नरपिशाच्च - भाग एक
सकाळची वेळ होती..रेल्वे स्टेशनवर ट्रेन थांबली आणी मी पाठीवर बँग लटकवत त्यातून उतरलो..रात्रभर जनरल डब्यातून बसून प्रवास केल्याने थोडा थकवा जाणवत होता..स्टेशनवरच तोंड धुतले, आणी बाहेर रिक्षा स्टँडवर आलो..एका छोट्याशा खेडेगावात लहानाचा मोठा झालेलो आणी तालुक्याच्या कॉलेजमधुन डिग्री मिळवणारा असा मी पहिल्यांदाच एकटा एवढ्या मोठ्या शहरामध्ये आलो होतो..आणी त्याला कारण होते ते म्हणजे शहरातून मला आलेला नोकरीचा कॉल. घरची गरीब परिस्थिती असतानाही अभ्यासात हुशार असल्याने मला घरच्यांनी जास्त शिकवले होते आणी आता शिक्षण झाल्यानंतर कमावण्यासाठी आणी स्वताच्या पायावर उभे राहण्यासाठी मला जॉब करणे आवश्यक होते आणी त्यासाठी शहरामध्ये येणेसुद्धा, त्याचबरोबर परवा आलेला कॉल एका नामांकित कंपनीतुन आलेला असल्याने मी ही संधी सोडु ईच्छित नव्हतो त्यामुळे घाईघाईने काल रात्री ट्रेनमध्ये बसून मी आज सकाळीच शहरामध्ये आलेलो होतो..🚊
स्टेशनबाहेरील रिक्षावाल्याला कंपनीचे नाव सांगताच त्याने मला गेटवर नेऊन सोडले..तेथे मला दिलेल्या वेळेनूसार मी ऑफीसमध्ये जाऊन इंटरव्ह्यू पण दिला..विशेष म्हणजे पास होऊन मला जॉबपण मिळाला..मी तर जाम खुश झालो, पण दुसर्याचक्षणी एच आर ने त्याची अट सांगितली कि, “आम्हांला ही पोस्ट अर्जंट भरायची आहे, त्यामुळे तुम्हांला उद्याच्या उद्याच आमची कंपनी जॉईन करावी लागेल”. मी आनंदाने लगेच होकार दिला आणी सर्व प्रोसेस पुर्ण करून कंपनीच्या बाहेर पडलो..आता माझ्यासमोर संकट उभे राहिले होते..या मोठ्या शहरामध्ये माझे कोणीही परिचित नव्हते आणी माझ्या पाकिटामध्ये पण मोजकेच पैसे शिल्लक होते..दोन तीन दिवसांचा वेळ मिळाला असता तर गावाकडे जावून काहितरी करता आले असते..पण मी तर उद्याच जॉईन होईल म्हणुन सांगुन बसलो होतो..त्यामुळे कमीत कमी पहिला पगार होण्याआधी हा एक महिना तरी मला अडचणीतच काढावा लागणार होता..मी बाहेर रस्त्यावर आलो आणी एका रिक्षावाल्याला माझी अडचण सांगितली तसेच एखादी स्वस्तामधली चांगली रुम कुठे मिळेल याची चौकशी करू लागलो. रिक्षावाल्याने एकदा माझ्याकडे पाहिले आणी म्हणाला,
“कसयं भौ..ह्या शहरामध्ये जागा आणी भाड्याच्या रूमा कधी रिकाम्या सापडतच नाही आणी जरी सापडली तरी तुझ्या सध्याच्या बजेटच्या बाहेरच असेल..त्यापेक्षा एक काम कर ना.. शहराच्या हद्दीच्या बाहेर जवळच एक ‘अशोकवन’ नावाची सोसायटी आहे तिथे तुला चांगली रुमही मिळु शकते आणी भाडेपण कमी असेल.. तिकडे तुला सोडतो, रिक्षाचे मिटर पन्नास रूपये होईल..बघ जायच असेल तर बस मागे.” 🏘️
मी रिक्षामध्ये बसलो आणी पंधरा वीस मिनीटानंतर रिक्षावाल्याने मला अशोकवनच्या गेटवर आणुन सोडले..शहराच्या कोलाहल व गोगांटापासुन दूर अशी ही सोसायटी होती..गेटच्या आत पाच पाच मजल्यांच्या चार जुनाट इमारती एकमेकांपासून थोड्याफार अंतरावर दिसत होत्या..शहरापासून आणी मुख्य रस्त्यापासून दूर असल्याने तिथले बरेसचे फ्लॅटस पण रिकामेच असतील असे वाटत होते.
“गेटवरच्या वॉचमेनला सांग..’बहादूरशेठ’ ला भेटायचे आहे म्हणुन”
ऐवढे बोलून रिक्षावाला त्याचे पैसे घेऊन निघून गेला. मी वॉचमेनकडे जाऊन बहादूर ची चौकशी करू लागलो..लगेच वॉचमेनने त्याच्या नेपाळी हिंदी भाषेत बहादूरशेठला फोन लावला..
आठ दहा मिनीटानंतर बहादूरशेठ गेटवर आला.
ऐवढे बोलून रिक्षावाला त्याचे पैसे घेऊन निघून गेला. मी वॉचमेनकडे जाऊन बहादूर ची चौकशी करू लागलो..लगेच वॉचमेनने त्याच्या नेपाळी हिंदी भाषेत बहादूरशेठला फोन लावला..
आठ दहा मिनीटानंतर बहादूरशेठ गेटवर आला.
अंगावर पॉश पण भडक रंगीत कपडे, जवळ येताच जाणवणारा सेंटचा वास, डोक्यावर नेपाळी पद्धतीची पांढरी टोपी..आणी गळ्यात सोन्याची जाड चैन घातलेला ‘बहादूर’ हा चाळीसच्या आसपास वय असले तरी वयाच्या मानाने बराच तरुण वाटत होता..
बहादूर हा अशोकवन सोसायटीचा केअरटेकर होता..सोसायटीचा मालक हा दुरच्या कुठल्यातरी शहरामध्ये राहायला होता..तो फक्त दरमहिन्याला एकदा येऊन बहादूरकडुन जमा झालेले सोसायटीचे भाडे घेऊन जायचा..बाकी महिनाभर बहादूरच सोसायटीचा मालक होता.. सगळे व्यवहार त्याच्याच हातात होते..वीस बावीस वर्षापूर्वी या सोसायटीमध्ये साधा वॉचमन म्हणुन कामाला लागलेला बहादूरने काही वर्षातच मालकाचा विश्वास संपादन केलेला होता.. आपल्या बोलबच्चन गिरीने आणी महत्वाकांक्षी स्वभावामुळे तो गेल्या दहा वर्षापासून सोसायटीचा केअरटेकर बनलेला होता.. आणी आता त्या सोसायटीमध्ये मालकापेक्षाही त्याचाच निर्णय अंतिम असायचा.🌆

“हं बोलो..काय काम है तुमचा??” बहादूरने हातातील सिगारेटचा एक झूरका मारत विचारले,
“नमस्कार सर, मी दिनेश..”
मी त्याला माझे नाव व माझी अडचण सांगितली..तसेच राहण्यासाठी एखादी रुम किंवा शेअरिंग फ्लॅट मिळेल का अशी विचारणा केली.
“नमस्कार सर, मी दिनेश..”
मी त्याला माझे नाव व माझी अडचण सांगितली..तसेच राहण्यासाठी एखादी रुम किंवा शेअरिंग फ्लॅट मिळेल का अशी विचारणा केली.
“कोई बात नही..तु चांगल्या घरचा वाटतोस..आपल्या येथे चार नंबर बिल्डींगच्या पाचव्या फ्लोअर वर एक शेअरिंग फ्लॅट आहे.. तेथे तु राहू शकतो, तेथे अजून एक छोकरापण राहायला असतो, तुझ्याच वयाचा असेल, अधेमध्ये तुला भेटल तो..त्याच्यासोबत तु राहू शकतो..तुझे भाडे महिन्या भरल्यानंतर दिला तरी चालेल.” बहादूर मला निरखून पाहत म्हणाला.
मला हायसे वाटले..मी बहादूरचे आभार मानले आणी त्याच्या मागोमाग त्या चार नंबर बिल्डींगच्या दिशेने गेलै..खूप शांतता वाटत होती त्या सोसायटीमध्ये.. अर्धे निम्मे फ्लॅट्स रिकामेच दिसत होते..किंवा अधेमधे तेथे कोणीतरी राहायला येत असावेत.. बिल्डींगच्या खाली काही लहान मुले खेळत होती..तेथे पोहोचल्यावर मला बहादूरने चावी देऊन फ्लॅट नंबर सांगितला आणी मला एकट्याला वर पाठवून तो खालूनच परत निघून गेला.
मी वर येऊन दरवाजा उघडून आत आलो..बर्यापैकी प्रशस्त असा
टु बीएचके फ्लॅट होता तो..आतमध्ये स्वच्छता आणी खेळती हवा पण होती..चला, कमी भाड्यामध्ये मला माझी अपेक्षापुर्ती करणारा फ्लॅट भेटला होता..त्यामुळे येथून माझी कंपनी जरी लांब पडणार असली तरी मला ही सोसायटी आवडली होती..आता फक्त आपला रूम पार्टनर कोण आहे याची उत्सुकता लागली होती पण त्या दिवशी तो तेथे नव्हता. 🙂

दूसर्या दिवशी सकाळी मी वेळेच्या आधीच कामावर हजर झालो होतो..संध्याकाळी कंपनी सुटल्यावर थोडावेळ शहरामध्ये भटकंती आणी काही शॉपिंग करुन रात्री उशीरा माझ्या फ्लॅट्वर पोहोचलो असता तो मला तेथे भेटला..मी दार उघडून आत येताच माझ्याकडे रोखून पाहू लागला..मी त्याला माझी ओळख दिली आणी त्याला त्याचे नाव विचारले..
“रवी..” तो फक्त ऐवढेच बोलला आणी लगेचच त्याच्या खोलीत निघून गेला..मला थोडे आश्चर्यच वाटले.
“रवी..” तो फक्त ऐवढेच बोलला आणी लगेचच त्याच्या खोलीत निघून गेला..मला थोडे आश्चर्यच वाटले.
काही दिवस गेले..दोन तीन दिवसानंतर अधेमधे तो मला आमच्या फ्लँटमध्ये दिसायचा..माझ्याच वयाचा असेल, पण अंत्यत मितभाषी.. एखादा प्रश्न दोन तीन वेळा विचारल्यानंतरच उत्तर द्यायचा ते पण एक दोन शब्दातच..बहुतांश वेळ तो त्याच्या खोलीतच असायचा.. चेहर्यावर सदैव निराळेच भाव असायचे.. मला तर कधीकधी तो मनोरूग्ण असल्यासारखे वाटायचे.. कामधाम काय करायचा काहिच समजत नव्हते..विचारले तर “मला कामाची गरज नाही” म्हणायचा..मध्येच दोन दोन दिवस गायब असायचा.. असो, मला काय देणेघेणे त्याचे, नाहितरी जास्तितजास्त दोन तीन महिनेच मी त्याच्यासोबत राहणार होतो आणी नंतर शहरामध्ये एखाद्या चांगल्या ठिकाणी शिफ्ट होणार होतो..पण त्या रात्री घडलेल्या एका प्रसंगानंतर मात्र मला तेथे महिनाभर थांबण्याचीही बिलकुल ईच्छा राहिली नव्हती.😮
त्या दिवशी मी माझा मोबाईल चार्जर कंपनीच्या ऑफिसमध्ये विसरून आलो होतो.. रात्रीचे अकरा वाजले होते तरी मला झोप काही लागत नव्हती आणी माझा मोबाईल पण स्वीच ऑफ होण्याच्या मार्गावर होता..शेवटी नाईलाजाने मी रवीच्या खोलीचे दार उघडून आत चार्जर आहे का ते पाहण्यासाठी गेलो व आतली लाईट लावली.
तो त्याच्या बेडवर आडवा पडलेला होता..वर फुल स्पीडमध्ये फँन सुरू असला तरी त्या खोलीमध्ये कसलातरी कुबट वास भरलेला होता..तो झोपलेला दिसत असला तरी त्याचे डोळे मात्र सताड उघडे आणी छताकडे रोखलेले होते..त्याला त्या अवस्थेत पाहुन मला जरा विचित्रच वाटले, मी त्याच्या जवळ जात त्याला हलवून जागे करण्याचा प्रयत्न केला असता त्याने एकदमच चमकून माझ्याकडे पाहिले.. त्याच्या चेहर्यावर एकदम संताप दिसू लागला होता आणी घशातून विचित्र आवाज बाहेर यायला लागला.. असा आवाज मी यापूर्वी कधीही ऐकलेला नव्हता..या विचित्र प्रकारामुळे भितीने माझी छाती धडधड करू लागली आणी मी लगेचच त्याच्या रुममधून बाहेर पडलो आणी माझ्या खोलीत येऊन चूपचाप झोपलो.😔

क्रमश..
No comments:
Post a Comment