आता पाऊस बर्यापैकी थांबलेला होता..थोडावेळ स्पीडने गाडी दामटल्यानंतर रॉकीचे लक्ष खिडकीतुन बाहेर गेले आणी बाहेरील द्रुश्य पाहून भितीने त्याचे हातपायच गळाले..बाहेर पाहतो तर तोच म्हातारा त्याच्या सायकलवर बसून अंत्यत वेगाने त्याच्या कारचा पाठलाग करताना त्याला दिसून आला..विशेष म्हणजे रॉकीने कार कितीही स्पीडने पळवली तरी कारच्या समांतर पळत असलेल्या म्हातार्याच्या सायकलला तो जरासुद्धा मागे टाकू शकत नव्हता.. थोड्याच वेळात म्हातार्याने सायकलवरूनच एका हाताने धावत्या कारचा दरवाजा खोलला आणी अगदी आरामात आत येत रॉकीच्या शेजारच्या सिटवर येऊन व्यवस्थित रेलून बसला..हे विस्मयकारी द्रुश्य रॉकी डोळे फाडुन पाहत होता..😨
“तुला काय वाटल होत..एवढ्या सहजासहजी माझ्या तावडीतून सुटशील व्हय तु..आरं आज आमावस्येची रात हाये..आजच्या रातीला हायवेवर तुझ्यासारख्या जिवंत माणसांपेक्षा पण आमच्या सारख्यांचाच जास्त वावर असतो हितं”
असे बोलून म्हातारा मोठमोठ्याने हसू लागला..हसताना त्याच्या तोंडातून रक्ताचे काही थेंब उडून रॉकीच्या अंगावर पडले..
रॉकीला आता पुढे काय करावे हे समजत नव्हते..तो फक्त घाबरलेल्या चेहर्याने कधी म्हातार्याकडे तर कधी कारच्या बाहेरील काळोखाकडे आणी झाडांकडे पाहत होता..म्हातारा मात्र रॉकीला जास्तीत जास्त घाबरवण्याचा प्रयत्न करून त्याच्या मनात अजून जास्त भिती निर्माण करु पाहत असावा..त्यामुळेच त्याचे मोठ्या आवाजातील बोलणे सुरुच होते.

“जवापासून हा हायवे तयार झालाय तवापासून यावर दरमहिन्याला अपघातामंदी एकातरी माणसाचा जीव जात असतो..कधी गाडी चालवणारा स्वतःच्या चूकीने स्वताचाच जीव गमावतो तर कधी त्याच्या समोरील माणसाचा जीव घेतो..पण अशा अपघातामंदी वेळेच्या आधीच मरण आलेल्या आमच्या सारख्या माणसांची जगण्याची ईच्छा आणी शरीराचा मोह काही लवकर सुटत नाही.. आणी मग आमचे आत्मे असेच हायवेवर भटकत राहतात..
अमावस्येच्या रातीला तर आमच्यासारख्यांची जत्राच भरते इथे हायवेवर.. 👻
इथल्या सुसाट वेगान पळणार्या गाड्या खूप आवडतात आम्हांला. त्यांच्यासमोर जावून पुन्हापुन्हा स्वताला धडक मारून घेतो आम्ही, हाच आमचा खेळ जो दर अमावस्येला रंगतो..पण हे हायवेवर भटकणारे आत्मे कुठल्याच जिवंत माणसांना दिसत नसतात..तरी पण मी मात्र तुला एकट्यालाच दिसलो कारण तुझ्याकडून मला जूना हिसोब चूकता करायचा हाये, आतापण मला समोर जे काही दिसतेय ते तुला दिसत नाहीये...कुठल्याच जिवंत माणसाला दिसत नाहीये..नाहीतर थांब तुलापण दाखवतो, नाहीतरी थोड्यावेळानं तु पण आमच्यासारखाच होणार हायेस की..हे बघ आता समोर”

म्हातार्याने त्याच्या दोन्ही हातांनी गाडीची समोरची काच पुसली.. रॉकी डोळे आणी तोंड वासून समोर पाहू लागला..त्याला आता त्याच्या समोरील हायवे काहिसा वेगळाच दिसायला लागला होता..
समोर काही अंतरावर रस्त्याच्या कडेला दोन लहान बारा-तेरा वर्षाची शाळकरी मुलं एकमेकांच्या हातात हात घालून कारकडे पाहत ऊभी होती..एवढ्या मध्यरात्रीला हायवेवर ही शाळेचा गणवेश घातलेली आणी पाठीवर बँग अडकवलेली मुले काय करत असतील असा विचार रॉकीच्या मनात आला,आणी तो त्यांच्याकडे पाहतच राहिला..त्या दोन्ही मुलांच्या चेहर्यावर विचित्र हास्य होते..त्यांची नजर वेगाने येत असलेल्या रॉकीच्या कारवर होती.. आणी कार जवळ येताच अचानकच ती दोन मुले रस्त्यावर धावली..रॉकीने जोरात ब्रेक दाबला पण गाडीला थोडाही ब्रेक लागला नाही..दोन्ही मुलांना जोराची धडक बसून ती दोघे दूर भिरकावले गेले..हे सगळे पाहून रॉकी तर जाम घाबरला, आश्चर्यचकीत होऊन तो त्या मुलांकडे पाहत राहिला..दोन्ही मुले अंग झडकत पुन्हा उठली अंगावरचे रक्त-जखमा हातांनी पुसत पुन्हा एकमेकांच्या हातात हात घालून रस्त्याच्या कडेला जाऊन ऊभी राहिली..👬

रॉकीने म्हातार्याकडे पाहिले..म्हातार्याच्या चेहर्यावर कोणतेच भाव नव्हते..
“हे..हे काय आहे? कोण होती ती मुले?” रॉकीने घाबरत विचारले.
“हे..हे काय आहे? कोण होती ती मुले?” रॉकीने घाबरत विचारले.
“हे दोघजण सोमा आणी सुरेश आहेत..या पलीकडच्या गावातल्या शाळात शिकायला होते .. तीन वर्षापूर्वी शाळा सूटल्यावर सांजच्याला ती दोघ त्यांच्या घराकड जायला निघाली होती पण हायवे क्रॉस करत असताना एका बेफाम वाहनाने दोघांनापण चिरडले होते”
कार अजून काही अंतर पुढे जात नाही तर एक लाल साडी नेसलेली आणी डोक्यावर मोठी वाताची टोपली घेतलेली एक स्री अचानक कुठूनतरी हायवेवर आडवी आली आणी वेगात असलेल्या रॉकीच्या कारला धडकून रस्त्याच्या कडेला ओल्या मातीमध्ये जाऊन पडली..आणी जशी पडली तशीच जमीनीवर झोपून राहिली.
“ही रखमाबाई, डोस्क्यावरच्या टोपलीतून आजूबाजूच्या गावात दूध, दही विकायची..पाच वर्षापुर्वी कुठल्यातरी वाहनाने हिला ठोकर मारून हिचा जीव घेतला होता.. तेवापासून ही पण अमावस्येला हायवेवरच भटकत असते” म्हातार्याने रॉकीचे शंकानिरसन केले.
रॉकीला स्वतच्या डोळ्यांवर विश्वास बसत नव्हता..
“हा असा खेळ कशासाठी खेळता पण तुम्ही म्रुतात्मे? आणी.. माझ्या कारचा ब्रेक का लागत नाहीये?..काय केलय तुम्ही?”
भेदरलेल्या आवाजात त्याने विचारले.🚘
“हा असा खेळ कशासाठी खेळता पण तुम्ही म्रुतात्मे? आणी.. माझ्या कारचा ब्रेक का लागत नाहीये?..काय केलय तुम्ही?”
भेदरलेल्या आवाजात त्याने विचारले.🚘
“तुम्हा जिवंत लोकांना जसा सुखामध्ये आनंद वाटतो ना, तसच आम्हा म्रूत लोकांना दुखाःमध्ये आणी वेदनांमध्ये आनंद वाटतो..
तु जेव्हा आमच्यामध्ये येशील, आमच्यापैकीच एक होशील तेव्हा तुलापण समद समजेल आपोआप...आणी राहिली बिरेकची गोष्ट तर आता तुझ्या गाडीचा बिरेक कधीच लागणार नाही..त्यामुळ त्याची फिकीर तु करूच नगस”
तु जेव्हा आमच्यामध्ये येशील, आमच्यापैकीच एक होशील तेव्हा तुलापण समद समजेल आपोआप...आणी राहिली बिरेकची गोष्ट तर आता तुझ्या गाडीचा बिरेक कधीच लागणार नाही..त्यामुळ त्याची फिकीर तु करूच नगस”
म्हातार्याचे स्पष्ट बोलणे ऐकून रॉकीच्या काळजाचा थरकाप उडाला होता...तो म्हातार्याकडे सुटकेसाठी विनवणी करू लागला.. तेवढ्यात त्याच्या समोर हायवेवरचे द्रूश्य पाहुन भितीने त्याची किंकाळी बाहेर पडली..
समोर एक डोक्यापासून ते पायापर्यंत पुर्ण रक्ताने ओथंबलेला एक व्यक्ती उभा होता..त्याचे हात पाय वाकडे झालेले होते.. चेहरा तर पुर्णच चपटा झालेला दिसत होता..एखाद्या वजनदार वाहनाचे मोठे चाक त्याच्या चेहर्यावरून गेलेले असावे...इकडेतिकडे झोकांड्या खात तो भररस्त्यात उभा होता.. रॉकीच्या कारचा ब्रेक तर लागणारच नव्हता..कार त्याच्या जवळ येताच त्याने एकदम उडी मारली आणी कारच्या समोरील बोनेटवर गुढगे रोवून बसला..त्याचे दोन्ही रक्ताळलेले वाकडे हात तो समोरील काचेवर दणादण आपटत होता.. हे भयंकर द्रुश्य पाहुन रॉकीला चक्कर आल्यासारखी झाली..कार अशीच सोडून देऊन बाहेर पळून जाण्याची त्याला ईच्छा होत होती, त्याने खिडकीतुन बाहेर पाहिले तर एक मोठेलठ्ठ जाडजूड कुत्रे त्याच्याकडे पाहून भुंकत कारच्या बाजूबाजूने पळत असलेले त्याला दिसले..त्या कुत्राचा जबडा पुर्णपणे फाटलेला होता आणी त्याच्या फुटलेल्या पोटातील आतडी बाहेर रस्त्यावर लांबपर्यंत लोंबलेली दिसत होती..त्या कुत्र्याचे लालभडक डोळे आणी भयानक रूप पाहून रॉकीला कारच्या बाहेर पडण्याची हिंमतच झाली नाही.💀
थोड्यावेळात बोनेटवर बसलेला तो रक्तबंबाळ व्यक्ती रस्त्यावर उडी मारून बाजूला झाला..रॉकीला जरासे हायसे वाटले पण थोडावेळच..कारण त्याने समोर पाहिले तर पुढे रस्त्यावर वीस वाबीस स्री पुरुष घोळका करून उभे असलेले त्याला दिसून आले.. आता पुढे काय काय पाहायला मिळेल या कल्पनेनेच रॉकी सून्न झाला होता..
“मागच्याच वर्षीची गोष्ट आहे.. माणसे गच्च भरून लग्नाला निघालेल्या टेम्पोचा ऐक्सीटेंड होऊन बरीच माणस या स्पॉटवर मेली होती..पेपरमंदी बातमीपण वाचली असेल कदाचित तु?” 🚚
रॉकीच्या कानावर म्हातार्याचे वाक्य पडले..
रॉकीच्या कानावर म्हातार्याचे वाक्य पडले..
ब्रेक फेल झालेली कार सुसाट वेगाने त्या घोळक्याच्या दिशेने गेली आणी ते सगळेच कारकडे धावले..कोणी स्वताला कारच्या समोर झोकून देऊ लागले तर कोणी धडकून बाजूला पडल्यानंतरही ऊठून परत कारकडे धावू लागले.. काहीजणांनी तर कारला हातांनी घट्ट पकडून धरले आणी डांबरी रस्त्यावरून वेगाने फरफटत जावू लागले..हिरव्या साडीतील एका तरुण स्री तर कारच्या समोरच रस्त्यावर झोपली.. गाडीचे चाक तिच्या अंगावरून जाताना काडकन हाडके मोडण्याचा आवाज आला.. म्रुतात्म्यांचा हा भयानक खेळ पाहून रॉकीला वेड लागण्याची वेळ आली होती.. हायवेवर चाललेल्या भीषण आरडाओरडा आणी गोंधळाने त्याचे कान बधीर झाले होते.. कारची पुढची काच तर पाणीमिश्रीत चिखल आणी रक्तांच्या चिळकांड्या उडुन पुर्णपणे लाल रंगाने भरून गेली होती..रॉकीला समोर काहिच दिसेनासे झाले होते..गाडीतर सूसाट वेगाने धावतच होती..
“माय गॉड..प्लीज बंद करा हे सगळे..मला नाही पाहायचे हे..गाडी कुठे चालली आहे, हे पण मला दिसत नाहीये”😖
रॉकी मोठ्याने ओरडत म्हणाला..
रॉकी मोठ्याने ओरडत म्हणाला..
म्हातार्याच्या चेहर्यावर क्रुर भाव उमटले..
“तुला दिसत नसले तरी मला समदे दिसत आहे..बरोबरच चालला आहेस तु” एवढेच बोलून म्हातार्याने एका हाताने कारचे स्टेअरिंग पकडून जोरात डावीकडे हिसका मारला आणी कार हायवेवरून खाली उतरून बाजुच्या एका मोठ्या झाडावर वेगाने आदळली..
जोरदार धडकेमुळे गाडी खिळखिळी झाली..रॉकीचे तोंड जोरात स्टेअरिंग वर आदळले होते..म्हातारा एकटक नजरेने त्याच्याकडे पाहत होता..त्याची अजुन पण थोडीशी हालचाल त्याला जानवत होती..म्हातार्याने मजबूत हाताने रॉकीच्या डोक्यावरचे लांब केस पकडले आणी त्याचे तोंड आणखी दोन वेळेस जोराने स्टेअरिंग वर आदळले.. त्याच्या शरीराची होणारी हालचाल आता पुर्णपणे थांबली होती..

दुसर्या दिवशी त्या घटनास्थळावर पोलीस आले, अपघाताचा पंचनामा केला..यंग बिजनेसमँन राकेश सक्सेना यांचे वाहनावरील नियंत्रण सुटल्याने हायवेवर अपघाती म्रुत्यु झाल्याची बातमी पेपरमध्ये एका कोपर्यात छापून आलेली होती..पण त्यापलीकडे या घटनेविषयी कोणाला जास्त काहीही समजले नाही.📰
####################
पुढील अमावस्येची रात्र..मध्यरात्रीची वेळ होती, हायवेवर संध्याकाळपासून चालू झालेला पाऊस अजूनही चालूच होता.. हायवेच्या कडेला असणार्या एका मैलाच्या दगडावर रॉकी बराचवेळापासून भिजत बसलेला होता..तेवढ्यात त्याला दूरूनच एका गाडीची हेडलाईट चमकताना दिसली..रॉकीच्या चेहर्यावर विचित्र हास्य उमटले..तो लगेच घाईने दगडावरून ऊठून हायवेवर मधोमध येऊन थांबला..समोरून एक ट्रक येत होता..ट्रकचालक असणारा सरदारजी मोठ्या आवाजात पंजाबी गाणी ऐकत भरधाव वेगाने आपल्याच मस्तीत चालला होता..🚛
ट्रकच्या जोरदार धडकेमुळे रॉकी रस्त्याच्या कडेच्या चिखलामध्ये उडून पडला तरी ट्रकवाल्याला काहीच समजले किंवा जाणवले सुद्धा नाही.. धडकेमुळे फँक्चर झालेल्या उजव्या हाताला डाव्या हाताने सरळ करत आणी डोके फुटून चेहर्यावर आलेला रक्ताचा ओघळ पुसत रॉकी चिखलातुन कसाबसा ऊठला आणी पावसामध्ये हेलकावे खात परत त्याच दगडावर येऊन बसला..
त्याची नजर पुन्हा एकदा हायवेवर खिळलेली होती..

समाप्त.
No comments:
Post a Comment