दत्तक (काल्पनिक कथा)
भाग ४
प्रल्हाद रक्ताने भरलेलं तोंड घेऊन जयप्पाकडे आला... त्याचे डोळे लाल झाले होते... जिभल्या चाटत चाटतच त्याने जयप्पाचा पाय पकडला आणि सर्रकन त्याला ओढत नेले... आम्हाला काही कळणार त्या आधीच त्याने जयप्पाचा पाय गुडघ्यातून कटकन मोडला... तशी एक जीव घेणी किंकाळी माळरानात पसरली... जयप्पाच्या आवाजाने आम्ही भानावर आलो आणि प्रल्हादला पकडलं... पाच गडी असून पण तो कोणालाच ऐकत नव्हता... एकाने त्याच्या डोक्यावर लाकडाने जोरात मारलं आणि तो बेशुद्ध पडला... दोघा जणांनी जयप्पाला उचलून घरी आणलं आणि बाकीच्यांनी प्रल्हादला त्याच्या घरी नेलं... जोर जोरात हाका मारून पण शोभा दार उघडत नव्हती... म्हणून दोघांनी दार ठोकायला सुरुवात केली,,, तरी पण तिने दार उघडलं नाही... काही तरी भानगड आहे हे सगळ्यांना समजलं... तसं आख्ख गाव जमा झाल.... शेवटी गावकऱ्यांनी दार तोडलं आणि आत गेले तर शोभा कसली तरी पूजा करत होती.. तिच्या समोर मानवी कवटी,,, लिंब,, टाचण्या,, बुक्का,,, काळ्या बाहुल्या,, हळद कुंकू,, वाटीभर रक्त आणि भस्म होता.... बाजूलाच तीच पोरगं गाढ झोपलं होतं... सगळ्यांनी तिला बाहेर आणलं आणि सोबत ते सामानही... माझं बाळ मला द्या... नाही तर एक एकाला मारून टाकील.. इतका आरडा ओरडा असूनही बाळ काही उठलं नाही... एकाने त्याची नस तपासून पाहिली ते जिवंत होतं... मूडद्यानो सोडा मला,,, माझं बाळ आणा इकड... दात ओठ खात बोलत होती... आजवर शांत असणाऱ्या शोभाचे हे वेगळं रूप बघून सगळेच चकित झाले... तिने काळी साडी घातलेली,,, केस मोकळे सोडलेले,, कपाळाला कुंकवाने मळवट भरलेला... हातात काळ्या बांगड्या... एखादी चेटकीण दिसावी तशीच ती दिसत होती... गावकऱ्यांनी त्या दोघांचे हात पाय बांधून त्यांना एका पारावर ठेवलं... गावकरी काय करत आहेत त्याकडे दोघांचंही लक्ष नव्हतं... त्यांना फक्त त्यांचं बाळ दिसत होतं,, जे आता रडत होतं... आमच्या बाळाला द्या इकडे... न्हाय तर तुमच्या नरडीचा घोट घेऊ... त्याला काही झालं तर,,, तुम्हा सगळ्यांच वाटोळं करू... तुमची मुलं पण जिती राहायची नाहीत.... हा शाप हाय,, रागा रागाने बोलत होती... माझ्या लेकरापायी मी इतकी वर्षे घालवली आहेत अन तुम्ही त्याला आमच्या पासून येगळ करताय... बेंबीच्या देठापासून ओरडत होती...
एक जण पुढे येऊन म्हणाला,, त्यांनी कितीही पाप केलं असलं तरी तो त्यांच्या पोटचा गोळा हाय... तीच रडणं,, पोरासाठी तरफडन बघून गावकऱ्यांनी त्याला तिच्याकडे दिलं... तसे तिने त्याचे मुके घ्यायला सुरुवात केली... हृदयाशी घट्ट पकडून रडत रडतच म्हणाली,,, मी तुला कुठेही सोडून जाणार नाही बबड्या.. तू जीव हायस माझा... प्रल्हादने पण रक्ताने भरलेल्या तोंडानेच त्याचे मुके घेतले... तू आमच्याच बरोबर राहणार... ते बी कायमचा... अस म्हणत प्रल्हादने त्याला वर उचलले आणि पारावर जोरात आदळणार तेच,,, मी त्या पोराला धरलं आणि त्याच्या कडून हिसकावून घेतलं... ते दोघे इतके क्रुर असतील हा विचार पण कोणी केला नव्हता... गावकऱ्यांनी त्या दोघांना त्यांच्याच घरात फाशी देऊन जाळून टाकलं... आता तीच दोघ इथ आली आहेत... आपल्या रुद्रकडे... पण रूद्रला का त्रास देत आहेत ते?? माझ्या रुद्रने काय केलंय... रडतच वेदिकाने विचारलं.... रूद्रने काही केले नाही सुनबाई,,, चूक माझी आहे... जी आता तुम्ही सगळे भोगताय... माफ करा मला अस म्हणत दोघांपुढे हात जोडून तात्या उठून उभे राहिले .... कोणती चूक,,, हे काय बोलताय तात्या....??? वेदांत पण उठून उभा राहिला.... "तू माझं पोरगं न्हाय र......" म... म... म्हणजे...??? अडखळतच वेदांतने विचारले... प्रल्हाद आणि शोभाचं..... पुढे काही बोलणार तेच तात्या तोंड झोडायला लागले... तात्यांच हे बोलणं ऐकून वेदांतच्या पाया खालची जमीनच सरकली.... त्याच्या डोळ्यात टचकन पाणी आलं... तुम्ही माझे तात्या नाहीत...??? अस नाही होणार,, हे खोटं आहे... वेदांत वेड्या सारखं स्वतःशीच बडबडायला लागला... वेदिकाने त्याला जवळ घेतलं... त्या पोराला सांभाळायला कोणीही तयार नव्हतं,,, म्हणून मी दत्तक घेतलं आणि त्याला माझं नाव दिलं... आम्ही ते गाव कायमच सोडून इकडे आलो आणि तुला इथे वाढवलं... पण मला न सांगता तू ह्यांना तिकडे घेऊन फिरायला गेलास... आणि हे माग घेऊन आलास... तसा खोलीत अंधार पसरला,, पुन्हा तो कुबट वास यायला लागला.... बोलण्याच्या नादात चंदन कधी संपलं,,, हे कोणालाच समजलंच नाही... ती आली होती,,, तीच बाळ घ्यायला.. फक्त एक तास उरला होता,,, त्या वेळातच त्यांना विधी पूर्ण करायचा होता.... तात्यांनी आधीच सगळं काही करून ठेवल होत... त्याप्रमाणे त्यांनी त्या रिंगणात वेदांतला बसवलं... रुद्रच्या तीन वस्तू पण ठेवल्या आणि वेदीकाला वेदांतच्या मागे बसण्यास सांगितले.... घनघोर युद्ध व्हावं तसे तात्या आणि ती चांडाळीन ओरडत होते... सुनबाई काही झालं तरी तू त्याच्या मागून उठायचं नाही... घाबरायचं नाही,,, ह्या दोघांचा जीव आता फक्त तूच वाचवू शकते... तात्यांचे हे बोलणं ऐकून तिने मनाची पूर्णपणे तयारी केली... बायकोचं आणि आईच कर्तव्य आज तिला पार पाडायचं होतं... त्यांना वाचवण्यासाठी ती काहीही करायला तयार होती... थेरड्या तू काय पण कर... मी ह्यांना घेऊनच जाणार... आता ती तिच्या खऱ्या रुपात आली आणि रूद्र खाली पडला... तिचे रूप इतके भयानक होते की,,, ते बघून वेदीकाला चक्कर आली... पण तात्यांचे शब्द तिच्या कानावर पडत होते... आता ती वेदिकाच्या बाजूलाच येऊन बसली... आणि तिच्या कानाजवळ येऊन हळूच आवाजात काही तरी बोलून फुंकर मारून गेली... मधेच तिच्या केसात हात घालून तिचे केस ओढत होती,,, तर कधी पाठीवर नखं मारत होती.... मला माझं बाळ द्या,,, घाणेरड्या आवाजात रडून बोलायची... तर कधी थेट वेदिका समोर उलटी उभी राहून हसायची...
क्रमशः
No comments:
Post a Comment