भाग::-तिसरा
गाडी सुटताच मिनानं जनरल डब्यात जशी तशी बसण्यास जागा मिळवताच जग जिंकल्याच्या अविर्भावात ती खिडकीजवळ बसली.गावाला जायचं म्हणुन तयारी व विचार यानं रात्री होस्टेल वर झोप लागलीच नव्हती व पहाटे लवकर उठल्यानं जागरणानं तिने डोळे मिटणं पसंद केलं.डोळे मिटताच तिच्या मनात किसना घिरट्या घालू लागला. किसनाची व आपली ओळख केवळ दोन वर्षाची.पण याचा लाघवपणात काय जादू आहे.अगदी आपलं हक्काचं माणूस वाटावा इतपत त्याचा आपणास आधार वाटतो.त्याच्या ढोलकीत तर अशी जादू आहे की आपलं गाणं ही त्या सोबत बहरतं.त्याच्या ढोलकीत आपणास फडमालक गणा काकाच ढोलकी वाजवल्याचा भास होतो.गणा काकासही हा ढोलकीत पुरुन उरेल नक्की.पण आपल्याला वाटतं तसं त्याला वाटतं का?का आपणास उगीच ....?पण तसा तो नकारही देत नाही आणि आपण प्रयत्न केला तरी ताकास तूर लागू देत नाही.पण काहीही असो उभा जन्म ओवाळावा असाच उमदा आहे किसना!
मध्यतंरी एक पोरगं हातातली ताटली वाजवत 'चढता सुरज धिरे धिरे...'गात होता.मिना किसनाच्या तंद्रीतून बाहेर येत तिला आपलं फडावरील गाणं आठवलं.वयाच्या आठव्या वर्षापासुन पावसाळ्यात शाळा व पाच -सहा महिने गावोगावी फिरत फडावर गाणं.असं करत करत शिक्षण सुरु.आपल्या गायनातली पोहोच ओळखुन बापुची इच्छा नसतांनाही गणा काकांनी आपल्यास मुंबई विद्यापीठात गायन स्पेशीलायझेशन घेत संगीतात पदवीला पाठवलं.गणा काकाचं सारं आयुष्य आपणास बापुनं सांगितलंय व आपण ही अनुभवलंय.कला अंगा अंगात भिनलीय पण तरी संघर्ष करूनही त्यांचं स्वप्न पुरं होत नाही याचंच बापूस दु:ख.
मिनाचे डोळे पुन्हा मिटू लागले.
गणा काका तुरुंगात जाताच फडातील लोक झाड पडावं नी पाखरांनी साथ सोडत उडुन जावं तसंच फडातील लोक पांगले.त्यातील बऱ्याच लोकांना नात्यानं आपली आत्या असणारी पारोबाईजीनंच पळवले.बापुनं आपण दोन्ही बहिणी व प्रभू ला घेत दुसरा फड गाठला.त्यावेळेस तर खूपच हाल होते.पावसाळ्यात तर फड बंद म्हणजे हालत आणखीच बिघडे..बापुनी प्रभूच्या शिक्षणास सुरुवात गेली.पण यात्रा सुरु झाल्या की शाळा बुडवून फडावरचं शिक्षण सुरु होई.
शिक्षा भोगून बाहेर गणा काका आले ते पार खंगूनच.तर पारो बाईजींनी प्रतापरावाच्या मदतीवर सुरु केलीली संगीत बारी महाराष्ट्रात धूम माजवत होती.बाईजीच्या ढोलकीनं रसिक घायाळ होत.ज्या ठिकाणी बारी असे त्या ठिकाणी पंधरा -वीस मैलावरून लोक बैलगाडीन गर्दी करत.गणा काका व बापूंनी एकत्र येत पुढे काय याबाबत सल्ला मसलत केली.
"गणा दादा आता स्वत:चा फड उभारणं नाही जमणार.दुसऱ्या फडात काम करूनच गुजराण करावं लागेल."
बापूनं गणाकाकास समजावण्याचा प्रयत्न केला.
"बापू तू जर सोबत आला तर फड उभा झाला समज"
"गणा! हा बापू मोरंबीकरास मरण देखील तुझ्या सोबतच फडावर आलं तर तो जिवनाचं सार्थक झालं असंच समजेल.सोडून जायचं असतं तर कव्हाचा पारीच्या बारीत दाखल झाला असता.तो प्रश्न नाही.पण आता फड कसा उभा करणार?"
"बापू ते माझ्यावर सोड.या पारीसाठी आणि गेलीली इज्जत परत मिळवण्यासाठी असले फड छप्पनदा उभं करीन मी!"
बापू गणाच्या भात्यागत हालणाऱ्या छातीकडं पाहत होता.वाघ शरीरानं थकलाय पण मनात अजुन तीच धमक हाय,हे बापूला कळून चुकलं.
"गणादा तसं असेल तर आर्थिक गणित कसं जमायचं रं?"
"बापू गावाकडं सातबाऱ्यावर तीन चार बिघ्याचा काळजाचा घड आहे तो गहाण ठेवतो प्रसंगी विकतो हवं तर.फक्त तु मला साथ दे."
"मग तर कलाकारांना जमवणं माझ्यावर सोड गणा दा.पंधरा दिवसात माणसं जमवतो"बापुनही विश्वास दिला.
खरच पुढच्या पंधरा दिवसात गणा काकाचा फड उभा राहिला व पहिला वग ज्या वाडीत पारीनं फड मोडुन गणाकाकाची इज्जत घालवली त्या वाडीतच फुकट करायचं गणा काकानं ठरवलं नी बापूचे हातपाय गळाले.
"गणादा एवढी मोठी जोखीम नको घेऊ,दुसऱ्या वाडीत शुभारंभ करु"
बापू गणावर विश्वास नाही वाटत का तुला?"
"तसं नाही. पण....?
"मग पण बिन काही नाही फड तिथंच होईल"गणाकाका ठामपणे म्हणाले.
त्या दिवसापासुन गणा काकाची ढोलकी वग व सोंगाड्या तर बापुचं स्री पात्र पारो बाईच्या बारीचे ठोके वाढवू लागला.बऱ्याच जत्रेत गणाकाकाचा फड व पारोबाईजीची बारी समोरा समोर ठाकु लागली. त्या दिवशी गणा वाघागत तुटून पडे.पारोबाईची ढोलकी ची चाटी टिपेला पोहोचली की इकडे गणाकाकाची ढोलकीचा घुमारा घुमे . जुगलबंदीत रसिक रंगून जात व द्विधेत पडत की गणाच्या ढोलकीतला पहाडी,रांगडी स्वर ऐकावा की पारीचया ढोलकीचा कलाकुसरीचा नजाकतीचा स्वर?
नी मग उत्तररात्रीत गणाला वगात पाहतांना बारीची गर्दी गणाच्या फडाकडं वळे.दोन तीन वर्षातच गणानं फड पुर्णत्वास आणुन बारीच्या तोडीचा केला.
पण पारो बाई अव्वाच्या सव्वा पगार देत कसलेल्या कलाकारांना आणे.व बारीतही नवनवीन संगित साधनं आणु लागली.गणा काकाची परिस्थीती हलाखीची म्हणुन कलाकारांना पुरेसा पगार जेमतेम पुरवत. म्हणुन कलाकाराची वाणवा होऊ लागली. तरी केवळ आपल्यातला सोंगाड्या,ढोलकीवादक,व वगातला अभिनय या जोरावर ते तग टिकवत पारोबाईजीस टक्कर देतच होते.
पारोबाईनी स्री कलाकाराचा ताफा वाढवत बैठकीची लावणी ,खडी लावणी कलाकार महाराष्ट्रातून गोळा करुन गणाकाकांना आव्हान उभं केलं.मग काकांनी प्रभु व आपली मोठी बहिण सुलू यांना प्रशिक्षण देत फडावर उभं करायला सुरुवात केलं.प्रभु ही काकाचे जन्मजात गुण घेऊन आला होता.सोंगाड्या व वगातलं काम असं काही उठवे की लोक त्यास दुसरा गणा काकाच समजत.सुलू ला बापु व काकांनी उत्कृष्ठ डान्सर घडवलं.स्टेजवर प्रभूचे विनोद व सुलूचा डान्स धमाल गर्दी खेचू लागला.पारोबाईचं व गणाकाकाचं प्रकरण लोक आता विसरू लागले व प्रभूला त्या ठायी पाहू लागले.पण काकांना भविष्यातील वेध माहीत होते. घरचा गायक असावा म्हणुनच त्यांनी मला मुंबई विद्यापीठात पाठवलं होतं.
दौंड आलं.मिनाला फडाची जागा सालाबादप्रमाणे माहीतच होती.ती शोधायला जड गेली नाही.अचानक बोलावण्याचं कारण की फडात गायक म्हणुन काम करणाऱ्या जोडप्यालाच पारोबाईनं फोडून पळवलं होतं.काकांना पश्चाताप वाटत होता. "आपण कोणतेही कलाकार भर्ती करावेत,त्यांना तासुन पैलू पाडावेत व तेच पगारासाठी धोका देतात.काय करावं कळत नाही!कोणावर विश्वास ठेवावा?.म्हणुन आता तुझं काॅलेज बंद पोरी .दोन वर्षात तु बरच शिकली असशील.शिवाय फडावरचे अनुभव आहेतच व तु बापुंची पोर आहेस तुला शिकवायची गरजच नाही पडणार.आजपासुन गायनाची बाजू तू सांभाळ."
'काॅलेज बंद!ऐकताच किसनाची ताटातुट या विचारानं अंगावर काटाच आला.मिनाला क्षणभर सरळ स्पष्ट शब्दात नकार द्यावा असं आलं ही'.
तितक्यात बावरलेली मिना पाहताच "पोरी तुझी इच्छा नसेल तर तु नकार ही देऊ शकतेश.पण मला नाही वाटत सच्च्या कलाकाराच्या पिलास जास्त शिकवायची गरज भासेल.
काकांचा संघर्ष व कलेसाठीचं वाहुन घेणं माहीत असल्यानं दुसऱ्या दिवसापासून फडावर गायन सुरु झालं.त्याच सिझन मध्ये प्रभू व सुलूचं लग्न करवून बापु व काका नात्यात अडकले.
पारोबाईच्या बारीशी संघर्ष सुरुच होता.
प्रभू व सुलुचं लग्न होताच काही महिन्यातच प्रभू व सुलू सुस्तावले व फडाच्या कामावरचं लक्ष उडालं.हाडाच्या कलाकार गणा काकाच्या लगेच लक्षात आलं.त्यांना प्रभू व सुलूत काही तरी वेगळ्याच हालचाली जाणवू लागल्या.हल्ली त्यांच्या ढोलकीतही पुर्वीचा जोश, बदला, सुड घेण्यासाठीचं जीव तोडून वाजवणं कमी झालं.पण प्रभुचं लक्ष कमी होताच त्यांना आपलं हरवलेलं काही तरी आठवू लागलं.त्याच आशेवर ते फडावर रोज ढोलकी वाजवत होते पण त्यात आता तिव्रता वाढू लागली.त्यांच्या वाजवण्यात आता रसिकांना जुगलबंदी पेक्षा कुणाला तरी आर्त साद घालणं जाणवू लागलं.ढोलकी आतुन खुपच खोल खोल कुणाला तरी जीव तोडून बोलवतेय अशी रसिकांना खिळवून ठेवणारी बाब प्रकर्षणानं जाणवू लागलं.त्यामुळं लोक ढोलकी साठी पुन्हा गर्दी करु लागले.त्यातच किसनाच्या आठवणीने मिनाच्या गायनात ही दुख:ची किनार उमटू लागली.म्हणुन प्रभु व सुलुच्या दुर्लक्षाचा परिणाम तेवढा जाणवला नाही.
पण इकडं पारोबाई आता आपल्या पोरी-सनाला बारीत न आणता आॅर्केस्टाच सुरू करायचा व सनाला लाॅंच करायचा बेत आखत गणाच्या फडाचं कंबरडंच मोडायचा प्लॅन तयार करू लागली.
गणाला याची भणक लागली.आॅर्केस्टा काढणं आपणास शक्य नाही कारण फड उभारतांना गहाण ठेवलेली जमीन नंतर व्याजात व फड चालवतांनाच विकली गेली .आता पैसा उभारणं शक्य नाही.आॅर्केस्टा पुढं फड चालवायचा म्हणजे नविन दमाचे नविन कौशल्याचे कलाकार हवेत. प्रभूनं आपले गुण उचलले पण ढोलकी त्याला पेललीच नाही.शिवाय लग्नानंतर तो ही ढिलाई करतोय.त्यात पारोची मुलगी स्पर्धेत उतरतेय....आपलं काय?
आपल्या ढोलकीची साद का ऐकू जात नाही?ढोलकी बोलवतेय तो कुठाय?देवा !अलक्षा !पार्वतीच्या शब्दबंधनात अडकवून ठेवलास मला.अन्यथा शोधलाही असता.

.
.
.
.
ढोलकी ज्याला साद घालत होती तो किसना मात्र सनाच्या पलटवार नजरेत अडकत चालला होता.

क्रमशः.......
✒वासुदेव पाटील.
No comments:
Post a Comment