तो झटकन उठून बसला...
"आधी डोळे बंद कर..."
" हे काय आता...?" थोडी गोंधळली पन तीच्या चेहऱ्यावर गोड हास्य उमटलं...
"प्लिज... माझ्या साठी..." त्यानं पुन्हा काळजाच्या देठापासून विनंती केली, आणी तीनं त्याची विनंती मान्य केली..
" केले बंद..."
तीच्याकड पहात त्यान आपल्या खिशातून एक छोटासा लाल चमकदार रंगीत कागदाने सजवलेली एक छोटीशी चौकोनी पेटी, एक गिफ्ट बाहेर काढल... ते तीच्या समोर धरून म्हणाला..
" आता उघड डोळे..." त्याचे शब्द कानावर पडताच तीनं अलगद आपल्या पापण्यांची कवाडं उघडली तसा त्यान ती चौकोनी पेटी उघडली... आणी ती पहातच राहिली... तीच्या काळजातला आनंद तीच्या डोळ्यात दाटून आनंदआश्रुंच्या रूपान ओघळू लागला..
त्यानं पेटीतली स्वताच पहिल अक्षर केरलेली ती अंगठी बाहेर काढली आणि तीचा नाजूक हात हळुवारपणे आपल्या हातात घेऊन तीच्या बोटात सजवली... तीचा अजुनही या घडणा-या गोष्टीवर विश्वास बसत नव्हता... जणू ती एक सुरेख स्वप्नच पहात होती...
" ए... रडायला काय झालं..." त्यानं तीच्या गालावरून ओघळणारे अश्रू बोटांनी टिपले...
"काही नाही... पन इतके पैसे खर्च करण्याची काही गरज होती का..." बोलतच ती त्याच्या कुशीत शिरली
" तु दिलेल्या लाॅकेट पेक्षा मी दिलेली अंगठी स्वस्तच आहे ग.."
मेडिकल कॉलेजच्या पहिल्या वर्षात दोघेही शिकत होते, तो तसा साधाच होता, अभ्यासात बरा पन खेळात एक नंबर अंगाने मध्यमच , किंचित सावळा , काळेभोर केस आणखी चेहरा नेहमी प्रसन्न... कधीच मरगळ नसायची.. आणि ती , गव्हाळ रंग , गोल चेहरा , कानात लांब असे झुमके जे तीच्या अंगावरच्या पंजाबी ड्रेसला नेहमी मॅचिंग असायचे.. घरातून निघताना बांधलेले केस काॅलेजला येईपर्यंत मोकळे व्हायचे कारण त्याला तीचे मोकळे केस खूप आवडायचे... काॅलेजमधे कोणी तीच रॅगिंग करत नव्हत...
कारण तीचा टास्कपन हाच पुर्ण करायचा.. ती नेहमी याच्यावर रागवायची...
'तु का त्यांच रॅगिंग सहन करतोस.'
तेव्हा तो काहीच न बोलता किंचित हसायचा...
कारण तीचा टास्कपन हाच पुर्ण करायचा.. ती नेहमी याच्यावर रागवायची...
'तु का त्यांच रॅगिंग सहन करतोस.'
तेव्हा तो काहीच न बोलता किंचित हसायचा...
दोघेही त्या धुंद एकांतातून रस्त्याकडेला उभ्या बाईक दिशेने हातांमध्ये हात गुंफून चालू लागले
'' उद्या शनिवार ना...? मी उद्या गावी जातेय. सोमवारी येईन.."
" इतक दिवस...? बापरे,... पन का...?"
"इतके काय...? शनिवार आणि रविवार.. अरे मावसभावाचा साखरपुडा आहे.. मी ताई आणी आई-बाबा चौघेही जातोय...."
" लाल डब्याने..?"
" नाही रे...कार आसताना एस टी ने कोण जाईल...? कार ने..."
" सासरेबुवांना सांग. कार नीट चालवायला.. नाही म्हणजे परवा धडकली होती ना कार ?"
" ए , गप हं... तेव्हा चुक बाबांची नव्हती... ते जाऊदे. जर उद्या त्या मुलांनी तुला त्रास दिलाय हे जर मला समजल तर मी तुझ काही ऐकणार नाही.. मी सरळ त्यांची पोलिसात कंप्लेंट करणार.."
बाईक वर बसतच ती म्हणाली तसं किंचीत हसुन त्यान आपली बाईक सुरु केली... तीला कोण सांगणार त्यान पुढचा टास्क स्विकारला होता...
*******
शनिवार रात्रीचे ११:३० झालेले... तो आपल्या रूममध्ये विचार करत बसलेला... कशातच त्याच मन लागत नव्हत..आज कुणाचाही फोन उचलला नव्हता की मेसेज पाहीला नव्हता... आज पुन्हा त्याला एक टास्क पूर्ण करायचा होता.. काही दिवसांपूर्वीच ठरलेलं... वेळ पुढे सरकत होती... बाहेर धो धो कोसळणाऱ्या पावसाच्या सरी तो आपल्या रूमच्या खिडकीतून पाहून आणखी अस्वस्थ व्हायचा... क्षणात उठला अंगावर रेनकोट चढवला आणि घरच्यांना न कळताच आपली बाईक घेऊन बाहेर पडला...
रात्रीचा एक वाजायला आलेला... ढगाळ वातावरणामुळे रात्र आणखी गडद्द आणी भयाण वाटत होती, पावसाचा तडाखा सुरूच होता... आपली बाईक रस्त्याकडेला लाऊन 'तो' चालत एका जुनाट इमारतीच्या मागच्या बाजूला आला...
" आयला आम्हाला वाटलं की तु विसरला असशील, पुन्हा आठवण न करता जागेवर हजर...? गुड..." मंगेशने बोलतच सिगारेट पेटवली
" तुम्हाला एकदा शब्द दिलाय ना मग येणारच..." संकेतने अगदी गंभीर पने उत्तर दिलं
" तुला एक शेवटचा 'टास्क' करायचा आहे... हा पुर्ण केलास तर पुन्हा तुझ रॅगिंग कोणीच करणार नाही.."
मंगेशच्या तोंडातली सिगरेट काढून आपल्या तोंडात घेत एक लांब झुरका ओढतच विकी बोलू लागला...
" Right..." अनिल बोलतच त्याच्या हातातून सिगारेट घेतली...
रात्रीच्या काळोखात एका इमारतीच्या मागच्या बाजूला काही तरुणांच टोळकं उभं होतं... दुरून त्यांच्या तोंडातल्या सिगारेटच्या निखा-याचा लालसर प्रकाश तेवढाच काय तो दिसत होता...
" जर असं असेल तर मी तयार आहे...." त्या घोळक्यात मधोमध उभा संकेत आव्हान पत्करायला तयार झाला.
" आज अमावस्या आहे, रात्रीचा ठीक दिड वाजतोय... आम्ही इथंच थांबणार... आपल्या या काळ्या दगडी भिंतीच्या पलिकडे पोस्टमाॅर्टम रूम मध्ये काही लोकांच्या बाॅडीच पोस्टमाॅर्टम झालय, आज सकाळीच कार अॅक्सिडेंट मधे चार जण ठार झालेत... आम्हाला त्याचे फोटो व्हाॅट्सप करायचे..." मंगेशने टास्क समजावून सांगितला...
आणी ते ऐकून संकेत क्षणभर स्तब्ध झाला... ते जिथ उभे होते त्या जागेबद्दल बरेच भयाण अनुभव तिथल्या डाॅक्टरानाही आलेले... सहसा इकडं पोस्टमाॅर्टमला कोणाला आणत नसतं पन जर सरकारी हाॅस्पिटल मधे संबंधित काम करणारी लोकं कमी असतील तर नाईलाजाने मृतांना या हाॅस्पिटलला आणलं जायच
" फाटली ना... पन आत तुझ्या साठी एक सरप्राइज आहे...... ." तोंडातल्या धुराची गोल रिंग हवेत सोडत निलेश बोलून गेला...
" सरप्राइज...?" त्याला थोड आश्र्चर्य वाटलं...
" हो सरप्राइज..."
" ठीक आहे.... पन आजपासून तीच्या आणी माझ्या वाटेला जायचं नाही... हा शब्द तुम्ही पन पाळा.."
संकेतन गंभीर आवाजात बोलत सर्वांवर एक नजर टाकली...आणी झपाझप पावलं टाकत हाॅस्पिटलच्या दिशेने चालू लागला...
" आम्ही आजवर स्वताच्या बापाला दिलेला शब्द पाळला नाही आणी हा बोलतोय..." म्हणतच सर्व एकमेकांन टाळ्या देऊ लागले...
पावसाची रिपरिप सुरूच होती... आत जाण्याआधी पायरीवर उभ राहूनच एक नजर मागे टाकली तर ते भिंतीच्या आडोशाला उभे त्याला पहात होते... तो आत शिरला आणि रिकम्या व्हरांड्यातुन चालु लागला.... दरवाजाच्या बाजूला लाकडी खुर्चीत एक पांढरा युनिफॉर्म घातलेली वयस्कर व्यक्ती टेबलवर डोकं ठेवून आराम करत होता... त्याच्याकड पहातच दरवाजा ढकलून संकेत आत गेला... त्या रिकाम्या खोलीत फक्त पोस्टमार्टम साठी लागणारे कपडे आणि प्लास्टिकचे कागद, काही रॅक ज्यामधे निरनिराळ्या रंगांच्या फाईली ठेवलेल्या.. दोन लोखंडी कपाटं जी लाॅक असावीत... आणी समोर आणखी एक लोखंडी दरवाजा.. त्या दरवाजाची कडी काढताना कुईई कुईईई असा आवाज येऊ लागला तसा संकेत सावध झाला... मागे दरवाकड पहात त्यान तो लोखंडी दरवाजा उघडला तसा डोक्यावरचे केस नी केस ताठ करणारा वास त्याच्या नाकात शिरला... तो वास त्याच्या साठी नवीन नसला तरी कोणाचंही डोकं सुन्न करेल असाच तो वास होता... लाईटच बटन लाऊन चालणार नव्हतं.. कारण आज पोस्टमार्टम करणारा एकही डॉक्टर आला नव्हता आणि जर लाईट लावली आणि कोणी पाहील तर...?
तो आतील भाग पहात क्षणभर तसाच उभा राहिला... प्रत्येक क्षणाला त्याला कसलासा भास जाणवत होता... जसं कोणी तरी त्याच्या आजूबाजूला आहे.. बाहेर पावसानं अक्षरशः कहर केला होता त्यात कुठून तरी गावठी कुत्र्यांच्या केकाटण्याचा आवाज येत होता ... तसा तो धाडशी होता पन ही परिस्थिती आणि वातावरण कोणाचाही हार्टफेल करण्यासाठी पुरेस होतं... आवंढा गिळत तो पुढ चालु लागला... आत लांब भयान दिसणा-या त्या खोलीत समोरच एक सात ते आठ फूट लांब एक टेबल होता, त्याच्या ठीक वर एक पांढरी ट्युब लटकत होती, टेबलच्या पुढे भिंतीला लागून काही जुने रंग उडालेली बंद कपाट आणि रॅक दिसत होते , त्याच भितीवर दहा फुट उंचीवर एक रिकामी खिडकी होती , त्या खिडकी मधूनच बाहेरच्या एखाद्या खांबावरील दिव्यांचा प्रकाश आत येत होता... तो तसाच चालत पुढं येऊ निघाला... त्या पोस्टमार्टम टेबलावरून हात फिरवत आजुबाजुला पाहत होता .. कितीतरी माणसांच्या शरिराची चिरफाड या टेबलवर झाली होती... डाव्या बाजूला काही बेवारस मृतदेह पांढ-या कापडात गुंडाळून खाली जमिनीवरच ठेवले होते .. खिशातून मोबाईल बाहेर काढत होताच की कसल्याशा आवाजान त्याच्या काळजाचा ठोकाच चुकला... झटकन त्यान त्या आवाजाच्या दिशेन पाहील .. एक घुबड त्या खिडकीच्या लोखंडी सळीवर बसल होत... आणी आपली भेदक नजर त्याच्यावरच रोखली होती.. त्याच्याकड दुर्लक्ष करत तो आपल्या कामाला लागला... थोड्या अंतरावरच उजव्या बाजूला लोखंडी स्ट्रेचरवर काही मृतदेह पांढ-या कपड्याने झाकून ठेवले होते.. याच प्रेतांचे फोटो त्यांना पाठवायचे होते... त्यान आपल्या हातातील मोबाईलचा टाॅर्च सुरू केला आणी त्या प्रेतांजवळ पोहोचला... पन चेह-यावरच ते कापड बाजुला करायचं धाडस होईना... त्यानं पुन्हा आजुबाजुला पाहिले आणि त्याची नजर वर त्या खिडकीत गेली... ते घुबड आपल्या कालकिल्या डोळ्यांनी त्यालाच पहात होत... त्यानं आपला धीर एकवटून दीर्घ श्वास घेत मोबाईल चा कैमेरा आॅन केला आणि त्या प्रेतावर झाकलेल कापड हळुवारपणे बाजुला केल आणि....
दुसऱ्याच क्षणी कोणीतरी शरीरातुन प्राण ओरबाडून काढावा असा तो शहारला... डोळे विस्फारून तो समोरच ते प्रेत पहात होता... काय करावं हे त्याला सुचेना.. हातापायातली शक्तिच संपली.. दंन्न दंन्न दंन्न असे आपल्याच काळजाचे ठोके तो स्वता: ऐकू शकत होता, अंगातली सारी शक्ती एकवटून ओरडाव, किंचाळाव वाटत होतं पन ती ही ताकत आता शरीरात राहीली नव्हती... डोळे मोठे करून त्यान पटपट सर्व मृतदेहावरचे ते कापड काढून टाकले .. त्याच्या मेंदूत लाल मुंग्याच जणु वारूळच उठलं होतं.. छिन्न विछिन्न अवस्थेतील ते चार मृतदेह त्याच्या समोर होते...
आणी ते मृतदेह दुसऱ्या कोणाचे नव्हते तर......
कदाचित हेच ते सरप्राइज होत....
विचार करतच तो खाली कोसळला आणि जागेवरच बेशुद्ध झाला...
आणी ते मृतदेह दुसऱ्या कोणाचे नव्हते तर......
कदाचित हेच ते सरप्राइज होत....
विचार करतच तो खाली कोसळला आणि जागेवरच बेशुद्ध झाला...
*******
त्यान घडलेली सर्व हकीकत सांगितली तसे इन्स्पेक्टर साहेबांनी एक कटाक्ष काॅन्स्टेबलकड टाकला... तो ही बुचकळ्यात पडला होता...
" हम्म... ठीक आहे......काळजी घे..." एवढं बोलून साहेब बाहेर पडले...
" हम्म... ठीक आहे......काळजी घे..." एवढं बोलून साहेब बाहेर पडले...
काॅन्स्टेबल स्वता: लिहिलेला रिपोर्ट पहात...
" साहेब याच काय करायचं...?"
" कायदा भुतं पिशाच्च यांच्यावर विश्वास ठेवतो...?
" नाही साहेब..."
" मग फाडून टाका.."
इकडे संकेतच्या अंगावर अजुनही सरसरून काटा येत होता.... तोच मोबाईल च्या रिंगने त्याच्या काळजाचा ठोकाच चुकला ...
नंबर पहाताच त्याच्या काळजाची धडधड वाढली... त्यानं झटकन फोन कानाला लावला...
" हैलो..."
" हैलो..."
" अरे पेपर मधली बातमी वाचलीस का...? कार अॅक्सिडेंट मधे ते चौघेही ठार झाले... So sad ना.... But आता तुझ रॅगिंग कोणीच करणार नाही... बरं तु कुठ आहेस...? मी अजून गावी आहे... उद्या सोमवार आहे... मी येतेय काॅलेजवर .. मग भेटू.. काळजी घे.. love you..''
" Love you RaSiKa ... Miss u..''
त्यानं फोन ठेवला आणि क्षणभर डोळे मिटून घेतले.. तीला सांगितल तरी ती ही आपल्या बोलण्यावर विश्वास ठेवणार नाही हे संकेतला माहीत होतं... तीच काय कोणीच विश्वास ठेवणार नाही की काल रात्री ज्यांनी पोस्टमार्टम रुममध्ये मृतदेहाचे फोटो काढायला पाठवलं होतं ती त्यांचीच प्रेत होती.. आज खुप शांत वाटत होत... बाजुच्या मशीनमधून तो बीप बीप बीप चा तेवढाच आवाज त्या शांततेत घुमत होता... तोच कोणीतरी त्याच्या कानात पुटपुटल...
" आता पुढचा टास्क..."
समाप्त.....
No comments:
Post a Comment