दत्तक (काल्पनिक कथा)
भाग ५
आता मात्र वेदीकाच लक्ष फक्त वेदांत आणि रूद्र कडे होते.... तात्या जे मंत्र बोलत होते त्यांचा त्रास त्या चेटकीणी सोबत ह्या दोघांना पण होत होता.... ती अचानक येऊन वेदीकाच्या खांद्यावर बसली... वेदिकाला तिचं ओझं सहन होत नव्हतं,,, तिच्या शरीराच रक्त वेदीकाच्या तोंडावरून खाली ओघळत होतं... सोबत चिकट पदार्थ पण... ती चांडाळीन तिच्या जिभेने वेदिकाचा पूर्ण चेहरा चाटत होती... आणि हूं... हू... हू... आवाज करत केसांवरून हात फिरवत होती.... वेदिका इतकी घाबरली होती की,,, तिचं काळीज कधीही फुटून बाहेर येईल असच वाटत होतं... तिला बाजूला करण्यासाठी वेदिका उठणार तेच तात्यांनी तिच्यावर गोमूत्र शिंपडल... तशी वेगानेच ती चांडाळींन मागे फेकली गेली... पोरी जागची उठू नको... तुला उठवण्यासाठीच ती हे सगळं करत आहे... थेरड्या पहिले तुलाच संपवते मग ह्यांना... रागाने बोलत ती रांगत रांगतच तात्यांजवळ आली,,, आणि त्यांच्याकडे बघून हसतच रुद्रला भिंतीवर दनकण आपटलं... आ....ईईई ग..... काळीज चिरून टाकणारी किंचाळी रुद्रच्या तोंडातून बाहेर निघाली.... त्याला वाचण्यासाठी वेदिका जागची उठलीच आणि पळत रुद्रकडे गेली.... सोन्या,,, उठ.... बघ माझ्याकडे.... तुला काही नाही होणार.... रूद्र मात्र गपचूप पडला होता,,, काहीच हालचाल करत नव्हता... त्यो न्हाय उठणार आता पण तू उठलीस.... हा... हा.... हा.... माझा रस्ता मोकळा झाला.... माझं बाळ मला भेटलं,,, असं म्हणत ति वेदांतकडे गेली.... अरे थेरड्या आता तू काय बी करु शकत न्हाय... हे माझं पोरं हाय,,, माझं.... छाती बडवून जोर जोरात बोलत होती.... ती वेदांतवर हवी होणार तेवढयात तात्यांनी त्या फोटोला टाचणी टोचली... आणि मोठं मोठ्याने मंत्र म्हणायला सुरुवात केली,,, तो मंत्र इतका प्रभावशाली होता की रूद्र आणि वेदिका दुसरीकडे आदळले... ती चेटकीण पण मागच्या मागे आदळली... वेळ खूपच कमी होता, ती तात्यांवर धावून गेली आणि त्यांचं नरडं पकडलं... तिची टोकदार नखं त्यांच्या नरड्यात घुसली... तिच्या शक्ती पूढे तात्यांची शक्ती कमी पडत होती... माझं बाळ माझ्या पासून लांब केलंस आणि आता बी तेच करतोस... न्हाय सोडणार कोणालाच... तात्या तिला दूर करण्याचा प्रयत्न करत होते... त्यांच्या तोंडातून लाळ पडायला लागली... देवा वाचव रे माझ्या लेकरांना ,, ह्या चांडाळणी पासून अशी मनोमन प्रार्थना करत होते... रूद्रने तर अजूनही डोळे उघडले नव्हते.... वेदिका उठली आणि तिच्याकडे धावून गेली.... सोड मामांना,,, पण तिची ताकद किती...
तात्यांना बोलता पण येत नव्हतं तरी पण ते वेदिकाला काही तरी सांगत होते... पण वेदीकाच्या लक्षात येत नव्हतं.... तिने नीट लक्ष दिलं,, तेव्हा समजलं की,,, ते वेदांत आणि रूद्रकडे बघून काही तरी बोलत होते... पण काय??? वेदांत तर बसला तसा शांत होता.... इथे काय घडतंय ह्याची कल्पना पण नव्हती त्याला.... तात्यांनी खिशातून एक वस्तू काढली आणि ती वेदिका कडे फेकली... तशी ती चेटकीण वेदिकाकडे पळाली... तात्या गळ्याला हात लावून तसेच उठले.. पोरी ती वस्तू,, टाचण्या टोचलेले लिंब आणि तो फोटो वेदांत आणि रुद्रवर उतरवून आगीत टाक... ती अस करणार तितक्यात,,, त्या चेटकीणीने तिचे पाय धरून तिला खाली पाडली.... वेदिका धाडकन खाली पडली... तिच्या तोंडातून रक्त यायला लागलं.... वेदिकाने तरीही हाताच्या मुठीतून ती वस्तू सोडली नाही... तात्या सरकत सरकत च वेदिका जवळ आले आणि तिच्या कडून त्या वस्तू घेऊन रूद्र वर उतरवत वेदांत कडे गेले... त्याच्या वरून त्या वस्तू उतरवणार तेच त्या चेटकीणीने तात्यांचे डोकं धरून खसकन मागे ओढलं.... सगळीकडे रक्त उडलं,, तात्यांच डोकं धडा वेगळं केलं होतं तिने.... तात्या रक्ताच्या थारोळ्यात पडले... हाताच्या मुठीत त्या वस्तू तशाच... हे सगळं बघून ती चेटकीण जोर जोरात हसत होती... तिने ते मुंडकं वर धरत आ... केलं... आणि घटाघटा ते रक्त पिऊ लागली... वेदिकला तर मोठा धक्काच बसला.... तात्या...... म्हणत ती जोरात किंचाळली... बारा कधीही वाजणार होते,,, ही वेळ रडण्याची नव्हती... वेदीकाला वेदांत आणि रुद्रला वाचवायच होतं... आता तिला कशाचीही भीती वाटत नव्हती... लंगडत लंगडतच ती उठून उभी राहिली आणि तात्या पडले तिकडे गेली... ती चेटकीण तिथेच उभी होती... रक्ताने माखलेली ती आता वेदांतला मारणार होती... वेदिका तात्यांच्या हातातली ती वस्तू काढत होती पण तात्यांच्या हाताची मूठ गच्च बसली होती,, तिला उघडतच नव्हती... ती चेटकीण वेदांतला मारणार तितक्यात वेदिकाने तात्यांच्या हातातली ती वस्तू काढली आणि वेदांत पुढे जाऊन बसली... हे बघून ती चेटकीण अजून रागावली... ति वेदिकाला उचलून आगीत टाकणार तेच वेदिकाने वेदांतचा हात घट्ट पकडला... आणि त्या चेटकीणीला काही समजण्या आधीच वेदांत वरून त्या वस्तू उतरवून त्याचा हात सोडून दिला... त्या चेटकीणीने तिला आगीत टाकलं,,, पण वेदिका लगेच पुढे गेली... तरीही तिचा हात आगीत पडलाच आणि सोबत त्या वस्तू पण... ती चेटकीण जोराने किंचाळायला लागली... माझ्या बाळाचा नाळ जाळलास तू... माझं बाळ.... तिचा तो कर्कश आवाज ऐकून वेदांत भानावर आला... रूद्र ने पण डोळे उघडले... तिघही जण त्या चेटकीणीला मरताना बघत होते... तिच्या शरीराचा एक एक भाग जळून खाली पडत होता... तशी ती वेदनेने विव्हळत होती.. आग विझली तशी ती पण नाहीशी झाली.... वेदिका आज जिंकुन पण हारली होती... तिने नवऱ्याला आणि पोराला वाचवलं तर होतं,,, पण तात्यांना वाचवू शकली नाही... वाईट शक्तीचा सामना करताना चांगली व्यक्ती पण गमवावी लागते.... आई,,,, बाबा.... रुद्रचा नाजूक आवाज ऐकून दोघही त्याच्याकडे गेले... तात्यांना अशा अवस्थेत पडलेलं बघून वेदांत मोठं मोठ्याने रडायला लागला... आणि शेवटी हात जोडून एकच म्हणाला... तात्या पुढच्या जन्मी मला तुमच्याच पोटी जन्माला यायचं आहे.... तुमचं पोरगं म्हणून....
समाप्त......
No comments:
Post a Comment