#घोस्टवाली लवस्टोरी"
मैत्री.... 💙
मी त्याला काही दिवसापुर्वीच "भुताखेतांच्या गोष्टी" नाव असलेल्या ग्रुपवर फेसबुकच्या माध्यमातुन भेटले होते.. नाव त्याचे विशाल.. त्याचे आणि माझे जन्मगांव एकच.. लवकरच आम्ही छान मित्रही झालोत.. बोलायला बरा वाटला तो !! त्याच्याशी बोलतांना जाणवले की, कुठेतरी मनाने दुखावलेला आहे. तसा तो हळवा होताच. आणि त्यामुळे त्याच्याशी एकमेकांविषयी बोलतांना त्याने नकळत आपला दुःखद भुतकाळ व्यक्त केला..
अंदाजे १७-१८ वर्षाचा असताना विशालच्या आयुष्यात एक मुलगी आली.. श्वेता नाव तिचे ! प्रेम आहे की आकर्षण हे न समजण्याइतक्या असलेल्या वयात तो तिच्या हसण्याबोलण्यावर..वागण्यावर .. तिच्या मोकळ्या स्वभावावर भाळुन गेला.. एरवी पुस्तकात रमणारा तो तिच्या विचारात शुन्यात बघत बसला असे.. लाजाळु स्वभाव असल्याने तो तिच्या समोर येऊन भावणा व्यक्त करण्याचे धाडस कधी करुच शकला नाही.. श्वेताला एकदा गाठुन मनातील भावणा व्यक्त करता यावी म्हणुन तो शेगांवला जावुन गजानन महाराजाला नवस बोलुन आला होता.. कृष्णाचा भक्त असलेला तो मनातल्यामनात देवाचा जाप करीत आपल्या प्रेमाला श्वेतासमोर मांडणार तत्पुर्वीच शिर्डीला दर्शनासाठी गेलेल्या श्वेताच्या बसला अपघात झाला... श्वेताला कायमचे गमावल्याचे दुःख तो पचवु शकला नाही.. विशालची देवावर इतकी श्रद्धा असुनही देवाने जाणुनबुजुन श्वेताला आपल्यापासुन दुर केले, ह्यासाठी तो सर्वस्वी देवाला जाबाबदार मानायला लागला,. त्यात तो विचार करायचा की, श्वेताला देवाविषयी श्रद्धा होती म्हणुनच शिर्डीला दर्शनासाठी गेली होती.. मग देवाने का बरं आपल्याच भक्ताला असे जीवनातुन उठवले.. जर खरंच देव असता तर त्याने देवदर्शनासाठी निघालेल्या आपल्या भक्तांच्या बसचा अपघात होण्यापुर्वीच बचाव केला असता.. असल्या देवाला आता मानायचेच नाही.. आणि तेव्हापासुन तो देवाविषयी मनात राग आणि श्वेताला गमावल्याचे दुःख घेत जगत होता...
विशालला मी फेसबुकवर भेटल्यापासुन तो नेहमी एक मित्र म्हणुन मला मनातलं सर्व बोलत होता.. मन हलके करीत होता.. असेच बोलता बोलता मी त्याला मैसेज करुन विचारले की-"विशु हे कधीपर्यंत चालेल? कधीपर्यत घुटमळत जगशिल? कधीपर्यंत देवाला दोष देशील?"
त्यावर विशाल रिप्लाय देत बोलला.. -- "मी श्वेताला गमावले ना, त्याचवेळी देवाला म्हटल होत.. की मी तुझ्या मंदिरात तेव्हाच पाऊल ठेवेल.. जेव्हा तु कुणा मुलीला माझ्या आयुष्यात पाठवशील.. आणि ती माझा हात पकडुन मला मंदिराच्या गाभाऱ्यात घेऊन जाईल व मला तुझ्यासमोर उभी करेल..!!"
अरे हो तुम्हाला सांगायचेच राहले.. माझेही नाव श्वेता आहे. मी पुण्याला राहते.. क्वचित विशालच्या भुतकाळातील प्रेयसीचे आणि माझे नाव सारखे असल्यामुळेच त्याची आणि माझी मैत्री झाली असेल.. कारण काहीही असो.. सध्यातरी एका हळव्या मनाच्या व्यक्तीची मी मैत्रीण होते.. मी ठरवलं की, ह्याला एकदा भेटायचे.. आणि ते करायचे.. जे विशालला अपेक्षितही नसेल..
मी विशालला भेटायला पुण्यावरुन लगेच अकोल्यात आले.. मी गजानन महाराजांची निस्सिम भक्त असल्याने अगोदर दर्शनासाठी शेगांवला जाऊन दर्शन घेतले आणि तेथुनच विशालला कॉल करुन शेगांवला भेटायला बोलावले.. सकाळपासुन सतत पाऊस सुरु होता.. व मंगळवार असल्याने मंदिरात जास्त गर्दीही नव्हती.. मी आडोशाला उभी राहुन विशालची प्रतिक्षा करीत होते.. काही वेळातच त्याचा कॉल आला.. तो मंदिराच्या प्रवेशद्वाराजवळ मला शोधत उभा होता.. मी लगबगीने त्याच्याजवळ गेले.. "अग अचानक कसे काय येणे झाले? आणि मला असं अचानक बोलविण्यामागील कारण तर सांग?"
"अरे काही नाही.. तुला सरप्राइज द्यायचे होते. चल मी तुला एक गम्मत दाखविते.." असे म्हणत मी त्याचा हात पकडला आणि म्हणाले-"विश्वास आहे ना माझ्यावर?"
"अगं हो.. पण असे का विचारतेस?" तो प्रश्नार्थक नजरेने मला बघत होता.. "विश्वास आहे ना आपल्या मैत्रीणीवर.. तर काहीच न बोलता मी नेईल तेथे चल.."-असे म्हणत मी त्याचा हात पकडुन त्याला मंदिरात घेऊन गेले.. काही क्षणातच तो आणि मी गजानन महाराजांच्या समोर होते. तो मला अजुनही आश्चर्याने बघत होता..
"अरे बघतोस काय? तुच देवाला म्हणाला होतास ना की, जेव्हा देव कुणा मुलीला तुझ्या आयुष्यात पाठवेल.. आणि ती तुझा हात पकडुन तुला मंदिराच्या गाभाऱ्यात घेऊन जाईल व तुला देवासमोर उभी करेल.. तेव्हाच तुझी देवावरची श्रद्धा पुर्ववत होईल.. हा आहेस तु.. ही आहे मी.." - बोलता बोलताच देवाकडे हात दाखवित म्हणाले-"आणि हा आहे आपला देव !! आता बोल.. काय करशिल?"-असा प्रश्न करीत मी त्याच्याकडे बघितले.. तो डोळे मिटुन देवासमोर हात जोडुन उभा होता...
मला फार आनंद झाला.. मन भरुन आले.. मी ही डोळे बंद करुन महाराजांसमोर हात जोडले.. मला अचानक जाणवले की, विशाल पापणी न हलविता मला बघत आहे.. मी लगेच डोळे उघडुन त्याच्याकडे बघितले.. तो खरचं मला एकसारखा बघत गालातल्या गालात हसत होता.. "असा काय बघतो माझ्याकडे?"-मी प्रश्न करताच तो अचानक हवेत विरघळायला लागला,, मी आश्चर्याने त्याने बघत होते आणि तो कापरासारखा हवेत लिन होऊन गेला...
"हैलो... ताई"-मागुन आवाज येताच मी मागे वळुन बघितले.. एक दोन मुली मागे होत्या.. "कुणाशी बोलत आहात? मगापासुन तुम्हाला एकटीला असे जोरजोरात बोलताना बघुन सर्व लोक हसत आहेत.." त्या मुलींनी असे म्हणताच मी मागे बघितले.. आजुबाजुला बघितले.. आजुबाजुचे स्त्री पुरुष.. मुले मुली माझ्याकडे वेगळ्याच नजरेने बघत हसत होते.. मी त्यांना इग्नोर करीत आता पर्यंत जे काही झाले, त्याचा विचार करीत मंदिराच्या बाहेर आले.. तितक्यात माझा मोबाईल व्हायब्रेट झाला.. मी पर्समधुन मोबाईल बाहेर काढीत बघते तर फेसबुक मैसेंजरवर "विशाल कुमार वाहाणे" ह्या आयडी वरुन मैसेज होता..
"थैक्स श्विटु... आज माझा आत्मा मुक्त झालाय.. श्वेता सोडुन गेल्यावरच मी ही ह्या जगाचा निरोप घेतला.. पण माझी आत्मा इथेच भुतलावर भटकत होती.. आज श्वेता म्हणुन प्रेयसी जरी मला लाभली नसली तरी श्वेता म्हणुन तुझ्या रुपात भेटलेली मैत्रीण ही मला मित्र प्रेम काय असते हे शिकवुन गेली.. खरचं देव प्रत्येक ठिकाणी हजर राहु शकत नाही, म्हणुन तुझ्यासारख्या लोकांच्या रुपात मित्र होऊन भेटतो.. आणि आता मी जात आहे कायमचा.. माझ्या श्वेताला भेटायला !!"
आता मी ही विचारात होते.. त्याचे फेसबुकवर बोलणे आमची मैत्री.. आमच्या गुजगोष्टी, मी ही आले भेटायला इतक्या दुर थेट आणि शेवटच्या क्षणी अशी झालेली भेट ? सगळं काही चक्राऊन टाकणारं होतं.., मी तिथेच पायरीवर विचार करीत बसले..
म्हणजे काय इतके दिवस मी फेसबुकवर एका आत्म्याशी बोलायची? त्याला तर त्याची श्वेता भेटुन जाईल पण ह्या श्वेताला आता तिचा मित्र कधीच भेटणार नाही. डोळ्यात पाणी आणि हातात व्हायब्रेट होणारा मोबाईल.. फेसबुक मैसेंजरवर त्याचा मैसेज परत एकदा आला होता...!💙
लेखक - विशाल के वाहाणे
जिल्हा व सत्र न्यायालय, अकोला.
दि. २९.०७.२०१८.
मैत्री.... 💙
मी त्याला काही दिवसापुर्वीच "भुताखेतांच्या गोष्टी" नाव असलेल्या ग्रुपवर फेसबुकच्या माध्यमातुन भेटले होते.. नाव त्याचे विशाल.. त्याचे आणि माझे जन्मगांव एकच.. लवकरच आम्ही छान मित्रही झालोत.. बोलायला बरा वाटला तो !! त्याच्याशी बोलतांना जाणवले की, कुठेतरी मनाने दुखावलेला आहे. तसा तो हळवा होताच. आणि त्यामुळे त्याच्याशी एकमेकांविषयी बोलतांना त्याने नकळत आपला दुःखद भुतकाळ व्यक्त केला..
अंदाजे १७-१८ वर्षाचा असताना विशालच्या आयुष्यात एक मुलगी आली.. श्वेता नाव तिचे ! प्रेम आहे की आकर्षण हे न समजण्याइतक्या असलेल्या वयात तो तिच्या हसण्याबोलण्यावर..वागण्यावर
विशालला मी फेसबुकवर भेटल्यापासुन तो नेहमी एक मित्र म्हणुन मला मनातलं सर्व बोलत होता.. मन हलके करीत होता.. असेच बोलता बोलता मी त्याला मैसेज करुन विचारले की-"विशु हे कधीपर्यंत चालेल? कधीपर्यत घुटमळत जगशिल? कधीपर्यंत देवाला दोष देशील?"
त्यावर विशाल रिप्लाय देत बोलला.. -- "मी श्वेताला गमावले ना, त्याचवेळी देवाला म्हटल होत.. की मी तुझ्या मंदिरात तेव्हाच पाऊल ठेवेल.. जेव्हा तु कुणा मुलीला माझ्या आयुष्यात पाठवशील.. आणि ती माझा हात पकडुन मला मंदिराच्या गाभाऱ्यात घेऊन जाईल व मला तुझ्यासमोर उभी करेल..!!"
अरे हो तुम्हाला सांगायचेच राहले.. माझेही नाव श्वेता आहे. मी पुण्याला राहते.. क्वचित विशालच्या भुतकाळातील प्रेयसीचे आणि माझे नाव सारखे असल्यामुळेच त्याची आणि माझी मैत्री झाली असेल.. कारण काहीही असो.. सध्यातरी एका हळव्या मनाच्या व्यक्तीची मी मैत्रीण होते.. मी ठरवलं की, ह्याला एकदा भेटायचे.. आणि ते करायचे.. जे विशालला अपेक्षितही नसेल..
मी विशालला भेटायला पुण्यावरुन लगेच अकोल्यात आले.. मी गजानन महाराजांची निस्सिम भक्त असल्याने अगोदर दर्शनासाठी शेगांवला जाऊन दर्शन घेतले आणि तेथुनच विशालला कॉल करुन शेगांवला भेटायला बोलावले.. सकाळपासुन सतत पाऊस सुरु होता.. व मंगळवार असल्याने मंदिरात जास्त गर्दीही नव्हती.. मी आडोशाला उभी राहुन विशालची प्रतिक्षा करीत होते.. काही वेळातच त्याचा कॉल आला.. तो मंदिराच्या प्रवेशद्वाराजवळ मला शोधत उभा होता.. मी लगबगीने त्याच्याजवळ गेले.. "अग अचानक कसे काय येणे झाले? आणि मला असं अचानक बोलविण्यामागील कारण तर सांग?"
"अरे काही नाही.. तुला सरप्राइज द्यायचे होते. चल मी तुला एक गम्मत दाखविते.." असे म्हणत मी त्याचा हात पकडला आणि म्हणाले-"विश्वास आहे ना माझ्यावर?"
"अगं हो.. पण असे का विचारतेस?" तो प्रश्नार्थक नजरेने मला बघत होता.. "विश्वास आहे ना आपल्या मैत्रीणीवर.. तर काहीच न बोलता मी नेईल तेथे चल.."-असे म्हणत मी त्याचा हात पकडुन त्याला मंदिरात घेऊन गेले.. काही क्षणातच तो आणि मी गजानन महाराजांच्या समोर होते. तो मला अजुनही आश्चर्याने बघत होता..
"अरे बघतोस काय? तुच देवाला म्हणाला होतास ना की, जेव्हा देव कुणा मुलीला तुझ्या आयुष्यात पाठवेल.. आणि ती तुझा हात पकडुन तुला मंदिराच्या गाभाऱ्यात घेऊन जाईल व तुला देवासमोर उभी करेल.. तेव्हाच तुझी देवावरची श्रद्धा पुर्ववत होईल.. हा आहेस तु.. ही आहे मी.." - बोलता बोलताच देवाकडे हात दाखवित म्हणाले-"आणि हा आहे आपला देव !! आता बोल.. काय करशिल?"-असा प्रश्न करीत मी त्याच्याकडे बघितले.. तो डोळे मिटुन देवासमोर हात जोडुन उभा होता...
मला फार आनंद झाला.. मन भरुन आले.. मी ही डोळे बंद करुन महाराजांसमोर हात जोडले.. मला अचानक जाणवले की, विशाल पापणी न हलविता मला बघत आहे.. मी लगेच डोळे उघडुन त्याच्याकडे बघितले.. तो खरचं मला एकसारखा बघत गालातल्या गालात हसत होता.. "असा काय बघतो माझ्याकडे?"-मी प्रश्न करताच तो अचानक हवेत विरघळायला लागला,, मी आश्चर्याने त्याने बघत होते आणि तो कापरासारखा हवेत लिन होऊन गेला...
"हैलो... ताई"-मागुन आवाज येताच मी मागे वळुन बघितले.. एक दोन मुली मागे होत्या.. "कुणाशी बोलत आहात? मगापासुन तुम्हाला एकटीला असे जोरजोरात बोलताना बघुन सर्व लोक हसत आहेत.." त्या मुलींनी असे म्हणताच मी मागे बघितले.. आजुबाजुला बघितले.. आजुबाजुचे स्त्री पुरुष.. मुले मुली माझ्याकडे वेगळ्याच नजरेने बघत हसत होते.. मी त्यांना इग्नोर करीत आता पर्यंत जे काही झाले, त्याचा विचार करीत मंदिराच्या बाहेर आले.. तितक्यात माझा मोबाईल व्हायब्रेट झाला.. मी पर्समधुन मोबाईल बाहेर काढीत बघते तर फेसबुक मैसेंजरवर "विशाल कुमार वाहाणे" ह्या आयडी वरुन मैसेज होता..
"थैक्स श्विटु... आज माझा आत्मा मुक्त झालाय.. श्वेता सोडुन गेल्यावरच मी ही ह्या जगाचा निरोप घेतला.. पण माझी आत्मा इथेच भुतलावर भटकत होती.. आज श्वेता म्हणुन प्रेयसी जरी मला लाभली नसली तरी श्वेता म्हणुन तुझ्या रुपात भेटलेली मैत्रीण ही मला मित्र प्रेम काय असते हे शिकवुन गेली.. खरचं देव प्रत्येक ठिकाणी हजर राहु शकत नाही, म्हणुन तुझ्यासारख्या लोकांच्या रुपात मित्र होऊन भेटतो.. आणि आता मी जात आहे कायमचा.. माझ्या श्वेताला भेटायला !!"
आता मी ही विचारात होते.. त्याचे फेसबुकवर बोलणे आमची मैत्री.. आमच्या गुजगोष्टी, मी ही आले भेटायला इतक्या दुर थेट आणि शेवटच्या क्षणी अशी झालेली भेट ? सगळं काही चक्राऊन टाकणारं होतं.., मी तिथेच पायरीवर विचार करीत बसले..
म्हणजे काय इतके दिवस मी फेसबुकवर एका आत्म्याशी बोलायची? त्याला तर त्याची श्वेता भेटुन जाईल पण ह्या श्वेताला आता तिचा मित्र कधीच भेटणार नाही. डोळ्यात पाणी आणि हातात व्हायब्रेट होणारा मोबाईल.. फेसबुक मैसेंजरवर त्याचा मैसेज परत एकदा आला होता...!💙
लेखक - विशाल के वाहाणे
जिल्हा व सत्र न्यायालय, अकोला.
दि. २९.०७.२०१८.
No comments:
Post a Comment