मित्र(भयकथा)
निशा सोनटक्के लिखित:-
****************************
आज ऑफीसमध्ये मित्राला फोन आला.त्याचा बालमित्र वारला... माझ्या मित्राच्या हातून फोन
गळून पडला.तो खूप रडत होता.तो जायला निघाला. पण,,मला जाणवले...त्याला एकटे सोडणे बरोबर नाही.
मी पण निघालो...नेमका खूप पाऊस लागला...वेळेवर बस मिळेना...रिक्षा पण मिळेना....अशावेळी हमखास त्रास होतोच...आपण खूप जणांच्या कडून हे ऐकतो...कशीबशी एक रिक्षा मिळाली...ती पण वाटेतच बंद पडली्.
हायवे वरून आंम्ही चालत चालत निघालो....पण एक वाहन मिळेल तर शप्पथ....मित्र सारखा फोन करत होता..".मी...निघालोय मला शेवटचे दर्शन घेऊ द्या...." त्यावरून तिकडे अजुनही डेडबाॅडी ठेवली असावी असा
अंदाज येत होताच....शेवटी एक ट्रक मिळाला....फाट्यापर्यत सोडतो बोलला.आंम्ही पण ट्रकमध्ये बसलो....
फाट्यापासून चालत निघालो...खूप काळोख पसरला होता....पाऊस तर नुसता कोसळत होता.....गांवच असल्याने रस्त्यावर वर्दळ नव्हती...मधूनच भटकी कुत्री अंगावर भुंकत होती. आंम्ही दोघे दरमजल करत एकदाचे पोचलो....
एका घरासमोर बरीच गर्दी होती... त्यावरून हेच ते घर असावे.असा मी अंदाज केला....बाहेरचे कुणीतरी बोलले """आले आले...."""सगळे लोक आमच्याकडे बघायला लागले..आतुन एक माणूस आला आमच्याकडे विचित्र नजरेने
बघत होता...आणि. बोलला""" खूप ऊशिर केलात हो"""मित्र खूप रडत होता..पण प्रेत फुगत चालले होते....
आणि लोकानी ऊचलले...आंम्ही स्मशानात प्रेतयात्रेसोबत निघालो...रात्र तर होतीच..सर्वत्रच काळोख होता...कुणीही काही बोलत नव्हते फक्त एकच आवाज """"राम जय जय जयराम श्रीराम""" खूप भयाण वाटत होते.रस्त्यावरील वड,पिंपळ वृक्षांच्या सावल्या पण खूप भयप्रद वाटत होत्या...ती पानांची सळसळ मधूनच त्यातुन येणारा गार वारा अंगावर रोमांच ऊभे करत होता.
पण ...आमच्या जवळून च कुणीतरी.....धावत होते जोरजोरात पळत होते....त्या अंधारात मला दिसत नव्हते....मी प्रयत्न
करत होतो...आणि मशालींच्या उजेडात मला तो चेहरा दिसला...तो खूप रडत होता...प्रेताला ओढत होता नेऊ नका सांगत होता....माझ्या काळजात धस्सच झाले कारण तो दुसरा ,,तिसरा कुणी नसून माझ्या मित्राचा बालमित्र होता...मी मित्राला

खूण करत होतो.पण,त्याला काही च दिसत नव्हते....याचाच अर्थ मृतात्मे सगळ्यांना दिसत नाहीत....आणि मेल्यानंतर ही आत्मा शरीराबरोबर असतो असे बोलतात हे खरे आहे.....मी खाली मान घालून चालत होतो. आंम्ही स्मशानात आलो....फाटक करकरत ऊघडले गेले.. आता प्रेतयात्राच गायब झाली....मित्र पण...मी सगळीकडे बघू लागलो...पण फाटका जवळच्या दोन पहारेकऱ्यांनी मला पकडले....माझा जीव गुदमरायला लागला....पण त्यांचे चेहरे दिसत नव्हते....त्यांनीतोंडावर काळे फडके
बांधले होते. ते दोघे मला समोर घेऊन चालले....तिथे. फास लटकत होता...आता माझ्या लक्षात आले....ते दोघे मला फासावर
देणार....मी जीवाच्या आकांताने ओरडलो.... आता मी काही वाचत नाही... आणि मी मंत्र म्हणू लागलो... "निशंक होई रे मना,निर्भय होई रे मना प्रचंड स्वामीबळ पाठीशी आहे रे मना... *********************************
मला कुणीतरी ऊठवत होते... मी जागा झालो... मी माझ्याच घरी...बेडवर??? हे स्वप्न होते???इतके भयंकर???
आई,,बायको विचारत होत्या... """काय झाले????ओरडत का होतास???" मी निशब्द.... आॅफीसला उशीर होईल म्हणून पटापट आवरून निघालो... मन ऊदासच... आज त्या मित्राकडे बघणारच नाही.... आॅफीसला पोचलो....त्याचे टेबल रिकामेच... मला खूप हायसे वाटले.... मी कुणाशीच बोलत नव्हतो.... साधारणपणे साडेअकरा ला फोन आला....
आॅफीसमध्ये सगळे एकत्र जमुन चर्चा करत होते. मी पण तिथे गेलो...तेंव्हा समजले... तो आॅफीसमधील मित्र अचानक हार्ट अॅटॅकने वारला... माझे डोके सुन्न झाले....कुणाशी बोलू??? कसा बोलू??? आॅफीसमधला जाधव बोलत होता...
ही तिसरी केस आहे... या खुर्चीवरचा माणूस जगत नाही...सात वर्षांपूर्वी या खुर्चीवर साळुंखे होते....त्यांचा बाल मित्र वारला.
फोन आल्यावर ते हाफ डे घेऊन निघाले...समोरच राणे होते...ते पण साळुंखे बरोबर गेले... गावाकडे डेडबाॅडी होती.खूप पाऊस होता... प्रेतयात्रा चालली. होती... पुलावरून जात असताना...अचानक काय झाले नक्की माहित नाही...पण पुलाचा काही भाग कोसळला. ओढ्याला पूर आलेला होता...आणि पुराच्य पाण्यात अख्खीप्रेतयात्रा वाहून गेली.... गावातल्या लोकांना सकाळी समजले... कुणाकुणाची प्रेते मिळाली...त्यातच आपल्या आॅफीसमधील साळुंखे,राणे यांचेपण प्रेत सापडले...
आता या खुर्चीवर बसायचीच भीती वाटते... सगळेजण त्या खुर्चीकडे बघत होते... आणि त्यासमोरचीच खुर्ची माझी...म्हणजेच...
पूर्वीच्या राणेंची आता सगळा प्रकार लक्षात आला... अशी मैत्री होती तर???
मी डोके दुखत होतेच हाफ डेने घरी गेलो...आणि थोड्याच दिवसात तेथून बदली घेतली
समाप्त
निशा सोनटक्के

No comments:
Post a Comment