(घटना सत्यात घडलेली आहे परंतु ती समजण्यासाठी दिलेली पात्राची नाव काल्पनिक आहेत.)
विनय रेल्वेत नोकरीला होता. कामानिमीत्त सतत् बाहेरगावी जाण येण होतं. कोल्हापूरात नोकरीत बरिच वर्षे गेल्यावर त्याची सातारया्स बदली झाली.१९६०-६२ चा तो काळ. ओळखीचे असे कोणच नाही पण योगायोगाने एक जुना मित्र भेटला,शाम्या आणि त्याच्याच सोबत त्याच्या खोलीत त्यानेच राहायला जागाही दिली.शाम्या मूळचा नगरचा.सरकारी नोकर होता. कामानिमीत्त त्यालाही सातारला धाडलं होत २ वर्षांसाठी.
बरं चाल्ल होत दोघांच आपापल्या नोकरीत. घरी पैसे पाठवून,वेळोवेळी पत्र पाठवून दोघे घरच्यांची काळजी व खबर घेत होते.
एके दिवशी नगरहून शाम्या चा मोठा भाउ, राम्या; शाम्याला भेटायला आला. बरेच दिवसांनी भेटले दोघं. विनयचीही छान ओळख झाली राम्या सोबत. गप्पा काय संपेनात. राम्या,विनय,शाम्या दिवसभर गप्पा मारत बसले.शाम्याने राम्याकडे राहण्यासाठी हट्ट धरला, राम्यालाही नाही म्हणवल नाही, तो राहीला. दुसराही दिवस तिघांनी फार मजेत घालवला. दिवसभर गप्पा, खाण-पिणं आणि हसण खिदळणं. तासाभरासाठी भेटायला आलेल्या राम्या २ दिवस राहीला.
राम्या तिसरया् दिवशी मात्र जरा लवकर उठला, आवरुन घाईघाईत निघताना शाम्याला घट्ट मिठी मारली आणि म्हटला,”कदीबी कायबी लागलं तर फक्त आठवन काड लेका माझी, दनक्यात हजर होतो बग तुज्या मोर्”! शाम्याच्या डोक्यावर हात फीरवला आणि एवढचं बोलून जोरात गेला निघून तिथून. शाम्या डोळे पुसतोय न पुसतोय तोवर राम्या दिसेनासाही झाला.
१०-१५ मिनीटाने पोस्टमनकाका आले ‘शाम्या शाम्या’ आेरडतच. तार आली होती शाम्याच्या गावाहून . त्याने तार वाचली तसा जागीच कोसळला. विनयही घाबरला.त्याने शाम्याला बिछान्यावर झोपवून स्वता: तार वाचली, विनयसुध्दा शुध्द हरपून खाली पडला.
तार अशी आली होती,

“शाम्या लेका लवकर घरी ये, ४ च दिवसांपुर्वी राम्याचा अपघात झाला आन् आपला राम्या त्या अपघातात जागच्या जागीच गेला रं!”
No comments:
Post a Comment