बाभूळभूत...*
लेखक:- अंकुश सू. नवघरे. (पालघर)
(ह्या कथेचे सर्व हक्क लेखकाकडे सुरक्षित आहेत)

नमस्कार मित्रांनो मी अंकुश नवघरे...
आज मी तुम्हाला जो अनुभव सांगणार आहे तो माझा स्वतःचा आहे. साधारणतः १३ ते १४ वर्षांपूर्वी ची गोष्ट आहे. माझे ग्रॅज्युअशन पूर्ण झाले होते आणि मला जॉब नसल्याने माझ्याकडे timepass करायला बराच वेळ होता. त्यावेळीही मला आत्तासारखीच भूतांविषयी खूप ओढ होती. भूत बघण्यासाठी मी कुठेही जायला तयार असायचो. माझा एक मित्र आहे त्याचे नाव दिलीप असे आहे. दिलीप ला ह्या सर्व गोष्टींची माहिती होती. दिलीप च्या अंगात वाघोबा च वारं पण येते. वाघोबा हा एक देव आहे त्याची देवळे गावाच्या वेशीपाशी असतात आणि कोणाला भूत इत्यादी लागलं तर वाघोबाला नवस केला जातो.
मला भूत बघण्याची इतकी ओढ लागली होती की मी दिलीप जवळ हट्ट धरला होता की मला काहीही करून भूत बघायचेच आहे. त्याने माझी खूप समजूत काढली कि हे इतकं सोप्पं नसते. कधी कधी आपल्या जीवावर पण बेतू शकते. पण मी ऐकत नाही असं पाहून तो म्हणाला की माझ्याजवळ एक अशी विधी आहे की त्याने आपण भुताला बोलावू शकतो. पण त्यात खूप धोका आहे तर तू नीट विचार करून सांग. ते ऐकून मी मागचा पुढचा काहीच विचार न करता त्याला होकार कळवला.
त्याने सांगितलेली विधी अशी होती...
अमावास्येला रात्री १२ वाजता स्मशानात बाभळीच्या झाडाखाली एक राक्षाचौकी लावावी. साधारणतः २ माणसे त्यात झोपू शकतिल इतकी ती मोठी असावी. त्यानंतर आपल्या समोर एक लिंबू एक अंड आणि एक नारळ ठेऊन त्यावर आपल्या अनामिक बोटाचे जरासे रक्त लावावे. नंतर ह्या मंत्राचा जाप १००८ वेळा करायचा. मंत्र:- ओम् श्री व वं भु भुतेश्वरी मम् वश्यम कुरु कुरु स्वाहा। हि साधना ३ दिवसाची असते. रोजची साधना संपल्यावर तुम्हाला अस दिसून येईल की ३ वस्तूंपैकी १ वस्तू गायब झालेली असेल. दुसऱ्या दिवशी परत ३ वस्तू ठेऊन सेम विधी करावी त्यावेळी २ वस्तू गायब होतील. शेवटच्या दिवशी सर्व वस्तू गायब झाल्या की समजायचं कि आपली साधना पूर्ण झाली. असे त्याने सांगितल्यावर मी त्याला विचारले की मग पुढे काय होते त्यावर तो बोलला कि त्यालाही ते माहित नाही. तीच रिस्क आहे. म्हणून तो सांगत होता की ते करू नकोस.
पण मी हट्टाला पेटलो होतो. ठरलेल्या वेळी आम्ही दोघे स्मशानात पोहोचलो. सर्व सोपस्कार झाल्यावर रामरक्षा कावचाचा पण पाठ केला. पाहिल्या दिवशी नारळ गायब झाला होता. दुसऱ्या दिवशी लिंबू गायब झाला होता. पण मला जास्त भीती वाटली नव्हती कारण आम्ही दोघे होतो. विधीत यश येत असल्याने मला खूपच बरं वाटलं होतं. तिसऱ्या दिवशी आम्ही तिकडे गेलो असता आम्हाला अस दिसलं कि सगळी कडे रक्तासारखं काही पडलं होतं आणि आमची जागा खराब झाली होती. साधनेत जागेला खूप महत्व असते. ज्या जागी पहिल्या दिवशी साधना केली जाते त्याच जागी शेवटपर्यंत करायची असते नाहीतर संकटे येऊ शकतात. म्हणून दिलीप बोलला कि आपण साधना थांबवूया काही गडबड आहे. पण मी हट्टाला पेटलो होतो मी बोललो कि नाही आपण करायचंच.
तो नाईलाजाने तयार झाला आणि साधनेला सुरवात झाली. साधना करत असताना आजूबाजूला खूप किंचाळण्या सारखे आवाज येऊ लागले. मी डोळे उघडून पहिले पण काहीच दिसत नव्हते.अस वाटत होते की आजूबाजूला असंख्य जीव किंवा काही फिरत आहे. पण मी लक्ष दिले नाही. ज्यावेळी पूर्णाहुती झाली तेव्हा माझ्या पाठीत जोरात कोणीतरी मारले. आता मात्र मला खूप भीती वाटू लागली होती. सतत भास होऊ लागले होते. जरा वेळाने समोर एक मोठी काळी सावली दिसू लागली. दिलीपला काहीच दिसत नव्हतं ऐकू येत नव्हतं. ती सावली बोलली के मला कशाला बोलावलंय आणि हसू लागली तशी आजूबाजूची सर्व झाड पण हलु लागली. सगळीकडे झाडीमधे खस खस होत होती. तिला बघून माझ्या तोंडातून शब्दच फुटत नव्हता. मी दिलीप ला दाखवायचा प्रयत्न करत होतो आणि ती सावली जवळ जवळ येत होती. ती एकदम जवळ आली मला खूप विचित्र, जे शब्दात वर्णन करता येऊ शकत नाही असं, वाटत होत. ती जवळ येऊन मला पकडणार अस वाटलं इतक्यात एक मोठा प्रकाश जसा चमकला आणि दिलीप वेगळाच करू लागला.
दिलीप उठून उभा राहिला आणि त्या सावलीवर धावून गेला. त्याला पाहून ती सावली पळू लागली. अचानक त्याने एक वाघासारखी डरकाळी फोडली तेव्हा मी समजलो कि त्याच्या अंगात वाघोबाच वार संचारल होत. कारण कि त्याच्यापण जीवावर बेतल्यामुळे त्याच रक्षण करण्यासाठी ते प्रकटल होत. मी पण जोरात जय वाघोबा जय जीवदानी माता असा जयघोष केला. समोर दिलीप मध्ये आणि त्या सावलीत बराच वेळ जुंपली होती तो पर्यंत ३ वाजून गेले होते. नंतर ती सावली हळू हळू गायब झाली. ते सर्व बघून मी खरोखरच खूप घाबरलो होतो आणि बेशुद्ध झालो. दिलीप मला त्याच्या घरी घेऊन गेला. त्याच्या आईने मला काही जडीबुटी खायला देऊन शुद्धीवर आणले. त्यानंतर मी ३ महिने आजारी होतो. मला स्वप्न पडायची त्यात ती सावली यायची मला घाबरवायची.
त्यातून बर व्हायला मला खूप वेळ गेला. त्यानंतर आम्ही एका मंत्रिकाकडे जाऊन पण विचारणा केली तेव्हा कळलं की जागा बदलल्याने आधी ज्या भुताच आम्ही आवाहन केलं ते न येता काही भलतंच आलं होतं. पण दिलीप मुळे माझे प्राण वाचले. त्यानंतर ह्या गोष्टींचा मी कधीच हट्ट केला नाही की त्यावर अविश्वास हि ठेवला नाही.
स्टोरी आवडली असेल तर लाइक करा. कंमेन्ट करा पण ह्यात दिलेली विधी स्वतःहून करू नका कारण कि ते तुमच्या जीवावर बेतू शकते. असे जर कोणी केले आणि त्याला काही त्रास झाला तर त्याला मी जबाबदार असणार नाही.
धन्यवाद...

अंकुश सू. नवघरे.
No comments:
Post a Comment