कथा :- अफझल विला
लेखक :- चेतन साळकर
💀💀💀💀💀💀💀💀💀💀💀💀💀
मोजके शब्द :-
नमस्कार ,
निसर्गतःच सक्षम असणार्या पण तरीही, मेंदूला पुरेसा वाव देऊन या अनैसर्गिक, अनाकलनीय गोष्टींवर विश्वास किंवा त्याबद्दल आवड असणार्या माझ्या सर्व मित्र मैत्रिणींना ही कथाभेट.
वास्तविक मी आहे एक "नाट्यनिर्माता - अभिनेता - लेखक - दिग्दर्शक" म्हणुन कार्यरत. पण यातील लेखक म्हणुन सर्वांगी "paranormal activity" आणि "astrology" ह्याचा अभ्यास करण्याचा एक विचित्र (प्रेमळ अनुषंगाने) पायंडा गेली दोन वर्ष जडला आहे, आणि आजतागायत 'एकाचे एकवीस कर' या पंक्ती प्रमाणे वाढत जात आहे.
ही कथा काल्पनिक असून त्याचा मृत अथवा जिवित व्यक्ति अथवा वस्तूशी तिळमात्र ही संबंध नसेल,पण यत्किंचितही तसा संबंध जाणवला तर तो निव्वळ योगायोग समजावा.
मला अनुमती द्या, माझी भेट पुन्हा होईल आता कथेच्या समाप्तीच्या भागात. तोपर्यंत धन्यवाद 🙏
कथा : अफझल विला
भाग :- 1
नाशिकातल्या कालिदास नाट्यगृहात भर लोकांच्या गर्दीत, तुडुंब प्रतिसादात, रात्रीच्या 9 च्या सुमारास टाळ्यांचा कडकडाट झाला. जर्द, भरीव रंगमंचावर जड, जड, अनुभवी पावले 'आस्थे कदम' येऊ लागली. कोणी निवेदकाने भरभरून कौतुक करण्यासाठी दोन-चार पाने लिहून आणली होती. रंगमंचाच्या पाठीमागच्या पडद्यावर मोठा बॅनर लागला होता "निरोप समारंभ". ज्या व्यक्तीला निरोप द्यायचा होता ती व्यक्ति धीमी धीमी पावले वर चढत रंगमंच व्यापू लागली. बघता बघता टाळ्यांचा वर्षाव त्या इसमावर होत होता. आपला पांढरा सदरा, त्यावर करकचून फिरवलेली कडक इस्त्री, त्यामुळे पडलेल्या ठळक रेघा चघळत आणि डाव्या हाताने आपला चष्मा अलगद नाकावरून उचलून पुन्हा नाकावर स्थानापन्न करण्यासाठी, आपल्या अंगठ्याने बोटांना जोड देत ते खुर्चीवर विराजमान झाले. ते होते लेखक, अभ्यासक, पदवीधर, गूढ हालचालींचा मागोवा घेणारे "प्रोफेसर कुलकर्णी"....
आता थोडं मान मागे वळवून भूतकाळात डोकावूया. प्रोफेसर मूळचे कोल्हापूरचे. त्यांच नाव "गिरीधर कुलकर्णी".मूळचे ब्राह्मण कट्टर होते. सोवळे-वोवळे पाळण्यात त्यांचा हातखंडा होता. वाडीला (नृसिंहवाडीला) त्यांचे मूळ घर. त्यांच लग्न झालेल होतं. पण दुर्दैवाने मूल - बाळ नव्हतं. राजाराणी दोघेच संसार करीत होते. त्यांच शिक्षण विज्ञान विषयात झाले असून पदवीधर झालेले होते. कोल्हापूरच्या 'शिवाजी विद्यापीठातून' त्यांनी आपलं शिक्षण संपूर्णाला नेऊन, मग नोकरीच्या खटाटोपात असताना नाशिकातील 'संयुक्त विद्यापीठात', विज्ञान विषयाचे प्रोफेसर म्हणुन नोकरी मिळवली. आता सहाजिकच सारा खापडपसारा घेऊन कोल्हापूर सोडले आणि एका रात्रीत नाशिक गाठले होते. ही वस्तुस्थिती होती 'तीस वर्षांपूर्वीची' .....
तसे ते देव माणूस, एकाग्रता, विनम्रता हा त्यांचा मूळ स्वभाव,पण आता मात्र ते या सार्याला कंटाळले होते. इतकी वर्षे नोकरी, करून करून जीव शमून गेला होता. लेखक म्हणुन त्यांना त्यांचा वेळ हवा होता. एकांत, जिथे चार भिंतीत ते एकटेच राहून आपला लेखक उभारून आणतील, जिथे असतील अश्या वैचित्र्यपुर्ण गोष्टी ज्या आजपर्यंत कोणाला उकलल्या नाहीत.
त्यांनी आपल्या पुण्याच्या घरात जे अगदीच नवीन होत, जिथे अजून रहायला कोणी गेल नव्हतं, तिथे जाण्याचा निश्चय केला. महिनाभर राहून त्यांना आपला वेळ मिळवून समाधान- सुख मिळवायचं होत. त्यांनी तिथल्या 'रामाडी' बिल्डरला फोन लावला "हॅलो, रामाडी,दोन दिवसात मी येतोय माझ्या रूम वर रहायला, महिनाभर तरी." रामाडी म्हणाला "अहो साहेब तुमची रूम खूप खराब झालीय. साफसफाईला पाच दिवस जातील. खूपच खराब झालीय. तोपर्यंत तुम्हाला इथला एक मस्त बंगला देतो. रहा आरामात तिथे, ओके".आता अगदीच निरुपाय म्हणुन प्रोफेसर 'ok- चालेल' असं म्हणाले. आपल्या बायकोला मोठ्या भावाकडे ठेऊन प्रोफेसर निघाले पुण्याला......!!
पुणे - चाकण - राजगुरुनगर - खेड - मंचर असा प्रवास करून, रात्री दहा च्या सुमारास प्रोफेसर 'वडगाव' मधील बस थांब्यावर उतरले. थंडीला जोर चढला होता. डिसेंबर महिन्याची चुणूक लागली होती. आकाशात रागिणी आपलं स्थान अढळीत चमकत होती. आता महिना ह्या मस्त थंडीत आणि स्वताच्या लेखनावर पुरवायचा असा खुमक विचार त्यांच्या मस्तकी निनादला. रस्त्यावरून वर चढण करून वीस दादर चढून गेले आणि समोर नजरेत भरला तो विशालकाय बंगला. बंगला कसला राजवाडा म्हणा अस प्रोफेसर मनमानी कुरकुरले. वास्तुच्या दुतर्फा कुंपण, कापलेली झाडे, मळकट - कळकट भिंतींचा रंग, गर्द धुळीचे लोट, आणि कुंपणात एक लाकडी पाटी. पण त्या पाटीवरील अक्षरे दिसत नव्हती त्या साचलेल्या धुळीमुळे. प्रोफेसर आत गेले. त्यांनी बॅगेतून फडका बाहेर काढला आणि त्या पाटीवर फिरवून सारी धूळ बाजूला सरसावली आणि त्यांची नजर ताठ झाली. डोळे लालेलाल झाले, रागाचे थेंब घळाघळा चेहर्यावरून ओघळले.
त्या पाटीवर नाव लिहिलं होतं "अफझल विला"
भाग 2 पुढील टप्प्यात.....!!
सूचना :- माझ्या प्रत्येक कथा पूर्ण वाचून संपवायचा प्रयत्न करा. अर्धवट सोडून त्या कळणार नाही. बाकी तुम्ही सर्व सुज्ञ आहात.

No comments:
Post a Comment