🙏🌹 भाग :-दुसरा 🌹🙏
' वलवाडीत सरदेसायाच्या गढीत आग ,आक्कासाब वाघीण आग विजवतांना निमाल्या' , दुसऱ्या दिवसाच्या जिल्हाभरातल्या अग्रणी दैनिकात ही बातमी झळकली.दमाजी इनामदार सकाळीच गढीवर पोहोचले संताप व आक्रोश करतच आल्या पावली परतले.त्यांनी न्यायदेवतेकडे जाण्याचं ठरवलं.पण दहा-बारा दिवसातच जिल्ह्यातील बड्या बड्या हस्ती मध्ये पडल्या व दमाजी इनामदारास समजावुन मधस्थी करण्यात आली.दमाजींनी ही दुख:चा प्याला तसाच आत दाबत आपली लहान मुलगी महानंदेचा विवाह संपतरावाशी नात रितुसाठी लावण्याचं ठरवलं.महिन्यात विवाह उरकला व रितु सहित महानंदा व संपतराव बॅंकाक ला गुणवंतरावाची हाॅटेल बिझमेंटची साखळी सांभाळण्याकरिता रवाना झाले.
गढी मात्र त्या दिवसापासुन बंदच झाली.आवळाई व प्रतापराव गुणवंतरावाकडेच जिल्ह्याला राहू लागले.प्रतापराव आठ चार दिवसात दिवसा येत सर्व राबता व्यवस्थित चालु आहे याची खातर करत व रातीचं पुन्हा कासेवाडीकडुन जिल्ह्याला रवाना होत.
दिवसा मागुन दिवस जात होते नि एक वर्षाच्या आत त्याच गढीत उमाकांत वायकोळे व रचना बाई आमले यांना रहावयास प्रतापरावांनी आणलं तोच गणपा सोबत हा प्रसंग गुदरला.
भिकुबा नं रात्र या विचारातच तळमळत काढली.भिकुबाला आठवायला लागलं त्या दिसापासुन जायतीनं त्यांना काहीच कमी पडु दिलं नव्हतं .गणपा हा लहान भाऊ गढीवर राबे तर भिकुबाकडं नाव होती या नावेचा धंदा बारमाही चाले.कारण कितीही दुक्काळ पडला तरी वलवाडीच्या विस मैलापर्यंतचे जायतीचे पात्र कधीच आटत नसे .कारण वलवाडीच्या पश्चिमेला सात मैलावर पश्चिमवाहिनी जायतीच्या पात्रात खडकाचा उत्तर दक्षिण दिसेचा नैसर्गिक बांध होता त्यामुळे त्यापासुन तर विस मैलापर्यंत जायतीत कायम आठ दहा पुरुष खोलीचं पाणी राही.व काठावरील पाचसहा गावाचा सर्व व्यवहार हा पलिकडील तालुक्याशी व जिल्ह्याशी चाले. म्हणुन कुठेही जायचं तरी भिकुबाच्या नावेवरनंच पलिकडे कासेवाडीला जावे लागे.सकाळपासुन तर रात्री पर्यंत गाडीच्या वेळा सांभाळत भिकुबा नावेच्या चार पाच खेपा करी.शिवाय हिवाळ्यात गावातील दोन तीन मुलांना हाताशी पकडुन जाळं टाकुन मासेही पकडी व ते कासेवाडीहून तालुक्याला विकायला पाठवी.उन्हाळ्यात सारं पात्र भरलेलं पण वलवाडीच्या काठानं जायती माय आक्रसु लागे मग त्या ठिकाणी गावातील इतर लोकाप्रमाणेच भिकुबा ही टांगरं , टरबुजं ,काकड्या व भाजीपाला उतरवे.फेब्रुवारी ते पावसाळा होईपर्यंत सारा जायती काठ माणसानं व समृद्धीनं नांदत असे.या सर्व कष्टानं भिकुबास उसंत मिळत नसे .तो गावात बारा महिन्यातुन लग्न भंडारा वा काही कार्यक्रम असला तरच जाई .मौतीला देखील सरळ काठावरिल विश्वतिर्थावरच जाई.तेही नावेची गर्दी व वेळा सांभाळत. अशा या भिकुबाला आज भविष्यात आक्कासाब च्या रुपानं वेगळ्याच सकंटाला सामोरं जावं लागणार हि सुचना मिळाली नी तसच गढीत राहायला गेलेले वायकोळेे इंजिनियर व आमले मास्तरीन बाई यांच्या भोवती ही हेच संकट जिभल्या चाटीत घिरट्या घालणार होतं.
तिकडं गढीवर पोहोचल्यावर रचना बाईस ही त्या रात्री झोप लागलीच नाही.त्यांना सारखं खटकु लागलं कि गणपा सोबत काही तरी वाईट घडलं पण भिकुबानं ते आपल्यास सांगण्याचं टाळलं.काय घडलं असावं.या विचारातच इतर विचारही डोक्यात गर्दी करु लागले व त्या झोपेकरिता तळमळु लागल्या.तितक्यात उमाकांत ने झोपेस कुस बदलवली व त्याचा हात रचना बाईवर पडला.दिव्याच्या मंद प्रकाशात उमाकांतचा चेहरा त्या पाहु लागल्या.उमाकांत मात्र निद्रादेवीच्या आहारी लीन झाले होते.रचना बाईस त्या ही स्थितीत एकदम हसु आलं कि ह्याच माणसास आपण एक दिवस चळफडत मनातल्या मनात शिव्याची लाखोली वाहिली होती व आज तोच आपला गळ्यातला ताईत झालाय.नियती आपली चक्रे किती भराभर फिरवतेय व आपण मात्र तिच्या हातावरिल घड्याळातले काटे बनुन फिरत राहतो.
या गावात येऊन आपणास मोजुन दहा अकरा महिनेही झाले नसतील या कालावधीत आपल्या जिवनात किती घटना घडल्या.या गावानं आपल्याला ओंजळी भरुन भरुन भरपुर दान दिलयं.या भाव विचारात ती मागं मागं सरकु लागली.
वैशाखात आपण वलवाडीतीलच खालवाडीत शिक्षीका म्हणुन बदलुन आलोत.तिनही स्री शिक्षीका.मुख्याध्यापक बाई वयानं थोर पण कामाच्या बाबतीत जेमतेम .मग सारा भार उचलला.शाळेच मीटर विजबील थकल्यानं सात आठ वर्षापासुन पि.डी.झालेल.व जिल्हा परिषदेकडुन मुलांकरिता आलेला दुरदर्शन संच (T.V.)तसाच धुळ खात पडलेला.टिव्ही सुरु करायचा म्हणजे विज हवी नी त्या करिता बील पेड करुन मीटर हवं.मग आपल्या चकरा सुरु झाल्या वलवाडीतील सब-स्टेशनला.त्या ठिकाणी वायरमन आॅपरेटर उडवाउडवी करु लागले.तीन चार फेऱ्या मारल्यावर साहजिकच संताप.कारण आपली शाळा खालवाडीत तर सबस्टेशन वलवाडीत. मध्ये मुर नाला.पोरांना एका बाईकडं सोपवुन मुख्याध्यापक बाईसोबत नाला चढुन पायी जायचं व तिथं उडवाउडवी चं उत्तर.त्या दिवशी आपण ठरवुनच गेलो कि आज दणकावयाचच.नेमकं दोन तीन दिवसापासुन साईटवरच्या महत्वाच्या कामाच्या व्यापातुन मोकळे झालेले इंजिनियर उमाकांत पहिल्यांदाच समोर ."कुठाय तुमचं साहेब?जर का साधं साधं काम होत नसतील तर तसं सांगा.आम्हालाही कळतं कि खालच्या पातळीवर न होणारी कामं वरुन कशी करावीत" आपण तोऱ्यातच फटकावलं.कामाचा व्याप व जागरणानं आधीच तापलेले इजिनियर उमाकांत नी ही सरळ आपणास " मग जा कि ,तुम्हाला कुणी अडवलं व सरळ वरतीच जायचं ना मग !इथं कशाला आलात आम्हाला सुनवायला.समोर गावातीलच दोन तीन माणसं बसलेली.आपणास नंतर कळलं की त्यातच एक प्रतापराव.एक जण हळुच बोलला मॅडम कोण आपण ?नी काम काय ते तर सांगा?इंजिनियर तसे नाहीत.तुमचा काहीतरी गैरसमज झालाय.
"अहो तुमचे सल्ले तुमच्या कडेच ठेवा.फक्त काम होणार नसेल तर तसं लिहुन द्या मग काय करायचं व कुठं जायचं ते पाहू आम्ही."अधिकच फणकाऱ्यात आपण उद्गारलो.तीन चार चकरा मारुन साधं मीटर कधीचं पेंडिंग ?बील किती?ही माहिती मिळत नसेल तर संतापायचं नाही तर काय करायचं.
"उमाकांतही अधिकच उखडत" तुम्हाला वाटेल ते करा मी माहिती ही देत नाही व लिहुनही देत नाही .जा कुठं जायचं तर.सन्मानानं निघा." या थंड उत्तरानं तर आपला सर्व फार्म उतरला .मनातल्या मनात आपल्याच वयाचा असणारा हा तरुण सुंदर अाहे,साहेब आहे हे कळुनही देता येतील तितक्या शिव्या वाहिल्या.आता आपण बोलुन तर गेलो पण पुढे काय? निघावं कि थांबावं? तेच कळेना.तितक्यात समोरचे प्रतापरावच मुख्याध्यापक बाईस " मॅडम सविस्तर सांगा तुमचं काम काय होतं ते?संताप करुन काहीच मिळणार नाही". बयाजवार ऐकल्यावर मग जा तुम्ही आता मॅडमांना शांत करा,या वयात इतका त्रागा बरं नव्हं.उद्या तुमचं सर्व काम होऊन जाईल.असं बोलत प्रतापराव आपल्याकडं वेगळ्याच नजरेनं पाहतोय हे मात्र आपण हेरलं.
दुसऱ्या दिवशी मात्र सबस्टेशन मधुन दोन लोकं येऊन मीटर ठोकुन तीन हजार बीलाची पावती देऊन चालले गेले.इंजिनियर इतक्या लवकर काम करतील असं वाटलच नव्हतं. मग त्यानंतर आपणास कळलं कि कि आपल्यागतच साहेब ही नविनच आलेत व चांगले आहेत .पण आपण मात्र ते थंड उत्तर विसरलोच नव्हतो.
आठ दिवसानंतर पोष्टात लातुरातुन रचनाबाईस तार आली लगेच दुसऱ्या दिवसी अर्जंट घरी बोलवलं होतं वडिलांनी.त्याचवेळी आॅफिसच्या लॅंडलाईनवर वायकोळे साहेबांनाही घरुन फोन आला व त्यांनाही लगेच घरी बोलवलं होतं .दुसऱ्या दिवशी कासेवाडीहुन सातची सकाळची गाडी पकडण्याकरिता जायती काठी भिकुबाच्या नावेवर रचनाबाई चढल्या तितक्यात मागाहून घाईघाईनं वायकोळेसाहेब ही चढले. नजरा नजर होताच रचनाबाईच्या कपाळावर आठ्याचं जाळं पसरलं.तालुक्याहुन जिल्ह्याच्या गाडीवर ही दोन्ही एकाच गाडीत चढले.आताही रचनाबाईच्या कपाळावर आठ्याच होत्या पण मधुन मधुन तारुण्यसुलभ वय म्हणा किंवा मनात कुठं तरी विरुद्धलिंगी आकर्षण म्हणा दोघांची भिरभिरती नजर एकमेकांना शोधत होती व नजरा नजर होताच पुन्हा दोघं आपला इगो जागवत आठ्या आणत होते.जिल्ह्यावरुन रेल्वे पकडुन रचनाबाई लातुरला जाणार होत्या त्या रेल्वेस्टेशन वर आल्या .उगाच त्यांना वाटलं कि पुन्हा वायकोळे साहेब सोबत आले तर.....नी योगायोग तेही त्याच वेळी लातुरच तिकीट घेत प्लॅटफार्मवर आले.आता दोघांनाही एकदम विचारावं असच वाटलं.पण तितक्यात गाडी आली व दोघेही बसले.आपला याच मानसानं पाणउतारा केलाय म्हणुन का बोलु मी असं बाईस वाटत होतं तर आपल्या कामात पहिल्यांदाच चॅलेंज करणारी ही बया , म्हणुन का बोलाव असं वायकोळेस वाटत होतं म्हणुन मनोमन इच्छा असुनही आपण कुठं चाललात असं कुणीच विचारलं नाही.लातुरातुन मात्र दोघं वेगवेगळ्या गाडीनं आपापल्या गावी निघुन गेले.पण दोघांना चुकचुक वाटली कि एकाच जिल्ह्याचे दोघं इतक्या दुर एकाच गावात ड्युटी करत होतो पण याची कल्पनाच नव्हती निदान गाव कोणतं हे विचारायला काय हरकत होती.
दुसऱ्या दिवशी रचनाबाईस लग्नाकरिता मुलगा पहायला येणार होता, हे बाईस घरी गेल्यावर कळलं. दुपारी मुलगा पहावयास आला .मुलाला बाईनं पाहिलं व बाईस मुलानं पाहिलं नी दोघही बसल्या जागी फुटभर उडत "अय्या तुम्ही!" काय तु! एकदम दोघही चकित. वायकोळे साहेबच रचनाबाईस पहावयास आले होते .घरच्यांनाही माहित नव्हतं कि दोघं एकाच गावात ड्युटी करत आहेत असं. फक्त मुलगा रचनाच्या जिल्ह्यातच इंंजिनियर आहे व मुलगी उमाकांतच्या जिल्ह्यातच मास्तरीण आहे इतकच माहित होतं.पण आता वातावरण एकदम उल्हसित झालं व दोघांच्या मनातील इगोची जागा आता तारुण्य सुलभ लज्जेनं घेतली.कोपऱ्यात उमाकांतनं बाईस विचारलं " मग काय ठरवलं आमले मॅडम?" त्यावर हसत " माझा बदला घेण्यासाठी मी लग्न करण्याचं ठरवलंय". नी दोघं खळाळुन हसली.
परततांना मात्र दोघांनी एकमेकाजवळ बसत कधी एकमेकाच्या कुशीत शिरतच प्रवास केला. नंतर महिन्याच्या आतच लग्न झालं व रचना बाई सबस्टेशनच्या क्वार्टरमध्येच रहायला आल्या .तेव्हाच वलवाडी ला दोघाचं लग्न झाल्याचं कळालं व या गोष्टीमुळं मात्र प्रतापरावाची तळपायाची आग मस्तकात गेली.पण त्यांनी तसं न दर्शवता उलट वायकोळे साहेबाशी दोस्ती अधिकच वाढवली.
उमाकांत वायकोळे व रचना बाईचा गुलाबी रातीचा प्रवास सुरु झाला. पावसाळा लागला तसं जायतीचं पात्र फुगु लागलं. ओढे नाले वघळी खळाळुन वाहु लागले. धरणी नं हिरवाई नेसली.इकडे रचना बाईसही पावसाळा मानवला.श्रावण संपायला आला तसं सारं रान समृद्धीनं भरुन आलं. एके रात्री रचना बाईनं उमाकांत कडं पावसाळी रात्रीत बाहेर फिरुयात असा आग्रह धरला.मात्र उमाकांतने भरपुर नकार देऊनही बाई मानेनाच .शेवटी हट्टापुढं उमाकांतला माघार घ्यावी लागली व त्यांनी पहाटे फिरण्याचं कबुल केलं.
पहाटे तीनलाच रचना नं उमाकांतला उठवलं व गावाच्या उत्तरेला डोंगराच्या बाजुनं निघाले.आकाशात भरलेल्या ढगांची गर्दी पाऊस ओतत होते.डोंगरातुन येणाऱ्या वाऱ्यानं सारं रान सांदळलं होतं.पुर्वेला वरती घडीचा चंद्र फिकट रजत आभा पावसात घुसळवुन फेकत होता.शेतातील केळी ऊस मका कापुस पाऊस पिऊन तर्र झाली होती.केळीच्या बागेत कमळ टर्रररकन फाटताच आवाजानं रचनानं उमाकांतचा हात अधिक घट्ट पकडला.मक्याची कणसं खाण्याच्या इराद्यानं आलेल्या कोल्ह्यास यांची चाहुल लागताच सळसळ आवाज करत त्यानं धूम ठोकली.तिकडे शुक्राची चांदणी पुर्वेला पाऊस पाहण्याकरिता कि काय हळुच अवतरली. दुर डोंगराच्या दिशेन मोराचा केका ऐकु येत होता .तर घरट्यातली उब पिऊन पक्ष्यांची चुळबुळ सुरु झाली.रान पावसानं तृप्त तर मधाळ गंधाळ धुंद सहवासानं रचना व उमाकांत उल्हसित.उगवतीला आता केशर किनार फुटू पाहत होती.तसं परतीचा मार्ग सुरु झाला.पुर्ण चिंब रानासारखी भिजलेली रचना अधिकच थडथड करत उमाकांत ला बिलगू पाहत होती व आता सबस्टेशन केव्हा सापडतं याची हूरहूर लागली.पक्ष्याचा कलरव सुरु झाला . आज रचनास स्वर्गसुखाची प्राप्ती झाल्यासारखंत वाटत होतं.
अशाच हिवाळ्यातील व उन्हाळ्यातील चांदण्याराती ही ते जागवू लागले. कधी कधी रातीला भिकुबाची नाव भाड्यानं घेत जायतीच्या पात्रात व स्वप्नात तरळत फिरत तर कधी जायतीच्या काठावरिल शिवमंदिरात रात्र रात्रभर गप्पा मारत बसत.मात्र प्रत्येक राती ते कुठं फिरतायेत हे एका व्यक्तीला इत्यंभूत कळत असे व त्याची नस तडकुन हाताच्या मुठी वळत.ती व्यक्ती म्हणजे प्रतापराव.एवढं वैभव पायाशी लोळण घेत तरी हा इष्काचा सोहळा आमच्याकरिता का होत नाही.ज्या सावजावर झडप घालणार तोच त्या दिड दमडीच्या इंजिनियर ने ते अचुक टिपावं.या विचारानं तळमळत.म्हणुन पुन्हा मैत्री वाढवत ते उमाकांत जवळ कायम येजा करु लागले.आता तर शाळेत येऊन मुख्याध्यापक बाईला समस्या विचारल्या जाऊ लागल्या.व लगेच गरजा ही पुर्ण होऊ लागल्या.रचना बाईला मात्र नजरेचा जाळ सहन होईना.पण जोपर्यंत आपणास धोका नाही तोपर्यंत त्याही कानाडोळा करत.
तिकडे सबस्टेशनचे क्वार्टर जिर्ण असल्याने पाडण्यात आले व इंजिनियरचा सर्व बाडबिस्तरा रचना बाईच्या विरोधाला न जुमानता प्रतापरावांनी साहेबाजवळ बंधुप्रेम दाखवत जवळ जवळ वर्षभरापासुन बंद गढीत हलवला . या गोष्टीला पाच दिवस होत नाही तोच आजचा प्रसंग घडला.या विचारानं रचना बाईस झोप लागलीच नाही.पण सकाळी रोजच्या वेळी शाळा व आॅफिस असल्यानं त्यांना उठावच लागलं.
गढी उघडली गेली.गढी साफ झाली व गढीतला वावर वाढला हि गोष्ट आक्कासाबास मानवली नाही व त्यांनी बरोबर होळीच्याच दिवसी आपलं अस्तित्व दाखवलं व पुढेही दाखवणारच होती.फक्त सारी सरकट्ण्याकरिता खराटा कोण देणार हाच प्रश्न बाकी होता

उर्वरित भाग क्रमश:
🙏🙏VSDV🙏🙏
No comments:
Post a Comment