जगातला मोठा आणि रहस्यमयी प्रश्न..... ज्याच उत्तर कोणाकडेच नाही. तर प्रश्न हा आहे की माणसाच्या मृत्यूनंतर त्याच काय होत ??? खरच माणसाला स्वर्ग अथवा नरकाच दर्शन करावं लागतं .... खरंच काही आत्म्यांना स्वर्गातही जायला मिळत नाही आणि नरकातही ..... आत्मे खरंच आपल्यासोबत या पृथ्वीवर राहतात का ????
क्षमस्व आज अर्बन लेजंडची गोष्ट पोस्ट नाही करु शकलो....कारण आज मला भारतातील गोरखपूर मधील भुताटकीच्या घटनेवर कथा पोस्ट करायची होती..... आजच्या सत्यघटनेत मी तुम्हाला एक अशा भयानक आणि रहस्यमयी जागेबद्दल माहिती देणार आहे...हि महिती ऐकुन तुम्ही नक्की हैराण होशाल....
एक अशी जागा जिथं भुतांची संख्या एक-दोन नाही तर त्यांची तिथं वरात लागते असं म्हंटल जात. ही जागा उत्तर प्रदेश मधल्या गोरखपूर येथील भांजपर या गावात आहे....
या गावाच्या पूर्वेकडील दिशेला खूप मोठा आंब्याचा बगीचा आहे. एक काळ असा होता जेव्हा हा बगीचा लोकांना आरामदायी सावली आणि गोड फळ द्यायचा...पण आजपासून २० वर्षांपूर्वी इथं एक अशी घटना घडली ज्यामुळे
कायमस्वरूपी इथं कोणीही आता जात नाही व या जागेबद्दल कोणीही जास्त बोलत नाही. आता इथे फक्त भूत आणि प्रेतातम्यांचा वास आहे...आसपासचे लोक असा दावा करतात की इथं सूर्यास्तानंतर पक्षीही पर नाही मारत. या घटनेची सुरुवात झाली १९९७ साली....जिथं सुभाष कांता नावाच्या माणसाच्या मुलीच लग्न एका मानव यादव या मुलाशी ठरलं घरात लग्नाची तयारी मोठ्या धुमधडाक्यात चालली होती. आज सुभाष कांताच्या मुलीच लग्न होत. वरात सुभाष कांताच्या घराच्या जवळच असलेल्या शाळेजवळ पोहोचली होती. जिथे वरातीच्या बसण्याचा बंदोबस्त केला गेला होता.
आराम केल्यानंतर वरातीला थोडं लांब असलेल्या सुभाष कांताच्या घरापाशी पोहचायच होत. त्या वेळेला गावात जाण्यायेण्यासाठी रस्त्यांचा चांगला बंदोबस्त नव्हता. तसच वरातीसोबत असलेले गाजेबाजेवाले आणि काही लोक एका ट्रॉली ट्रेकटरवर बसले होते. वरात त्या बागेच्या दिशेने जात असताना कच्या रस्त्यावरून पुढे जाऊ लागली. आणि बागेमधी असलेल्या तलावाच्या कच्या रस्त्यावर पोहचली. पण तेव्हा अस काही झालं ज्याची कोणालाच आशंका नव्हती. ट्रॉली ट्रॅक्टरचे मोठे-मोठे चाक जेव्हा तलावाच्या किनाऱ्यावर असलेल्या रस्त्यावर पोहचले....तेव्हा तो रस्ता एका बाजूने वाहून गेला. आणि तो ट्रॉली ट्रॅक्टर त्या तलावात पलटी झाला. या घटनेमध्ये ट्रॉलीमधी बसणारे खूप लोक मारले गेले. आणि काही वेळेतच आनंदाचा क्षण दुःखात बदलला. या घटनेत १४ लोकांचा मृत्यू झाला. दुःखात आणि वेदनेत हे लग्न तर झाले....पण पालखी बरोबर लोकांच्या अर्थी पन परत गेल्या. त्या अर्थीत मेलेल्या लोकांचं शरीर तर गेलं पण मेलेल्या लोकांचे आत्मे त्या बागेतच राहून गेले. आणि या गोष्टीची माहिती लोकांना तेव्हा कळली जेव्हा सप्टेंबर महिन्याच्या एका रात्री आजूबाजूच्या लोकांना रात्रीच्या वेळेस बॅंडबाजाचा आवाज आणि हर्षोउल्लास ऐकू येऊ लागला. त्यावेळेस गावामध्ये लाइटीची व्यवस्था नसायची. मग तर हे अशक्यच होत की लोकांना ऐकायला येणारे आवाज हे कोणत्या साउंड सिस्टिम अथवा टीव्हीची होते....आणि सप्टेंबर महिन्यात हिंदू पत्रिकेनुसार कोणतंच लग्न होत नाही. मग प्रश हा पडत होता की हे आवाज कुठून येत होते.....या गोष्टीचा तपास करण्यासाठी एक व्यक्ती त्या आवाजांचा शोध घेत पुढं जाऊ लागला. आणि बघता बघता तो त्या आंब्याच्या बागेत पोहचला जिथे ती दुखद घटना घडली होती. पण तिथे त्याने जे पाहिलं ते पाहून तो हादरलाच
कारण त्या बगीचामध्ये लोक बॅंडबाजा वाजवत नाचत-गात चालले होते. आणि त्यांच्या चेहऱ्यावर आनंदाच्या जागी दुःखाचे भाव होते. त्या माणसाला कळून चुकलं होत की तो जे बघत आहे ती काही सामान्य घटना नाही. तो हे समजून गेला होतो की हे त्याच मेलेल्या लोकांचे आत्मे आहेत जे काही महिन्यांपूर्वी या बगिच्यात मृत्युमुखी पडले होते. हे भयानक दृश्य पाहून तो तिथून पळून जाऊ लागला. पण तरीही बँडबाज्याचा आवाज कमी नाही झाला. त्या व्यक्तीला असा भास होत होता की त्या भुतांची ती वरात आताही त्याच्या मागे मागे चालत आहे. खूप लांब आल्यावरही ते आवाज स्पष्टपणे ऐकू येत होते.त्या व्यक्तीला अस वाटत होतं की आपण भुतांच्या वरातीत अडकलो आहोत. कसंबसं गावात आल्यानंतर त्याने त्याची आपबिती लोकांना सांगण्यास सुरुवात केली. पण एकणार्यांना त्याच्या गोष्टीवर पूर्ण विश्वास नव्हता. पुढच्या दिवशी गावकऱ्यांनी एकसोबत त्या बगिच्यात जाण्याचा निर्णय घेतला. जेव्हा सकाळी गावकरी त्या बगिच्यात पोहचले तेव्हा त्यांनी पाहिलं की बगिच्या जवळच्या तलावापाशी असलेल्या चिखलात पायांचे ताजे ताजे निशाण होते....पण रात्रीच त्या बगिच्यात कोणीही जात नसे....मग पायांचे एवढे निशाण कुठून आले...हे पाहून गावकऱ्यांचा त्या व्यक्तीवर विश्वास बसला की ती व्यक्ती खर बोलत होती. पण आपली कहाणी सांगण्यासाठी ती व्यक्ती जास्त दिवस नाही जगली. ते भयावह दृश्य बघितल्यानंतर त्या व्यक्तीच मानसिक संतुलन ढासाळल. त्याला दर रात्री त्या बँडबाज्याचा आवाज येत असे. आणि रात्रीचा उठून तो त्या बगिच्यात पळत जात असे. या दुखद घटनेनंतर सर्वाना हे कळलं की त्या बगिच्यात मारले गेलेले लोक परत जागे झाले आहेत. आणि तेव्हापासूनच या बगिच्यात कोणालाही जाण्यास सक्त मनाई आहे. पण तरीही गेल्या २० वर्षात या बगीच्याने खूप लोकांना आपल शिकार बनवल आहे.आजूबाजूच्या लोकांचं अस म्हणणं आहे की जो कोणी त्या आवाजाच्या नादात तिथं जातो तो परत नीट नाही येत. एकतर तो वेडा होतो नाहीतर त्या आत्म्यांच्या जाळ्यात फसला जातो. आजही लोकांना इथं रात्रीच्या वेळेला बँडबाज्याचा आवाज येतो.......

- सानप रोहित
No comments:
Post a Comment