सुटका...
लेखक:- अंकुश सू. नवघरे. (पालघर)
©Ankush S. Navghare ®२०१८
(ह्या कथेचे सर्व हक्क लेखकाकडे सुरक्षित आहेत)
साधारणतः २५ वर्षांपूर्वीची गोष्ट आहे. तेव्हा आम्ही एकत्रकुटुंब पद्धतीत गावी राहायचो. गावात आमचे आजोबांनी चालू केलेले छोटेसे चहा, वडे, भज्या, पोळीभाजी, इत्यादी बनवण्याचे हॉटेल होते त्यातच बिडी काडी ही विकण्यासाठी ठेवली होती. हॉटेल तसे चांगले चालायचे परंतु काही दिवसांपासून परप्रांतीयांनी जास्त गुंतवणूक करून गावात अजून दोन तीन हॉटेल उघडल्याने आमच्या धंद्यावर परिणाम झाला होता. कधी कधी वाटायचे की आता धंदा बंद करावा आणि सरळ नोकरी पत्करावी परंतु वडिलोपार्जित व्यवसाय असल्याने हॉटेल बंद करायची इच्छा होत नव्हती. म्हणून शेवटी मी गावाच्या बाहेरच्या बाजूला अजून एक नवीन छोटेसे हॉटेल टाकायचे ठरवले. खूप शोधाशोध करूनही मला मोक्याची जागा मिळत नव्हती. तिथेच गावाच्या बाहेर शेताच्या रस्त्याजवळच्या विहिरी लगतची एक जागा माझ्या मनात भरली होती. पूर्वी तिथेच विहिरीच्या बाजूला कोणाचीतरी छोटी खानावळ होती, खुप चालायची पण नंतर कित्येक वर्षे बंद होती. त्या विहिरीबद्दल लोकांच्या मनात जरा भीती होती म्हणून तिकडे हॉटेल चालेल की नाही अशी शंका असल्याने निर्णय मागेपुढे होत होता. पूर्वी गावात नळ नसताना त्या विहिरीचे पाणी पिण्यासाठी किंवा कपडे, जनावरे धुण्यासाठी वापरात असत परंतु बऱ्याच वर्षांपूर्वी गावातील एका सुशिक्षित माणसाचे प्रेत त्या विहिरीत फुगून वर आले होते. तो कसा मेला हे गूढ बनूनच राहिले पण तेव्हापासून विहिरीवर लोकांना काही अमानवी अनुभव आल्याने त्याबाजूला कोणीच फिरकेनासे झाले होते. मलाही त्याच गोष्टीसाठी घरातून विरोध होत होता तरीही शेवटी मी तिकडेच विहिरीच्या बाजूला असलेल्या त्याच जुन्या खानावळीच्या जागेवरच आमचे नवीन हॉटेल सुरू केले. आमचे नवीन हॉटेल गावाच्या ज्या बाजूला होते तो भाग गावाच्या जरा शेताकडच्या बाजूला असल्याने सकाळच्या वेळी गावातल्या लोकांची खूप गर्दी असायची. शेतावर जाणारे मजूर, कामगार, शेतकरी असे सर्वच यायचे परंतु कदाचित विहिरींच्या भीतीमुळे हवितशी गर्दी होत नव्हती आणि त्यातच संध्याकाळचे सहा वाजून गेले की जास्त कोणीच फिरकत नसे. एखाददुसरा शेतकरी इत्यादी रात्री राखण करणारे लोक असे मधेच बिडी काडी साठी येत असत. हॉटेलच्या बाजूला असणाऱ्या विहिरीत आणि विहीरीच्या आजूबाजूला खूप झाडे झुडुपे वाढल्याने तिचे पाणी कोणीच वापरात नसत तसेच तिच्याजवळ कोणीच फिरकत नसे म्हणून मी ती विहीर दोनतीन मजूर लावून थोडी साफ करून घेतली होती. मला त्या विहिरीजवळ जायला काहीच वाटत नसे. विहिरीत खूप मासे होते आणि कासवे पण होती. दुपारच्या वेळी विहिरीजवळचा परिसर थंड वाटत असल्याने मी तिकडे जात असे आणि त्या विहिरीत डोकाऊन माश्यांची मजा पहात असे.
...हल्ली मला त्या माशांचा आणि कासवांचा जरा जास्तच लळा लागला होता. मधून मधून मी पावाचे तुकडे इत्यादी विहिरीतल्या माशांना टाकत असे. मला जसे विहिरीचे आकर्षण वाटायचे तसेच अजून एक माणसालाही ते होते. मला आठवतेय की मी माशांना खाणे टाकणे सुरू केल्यापासूनच्या दिवासपासूनच असेल पण एक माणूस रात्री आठ च्या सुमारास मला नेहमी त्या विहिरीच्या आसपास डोकावताना दिसत असे. कधीकधी तो माझ्या हॉटेल ला येऊन काही न काही खायला घेऊन जात असे. कोणीतरी गावातलाच असेल असे वाटून मी त्याच्याकडे जास्त लक्ष दिले नाही. नंतर मी रात्री पण हॉटेलमध्येच झोपायला सुरुवात केली होती कारण त्यामुळे मला पहाटे लवकर हॉटेल उघडायला सोपे जात होते, परंतु अमावस्येच्या आणि पौर्णिमेच्या दिवशी मी पूर्णदिवस हॉटेल बंद ठेवत असे आणि दुसऱ्यादिवशी सकाळी ८ वाजता उघडत असे. असेच दिवसामागून दिवस जात होते आणि हळूहळू माझे हॉटेल जोर धरत होते. एकदिवस अमावस्या होती परंतु मला लक्षात न आल्याने मी हॉटेल चालू केले आणि सर्व खाण्याचे पदार्थ बनवून गिर्हाईकांची वाट पाहत बसलो होतो, संध्याकाळचे ५ वाजत आले तरी एखादा गिर्हाईक सोडला तर कोणीच फिरकले नव्हते. शेवटी काळोख पडायला लागल्यावर मी सर्व आवरते घेतले. आज अजिबातच धंदा झाला नसल्याने मी खूपच दुखी झालो होतो. तेवढ्यात मला त्या विहिरींची आठवण झाली म्हणून मी रात्री मला जेवण्यापूरते पुरेल इतके खाणे काढून ठेवले आणि बाकीचे घेऊन विहिरीवर आलो. आज सर्व उरलेले जेवण विहिरीतल्या माशांना खाऊ घालायचा असा माझा मानस होता.
...मी विहिरीवर आलो तेव्हा तो माणूस पण तिथेच बसून विहिरीतल्या माशांकडे पाहत होता. मी खाद्यपदार्थ काढल्यावर तो त्या खाद्य पदार्थांकडे पाहत असताना मला काहीतरी वाटल्यामुळे मी त्याला विचारले की, ओ पाहूण काही खाणार का, त्यावर त्याने काहीच न बोलता फक्त होकारात्मक मान हलविली म्हणून मी सर्व नाश्ता त्याच्यासमोर ठेवला. नाश्ता समोर येताच तो बकाबक खाऊ लागला. त्याला तसे करताना पाहून मला असे वाटले की नक्कीच त्याला खूप भूक लागली असणार. त्याने सर्व नाश्ता संपवून जरासा उरलेला विहिरीत माशांना टाकला. मलाही आता आतून खूप बरे वाटले की आपला धंदा नाही झाला तरी कोणाचेतरी पोट भरले. त्याने त्याच्या खिशात हात घातला आणि ५० रुपयांची नोट काढून माझ्यासमोर धरली. मी त्याला नको नको म्हणत असताना माझ्या खिशात कोंबली. आज पहिल्यांदाच तो बोलला की कधी कधी खाऊ घेऊन येत जा. मग असे रोजच होऊ लागले. उरलेला सर्व खाऊ तो विकत घेऊ लागला. खिशात हात घालून तो कधी ५०, कधी १०० तर कधी त्याहीपेक्षा जास्त नोटा काढून देत असे. कधीकधी थोड्याश्या नाश्त्याला पण खूपच जास्त पैसे देत असे. मी नाही म्हणत असताना माझ्या खिशात कोंबत असे. कधी कधी मला असे वाटायचे की नक्कीच हा कोणितरी वेडा आहे. आता माझ्या हॉटेल मधला सर्वच माल संपत असे. आता दिवसभरात कोणीच गिर्हाईक नाही आले तरी मला चालत असे कारण तो माणूस रात्री सर्व माल घेत असे.
...काही दिवसांपासून मी पण मुद्दामूनच तिपटीपेक्षा जास्त नाष्टा बनवू लागलो होतो, कारण काहीच उरायची भीती नव्हती. आता आमचे गावातले हॉटेल पण व्यवस्तीत चालत चालू लागले होते. हळुहळू मी खूप पैसा कमावला आणि तोच पैसा वापरून गावातले हॉटेल व्यवस्तीत आणि मोठे बांधून घेतले, तिथे बाहेरगावच्या लोकांना राहण्याची सोय केली त्यामुळे लोकांची वर्दळ खूप वाढून काम वाढल्याने माझे गावाबाहेरील हॉटेल कडे कधी कधी दुर्लक्ष होऊ लागले परंतु मी नियमितपणे रात्री जात असे आणि त्या माणसाला नाश्ता पुरवत असे. कधी कधी मी विहिरीवर बसलेलो असताना गावातून येणारी जाणारी लोक माझ्याकडे बघून हसत असत आणि हातवारे करून एकमेकाला काही तरी सांगत परत जोरात हसत असत परंतु मी लक्ष देत नसे. ते तसे का करतात ह्याचे कारण मला समजत नव्हते. परंतु कधीकधी गावात अशी चर्चा कानावर आली होती की, लोक म्हणायची की हा एकटाच विहिरीवर बसून बडबडत असतो. ह्याला वेड लागले आहे इत्यादी. असेच खूप दिवस निघून गेले. आता माझे दुकानात जास्त लक्ष नासायचेच. मी सकाळी नाश्ता बनवून विहिरीवरच जाऊन बसत असे आणि संध्याकाळी सर्व उरलेला नाष्टा त्या माणसाला देत असे. हल्ली हल्ली तो माणूस सकाळपासूनच येऊ लागला होता. दिवाळी जवळ आली होती. मिठाईच्या मोठमोठ्या ऑर्डर गावतील दुकानात येत होत्या. नवीन दुकान काढल्यानंतर पहिल्यांदाच कामाच्या व्यापात गुंतून पडल्याने गेले दोन ते तीन दिवस मी नवीन हॉटेल मध्ये फिरकलोच नव्हतो. अचानक दिवाळीच्या अमावस्येच्या दिवशीच मला असे वाटले की अरे २..३ दिवस आपण गावाबाहेरच्या हॉटेलात फिरकलो नाही. तो माणूस बिचारा आपली वाट बघत उपाशीच राहिला असेल. रात्रीचे ८ वाजून गेले होते तरी त्या विचाराने मला खूपच वाईट वाटल्या मुळे मी लगेच हॉटेल कडे जायला निघालो आणि पोहोचल्यावर पाहतो तर काय, तो माणूस विहिरीजवळ माझीच वाट पाहत बसला होता. मला पाहिल्यावर रागातच बोलला की काय राव तुम्ही इतक्या दिवसातून आज आलात. इतकेदिवस मी आणि माझे मासे उपाशीच राहिले ना! ते बघा भुकेने तडफडून मेले सर्व. तुम्हाला मी इतकी मदत केली, जवळजवळ वर्षभरातच तुमचे गावचे हॉटेल पण मोठे झाले. तुमच्यासाठी इतके करून पण तुम्ही हे पांग फेडलेत. तो म्हणाला की बघा जरा त्या माशांकडे, तुम्हांला ह्याची शिक्षा भोगाविच लागणार. त्याचे ते बोलणे ऐकून मी माशांकडे पहात असताना अचानक माझ्या छातीत जोराची कळ आली आणि तोल जाऊन मी विहिरीत पडलो. असं कितीवेळ पडलो असेल माहीत नाही पण बहुतेक रात्र उलटून गेलेली असावी. कोणीतरी मला बाहेर काढले होते आणि मी विहिरीच्या कठड्यावर बसलो होतो. त्या माणसाचा कुठेच पत्ता नव्हता. समोर माझ्या हॉटेल च्या बाहेर खूप लोकांची गर्दी जमली होती. सर्वजण आपापसात काहीतरी कुजबुजत होते. माझ्याकडे कोणाचेच लक्ष नव्हते. मला वाटले की हॉटेल मध्ये चोरी तर नाही ना झाली म्हणून मी गर्दीतुन वाट काढत काढत जाऊ लागलो तरी कोणाचेच माझ्याकडे लक्ष नव्हते किंवा ते माझ्याकडे पाहत नव्हते. शेवटी मी तिकडे पोहोचलोच आणि पाहतो तर काय तिकडे एक भिजलेला माणूस उपडा पडला होता. आजूबाजूचे लोक हळू आवाजात काहीतरी कुजबुजत होते. मी कान देऊन नीट ऐकले. एकजण म्हणाला की हा विहिरीत पाय घसरून पडला असेल रात्री. दुसरा म्हणाला काल अमावास्या होती ना, अशा घटना इथे नेहमीच घडतात. तिसरा म्हणाला फुगून प्रेत पाण्यावर तरंगत होते गण्याने पाहिले. मी त्यातल्या एकाला विचारले की गावातलाच होता का? पण माझ्या प्रश्नाचे कोणीच उत्तर दिले तर नाहीच वर माझ्याकडे पाहिले पण नाही. मला खूपच अपमानास्पद वाटले. आज गावात माझ्याहून बडे प्रस्थ कोणीच नाही. गावात राहण्याची सोय असलेले एकमेव हॉटेल माझेच आहे. गावाबाहेर दुसरे हॉटेल आहे. कितीतरी जमिनी आहेत, शेते आहेत, हे सर्व मी एक वर्षाच्या आतच मेहेनेतीने कमावले. ह्यांची कोणाची लायकी तरी आहे का माझ्याशी बोलायची, तरी ह्यांना विचारतोय पण ह्यांना फार माज आला आहे. बघून घेईन एकेकाला.
...असा विचार करत करत आपल्या हॉटेल च्या आवारात हा कोण असा पडला असेल असे वाटून मी त्याचे तोंड पाहण्यासाठी खाली वाकणार इतक्यात कोणीतरी त्याला सरळ केले आणि त्याचे तोंड पाहून किंवा पाहण्या आधीच की काय पण क्षणभर मला चकारावल्या सारखे झाले आणि मी तिथेच कोसळलो. रात्रीचे ८ वाजून गेले असतील, खूप थंडी वाजत होती त्यामुळे मला जाग आली, मी आजूबाजूला पाहिले, मी परत त्या विहिरीच्या कठड्यावर होतो आणि माझ्या समोरच तो माणूस बसला होता. माझ्याकडे बघून हसला आणि म्हणाला काय पाव्हण, सर्वकाही ठीक आहे ना? मी म्हटलं ठीक आहे. त्यावर तो म्हणाला की माझं काम झालं, आता मी जातो, आता ते हॉटेल परत चालू झाले की तूच ह्या माशांना रोज खायला घालत जा.... असे म्हणून तो गायब झाला... तो काय बोलत होता ते आधी मला नीट कळत नव्हते म्हणून मी त्याला खूप हाका मारल्या, परंतु तो काही आलाच नाही. तिथे मी एकटाच बसलो होतो. रात्रीचे ८ वाजून गेले होते. मी सकाळचा प्रसंग आठवण्याचा प्रयत्न करू लागलो, मला आठवले की मी खाली वाकून त्या माणसाचे तोंड पाहण्याचा प्रयत्न केला इतक्यात दुसऱ्या कोणीतरी त्याला सरळ केले आणि मला दिसले की तो माणूस सेम माझ्या सारखाच दिसत होता. हे कसे शक्य आहे मी तर इकडे आहे. ते आठवून परत मी चक्रावलो, परत माझ्या छातीत एक जोराची कळ आली आणि मी परत विहिरीत त्या विहिरीत कोसळलो. तेव्हापासून आज ह्या स्टोरीची ही शेवटची ओळ तुम्हाला सांगेपर्यंत मी अजूनही विहिरीच्या कठड्यावर बसून वाट पाहतोय की तुमच्यापैकी कोणीतरी अमावास्येला ह्या माशांना खायला घालायला येईल आणि माझी इथून सुटका होईल.
धन्यवाद...
अंकुश नवघरे...

No comments:
Post a Comment