ही ओढ रक्ताची-Bhag 4
भाग::-चौथा
कुरळे केस...!
कुरळे केस... !
या केसांनीच तर पहिल्या भेटीतच कुंदा व मुकुंद....
मुकुंदाला तीन-चार महिन्या पुर्वीचा प्रसंग आठवला.
कल्याण वरुन केळीचं ठोपलं भरुन तो स्टेशनवर उभा होता. त्याच वेळी नाशिकला शिकत असलेली कुंदा मैत्रिणींना भेटायला कल्याणला आली होती ती आज लिंबर्डीला परतत होती. मैत्रिणी तिला स्टेशनवर सोडायला आल्या होत्या. गाडीची प्रतिक्षा करत असलेल्या कुंदाचं लक्ष मुकुंदकडे व मुकुंदचं लक्ष कुंदाकडं गेलं व दोघं एकमेकांकडे पाहतच राहिली. आपल्या सारखेच कुरळे केस पाहुन दोघेही अचंबीत झाले. मध्यंतरी एक पोरगं केळ घ्यायला आलं तरी मुकुंदचं तिकडे लक्षच नव्हते तर कुंदालाही मैत्रिणी काय सांगता आहेत कडं ध्यान नव्हतं.
"काय गं एवढं एकटक काय पाहतेय त्या केळवाल्या पोराकडं?" एकीनं विचारताच कुंदा भानावर येत "कुठं काय?" म्हणतस्मित हास्य केलं.
"अगं सांभाळ हं तुला एकटीला प्रवास करायचाय. ह्या फेरीवाल्यापासून सावध रहा" दुसरीनं तिला सावध करत म्हटलं.
"काही नाही गं त्याचे व माझे केस सारखेच आहेत बघ, तेच पाहत होते. "
तितक्यात मुकुंदला काॅल आला.
"बोल रे मुकुंद बोलतोय, काय म्हणतो"
"........"
"अरे तलाठीच्या मुलाखतीला चाललो धुळ्याला"
"... ......."
" बर करतो नंतर तुला काॅल"म्हणत मुकुंदानं काॅल कट केला.
"बघ गं कुंदा किती छपरी देतोय तो इथं केळ विकतोय नी फोनवरती मुलाखतीला चाललोय सांगतोय! असे फसवे असतात."
कुंदालाही त्याची लबाडी पाहुन आता पर्यंत वाटणारं कुतूहल जाऊन तिरस्काराची भावना निर्माण झाली. तितक्यात गाडी आली व ती आरक्षीत जागेवर बसली. डब्यात इतकी गर्दी नव्हती. पण छछोरी चारपाच पोरं विना तिकीट डब्यात घुसली होती. मुकुंद जनरल डब्यात केळ विकत फिरू लागला. शहापूर येईपर्यंत त्यानं सर्व केळी विकली व टोपलं त्याच स्टेशन मध्ये ठेवलं. तितक्यात कुंदा उतरून जनरल डब्यात चढली. कुंदा पाठोपाठ छछोरी पोरं ही चढली. व कुंदाला खेटू लागली. नाशिक येईपर्यंत तोच प्रकार चालला. ती पोर ढकलत ढकलत कुंदाला दरवाज्याकडे नेऊ पाहत होती. जेणेकरून त्यांच्यावर सूर्यकांतरावानी सोपवलेली जबाबदारी पार पाडणं सोपं जाणार होतं. कुंदा आता घाबरायला लागली. तीनं परत जनरलचा डबा बदलून दुसऱ्या डब्यात आली व रेल्वे पुलीस पाहू लागली. इतपत रात्रीचा एक वाजण्यात आला असावा. तितक्यात गर्दीत तिला मुकुंदा दिसला. आता त्याच्या जवळ केळीचं टोपलं नव्हतं. तिला आता वाटू लागलं खरच हा मुलाखतीला जात असावा. अन्यथा केळी विकल्यावर माघारी फिरला असता. छछोरी पोरांचा त्रास व रात्रीची वेळ. पोरं तर मागावरच होती. ती परत येऊ लागताच तिनं "मुकुंदा काय रे इकडं कुठं? कुठं जातोय?" सरळ विचारत ती त्याच्या जवळच सरकली.
क्षणभर मुकुंदाला विश्वासच वाटेना. ओळख नसतांना ही थेट नावानं पुकारतेय? तो गोंधळला. तितक्यात ती कानात कुजबुजली. "माफ करा आपली ओळख नाही. पण मघासी कल्याण ला मोबाईल वर बोलतांना मी आपलं नाव ऐकलं होतं. मला ही माणसं त्रास देताय मलाही धुळ्यालाच जायचंय, मदत करा प्लीज". एका दमात हळू आवाजात कुंदानं सांगताच मुकुंदानं प्रसंग ओळखून तिला जागा करून देत बसवलं व तो मध्ये उभा राहिला. छछोरी पोरं पुढं सरकली पण आडवा येणाऱ्या मुकुंदाला पाहताच चवताळली. मुकुंदानं मोबाईल करत मध्य रेल्वे लाईनवर चालणाऱ्या फेरीवाल्या ओळखीच्या मित्रांना बोलावलं पुढच्या थांब्यावर दोन चार मित्र इतर डब्यातून उतरत आली. तेव्हा त्या छछोरी पोरांनी काढता पाय घेतला. सूर्यकांतरावास फोन करत मुलीसारखा कुरळ्या केसाचा तिचा भाऊ आहे तिच्या सोबत असं सांगताच सूर्यकांत संतापत"मुर्खांनो तिला भाऊ नाहीच कोणी तरी असेल तिच्या सोबत हवं तर त्याला ही फेका किंवा चाळीसगावला ती उतरेल तिथंच....... पण मला रिझल्ट हवाय" अशी धमकावणी दिली. चाळीसगावला उतरताच ती पोरं पुन्हा पाठलाग करु लागली. आता कुंदानं मुकुंदाचा हात घट्ट धरला होता. ती भयभीत झाली होती. गाडी विस मिनीटात हलणार होती. तितक्या वेळातच कुंदाचा गेम करुन त्या पोरांना तीच रेल्वे पकडत पुढे जायचं होतं त्यामुळं ती घाईला आली होती. मुकुंदा मात्र आड येत होता. स्टेशनमधून बाहेर निघताच ती आक्रमण करणार हे मुकुंदानं ओळखता मुकुंदानं कुंदाला घेत परत स्टेशनात गर्दीच्या ठिकाणी आला. येतांना वाटेतल्या एका गॅरेज च्या बाहेर पडलेला लोखंडी राॅड त्यानं हातात घेतला. मागून दोघांनी धरण्याचा प्रयत्न करणार तोच यानं एकाच्या डोक्यात राॅड हाणला. पोरगं मारोतीगत रक्तबंबाळ झाला. मुकुंदा व कुंदा स्टेशनवरच्या तुरळक गर्दीत आली. तोच गाडीनं शिटी दिली नी पोरं सूर्यकांतरावांनी सोपवलेलं काम अर्धवट टाकत गाडीत बसली. ते पाहताच मुकुंदाला हायसं वाटलं तर कुंदानं त्याला गच्च मिठी मारली व आपसुक मुकुंदाचा सात्वनपर हात तिच्या पाठीवरनं फिरु लागला.नभात नियतीचा चंद्र हासत धावत होता. सातच्या रेल्वेने ती दोघं लाजत लाजतच धुळ्याला उतरली. मुकुंद मागेच राहिला. कारण उतरताना मोबाईल कुठंतरी पडला. तो शोधण्यात बराच वेळ गेला. तोच कृष्णा अण्णाची गाडी स्टेशनबाहेर उभीच होती. कुंदा मागे पाहत पाहत गाडीत बसली. पाच मिनीट वाट पाहुनी मुकुंद आला नाही. शेवटी गाडी निघाली. तिला वाटलं नंबर घेतलाय करेल तो फोन.
मुलाखत देऊन मुकुंद परत गेला पण मोबाईलच हरवल्यानंतर व तिनं याचा नंबर घेतला नसल्याने ताटातूट झाली. योगायोगानं मुकुंदाला तेच गाव मिळाल्याने कुंदा भेटलीच.
मुकुंदाला सारं आठवलं.
झडी सरली तसा तो कामाला लागला. त्या रात्रीच्या प्रसंगानंतर त्याच्या सोबत सारेच घाबरले होते. तरीपण त्यानं सजा नव्या सचिवालयात नेला. पण कृष्णा अण्णानं कोकणातून एका बाबास आणलं त्यांनी दोन्ही वास्तू पाहिल्या. कोणास चेहरा दिसला का? व या वास्तूत आधी काही विपरीत घडलं का? याबाबत विचारणा केली. परंतु शीर बोकडाचं असलेली आकृती भिमानं पाहिली होती व बुराई बंगल्यात ही पाठमोरी आकृती भिमानं व सर्कलनं पाहिली असल्यानं उलगडा होईना. काही सोपस्कार करत तूर्तास दिवसा काहीच भिती नाही पण रात्री या ठिकाणी येणं टाळा मी येत्या अमावास्येला येईन मग काय करायचं ते पाहू. तो पर्यंत या वास्तूत काय घडलं याचा उलगडा झाला तर लवकरच काहीतरी शाश्वत उपाय करता येईल असं सांगत निघून गेला.
मुकुंदानं सर्व नुकसानीचे पंचनामे करत झपाटून कामाला लागला. तोच शासनस्तरावरून अभ्यासदौऱ्याचं आयोजन झालं. सरपंच, सदस्य, कृष्णा अण्णा, गावातील शेतकरी, तलाठी, सर्कल सारी नागपूरला संत्री लागवड, उत्पादन व प्रक्रिया याचा अभ्यास करण्यासाठी लक्झरीनं निघाली. कुंदा व मुकुंदाच्या तर मनात आनंदाच्या उकळ्या फुटू लागल्या. जळगाव, अजिंठा, शेगाव करत सारी संत्रानगरीत पोहोचली.
संध्याकाळी बाजारात फिरत जो तो किरकोळ खरेदी करण्यात गुंग असतांना कुंदा व मुकुंद मुद्दाम माघारले. एका ठिकाणी दोघांनी ज्यूस घेतला. मुकुंदानं बील पेड करण्यासाठी वालेट काढलं. जवळच एक भिकारी बसला होता. त्यालाही दहाची नोट दिली. व वालेट खिशात ठेवलं. सारं लक्ष कुंदाकडच असल्यानं त्या घाई गरबडीत काही तरी खाली पडल्याचं त्याच्या नाही पण भिकाऱ्याच्या लक्षात आलं. भिकारी उठला व
पडलेला फोटो उचलला. सुलट करून तो मुकुंदा कडं जाऊ लागला. पण त्या फोटोवर लक्ष जाताच तो पुन्हा पुन्हा फोटो पाहू लागला. त्याचा त्याच्या डोळ्यावर विश्वासच बसेना. 'शालिनी व दामोदरचा फोटो तो डोळे वटारून वटारुन पाहत होता.
"साहेब हा फोटो पडला तुमच्या पाकीटातनं. साहेब एक विचारू का? कोण आहेत हे तुमचे? " भिकाऱ्यानं भित भित विचारलं.
"आण बाबा तो फोटो. काय करणार तु जाणून ते! ते मलाच आठवत नाही स्पष्टसे. आई-वडील आहेत ते माझे" मुकुंदानं सांगत फोटो घेणार तोच कृष्णा अण्णा त्यांना शोधत आला. भिकाऱ्याशी बोलतांना पाहताच ते भिकाऱ्याकडं पुन्हा पुन्हा पाहु लागले तोच भिकारी अण्णाच्या पायाला बिलगत रडू लागला" अण्णा मी खंडोजी बापुचा व तुमचा गुन्हेगार आहे. विस वर्षात मला माझ्या कर्माची फळ मिळालीच पण तरी आपण जी शिक्षा द्याल ती मला मान्य आहे पण मला पदरात घ्या".
कृष्णा अण्णाला हा भिकारी कोण व आपल्या ला कसं ओळखतो हे कळेचना. त्यांनी त्याला उठवत उभं केलं व निरखुन पाहिलं त्यांना ओळख पटू लागली.
" बालट्या तू? आणि इतक्या वर्षापासून तुम्ही पाचही भावंडं गायबच झालीत रं. तर तू आज या स्थितीत? आणि काय बोलतोय हे? आमचा काय गुन्हा केलास बाबा की आम्ही तुला माफ करावं" अण्णा विचारते झाले. "
तोच मुकुंदा आणखी गांगरला" अण्णा हा काय प्रकार? हा माणुस तुम्हाला ही ओळखतो आणि माझ्या आई-वडिलांना देखील ओळखतो?" असं म्हणत असतांनाच अण्णाला मुकुंदाच्या हातातला फोटो दिसला. अण्णांनी तो हातातुन घेत पाहताच त्यांना आणखी धक्का बसला. आपली बहिण शालीनी!
"अप्पा हा फोटो तुमच्या कडं? अण्णांनी आश्चर्यानं विचारलं व सारा उलगडा झाला.
'एम. डी. माने....' 'मुकुंदा देवधर माने' म्हणजेच हा आपला भाचा. पण आपली बहिण व देवधररावाचं काय. गायब झालीत लग्नानंतर. आपण तर आशाच सोडली. मग हा जर भाचा असेल तर त्यांचं काय?
मुकुंदालाही हेच प्रश्न सतावत होते. आणि हा सारा गुंथन काला बालट्याच सोडवणार होता.
शालिनी देवधर...?
सचिवालय बुराई बंगला?
बालट्या ची गुन्हेगारी म्हणून कबुली?
आणि..
सूर्यकांत चंद्रकांत....?

क्रमश.....
✒वासुदेव पाटील.
No comments:
Post a Comment