🔹हायवे - भाग दोन🔹
झालेल्या प्रकाराने रॉकीची झोप पुर्णपणे उडून गेली होती.. पाच सात मिनीटे गेल्यानंतर त्याने हातानेच स्वतःच्या कपाळावरचा घाम पुसला आणी कारमधील लाईटचा स्वीच ऑन करून समोर ठेवलेल्या पाकिटामधील आणखी एक सिगारेट बाहेर काढुन सुलगावली..तेवढ्यात त्याचे लक्ष कारमधील ड्रायव्हर सिटच्या वर लावलेल्या मधल्या आरशाकडे गेले आणी त्याच्या काळजाचा ठोकाच चूकला.. काहीवेळापुर्वी त्याने रस्त्यावर पावसात पाहिलेला तो म्हातारा आता त्याच्या कारमध्येच मागील सिटवर बसलेला त्याला दिसून आला. त्याने एकदम चमकून मागच्या सिटकडे पाहिले पण त्या सिटवर त्याला कोणीच दिसले नाही..हा सर्व घडत असलेला प्रकार हा फक्त एक भास नसून भलतेत काहितरी आहे हे त्याला आता समजून चुकले होते..त्याने आजवर जे काही भुताटकीचे प्रकार ऐकले होते किंवा चित्रपटांमध्ये पाहिलेले होते ते एकएक करून त्याला आठवू लागले.. आणी तो आता मनातल्या मनात देवाचा धावा करू लागला.💀

दरम्यान बाहेर पावसाचा जोर जास्त वाढला होता..त्याची कार आता लो स्पीडवर पळत होती..भितीमुळे रॉकीचा स्टेअरिंग वरचा हात आणी संपूर्ण अंगच थरथर कापत होते.. अधूनमधून चोरून तो मधल्या आरशाकडे कटाक्ष टाकत होता..अधेमधे त्याला तो म्हातारा मागच्या सिटवर बसलेला दिसून यायचा तर कधी ती सिट रिकामीच दिसायची.. हे नक्की काय चालले आहे हेच रॉकीला समजत नव्हते..थोडा वेळ गेला..आरशामध्ये अधेमधे दिसणारा म्हातारा आता बराच वेळापासून दिसलेला नव्हता.. पावसाचा जोर वाढल्याने बाहेरील पावसाचे थेंब आता खिडकीतून आत यायला लागल्याने त्याने खिडकीची काच बंद केली ..तेवढ्यात त्याचे लक्ष शेजारील सीटवर गेले आणी भितीने दचकून तो जागेवरच उडला.. तो म्हातारा आता त्याच्या शेजारच्या सिटवर येऊन बसलेला होता.. म्हातार्याच्या सफेद कपड्यांवर रक्ताचे लालभडक मोठमोठे डाग स्पष्ट उठून दिसत होते..त्याच्या डोक्यावरील फेट्याच्या आतुन रक्ताचा ओघळ त्याच्या पुर्ण चेहर्यावर आलेला होता..आतली जखम ताजी असल्यासारखी त्यातून रक्ताचे थेंब पडत होते.. आणी त्याची भेदक नजर रॉकीवर रोखलेली होती..😨
“काय पाव्हणं,..गाडी अंगाव घातली तर घातली आन पळून पण चाललाव का? कमीतकमी हास्पीटलात तरी घेऊन चला की मला”
“कं..कोणी? काय बोलताय तुम्ही? मी कधी गाडी घातली पण तुमच्या अंगावर?” रॉकीने घाबरत विचारले.
“एवढ्या लवकर ईसरलास की काय ती सात वर्षापुर्वीची रात?
त्या रातीला मी सायकलवरून माझ्या घराकड जात असताना तुच मला मागुन येऊन गाडीने ठोकुन पळून गेला व्हतास ना? हे बघ कि, तवाच्या जख्मा अजूनबी अंगाव हायेत माझ्या “
म्हातार्याचे हे बोलणे आणी सर्द आवाज ऐकून रॉकीचा थरकाप उडाला.

“हे बघा बाबा..तुमचा काहितरी गैरसमझ झालेला दिसतोय.. माझ्यासारख्या दूसरा कोणीतरी असेल तो..मी तर आज पहिल्यांदाच चाललोय या हायवेवरून..आणी तुम्ही म्हणत असाल तर यापुढे परत कधी इकडे येणार पण नाही” 🛣️
रॉकीचे बोलणे ऐकून म्हातार्याच्या कपाळावर आठ्या जमा झाल्या.
“तुला कसा काय ईसरल रं मी..तुज्यामुळच तर गेल्या सात वर्षापासून या हायवेवर भटकतोय मी..बर चल ते बी जाऊ दे, एकवेळ नशेच्या भरात आणी जवानीच्या व श्रीमंतीच्या धुंदीमध्ये तु फक्त माझ्या एकट्याचाच जीव घेतला अस्ता ना तर मी तुला कवाच ईसरूनबी गेलो असतो.. पण त्या राती तु फक्त माझाच नाही तर माझ्या म्हातार्या बायकोचा यशोदाचा पण जीव घेतला होतास..आणी ते मी कधीच ईसरणार नाय..”

रॉकीने कारच्या बाहेर डोकावून पाहिले..बाहेर त्याला सर्व अंधारच दिसला..अंधारात रस्त्याच्या कडेची झाडे झूडपे पण त्याला भेसूर वाटत होती..म्हातारा मात्र त्याच्या मोठ्या आवाजात बोलतच होता.. स्वतःच्या भुतकाळात रमून गेल्यासारखा वाटत होता.. सध्यातरी रॉकीला निमुटपणे त्याचे बोलणे ऐकून घेण्याशिवाय दूसरा पर्यायपण नव्हता..म्हातारा पुढे बोलायला लागला,🗣️
“ह्या हायवेहुन आतमध्ये पाच-सात कोसावर गाव होत माझ..तिथे गावामधल्या मळ्यात राहायला होतो मी.. दोन मुली हायत मला, दोघींचीबी लगीन झालेली असल्यान दोघीबी सासरी नांदायला गेल्यात..गेल्या अनेक वर्षांपासून आमच्या घरात फक्त मी आणी माझी बायको यशोदाच राहायला होतो..आम्हाला जेवढ जमत होत तेवढ आमच्या शेतात राबायचो आणी आमच्या दोघांच्या पोटापाण्यापुरत कमवायचो.. पण वाढत्या वयोमानानुसार यशोदाला आजारपणान गाठल.. ती कायमच आजारी पडायला लागली..तिला जास्त काम करायलाबी जमत नव्हत,तरीबी ती कसबस करायला बघायची..मला ते बघवत नव्हते, मी तिला म्हणल होत, “हे बघ यशोदा, आजवर तु लई केलस,पण आता फक्त आराम करायचास तु” पण ती काही माझ ऐकतच नव्हती.. तिच आजारपण वाढत चालल होत, शेवटी तिला शहरामंदी नेऊन हास्पीटलात दाखल केल..एक मोठ आपरेशन करून परत घरी आणल होत.. त्यानंतरबी आजार पुर्ण बरा होण्यासाठी डॉक्टरन वेळच्यावेळी लिहून दिलेल्या गोळ्या औषधं घेण्यास बजावल होत..
दवाखाना केल्यावर काही दिस यशोदाला बर वाटत होत..
मलापण वाटल ती आता बरी झाली असल..पण त्या राती अचानकच तिला ताप भरला..समद अंग फणफणु लागल..तिची औषधपण घरात शिल्लक नव्हती..आमच गाव एक छोटस खेड असल्यान गावात काही मिळणार नव्हतच..त्यामुळ ताबडतोब रातीलाच शहरामंदी जाऊन औषध घेऊन येण्याशिवाय माझ्याकड दूसरा मार्ग नव्हता, म्हणुन मी एवढ्या रातीला सायकल मारीत शहरामंदी जाऊन यशोदाची गोळ्या-औषध घेऊन राती उशीरा परत घाईन आमच्या घराकड निघालोच होतो..🚴
पण मला काय माहित होत ती रात माझीच शेवटची रात ठरल म्हणुन.. भररस्त्यात तुझ्या गाडीन मला मागुन जोराची धडक मारली..मला रस्त्याच्या कडेला बेसुद झालेल पाहून पण तुमी तेथून पळून गेलात आणी मी रातभर तिथच रस्त्याच्या कडेला पडुन रायलो..सकाळ झाल्यानंतर पार उशीरा मला कोणीतरी हास्पीटलात दाखल केल पण तोपर्यत उपचाराला लई उशीर झाला होता..थोडावेळ आधी अँडमीट केल असत तर मी वाचू शकलो असतो अस डाक्टर म्हणाले..तिकड माझ्या घरी यशोदा रातभर अथुरणात तळमळत माझी वाट पाहत होती..खूप ऊशीर झाला तरी मी येत नसल्यान तिला वाटत होत तिची औषध नाही आणली तरी चालतील पण तिचा नवरा परत यावा..पण तिची औषधे आणी नवरा दोन्हीपण हायवेच्या कडेला पडलेले होते.. दूसर्या दिसी संध्याकाळी तिला गाववाल्यांनी माझ्या अपघाताची आणी म्रुत्युची बातमी सांगितली आणी ती ऐकून आधीच आजारान खंगलेल्या यशोदानबी तिचा जीव सोडला.. तिच्या शेवटच्या क्षणी मी तिच्या कामी येऊ शकलो नाही याच दूखः आजही माझ्या मनात तसच आहे”

म्हातार्याने त्याची सत्यकथा संपवली..पण त्याने सांगितलेल्या कहाणीमध्ये रॉकीला जराही इंटरेस्ट नव्हता, पण दूसरा पर्याय नसल्याने तो निमुटपणे ऐकत होता.. आणी ऐकता ऐकता आपल्या गाडीत घुसून बसलेल्या म्हातार्याच्या भुतापासून स्वताची सुटका कशी करता येईल याचा विचार करत होता..थोडावेळ विचार करून त्याने हळूच रिमोट सेन्सरचे बटण दाबून कारचा दरवाजा अनलॉक केला..आणी कारचे स्पीड कमी करुन म्हातार्याकडे पाहुन म्हणाला,
“मला माफ करा बाबा, त्या रात्री अजाणतेपणी माझ्याकडुन मोठी चूक झाली..पण मी परत अशी चूक करणार नाही..” 🙏
बोलता बोलता त्याने दोन्ही हात म्हातार्यासमोर जोडून विनवणी करण्याचे नाटक केले आणी त्याचक्षणी अंत्यत चपळाईने कारचा दरवाजा उघडून दोन्ही हातांनी म्हातार्याला जोरदार धक्का देऊन चालत्या गाडीतुन बाहेर ढककले..गाफील असणारा म्हातारा या अनपेक्षित धक्याने गाडीच्या सिटवरून बाहेर हायवेवर कलंडला, आणी रॉकीने चपळाईने दरवाजा लॉक करून टॉप गिअर टाकून कारचा वेग वाढवला..
म्हातार्याला खाली ढकलल्यानंतर जेवढ्या वेगात त्याला कार पळवणे शक्य होते तेवढ्या वेगात तो पळवू लागला.. त्याची कार आता वार्याच्या वेगाने धावू लागली..त्याला आता जमेल तेवढ्या लवकर त्या म्हातार्यापासून लांब जायचे होते..दहा- पंधरा मिनीटे स्पीडने कार पळवल्यानंतर त्याला जरा हायसे वाटले..आता म्हातार्याच्या भुतापासून आपली सूटका झाली असावी अशी आशा त्याला वाटू लागली..तसेच अशा बिकट प्रसंगामध्येपण आपण प्रसंगावधान दाखवले याबद्दल त्याला स्वताचाच अभिमान वाटू लागला..पण त्याचा हा आनंद फारकाळ टिकणार नव्हता..कारण पूढे जे काही घडणार होते ज्याची त्याने आजवर कधी कल्पनापण केली नव्हती..😔
#क्रमश..
No comments:
Post a Comment