🙏ही ओढ रक्ताची 🙏
ही ओढ रक्ताची-Bhag 5
बालट्या विस वर्ष मागे भुतकाळात गटांगळ्या खाऊ लागला. त्याला लिंबर्डी आठवली. आपले चार भाऊ व त्यांची दादागिरी, धंदे आठवले. सूर्यकांत-चंद्रकांत आठवले. तो गटांगळ्या खात खात खोल खोल शिरु लागला. त्याला आता भूतकाळाचा स्वच्छ तळ दिसू लागला.
खंडोजी काकडे एक टंच असामी. ऐंशी नव्वद एकराच्या पाणी पित्या रानाचा मालक. तमाशाचा हौशी व दर्दी. राधाबाईशी विवाह होऊन नुकताच कृष्णा जन्मलेला. खंडोजी राव तमाशाच्या वेडापायी दूर दूर जात. कृष्णा दोन वर्षाचा होत नाही तोच खंडोजीच्या जिवनात एक प्रकरण घडलं. खंडोजीराव मिरा शिरणीकर नावाच्या एका तमाशा वाल्या बाईच्या नादी नादावले. बाई फडावर नाचू लागली की तिच्या मोहक अदांवर व थिरकणाऱ्या घुंगरावर उभ्या महाराष्ट्रातला रसिक थिरके. बाईचा पहिला नवरा मरुन सहाच महिने झाले होते व एका वर्षाची दोन जुळी मुलं होती. पण बाई अशी काही तुफानी कलाकार होती की भले भले वेडे व्हायचे. खंडोजी रावांनी हे पाखरू नारायणगावला प्रथम पाहिलं. बाईला थेट पळवुनच आणलं लिंबर्डीला. पण बाईही महा वस्ताद. तिनं आपल्या जुळ्या मुलांचं भविष्य उजाळावं म्हणून खंडोजीरावाकडनं आधी दहा एकराचं रान नावावर करून घेतलं मगच पुढचे लग्नाचे सोपस्कार पार पडले. साऱ्या लिंबर्डीत चर्चेचे फड रंगले. राधाबाई सवतासुभा पाहून ऊर फाडून रडल्या. पण खंडोजीनं कुणालाच खोकलू न देता मिराबाईसाठी वेगळं घर बांधुन दिलं. पुढे दोन तीन वर्षानं राधाबाईनंही आपल्या नशिबाशी समजोता करत जुळवून घेण्यातच भलं समजलं.राधाबाईस कृष्णा पाठोपाठ मुलगी झाली त्या नंतर महिन्यातच मिरा बाईसही मुलगीच झाली. राधाबाईनं मुलीचं नाव शालिनी ठेवलं होतं तर मिराबाईनं मुद्दाम मालिनी ठेवलं.काळ झपाट्यानं पुढं सरकु लागला तसा कृष्णा, शालिनीसोबतच मालिनी व सूर्यकांत-चंद्रकांत ही जुळी मुलंही वाढू लागली. फरक इतकाच की शालीनी व कृष्णा अतिशय मवाळ सालस व शालीन तर सूर्य-चंद्रकांत व मालिनी अतिशय रगेल, बेरकी चढेल. खंडोजी रावांना सूर्य - चंद्रकांत तशी निघाली याबाबत आश्चर्य वाटत नव्हतं पण मालिनी तर आपल्या रक्ताची मग ती का अशी निघावी? संगतीचा तर परिणाम नसावा? म्हणून मालिनी दहा वर्षाची होताच अजुन वय लहान आहे सवयी बदलता येतील म्हणून त्यांनी मिराबाईच्या विरोधाला न जुमानता मालिनीस शालिनीजवळ राधाबाईकडं आणलं.
राधाबाईनं ही काही झालं तरी धन्याचाच हाडामासाचा गोळा म्हणून तिला ही जीव लावत वाढवू लागली.
पण यानं मिराबाईचा फडावरचा अहंकार डिवचला गेला. त्या क्षणी ती काहीच बोलली नाही. तिला माहीत होत माझं रक्त ओढ घेईल व परत येईल. त्या दिवसापासून मिरानं वेगळंच सुरू केलं. सूर्यकांत व चंद्रकांत ला ती गायन वादन नृत्य शिकवू लागली. महिन्यातच लिंबर्डीत चर्चा सुरू झाली. की खंडोजी रावाच्या दुसऱ्या घरात पुन्हा तमाशा (फड) उभा राहणार.
खंडोजी राव या प्रकारानं संतापले.त्यांनी मिराबाईस धारेवर धरलं.
"मिरे काय हे? असलं वागण्याची तुला लाज नाही वाटत?" ज्या दलदलीतून तुला काढून एक सुखवस्तू जिवन दिलं मी तुला व पोरांना. आणि तू पुन्हा त्याच वाटेवर पोरांना ढकलतेय? "
" माझी पोरं आहेत मी काहीही करेन. तुमची लेक होती नेलीत ना तुम्ही? "
" मिरे माझं तुझं करू नको. "
" काय खोटं बोलली मी! आणि ज्या तमाशाचं तुम्हाला वेड होतं तो कधीपासून वाईट वाटायला लागला तुम्हाला? "
" मिरे कोणत्याही गोष्टीचं एक ठराविक वय असतं. पण वाढत्या वयानुसार माणसानं बदलायचं असतं"
" बदलायचं? अहो आमच्या रक्तात भिनलीय ती कला! शिवाय कला आहे ती! त्यात वावगं काय! उद्या उठून तुम्ही दूर केलं तर माझ्या मुलांनी कशावर जगायचं? म्हणुन रक्तातील कला शिकलेली बरी" मिराबाईनं कुत्सीत हसत म्हटलं
" मिरा तोंड आवर. दहा एकराचा काळजाचा ठाव दिलाय मी त्यांना. वाऱ्यावर नाही सोडलं. शिवाय नीट रहा मी कधीच उघडं पडू देणार नाही "सांगत ते विव्हळत बाहेर पडले.
मिराबाईनं पोरांना शिकवणं सुरुच ठेवलं. यानं खंडोजी रावांना आपण जवानीत मोठी चुक करुन बसलो हे समजून चुकलं. त्या नंतर वितुष्ट वाढतच गेलं.
पुढं सूर्यकांत व चंद्रकांत वयात आल्यावर तमाशाची क्रेझ कमी झाल्यानं त्यांनी तमाशा ऐवजी आर्केस्ट्रा काढावयाचं ठरवलं व त्या नुसार संच उभा करून आॅर्केस्टा काढलाही. त्यातल्या त्यात तमाशा काढला नाही याचं खंडोजीरावांना बरं वाटलं. पण....
त्यातच मिराबाईनं वयात आलेल्या मानिनीला पटवलंच व परत आपल्या कडं वळवलं व तिला ही गायन शिकवलं. मानिनीचा आवाज तर एक बहार होता. मिराबाईला तिचा आवाज ऐकून आपलीच झलक तिच्यात दिसू लागली. आणि मालिनीही एक दिवस आॅर्केस्टात गाऊ लागली. खंडोजीराव मानिनी मिराकडं गेली यानं ते खचले त्यांनी आपली चाळीस एकर जमिन कृष्णा, वीस एकर शालिनी व वीस एकर जमीन मालिनीच्या नावावर करून दिली.
एका वर्षात सूर्यकांत मालिनीचा आॅर्केस्टात जळगाव धुळे नाशीक जिल्ह्यात धूम गाजवू लागला. मिराबाईकडं पैशाचा पूर येऊ लागला तसा सूर्यकांत चंद्रकांतच्या अंगात रग व मस्ती वाढू लागली.
इलेक्शन ला उभ्या असलेल्या एका नेत्याने जळगावला यांचा आॅर्केस्ट्रा ठेवला. तुफान गर्दी जमली. विरोधात उभ्या उमेदवारांनं जळगावमधल्या जैनाबादमध्येच राहणारा व रेल्वेत फळं विकता विकता गाणारा देवधर नावाचा स्थानिक कलाकार होता त्याचा स्टेज शो सारखा कार्यक्रम ठेवून दिला. दोन्ही कार्यक्रम समोरा समोर. सूर्यकांतच्या आॅर्केस्ट्रा ला तुफान गर्दी तर तिकडं देवधर नवीन असल्यानं जेमतेम गर्दी. देवधरनं विचार केला मोठा गायक व्हायची ही नामी संधी आहे. जे काही करायचं ते फाड के करायचं आज. तिकडं मालिनी गात असतांनाच इकडं देवधर गाऊ लागला. त्यानं रेल्वेत भरपूर गाणी गायली होती पण त्याला साथीला कोणतीच साधनं नसायची इथं सर्व साहित्यासोबत गातांना त्याचा आवाज खुलू लागला. त्यालाही आपला आवाज आज नवीनच वाटू लागला व हूरूप वाढून तो जिव ओतून गाऊ लागला. गर्दी उठत देवधर कडं आपसुक वळली. पाहता पाहता देवधरकडं सारी गर्दी खेचली गेली. मालिनीला हा आपला अपमान वाटला. व त्यातच ती खचली व त्या दिवसाचा तिचा कार्यक्रम पडला. पण सूर्य - चंद्रकांत ओळखलं या पोराच्या आवाजात खरच जादू आहे. हा आपल्या संचात आला तर आपला संच आणखी भारदस्त होईल. त्यांनी त्याला दुसऱ्या दिवशी हूडकून काढला जैनाबादमधून व मोठी आॅफर देत आपल्या संचात घेतलं. आता देवधरनं रेल्वेत फळ विकनं आईकडं सोपवलं व तो मानिनी सोबत गात सर्वत्र फिरु लागला.देवधर मालिनी जोडीच्या
आॅर्केस्ट्रानं सारीकडं धूम मचवली. पुढं सूर्यकांतनं रानमाती हा म्युझीक व्हिडीओ अल्बम काढायचं ठरवलं. त्याचं शुटींग लिंबर्डीच्या शेतातच करण्यासाठी देवधरचा मुक्काम लिंबर्डीला पडला. पण गावरान गितं त्याला जमेतच ना. पुन्हा पुन्हा रिटेक होऊनही व सारीच टिम नवीन म्हणून म्हणावी तशी भट्टी जमेना. त्याच वेळी शेतात आलेली शालिनी देवधरला नजरेस पडली. आणि त्या दिवसापासून सतत तो मागावर राहू लागला. नंतर मात्र त्याच्या गाण्यात खुपच बदल झाला. तिचा चेहरा आठवता आठवतातच तो गावू लागे व त्यातच त्याची कला उधाणास येऊ लागली. गिताचा अल्बम गाजला. दुसरा अल्बम ही निघाला. आता देवधर व शालिनी एकमेकाच्या अधिकच जवळ आली. ही बाब खंडोजी रावणाच्या लक्षात आली. त्यांना देवधर गरीब असला तरी गुणी आहे प्रगती करेल शिवाय आपल्या कडंच भरपूर संपत्ती आहे म्हणून त्यांचीही मूळ संमती होतीच.
अल्बम लाॅंच होऊन हिट होताच मालिनी ही देवधरवर आकर्षित झाली. व ती देवधर मागं फिरू लागली. काही दिवसात मालिनीची बदललेली वागणूक पाहताच शालिनीवर प्रेम करणारा देवधर मालिनीला टाळू लागला. तर मालिनी अधिकच जवळ जाऊ लागली. देवधरनं तिला समजावत स्पष्ट शब्दात समजावलं. "मालिनी मी तुला कधीच त्या नजरेनं पाहिलं नाही. तरी कदाचित गाण्यामुळे तुला गैरसमज झाला असेल तर तो मनातून काढ. कारण मी शालिनीवर प्रेम करतोय"
हे ऐकताच ती संतापली. व त्या दिवसापासुन तिनं गाणंच बंद केलं ही बाब भावांना समजताच त्यांनी देवधरला धमकावत"तुझी लायकी नसतांनाही आम्ही आमच्या बहिणीच्या इच्छेखातर तुला स्विकारावयास तयार आहोत म्हणून चाळे न करता लग्नास तयार हो".
देवधरनं या गोष्टी शालिनीमार्फत खंडोजी रावणाच्या कानावर घालताच. त्यांनाही पेच पडला. दोन्ही मुली सारख्याच. पण शालिनी व देवधर एकमेकास पसंत करता आहेत तर मग?
त्यांनी शालिनी पुरेपुर समजावण्याचा प्रयत्न केला. पण व्यर्थ. म्हणुन खंडोजी रावांनी तत्काळ शालिनीचं व देवधरचं जळगानलाच लग्न ठरवलं. लग्नाच्या दिवशीच मालिनीनं देवधर आता मिळणं शक्य नाही हे पाहून स्वतःला संपवण्याचा निर्णय घेत घरामागच्या आडात उडी घेतली. इकडे शालिनी व देवधरवर अक्षता पडत असतांनाच तिकडे मालिनीच्या श्वासाची लड धिमी पडत होती. दोन्ही भाऊ बिथरली. त्यांनी खंडोजीला न कळवताच शालिनीच्या पार्थिवाचं विसर्जन केलं. दुसऱ्या दिवशी गटलू व बाटल्या यांना बोलवत सुपारी दिली. दहाव्याच्या आत खातमा करायचा. त्या शिवाय शालिनीच्या आत्म्यास मुक्ती नाही. खंडोजी ला कळताच मुलीसाठी ते धावतपळत आले. शालिनीसाठी ते धाय मोकलून रडू लागले. शालिनी असं काय करेल याची यत्किंचितही त्यांना वाटलं नव्हतं. रात्री त्यांना गटलू व बालट्याची टोळी रवाना झाली हे खंडोजी ला कळलंच. त्यांनी तसच निघत जळगाव गाठलं. देवधर त्याची आई व शालिनीला घेत त्यांनी बिहार गाठलं. गटलू व बाटल्या जैनाबादला पोहोचण्यास आधीच खंडोजी राव निसटले होते. ही टोळी शोधशोधून रिकाम्या हाताने परत येताच सूर्यकांत व चंद्रकांत यांनी त्यांना फोडून काढलं. एरवी त्यांना सारा जिल्हा थरथर कापायचा पण हे सूर्यकांत व चंद्रकांत याना मात्र घाबरत.
शालिनी देवधर व त्याची आई बिहार मध्येच राहु लागली. खंडोजीराव त्यांना सारं पुरवत पण गुप्तपणे. लिंबर्डीत त्यांनीच गुप्तपणे अफवा फैलावली की गटलू व बालट्याच्या टोळीनं शालिनी व देवधरचा खातमा केला. राधाबाई कृष्णा सोबत खंडोजीरावांनी ही बऱ्याच महिने शोक केला. पण त्यांनी घरात देखील कळू दिलं नाही व तिकडं शालिनी व देवधरलाही सक्त ताकीद दिली की महाराष्ट्रात फिरकायचंच नाही.
महिन्या मागून महिने गेली. शालिनीला मुकुंदा झाला. तीन वर्षापर्यंत सुखरुप चाललं. पण एके रात्री खंडोजीराव झोपेतच ह्रदयविकाराच्या झटक्याने गेले. विधात्यानं त्यांना कृष्णाला शालिनीबाबत सांगण्यासाठी काही श्वासाची ही सवड दिली नाही. त्याच वाटेनं राधा मिराबाई ई त्याच वर्षी गेल्या.कृष्णा काकडे शेतात राबत सालस जीवन जगू लागले. त्यांना कुंदा झाली.
सूर्यकांत चंद्रकांत यांनी आॅर्केस्ट्रा बंद करत गॅस एजंसी व ट्रान्सपोर्ट सुरु केलं पण गेलेली जमीन व बहिणीचा सूड त्यांना स्वस्थ बसू देईना. ते गटलू व बाल्ट्याला शोध घेण्यासाठी सतत तगादा लावत.
खंडोजीराव गेले व पैसे येणं थांबलं. मग देवधरच्या आईनं बिहारमधून कल्याणला आपल्या बहिणीकडं येत पुन्हा आपला रेल्वेत फळ विक्रीचा व्यवसाय सुरु केला. व देवधरलाही मदत करू लागली. पुढं देवधरनच बिहारमध्ये आपलं गाणं सुरु केलं. पण तो पडद्याआडून गायचा. स्वतःला स्टेजवर येऊ द्यायचंच नाही, या अटीवरच त्याला शालिनीनं गाण्याची परवानगी दिली होती. हळूहळू त्याच्या आवाजाची जादू प रू लागली. लोक मालकाकडं गायक कोण म्हणून विचारणा करत. पण मालकानंही याबाबत गुप्तता पाळली. यामुळं आणखी प्रसिद्धी मिळू लागली. देवधर आता स्वतः भरपूर पैसे कमवू लागला. मुकुंदा आता पाच वर्षाचा झाला व दोघांनी त्याला मराठी माध्यमाकरिता आईजवळच कल्याणला दाखल केलं. लहान पोरं सुरुवातीस खूप रडला पण हळूहळू आजीच्या मायेनं रूळला.
गटलू व बालट्या सूर्यकांतच्या ट्रान्सपोर्टच्या कामासाठी बिहारला गेले. पाचही भाऊ तिथलं काम आटोपून आपल्या कारनं परत निघतांना बाजारात त्यांना शालिनी व देवधर दिसले. गटलूनं त्यांचा पिच्छा करत करत राहण्याचं ठिकाण हुडकलं. व एका भावाला ही बातमी देण्यासाठी सूर्यकांतकडं पिटाळलं.
सूर्यकांत व चंद्रकांत यांनी आपल्या बहिणीच्या जपून ठेवलेल्या अस्थींना नमस्कार करत बेबी तू आता मुक्त होणार असं रडतच म्हणत त्याला व्यवस्थित समजावत दोघांना काळजीनं लिंबर्डीला आणा. गडबड होऊ देऊ नका. अशा सुचना दिल्या.
"दादा तिकडं मुंडकी छाटायचं सोडून त्या बेन्यांना का उगाच आणतोय इकडं?" चंद्रकांत रागानं विचारताच
"भावा त्याच्या सह्या घ्यायच्या आधी नी मग लिंबर्डीत त्यांची मुंडकी पडलेली मला पहायची आहेत. म्हणून तू जा रे व त्यांच्या मुसक्या आवळून आणायला सांग गटलूला. ही संधी गमवू नका. " सूर्यकांतनं बजावलं.
रात्र होताच दरवाज्यावर थापा पडल्या. झोपेच्या धुंदीत देवधरनं दरवाजा उघडला तोच नाकावर रूमाल दाबला गेला. व त्याची शुद्ध गेली. तोच प्रकार शालिनीचाही झाला. दोघांना बेशुद्ध अवस्थेत कारमध्ये घालून कार महाराष्ट्रात निघाली. दोन दिवस प्रवास करून संध्याकाळी सातलाच लिंबर्डी शिवारात आली. मध्यंतरी शुद्ध येण्या आधीच त्यांना बांधुन त्यांच्या तोंडावर पट्टी बांधली गेली होती. शालिनी रडून रडून अर्धमेली झाली होती. तिनं गटलू व त्याच्या टोळीला ओळखलं होतं व यांची करणी माहीत असल्यानं आता आपण जिवंत राहणार नाही हे तिला कळून चुकलं होतं.तिचं मन मुकुंदकडं धावु लागलं. लिंबर्डी शिवारात येताच गटलूनं त्यांना परत बेशुद्ध केलं. गटलूनं एका भावाला सूर्यकांतकडं पाठवलं तर दोन भावांना सूर्यकांतच्या खळ्यात मटणाच्या स्वयंपाकाची तयारी करायला पाठवलं. गटलू व बालट्या शिवारात आडोशाला गाडीसह थांबले. रात्री अकराला त्यांनी गजा पाटलांच्या गोट फार्मवरनं एक बोकड उचलला व गाडीत टाकून खळ्याकडंच आणायचा निरोप असल्यानं खळ्यात निघाले. गावात यात्रा असल्यानं लिंबर्डी सारी तमाशा पहायला देवीकडच एकवटली होती. जेष्ठाची अमावास्या असल्याने सारीकडं अंधार दाटला होता. खळ्यात आल्या आल्या साऱ्या भावांनी मव्हाची मजबूत ढोसली. बोकड मारायला गनिम खाटकीला आणलं तर साऱ्या प्रकरणाचा बोभाटा व्हायचा. म्हणून बोकड त्यांनीच मारायचं ठरवलं. पण त्याना हत्यार सापडेना. त्यातच गटलूला खळ्यात कडबा कापायचा सुळा दिसला. त्यानं ओढत ओढत सुळा मोकळ्या जागेत आणला. लोखंडी दंडा वर उचलला. व दोन भावांनी बोकडाला करवती पात्यावर आडवं करताच गटलूनं जोरात दंडा कचकन दाबताच बे बे करत बोकडाची जीभ बाहेर निघत शीर एका बाजूला पडलं. बाकीच्यांनी शीर तसच पडू देत धडाला सोलत मटण केलं व भाजी शिजू लागली. दारू रिचू लागली. तमाशात वग रंगू लागला. एक वाजता सूर्यकांत चंद्रकांत खरेदीची सारी तयार कागदं घेऊन खळ्यात आले. येता येताच त्यांनी शुद्धीवर येत असलेल्या देवधरला व शालिनीला गाडीतंन बाहेर काढत ठोकायला सुरुवात केली. देवधरच्या वर्मावर लाथा पडू लागल्या. तर शालिनीच्या तोंडावर चंद्रकांत लाथा घालू लागला. "शिंच्यांनो तुमच्यामुळंच आमच्या बेबीनं आडात जीव दिलाय. आणि त्या बुढ्ढ्यानं साठ एकराची खैरात केली तुझ्या वर व त्या बांगा बदाम कृष्ण्यावर"
"चंद्रा तिची सही घे व उडव तिची मुंडकी."
सूर्यकांतनं फर्मान सोडलं.
तितक्यात तोंडावरच पट्टी निसटवत देवधरनं आरोळी ठोकायला सुरुवात केली. गटलू व बालट्या धावला त्यानी देवधरला खाली आपटत तोंड दाबलं. चंद्रकांत शालिनीची सही घेण्याची झटापट करत होता. देवधरनं तोंड मोकळं करत," शालू या कुत्र्यांना सही देऊ नको" ओरडला.
"अरे गटलू आधी याची मुंडकी उडव जर ती सही देत नसेल तर. तिचा अंगठा उठवता येइल नंतर. " सूर्यकांत ओरडला. तरी शालिनी मुठ गच्च वाळून सहीस व अंगठ्यास नकार देताच साऱ्याचं पित्त खवळलं. तितक्यात देवधरनं सुटत सुर्यकांतवर झडप घालत त्याच्या वर्म बंधात गुडघ्यानं दणका दिला. सूर्यकांत कुत्र्यासारखा विव्हळत खाली लोळू लागला. तोच चंद्रकांतनं देवधरला मागून धरत सुळावर देवधरला आडवं पाडलं. "गटल्या, बाल्ट्या हाण वरुन तो दंडा. उडव या साल्याचं मुंडकं!"
पण बोकडाचं मुंडकं उडवणाऱ्या गटलूची हिम्मत होईना. चंद्रकांत पात्यावर देवधरचं मुंडकं दाबून ठेवलंच होतं. गटलू दाबत नाही हे पाहताच सूर्यकांत तसाच उठला व त्वेषानं त्यानं सुळ्याचा लोखंडी दंडा खटाखट दोन तीन वेळा दाबला." साला मला मारतो. मार मार! "त्वेषाने आरडू लागला. देवधरचं उष्ण रक्त उडालं व बुबुळ बाहेर येत जिकडे बोकडाचं धड पडलं होतं आधी त्या बाजुला मुंडकं उडालं. दोन्ही भाऊ उन्मादानं जोर जोरानं आरोळ्या ठोकू लागले. देवधरचं धड लाथा झटकत टाचा सोलून घेत निमू लागलं. शालिनीनं थरार पाहून आक्रोश मांडला पण तमाशाच्या वगात रंगलेल्या लिंबर्डीकरांना तो ऐकुच गेला नाही. मटण रटरट आवाज करत शिजत होत. शालिनी धावली व तिनं आपले दोन्ही हात त्या भाजीत बुडवले. "घ्या मेल्यांनो सही अंगठा काय घेता! घ्या." तीच्या हाताची कातडी शिजून लोंबू लागली. सूर्य कांत व चंद्रकांत समजून चुकले आता सही अंगठा शक्य नाही. "ये आणा रे त्या कुत्रीला तिला ही उडवा. नाही सही तर नाही पण मुंडकी उडवा. गटलू व बालट्यानं पाहिलं यांच्या अंगात खून सवार आहे आता ऐकावंच लागेल. अन्यथा आपलंही खरं नाही. खळ्यात वेदनेनं व दुःखानं होरपळणाऱ्या शालिनीला पकडून सुळ्यावर आणलं व क्षणात देवधर सारखंच मुंडकं पडलं पण ते देवधरच्या लाथा झाडून शांत पडलेल्या धडाकडं.
सूर्यकांत व चंद्रकांत शांत खाली बसले पण गटलू बाटल्या साऱ्यांची दारु उतरली व ते भेदरल्या नजरेनं पाहू लागले. सूर्यकांत रावांनी त्यांना लगेच पुन्हा भरपूर पाजली. मग त्यांनी खळ्यात जुन्या काळाचा बंद केलेला पेव होता(धान्य साठवण्याची जमिनीतील मोठा रांजण वा खोली) तो उघडला. त्यात गटलू, बालट्यानं शालिनीचं धड व शीर टाकलं धडाचा धप्पकन आवाज आला. शीर पायाकडं दूर घरंगळलं. तितक्यात मागून एका भावानं देवधरचं शीर ही त्याच पेवात टाकलं ते नेमकं शालिनीच्या मानेजवळच पडलं. लगेच त्यांना सूर्यकांतनं देवधरचं धड व तिथंच पडलेलं बोकडाचं शीर उचलायला लावत सचिवालयाचं बांधकाम चालू होतं तिकडं आणलं जिथ सजाची खोली बांधली जाणार होती त्या जागेत पुरलं. वरून मातीची भर घातली. आणखी दारु पाजत जेवण करायला लावुन त्यांना गाडीत बसवलं. पण त्या आधी त्या गाडीत चंद्रकांतनं तीन सिलेंडर रेग्युलेटर लावुन नाॅब बंद करून ठेवले होते. सूर्यकांतनं गाडी कोंडाईबारी घाटाकडं हाणली. जेवणं झाल्यानं व दारुमुळं गटलूसह सारी भावंड झोपू लागली. एकडे चंद्रकांत खळ्यात कडबा पसरवून आग लावली असावी. . कारण तिचा प्रकाश दुर जाणाऱ्या गाडीत दिसू लागला. घाटात येताच गटलूच्या टोळीला नकळत हळूच सूर्यकांतनं नाॅब सुरू केला व "मी आला रे लघवी करून म्हणत घाईत निघून गेले. बालट्या धुंदीत खाली उतरला मात्र घाटाच्या वर आपण आहोत हे न कळल्यानंतर पाय घसरुन घरंगळत खाली खाली गेला पाय मोडला तितक्यात कानाचे पडदे फाडणारा धमाका झाला व अमावास्येची घाटातली पहाट भयंकर स्फोटानंतर उजळली. गटलूसह तीनही भाऊ चिथळ्या चिथळ्या होत सारं सारं जळालं. गाडी देखील. बालट्या दरीत कोसळल्याने वाचला. तो उतरल्यावर कुणी तरी उठत बिडी पेटवली असावी. म्हणून तर सूर्यकांतनं नाॅब सुरु ठेवत घाईत पळाला होता. बालट्याची सारी उतरली. तो लंगडत लंगडत सकाळी सकाळी दरीतून त्या जागेवर आला तर त्याला काहीच शिल्लक दिसलं नाही. फक्त दुर फेकला गेलेला पूरा जळून कोळसा झालेला गाडीचा सांगाडा पोलीस न्याहाळत होते. बालट्यानं आसवं गिळत जगायचं असेल तर इथंनं निघावं लागेल कायमचं असं ठरवत घाटात सुरतेला संत्रा उपसून नागपूरकडे निघालेल्या ट्रकला हात दिला. "किधर जाना है?"
"चल बाबा तुझी गाडी जिथपर्यंत जाईल तिथपर्यंत" इतकं बोलून गाडीत बसला.
बालट्यानं हे सारं कृष्णा काकडे व मुकुंदाला सांगताच सारी सारी रडू लागली. अण्णा आपल्या बहिण-मेव्हण्यासाठी तर मुकुंद आपल्या आई-वडिलांसाठी. अण्णानं मुकुंदाला जवळ घेत पोरा जे झालं ते वंगाळच पण रक्ताच्या ओढीनंच तुला कल्याण हुन लिंबर्डीला आणलं. मुकुंद हा आपला आत्याचा मुलगा म्हणूनच आपल्या दोघांचे केस सारखे हे कुंदाला कळून चुकलं.
अण्णानं परत येताच कोकणातल्या बाबाला सारं सांगितलं. बाबांनी त्यांना अमावास्येला मी येतो. विधीवत आपण ज्याचं त्याचं शीर ज्या त्या धडाजवळ पोहोचवु व इतर विधी करत त्यांना मुक्त करू असा सल्ला दिला. सारे जण अमावास्येची वाट पाहू लागले. अण्णांना पोलीसात जाऊन आणखी सूर्यकांतशी वैर वाढवायचं नव्हतं. म्हणून तूर्तास मुकुंदालाही शांत रहावयास लावलं.

क्रमशः.......
✒वासुदेव पाटील.
No comments:
Post a Comment