मयत...
लेखक:- अंकुश सू. नवघरे. (पालघर)
©Ankush S. Navghare ®२०१७
(ह्या कथेचे सर्व हक्क लेखकाकडे सुरक्षित आहेत)
आज एक कथा घेऊन आलोय. ही कथा मला माझ्या ओळखीच्या म्हाताऱ्या भगत (इंग्लिश मध्ये ह्यानाच paranormal expert असे म्हणतात) काकांनी सांगितली होती. पुढील कथा त्यांच्याच शब्दात...
.....त्यादिवशी एकाच घरात एक बाप आणि एक छोटं बाळ अचानक मयत झाल्यामुळे घरातील लोकांनी मला निरोप पाठवला होता. करण खूप दिवसांपासून गावात अशी कुजबुजाट होती की त्या माणसाची बायको जारणमारणं करीत असे त्यामुळे विद्या पूर्ण करण्यासाठी तिला कोणाचा तरी बळी घ्यावाच लागणार होता. परंतु स्वतःच्या नवऱ्याचा आणि मुलाचाच बळी म्हणजे जरा अतीच झाले होते असे गावातील काही अंधश्रद्धाळू लोकांची धारणा झाल्यामुळे त्या सर्वांनी बिचाऱ्या त्या बाईला दोषी धरून तिला त्या मेलेल्या माणसाबरोबर जिवंत जाळण्याची तयारी चालवली होती. म्हणून कोणीतरी त्यांची समजूत काढायला मला बोलावणे धाडले होते. मी कौल लावून पहिला असता मला दिसले की प्रकार काही वेगळाच होता. प्रकार तर करणीचा होता पण ती बाई बिचारी निर्दोष होती. परंतु खऱ्या आरोपीला शोधणे भाग होते नाहीतर अजून किती लोकांचे बळी जाणार होते कोण जाणे.
.....मी तिकडे पोहोचलो तेव्हा रात्रीचे ११ वाजून गेले होते. जेव्हा लहान बाळावर करणी केली जाते तेव्हा त्याचे प्रेत पुरून आल्यानंतर पुरणारे लोक आणि नातेवाईक माघारी परातल्यानंत करणी करणारे लोक ते प्रेत परत उकरून खातात असे म्हटले जाते आणि त्यांमुळे त्या बाळाच्या प्रेताची विटंबना तर होतेच वरून त्याला मुक्ती मिळवून न देता त्याच्या आत्म्यांचा वापर करून काही अघोरी सिद्धी मिळवल्या जातात. हे गावाकडे सर्वानाच माहीत असल्याकारणाने त्यांनी बाळाचे प्रेत सकाळीच पुरण्याचे ठरवले होते.
.....परंतु खुप कमी लोकांना हे माहीत आहे की जेव्हा कोणी माणसावर करणी केली जाते आणि त्यातच त्याचा मृत्यू होतो तेव्हा त्या माणसाचे खरे प्रेत करणी करणारे कसेही करून पळवतात आणि त्याच्या जागेवर एक आभासी प्रेत आणून ठेवतात किंवा त्यातील हृदय आणि इतर महत्वाचे अवयव काढून ते परत त्या जागी आणून ठेवतात त्यामुळे त्याचे नातेवाईक जे प्रेत पहात असतात तो फक्त एक आभास असतो किंवा एक अपूर्ण प्रेत असते आणि त्यामूळेच त्या करणी झालेल्या माणसाला कधीच मुक्ती मिळत नाही कारण की त्याच्या पूर्ण प्रेतासाहित अंतीमसंस्कार होतच नाहीत. परंतु लहान बाळाच्या प्रेताच्या बाबतीत तसे नसते तर ते प्रेत पुरल्यानंतरच उकरून खावे लागते असा तो विधी आहे.
.....मी तिथे पोहोचलो तेव्हा सर्व लोक प्रेताला गराडा घालून बसले होते. त्यांना आधीच ह्या सर्व गोष्टींची कल्पना असल्याने ते प्रेत कोणीही पळवून नेऊ नये ह्यासाठी सर्व राखण करत बसले होते. सर्वांनी मला त्या प्रेताचे रक्षण करण्याची विनंती केली. मी तिकडे बसलो असताना मला असे जाणवले की तिथे त्या हवेत नक्कीच काहीतरी विपरीत आहे, काहीतरी अमानवी आहे. कारण मी एक भगत असल्याने करणी करणाऱ्या लोकांच्या बऱ्याच गोष्टी मला माहित होत्या. त्यातील एक गोष्ट म्हणजे त्या लोकांकडे लहान बाळाच्या आतड्या पासून बनवलेली एक वस्तू असते, ती वस्तू जाळली असता त्यातून निघणाऱ्या धुरामुळे गुंगी येऊन सर्व लोक आपोआप झोपी जातात आणि मग ते करणी करणारे खरे प्रेत पळवून खोटे आणून ठेवतात. म्हणून शक्यतो प्रेत जास्त वेळ न ठेवता त्याला अग्निसंस्कार केले जातात. आशा बऱ्याच गोष्टी करणी करणाऱ्यांकडे असतात. त्यांचा उपयोग ते वेळ प्रसंगी करत असतात. तिकडे काही धोका होऊ शकतो म्हणून मी आधीच काही मंत्र उच्चरून स्वतःभोवती कडे केले होते त्यामुळे त्या धुराचा माझ्यावर परिणाम झाला नाही परंतु इतरांवर मात्र त्याचा परिणाम होतोय हे मला दिसत होते.
......थोड्या वेळाने सर्वच झोपी गेले. आता तर प्रेताचे रक्षण करण्याची पूर्ण जबाबदारी माझ्यावर येऊन पडली होती. वातावरणात एक वेगाळेपणा जाणवत होता. बाहेर कुत्रे भेसुर आवाजात रडत होते. मधेच कोल्ह्यांची कोल्हेकुई ऐकायला येत होती. मी माझ्या बाजूच्या माणसाला उठवण्याचा प्रयत्न केला परंतु त्याने साधी हालचालही केली नाही. रात्रीचे १२ वाजून गेले असतील वातावरण अधिकच गूढ झाले होते. एक लहानसा आवाज पण शांतता चिरत जात होता. माझे पूर्ण लक्ष त्या प्रेताकडेच लागून राहिले होते. इतक्यात म्याव असा आवाज माझ्या पाठी मागे मला ऐकू आला तसे मी मागे वळून पाहिले असता दोन चमकणारे लाल वर्तुळ माझ्या नजरेत पडली. नीट पाहिले असता मला दिसले की एक काळभोर बोका त्याच्या लाल डोळ्यांनी माझ्याकडे रोखून पहात होता. त्याच्या डोळ्यांमध्ये एक वेगळीच धार होती. त्याला पाहून मला माझा आबांनी सांगितलेली गोष्ट आठवली की प्रेताच्या अंगावरून मांजर ओलांडून गेली की प्रेत जागे होते. ह्या गोष्टीत किती तथ्य आहे माहीत माही पण त्या विचाराने माझ्यात भीती दाटून आली.
.....त्या बोक्याच्या डोळ्यात काहीतरी विलक्षण होते. त्याचे डोळे एक प्रकारचे संमोहन करत होते. त्या संमोहनामुळे माझ्या डोळ्यांवर झापड येऊ लागली होती तरीही मी सावरून त्या बोक्याक हाकलण्यासाठी हाड हाड केले असता तो बोका अजूनच चवताळला आणि त्याने माझ्यावर झेप मारली, मी चपळाईने बाजूला झालो, त्याची झेप चुकली ती थेट त्या प्रेताच्या छातीवर आणि तो दुसऱ्या बाजूला जाऊन मागे कुठेतरी गडप झाला. त्याकाळी घरांमध्ये लाईट नसल्याने दिव्याच्या प्रकाशात तो दिसलाच नाही. आता मात्र माझी झोप पूर्णपणे उडाली होती. मी आता पुढे काय होणार ह्याचीच वाट पाहत होतो. घरातले सर्वच झोपले होते. वातावरणात किर्रर्र शांतता होती. माझे लक्ष पूर्णपणे त्या प्रेतावरच खिळून राहिले होते इतक्यात मला असा भास झाला की त्या प्रेताची करंगळी हालत आहे. आधी मला वाटले की मला भास होतोय परंतु खरच त्या प्रेताची करंगळी हलत होती. ते भयाण दृश्य पाहून मी पूर्णपणे हादरूनच गेलो होतो. नियतीने अजून पुढे काय वाढून ठेवले आहे त्याची वाट पाहणे इतकेच माझ्या हातात उरले होते.
......थोड्या वेळाने प्रेताची जास्तच हालचाल होई लागली म्हणून मी जवळच बसण्यासाठी ठेवलेली सतरंजी माझ्या अंगारावर ओढून घेतली आणि अंग टाकून झोपेचे सोंग घेऊ लागलो. मी ती चादर डोक्यावरून ओढून घेतली होती आणि हळूच तिला काठीने एक भोक पाडून त्या भोकातून त्या प्रेताच्या हालचाली पाहू लागलो. ते प्रेत एखादा माणूस झोपेतून उठून बसतो तसे उठून बसले असता त्याच्या तोंडावरचे पांढरे कफन गळून खाली पडल्यामुळे मला असे दिसले की त्या प्रेताच्या डोळ्यांची बुबुळे वर गेली होती आणि त्याचे डोळे वटारले. चेहरा पांढराफटक पडला होता आणि डोळ्याभोवती काळी वर्तुळं आली होती. त्या प्रेताची नजर दरवाजाकडे लागली होती. अचानक त्या प्रेताची मान वळली ती नेमकी माझ्याकडेच आणि माझी आणि त्या प्रेताची नजरानजर झाली. जरी मी चादरीच्या भोकातून पहात असलो तरी त्या थंड आणि भेदक नजरेने मी थंड पडलो होतो. ते प्रेत आता एकटक माझ्याकडे पहात होते आणि मी त्याच्याकडे पहात असताना त्याने तोंड उघडून माझ्याकडे पाहून दात विचाकवले. ते दृश्य इतके भयानक होते की त्याचे वर्णन करणे पण अशक्य आहे.
......मी जगाच्या जागी थिजून गेलो होतो. मी कितीही लपायचा प्रयत्न केला तरी त्या प्रेताने बरोबर मला पाहिले होते तरीही मी काहीच हालचाल न करता ते दृश्य पाहू लागलो. मला आता कळून चुकले होते की ते साधे प्रेत नसून करणी करणार्यांनी प्रेताला पळविण्यासाठी पाठवलेला शैतान त्यात संचारला होता आणि त्यांचे मनसुबे मला कळले आहेत हे त्यांना ही कळले होते आणि म्हणून माझा काटा काढण्याचा त्यांचा बेत होता. आता त्या प्रेताने त्याच्या अंगावरचे कफन काढले आणि ते कापसाच्या वातीसारखे पिळले. त्यानंतर त्या कफनाला एक गाठ मारली आणि तोंडात घातली, चावली आणि गिळली. दुसरी गाठ मारली, तोंडात घातली, चावली आणि गिळली. अशा सात गाठी मारल्या आणि अचानक माझ्या डोळ्यांची पाती लवते न लवते तोच ते प्रेत उठून उभे राहिले आणि माझ्या दिशेने झेपावले. मीही सावध असल्यामुळे क्षणाचाही विलंब न लावता लगेच हालचाल करून उठून बसलो, दरवाज्याकडे पळालो आणि कसातरी बाहेर पडलो आणि धावत सुटलो.
......त्या घराच्या आजूबाजूला सर्वत्र शेत पसरलेले होते. मी लडखडत, ठेचकाळत कसाबसा वाट फुटेल तिकडे धावू लागलो. सर्वत्र अंधार होता त्यामुळे जास्त काहीच दिसत नव्हते. पण चांदण्यांचा प्रकाश पसरला होता त्यामुळे काही गोष्टी अंधुक दिसत होत्या. मी मागे वळून पाहिले तेव्हा मला धक्काच बसला की ते प्रेत मोठ्या मोठ्या ढेंगा टाकत माझ्या मागोमाग येत होतं. मी वेग वाढवला तसा त्यानेही वाढवला. माझ्या दुर्दैवाने मी माझे कुठलेच साहित्य तिकडे आणले नव्हते. आता हे प्रेत काही आपल्याला सोडणार नाही हे मला कळून चुकले होते तरीही मी जिवाच्या आकांताने पळतच होतो. पळता पळता मी दुसऱ्या एका शेतात घुसलो असता मला तिकडे एक बांबूपासून विणलेली घोंगडी दिसून आली. मला आठवले की भूत बांबू पासून विणलेल्या वस्तूंच्या लांब राहतात. ते म्हणाले होते की जर का तुला कधी स्मशान साधना करायची झाली तर तू बांबूपासून विणलेल्या आसनावर बस, कुठलाही आत्मा तुला स्पर्श करणार नाही.
.......मी लगेच ती घोंगडी समोर अंगावर घेतली आणि एक झाडाला टेकून बसून राहिलो. तितक्यात ते प्रेत तिकडे येऊन पोहोचलेच होते. ते परत माझ्यावर झेपावले आणि बाहेरच्या बाजूने त्याने त्या घोंगडीला पकडले. मी धावून धावून खूप दमलो होतो त्यामुळे आता जराही पाळण्याची ताकद माझ्यात राहिली नव्हती. मी आता पूर्णपणे अडकलो होतो. शेवटी देवाचा धावा करत, थरथरत मी तसाच पडून राहिलो. कितीवेळ झाला असेल माहीत नाही पण अचानक मला लोकांचा गोंधळ ऐकू येऊ लागला. घरातून प्रेत गायब झाले म्हणून गावकरी त्याचा सगळीकडे शोध घेत नक्की येतील असे मला वाटले म्हणून मी जिवाच्या आकांताने ओरडू लागलो. कोणीतरी माझा आवाज ऐकला असावा, सगळी लोक मशाली घेऊन आली होती. आधी त्यांना वाटले की प्रेत ओरडत आहे म्हणून त्यांनी मशालीने प्रेताला सरळ पेटवयाचाच निर्णय घेतला परंतु आवज ओळखीचा वाटल्याने त्या प्रेताला तिथून हुसकावले. ते प्रेत जागचे हलतही नव्हते. कसेतरी त्याला ओढून काढले आणि तिथून माझी सुटका झाली. सर्वानाच आश्चर्य वाटत होते की प्रेत इतक्या लांबवर कसे काय आले असावे. आज जर का ती घोंगडी मला मिळाली नसती तर तिथे एकाच्या ऐवजी दोन प्रेताला संस्कार करावे लागले असते...
धन्यवाद...
अंकुश सू. नवघरे..
दि.२७.११.२०१८ वेळ.२.४० दु.

No comments:
Post a Comment