सीमा लॉज...
लेखक:- अंकुश सू. नवघरे. (पालघर)
©Ankush S. Navghare ®२०१७
(ह्या कथेचे सर्व हक्क लेखकाकडे सुरक्षित आहेत)
.....हा अनुभव ह्याआधी मी भुतांची पवित्र स्मशानभूमी ह्या गृप वर शेयर केलेला आहे, त्यामुळे तो कोणाच्याही वाचनात आलेला असण्याची शक्यता आहे. हा मला माझ्या मित्राने सांगितला होता. पुढील अनुभव त्याच्याच शब्दांत...
.....व्यवसायाने मी वकील असल्याने कधीकधी मला व्यवसायानिमित्त वेगवेगळ्या गावी जावे लागते. त्याचबरोबर मला भूतांविषयी खूपच आस्था आणि कुतूहल असल्या कारणाने त्याचाही शोध घेण्याचे माझे काम चालू असते. आणि मी राक्षत्मक कवच पण नेहमीच बाळगून असतो.
.....असेच एकदा माझी एक केस नागपूरच्या ग्राहक पंचायत (Consumer Court) मध्ये लागली होती. मला कोणीतरी मदतनीस हवा म्हणून मी माझ्या असिस्टंट वकील मित्राला सोबत घेऊन गेलो होतो. मी एका स्वस्तातल्या लॉज वर रूम बुक केली होती. केस सकाळी लवकर असल्याने आम्हाला अदल्यादिवाशी रात्री मुक्काम करणे भाग होते. त्यादिवशी रात्री 2 च्या सुमारास माझा असिस्टंट बेड वर झोपला होता आणि मी केस चा अभ्यास करत होतो इतक्यात मला अस जाणवलं की काहीतरी गडबड आहे. माझा असिस्टंट झोपेत वेगळेच हाव भाव करत होता आणि घाबरलेला वाटत होता. ... म्हणून मी त्याला हलवून जाग करण्याचा प्रयत्न केला परंतु तो उठालाच नाही म्हणून शेवटी त्याच्या चेहऱ्यावर पाणी मारले तेव्हा कुठे त्याला जग आली. तो खूप घाबरला होता. मी त्याला विचारले पण त्याने काही सांगितले नाही.
..... दुसर्यावेळी जेव्हा आम्ही नागपूर ला गेलो तेव्हा ही सेम अनुभव आला म्हणून शेवटी मी लॉज बदलण्याचा निर्णय घेतला. मी जेव्हा जेव्हा माझ्या मित्राला माझ्यासोबत नागपूर ला येण्यास सांगत अस तेव्हा तो टाळाटाळ करत असे किंवा घाबरत असे. पण त्याने मला कधी काही सांगितले नाही. लॉज बदलल्यानंतर एकदा दोनदा काही झाले नाही पण नंतर तेच प्रकार पुन्हा चालू झाले. पहिले पहिले मला असे वाटायचे कि हा मुद्दामून हे सर्व करत आहे कारण त्याला तिकडे यायला आवडत नसावे. परंतु एकदा तर कहरच झाला की तो बेड वरून चक्क खाली फेकला गेला आणि त्याला इंजुरी पण झाली. तेव्हा मला जाणवलं की जे काही घडतंय ते काही ठीक नाही. ... म्हणून मी त्याला खोदून खोदुन विचारल तेव्हा तो म्हणाला की त्याच्या स्वप्नात एक पांढरी साडी नेसलेली बाई येते आणि कधी त्याचे पाय खेचते कधी हाताला हात लावते.. कधी कधी गालावरून हात फिरवते. हे करत असताना त्याच्या छातीवर एक प्रकारचं दडपण आलेलं असत.. आणि तो कोणाला हाक मारु शकत नाही की डोळे उघडून पाहू शकत नाही. त्याला स्वप्नातून जाग आल्यासारखी वाटते परंतु जागेवरून हालता येत नाही.... त्यादिवशी त्या बाईने चक्क त्याला बेड वरून खेचून खाली पाडले होते... त्याने मला हे सर्व सांगितलं आणि तो रडू लागला.. त्याला वाटलं होतं की मी त्याला मूर्खात काढेन किंवा त्याच्यावर विश्वास ठेवणार नाही किंवा नोकरीवरून काढेन म्हणून त्याने मला कधी काही सांगितलं नाही. .. त्याच बोलणं ऐकून मला शॉक बसला होता. कारण मला तसा काहीच अनुभव आला नव्हता. त्यादिवशी मी त्याला धीर दिला आणि खूप विचार केला की त्यालाच हा अनुभव का येतोय... मला का येत नाही ... कारण कदाचित मी गळ्यात ताविज, रुद्राक्ष माळ इत्यादी घातले असावेत म्हणून मला येत नसेल का आणि हे सर्व काशामुळे होतेय. ह्या सर्व प्रकरणाचा छडा लावण्याचं मी ठरवलं होतं म्हणून दुसर्यावेळी त्याला समजावून धीर देऊन परत त्याच ठिकाणी राहायला गेलो आणि झोपताना मी माझ्या गळ्यातले सर्व ताविज इत्यादी काढून ठेवले आणि झोपी गेलो. त्या रात्री माझ्या बाबतीत जे घडलं ते आठवून मला आताही अंगावर काटा उभा राहतो. त्या रात्री मी माझ्या मित्राला म्हटलं की तू आज जागा रहा आणि मी झोपतो. बरोबर रात्री 2 वाजता मला एक स्वप्न पडलं. स्वप्नात मी पाहिलं की एक मुलगी जिने पांढरी साडी नेसली होती मला हात लावण्याचा प्रयत्न करत होती. तिच्या डोक्यातून सारखं रक्त येत होत आणि तिचे डोळे लाल होते. तीच ते ध्यान पाहून मला खूप भीती वाटत होती. मला धड हेही समजत नव्हतं कि मी स्वप्नात आहे की जागा आहे. पण मला डोळे उघडता येत नव्हते. मला असही वाटत होत की माझा मित्र माझी काही मदत करेल पण काहीच होत नव्हतं. ती सारखी मला हात लावत होती मी प्रतिकार करत होतो... मला वाटलं की ही मला काही इजा करेल म्हणून मी खूप घाबारलेलो. त्यानंतर मला अस दिसलं कि तिने मला जबरदस्तिने बेड वरून उठवलं आणि मला खेचत नेऊ लागली आणि मी काहीच करू शकत नव्हतो. त्यानंतर तिने ग्यालेरित नेऊन मला तिकडून खाली उडी मारायचा इशारा केला आणि मी पण सज्जावर चढणार आणि उडी मारणार इतक्यात मला जाग आल्यासारखे वाटले तेव्हा पाहतो तर काय माझा मित्र मला गदागदा हलवत होता आणि हाका मारत होता.
.....हे सर्व नंतर मला त्याने सांगितले पण मलाही सर्व प्रत्यक्षात घडतेय अस वाटत होते. झाल्या प्रकाराने मी घाबरलो नव्हतो पण मला खूप बेचैन वाटत होत. कारण असले प्रसंग मी जवळून पाहिले होते पण दुसऱ्यांचे आणि आज माझ्यासोबत ते घडत होत. ... त्यानंतर मी दुसऱ्यादिवशी काम आटोपल्यानंतर आधीच्या लॉज वर जाऊन चौकशी केली असता मला कळलं की त्या लॉज वर एका मुलीचा खून झाला होता. तिला डोक्यात मारहाण करून मारलं होत आणि खाली टाकण्याचा प्रयत्न केला होता. आणि तीच रूम आम्हाला देण्यात आली होती जी खुनानंतर सील करण्यात आली होती. बऱ्याच लोकांना वाईट अनुभव आल्याने ती नेहमीच बंद ठेवण्यात येत असे पण खूप गर्दी असल्यावर गुपचूप देण्यात येते. असे एका वेटरने नाव न सांगण्याच्या अटीवर सांगितले. आता प्रश्न असा आहे की दुसऱ्या लॉज वर पण आम्हाला तसाच अनुभव का आला... ते भूत तिची हद्द सोडून कशी काय आली.. तिला आमच्या कडून काय हवं होतं.. आणि आता ती मुलगी लोकांना त्रास देते का... सर्व प्रश्न अनुत्तरित आहेत पण त्यांचा शोध मी नंतर घेइनच...त्यानंतर मी परत माझे रुद्राक्ष इत्यादी घातले आणि माझ्या मित्राला कमरेला काळा दोरा बांधायला सांगितला. त्या दिवसापासून आम्हाला काहीच अनुभव आलेला नाही... अनुभव जास्त भीतीदायक करून रंगवून सांगितलेला नाही तरी खरा आहे.. लॉज चे नाव बदललेलं आहे... कमरेला निदान काळा दोरा बांधला तरी भूत मागे लागत नाही म्हणून घरातली जुनी माणसे कदाचित लहान असताना आपल्याला काळा दोरा कमरेला बांधत असावेत... धन्यवाद... भूतरात्री..
...अंकुश नवघरे...

No comments:
Post a Comment