।। हरे कृष्ण ।।
। रावण संहिता माहिती.
आजकाल बरेच जण आपल्या जीवनातील अडचणींना त्रासून त्यांच्यावर उपाय म्हणून हवं ते करायला तयार असतात.त्यातलाच एक उपाय म्हणून रावण संहितेची निवड काही जण करतात.
पण बऱ्याचदा एखादा उपाय करतांना काम होण्याच्या जागी अजून बिघडते.याला कारण म्हणजे अर्धवट ज्ञान.मुळात रावण संहितेत अघोरी,दैवी उपाय आहेत.समजायला,वाचायला सोप वाटणारे हेे उपाय जर खरच सिद्ध करायचे असतील तर एखाद्या शक्तीच प्रचंड पाठबळ आपल्या पाठी असायला हवं (जस रावणाला शिवांच होत).तेव्हाच हे उपाय खरे ठरू शकतात.
पण आजच्या युगात ओरिजिनल काहीही मिळणं कठीणच.मग त्यात रावण संहिता का बर मागे पडेल ? जी रावण संहिता आता उपलब्ध आहे ती खऱ्या रावण संहितेंची फक्त १-२% एवढीच आहे.त्यातही ७०-८०% भेसळ आहे.मग त्यातील उपाय सिद्ध होतील हे कस शक्य आहे ?
जी बाजारात मिळते ती वाचायला हरकत नाही पण त्यातील उपाय खरा ठरेलच अस नाही.
मूळ रावण संहितेत खालील गोष्टींच्या सिद्धी,विधी इ आहेत.
१) स्मशान साधना.
२) संजीवनी विधी आणि साधना.
३) तांडव शिव साधना.सिद्दी.
४) भैरव साधना व प्रेत साधना.
५) स्मशान पिशाच्च सिद्धी व साधना.
६) उग्र महाकाली साधना-सिद्धी.
७) तांडव गणेश साधना-सिद्धी.
८) अप्सरा साधना-सिद्धी.
९) किन्नर साधना-सिद्धी.
१०) शरभ-शालूव पक्षीराज साधना.
११) सर्व आजारांवर तांत्रिक व आयुर्वेदिक उपाय.
१२) ग्रहांना प्रसन्न करण्याचे विधी.
१३) नरकातील आत्म्याला स्वर्गात पाठवण्याचा विधी व स्वर्गातील आत्म्याला नरकात पाठवण्याचा विधी. इ..
रावणाने एवढ्या सर्व सिद्धी मिळविल्या पण त्याचा वापर त्याने वाईट गोष्टींसाठी केल्या नाही.
साधना किव्वा सिद्धी वाईट नसतात तर जो त्या साधना सिद्धिनाचा वापर करतो हे त्याच्यावर अवलंबून असत....
।।धन्यवाद।।
।। श्री राम जय राम जय जय राम ।।
http://marathighoststories.blogspot.com/2018/08/asali-raavan-sahinta.html
No comments:
Post a Comment