अघोर भाग ५
लेखक : कनिश्क हिवरेकर
“रे चांडाळ मांडक तांडव प्रघ्ल्बा....अरेय...ताम्सेया प्रकट हो....गळा तर्रर झाला रे चांडका...तुझे नाव घेऊन....समोर ये...त्या काळोखात का दडतोयस...बघ बघ बघ...काय आणलय तुझ्यासाठी हे बघ...भक्ष्य...कवळ कवळ मास आणलय तुझ्यासाठी...हि बघ..गंगारामची छ्की आहे हि अगदीच नवीन कवळ मास तुझ्यासाठी ये ये ये.... ये चांडळा ये...”
किरर्र काळोखात त्याच्या मंत्र उच्चार पुकारहाकारीने सगळी विहीर घोन्गवून निघत होती...वाटवाघळ, घुबड साप, श्वापद त्या काळोखात भयान किरकिराट गर्जना करत होती वाड्याच्या दैत्य रूपाने जंगलात हाहाकार माजला होता त्याच्या मंत्रोचाराने तर दैव देखील कान बंद करून घेतील...वाड्यामागे खोल त्या काळ्या दगडाच्या विहिरीत त्यान आपला तांडव मांडला होता...बळी रचला होता त्यान बळी इकडे गंगारामने दिवसभर आपल्या पोरीच्या शोधात अख्खा गाव पालथा घातला होता दमून आता तो सुद्धा वेड्यासारखा वागायला लागला होता “ माझी पोर कुठ गेली...माझी पोर...” परंतु छ्की होती ते याचं बळीच्या पाटावर हळदी कुंकू माथ्यावर पोतरलेल तिच्या हात बांधून दोरी पायाकड नेली होती अन पाय गच्च बांधून ठेवले होते. तिच्या मरणाआधीच त्याने पानावर पिंड बांधली होती तिथच बाजूला फरशी कुऱ्हाड होती.
“हिहीहिssssस्स्स...ए चूप...चोपsss...आवाज काढायचा नाही...शुश्स्स....”
“ रे चांडळां स्वीकार कर रे..... स्वीकार कर....अन मला पुत्ररत्न होऊ दे...हात असुदे तुझा...हात...” चिखलात पडलेली कुऱ्हाड उचलून त्याने हवेत उगारली आणि स्र्रर्र्र्रकण खाली आणली छ्कीची एक आर्त किंकाळी त्या विहिरीपुरतीच जणू मर्यादित घुमली... ती थेट कुऱ्हाड खाली येताच त्याच्या तोंडावर रक्ताचा शितोडा उडाला लालभडक... विहिरीच्या तोंडावर बसून खाली चाललेला तांडव बघायला ; नाही नाही ते कृत्य झाल्यानंतर उर्वरित मांस खायला कावळे टपून मान वाकडी करून बघत होते. तो घात होताचक्षणी किंकाळी फुटताच ते सगळे एका झटक्यात उडून गेले...
***

“संध्या ? ए बाळा कुरवड्या तळ्ल्या आहेत बघ तुझ्यासाठी ये हो खायला...” स्वयपाकघरात चुलीवर कुरवड्या तळता तळता सावित्रीने संध्याला हाक मारली...आईचा आवाज आणि आवडीच्या कुरवड्या म्हटल्यावर तर संध्या आपला बाहुलीचा खेळ तिथेच टाकून धावत आईपाशी गेली... “ मला मला आई मला हव्या कुरवड्या...” आईच्या हातच्या कुरवड्या म्हटल कि संध्या आधी त्याच्या मागे लागायची...
“ ताई ? अग सावित्री ताई ? अग कुठेयस तू ?” भाऊबीजचा दिवस होता तो. सखाराम आपल्या बहिणीला आपल्या सावित्री ताईला भेटायला आला होता. परंतु वाड्याच्या अगदी उंबरठ्यावरच उभा राहून त्याने हाक मारली होती. पायचा अंगठा देखील आतमध्ये ठेवला नव्हता... “ अग बाई सखा आला वाटत...संध्या बघ मामा आलाय...जा लवकर..आत घेऊन ये त्याला..” संध्या बाहेर जाताच सावित्रीने आपल्या सुजलेल्या काळ्या निळ्या झालेल्या डोळ्यावर अन गालावर पदर झाकून घेतला.. अश्या अवस्थेत कस जाणार त्याच्या समोर...जनावरांच्या वरची हालत झाली होती त्या घरात राहून तिची. अगदी राक्षसाची गुलामगिरी पत्करली होती तिने. दारातच त्याने संध्याला धावत येताना पाहिले “ अरेरे आमची लाडकी आली...कशी आहे ग आमची सोनुली..? आणि ताई कुठेय ?” असे म्हणत सखारामने उंबरठा ओलांडला...आतमध्ये येताना जरा दबकूनच आला तो. आजूबाजूला नजर फिरवत त्याने कानोसा घेतला...जवळपास कोणी नव्हत. “ बाळा आई कुठ हाय?” सखा मामाने संध्याला विचारले...तसेच समोरच्या स्वयपाक घरातून सावित्री आपल्या तोंडावर पदर झाकून बाहेर आली... “ आलास तू ? एवढ उशीर कावून लावलास रे...चल बर लवकर...ओवाळून घेते तुला जेवून जा मग तुझ तू...”
सखारामला काहीक्षन समजलेच नाही आपण एवड्या दुरून आलोय आणि आपली बहिण आल्या आल्याच परत पाठवायची गोष्ट करतेय... पण सखा एका शब्दाने तिला काही बोलला नाही....आला तसाच त्याला तिने स्वयंपाकघरात नेले न बिछान्यावर न लोड न तक्या बसायला दिले...वाडा अगदी दिसायला टोलेजंग होता श्रीमंत होता परंतु त्यात रहाणारा तो मात्र....स्वतःच्याच घरात अगदी चोरासारख घाबरून दबून वावराव लागायचं..कधी रात्र होईल अन त्याच्या आगमनाआधी निद्रा येईल अस वाटायचं सावित्रीला.असो...
“ ताई काय झालय? अस पदरान तोंड का लपवते ?बघू काय झालय दाखव मला..”
“ काही नाही झाल एवढ भाकरी करताना वाफ लागली अन थोड भाजल...तू बस बर इथ...मला ओवाळून घ्यायचं तुला...” सावित्रीने सखारामला हातास धरून खाली पाटावर बसवले अन आरतीची थाळी तयार करून त्याला ओवाळू लागली.कुंकू तांदूळ माथ्यावर लावता लावता तिचे डोळे भरून आले होते एका हाताने तोंडाला तसाच पदर धरून बसली होती ती सखारामच्या नजरेतून ते काही चुकले नाही. औक्षण करायला मात्र तिला दोन्ही हाताची गरज होती सवयीनुसार तिने दुसरा हात पदरावरचा काढला न काढला तोच सखारामच्या नजरेस तिच्या चेहऱ्याची दिनवाणी अवस्था दिसली ते पाहून तर सखाराम जागीच हादरला...कारण सावित्रीच्या चेहऱ्यावरच्या जखमा काही साध्या सुध्या नव्हत्या कि भाजलेल्या खुणा नव्हत्या...कोणीतरी जोरदार सतत आघात करून ते घाव दिले होते तिला..जबडा पूर्ण सुजून गेला होता गालाचं हाडाला चीर पडली होती हातांवर मानेवर नखे दाते बुडालेले दिसून येत होते.ते पाहून तर सखारामच काळीजच धसले... “ ताईsss..! काय ग ह्ये ? कोण केल ? त्यांनी ? मी आत्ता बघतोच त्याच कुठय त्यो भटुरडा..”
“ सखा ! तुला माझी शपथ आहे तू अस काही करणार नाही... ! तू मला भेटायला आलास माझ्याशी बोल...”
“ ताई ग हे काय केलस का? अस का ? माझ हात नको ग बांधू अस...”
“ माझ्या नशिबाच्या वाटला जे आलय ते मलाच भोगाव लागणार हाय...सहन करतेय पण त्याच्या पल्याड जातय समद...रात्री बेरात्री वाड्याच्या कोपऱ्यातून घंटीचा आवाज ते भसाड मंत्र सखा अस वाटत जणू देवाला नाही तर...”
“ तर काय ताई ?”
“ देवाला नाही तर सैतानालाच बोलवान धाडत्यात...”
“मागच्या विहिरीत रात रातीला मड्याची अंघोळ... पूजाच्या घरात नुसती पिंड बांधलेली...अन ....चल तू जेवून घे बोलण्यात वेळ नको घालवू...त्ये यायच्या आतमध्ये जेव..” ताईच्या बोलण्याने सखाराम मात्र धास्तावून गेला होता...असा माणूस एक तर येडा असू शकतो नाहीतर राकीस....सखारामने छोट्या चीमुला अर्थात संध्याला मांडीवर घेऊन आपल्या बहिणीसोबत जेवण उरकले...आणि तसाच त्याने सावित्रीचा निरोप घेतला...चीमुला खाऊला काही पैसे देऊन तो वाड्याच्या ओसरीजवळ आला होताच कि समोरच उंबरठ्यावर ठ्य्य करून कोणाचा तरी पाय पडला त्या पायात तांब्याच कड होत.... “ह्हीही....”
दात विचकत जबडा फाकवत तो चौकटीत उभा होता दोन्ही हात मागे बांधून पायात धोतर...अंगात जागोजागी काळेभोर विकृत गोंदण काळ्या दाट भुवया मोठे वटारलेले लालभडक घारे डोळे. एक हि केस नव्हता माथ्यावर पण मागे एक जट गाठ मारून सोडली होती ती अगदी खांद्यावरून खाली अंगावर लोंबत होती. हसता हसता त्याने अचानक दात खायला सुरुवात केली.
***
वर्तमान स्थिती ***
रात्र जणू सर्वांच्याच विचारांनी घेरून निघाली होती. शांत झोप भेटली होती ती फक्त अनुला एवढ्याश्या जीवाला काय कळत कसले विचार आणि कसले अविचार. रात्र उलटली पावसाचे पडसाद उमटलेले स्पष्ट दिसून येत होते बाहेर रोडच्या बाजूनी झालेला चिखल रात्रभर लाईट नसण्याच कारण हि तेच होते कुठेतरी खांब पडून वीज गेली होती सूर्याने मात्र संप केला होता अजूनहि काळे ढगाळ वातावरण होते. संध्याने डोळे चोळत आपल्या पापण्या उघडल्या तसे तिला समोर विश्वास कपाटावरून काहीतरी काढताना दिसून आला तो बँग काढून खाली घेत होता. “ विश्वास हे काय करतोयस ? कुठे जातोयस का ?” संध्या झोपेतून उठत उद्गारली... “ मी नाही...आपण जातोय..” विश्वास म्हणाला... “ आपण ? कुठे ? कशासाठी ?”
“उठ...आवरून घे आणि अनुला देखील उठव...आणि दोघी आवरून घ्या पटापट...” “ हो पण आपण नेमके जातोय कुठे ते तरी सांगशील ?” त्यावर विश्वास तिच्याकडे पाहून बस एवढच म्हणाला “ वेकेशनसाठी जायचं आहे.” एवढ म्हणतच विश्वासने भरलेली सुटकेस बंद केली... निर्णय तातडीचा होता परंतु अत्यंत गरजेचा होता. घराला टाळे लावून विश्वासने संध्या अनु आणि बकुळाला देखील आपल्या सोबत घेतले... संध्याच्या या त्रासाच निदान तिच्या लहानपणीचे ते गूढ उकलण्यास निघाला होता. विश्वासने कोणालाच हि गोष्ट कळवली नव्हती. जयदेवासदेखील नाही अनिश्चितपणे विश्वास स्वतःच आपल्या बायको अन मुलीला संध्याच्या भूतकाळात घेयुन जात होता त्या काळाच्या ओघात न जाणे काय दबा धरून बसले असेल अन काय नाही. इकडून सरपंचाने होकार आणि मुदत दिली होती त्याला तुझ्या बहिणीच श्राद्ध उरकून घे तुझ्या भाच्चीला बोलवून. त्यानंतर त्यांनी जे काय ठरवायचे ते ठरवल होत. एक करारच होता तो. मिळालेल्या सवडीने सखाराम मामाने त्याच गावातून इकडे शहरात संध्याच्या सासरी अर्थात विश्वासच्या घरच्या पत्त्यावर तार पाठवली होती. योगायोग कि विधिलिखित होते परंतु आता जे घडणार होत त्याला टळ नव्हता. मजल दरमजल करत विश्वासने बरेच अंतर पार केले होते. रस्त्याने अध्येमध्ये जोरदार पाउस विजांचा कडकडाट ढगांच्या गर्जना असे निसर्गाचे रूप त्यांना पाहायला मिळाले...एव्हाना संध्याकाळ झाली होती आणि गाव हि जवळ आल होत पारगाव ते सखारामच गाव जिथे सखारामच राहत घर होत. गावात एक दुसऱ्या माणसाला विचारत विचारत विश्वास आणि संध्याने सखाराम मामाच घर शोधून काढले.. “ विश्वास इथे ? आपण इथे का आलोय ?” गावात पोहोचताच संध्याला तिथल्या आठवणी नजरेसमोर उभारताना दिसू लागल्या ती समजून गेली होती कि विश्वासने वेकेशन नाही तर संध्याला तिच्या मामाच्या घरी आणले होते. मागे बकुळा अनुला मांडीवरती घेऊन झोपी गेली होती. गावात आणि मामाच्या घराजवळ पोहोचता पोहोचता अगदी झाकळ पडायला आली होती. संध्याच्या प्रश्नाना उत्तरे देत म्हणाला “ संध्या तुझ्या या आठवणीच्या त्रासामागे नेमके कारण आणि त्याच मूळ शोधायला आलो आहोत आपण इथे.”
“पण ! विश्वास ?”
“ नाही संध्या! मला तुझी काळजी आहे तुझ्यासाठी नाही हे मी माझ्यासाठी आणि अनुसाठी करतोय...वेकेशनच समज न हे तू हं ?”
“ठीक आहे ! जसे तू म्हणशील तसेच..” संध्या खिडकीतून बाहेर गावातल्या ओळखी अनोळखीच्या भिंती निहळू लागली... विश्वासने गाडीचे दिवे लावले अंधार पडला होता...वाट शोधत येऊन शेवटी विश्वासने गाडी एका घरासमोर आणून थांबवली...समोरचा त्या घराचा दरवाजा पाहून संध्याच्या डोळ्यासमोर तिला तिचे अख्खे बालपण दिसू लागले...तो दरवाजा पाहताच तिच्या तोंडून उद्गार बाहेर पडले.. “ विश्वास ! हेच मामाचे घर जिथ माझ बालपण गेले...परंतु अगदीच लहानपण नव्हत ते. त्या आधीहि तिचे आयुष्य तिने आपल्या आईच्या कुशीत घालवले होते. आणि तेच हरवले होते. विश्वासने गाडीमधूनच हॉर्न वाजवला
“पोंsss...”
हॉर्न वाजवून काहीक्षण विश्वास थांबला पण कोणी दरवाजा उघडला नाही...परत दुसऱ्यावेळी त्याने हॉर्न वाजवला तेव्हाहि कोणाचा प्रतिसाद नाही आला विश्वास तिसऱ्यांदा हॉर्न वाजवणार होताच कि शेजारचा एक दरवाजा उघडला आणि त्यामधून एक बाई ओरडत बाहेर आली... “ काय रे कोण हाय एवड्या रातच कोण बोंबलत हाय र ?”
तसा विश्वासचा हॉर्नवर जाणारा हात थांबला आणि तो गाडीमधून खाली उतरला... “ आम्ही इथे सखाराम मामा ला भेटायला आलो आहे. कुठे आहेत ते ? कोणी दरवाजा उघडत नाहीये..”
“ त्यो इथ नाही. त्यो गेलाय पल्याड गावाला...रत्नापुरला...” बोलत बोलत ती बाई पुढे आली आणि दुरूनच गाडीमध्ये कोण बसल आहे वाकून पाहू लागली... “ कोण म्हणायचं पावण तुम्ही अन या सखाकड काय काम तुमच ?”
“ जरा म्हत्वाच काम आहे त्यांच्याकडे त्या गावाकडे जायचा रस्ता कुठून आहे तुम्ही सांगू शकाल का प्लीज ! आम्हाला अर्जंट आहे...”
“ अयो बाये ! अवो साहेब तुम्ही एवढ्या रातीला त्या गावची वाट विचारताय..बया बया रात झाली कि कोण त्या गावच नाव सुदा घेत नाय अन तुम्ही तिकड जायचं म्हणतास” गाडीमधून संध्या बकुळा आणि गाडीबाहेर उभा विश्वास त्या बाईकडे आश्चर्याने पाहू लागले...
“ म्हणजे ? अस काय आहे त्या गावात ?”
“ ओ साहेब हे बघा तुम्हाला जायचं तर रस्ता सांगते पूड जे होईल ते तुमच तुमी बघा... इथून सरळ बाहेर निघाला तर सडक लागेल तिथून दहा पंधरा मैलान गेलात कि एक कच्चा रस्ता दिसल पाटी हाय तिथ त्या गावाची...अन घाई करा जायचं हाय तर वार कावदान सुटल्यावर मग रस्ता दिसायचा सुदिक नाही...”
“बर ! बर ! ठीक आहे धन्यवाद !” विश्वास उद्गारला आणि गाडीत जाऊन बसला आणि त्या बाईने सांगितल्याप्रमाणेच त्यांनी रस्ता पकडला...आणि थेट त्या रस्त्याने निघाले...इकडे अनुला सांभाळत बकुळा देखील निजून गेली आणि पुढे संध्या देखील... विश्वासला या सर्वांची एवढी आबदा करायची नव्हती पण नाईलाज होता. मागे अनुला जाग आली तशी ती गाडीच्या खिडकीत येऊन बाहेरच दृश्य पाहू लागली अंधार किरर्र पडला होता बाहेर अगदी भूतासारखा व्हुई व्हुई करत वारा वाहत होता...आता गाडी गावाच्या मार्गाला लागली होती.अचानक कच्चा रस्ता पार करून गाडीने जंगलाचा रस्ता पकडला होता हळू हळू गाव जवळ जवळ येऊ लागल होत दुरूनच गावची दिवे कंदील लावलेली घरे दिसू लागली होती. रस्ता संपत आला होताच कि विश्वासला गाडीच्या दिव्यांच्या उजेडात विश्वासला एक माणूस रस्त्याच्या बाजूने चालत जाताना आढळून आला...अगदीच सडपातळ होता तो हडकुळ. गाडीचा दिवा त्याच्यावर पडताच त्याने गाडीकडे असे वळून पाहिले जसे त्याला त्या गाडीच्या दिव्याची अडचण झाली होती आणि रागाच्या भरातच आपला काना डोळा घेऊन त्याने वळून पाहिले...शहरातील गाडी पाहून “ अहह...कोण आल बाबा...”
असे म्हणत तो गाडीकडे पाहू लागला आणि हात करू लागला...परंतु तेव्हा विश्वासच्या मनात काय आले त्याने गाडी तिथे थांबवली नाही तो ओरडत राहिला... “ ए साहेब..! एय...साहेब...” गाडी त्याला ओलांडून पुढे गेली तेव्हा त्याची नजर गाडीत मागे खिडकीतून त्याला पाहणाऱ्या छोट्या अनुवर पडली...अनुची आणि त्याची अगदी नजरानजर झाली तिला पाहताच त्याच्या चेहऱ्यावर एक भयानक हस उमटले अगदी दात विचकत भुवया उंचावत अन ते डोळे मोठे करत...त्याच्या त्या भयंकर हास्याने अनु घाबरलीच आणि दचकून चटकन बकुळाच्या मांडीवर डोक ठेऊन झोपी गेली...
***
“ नाना आजच तार पाठवलीय एक दोन चार दिवसात त्यांना भेटल अन ते येतील माझ्याकड मग त्यांना घेऊन मी वाड्यावर जाईन काही दिवस राहून ताईच श्राद्ध उरकून जाईन मग त्याच्या नंतर तुमचाच वाडा तो.”
“ सखा..! तुला तर माहितीच हाय कि त्या वाड्याच्या माग का लागलोय आम्ही एवढ ते...सावित्री ताईची आख्ख्या गावाला द्या यायची पण त्या माउलीन एका शब्दान सुद्धा कुणाकड तक्रार केली नाय का आपल्या नवऱ्याबद्दल कुठ चाडी केली नाई..”
“काय करणार सरपंच माझ्या ताईच नशीबच अगदी वाईट होत व्हो....कसा निभाव लावला तिने तिलाच माहित...पण शेवटी गेलीच ती...”
सरपंच आणि सखा बोलण्यात गुंग होते कि तोच त्यांच्या दरवाजासमोर एक पिवळसर प्रकाश दिसून आला...सखाराम पायरीवरच बसला होता. तो पिवळा प्रकाश आणखीनच प्रखर होऊ लागला...तसा सखाराम जागचा उठला अन त्याच्या पाठोपाठ सरपंच सुद्धा... सरपंच आणि सखा दोघेही दरवाज्यात पडणाऱ्या त्या प्रकाशास निरखून पाहू लागले दोघे बघत होतेच कि तोवर भर्रकण एक गाडी दरवाज्याच्या बाहेरून गेली...
गाडी जात असतानाच सखारामची नजर गाडीत बसलेल्या संध्यावरती पडली...काही क्षणासाठी सखाराम दचकला आजच त्याने सकाळी तार पाठवली होती. बरेचसे विचार एकाच वेळी त्याच्या डोक्यात आले आणि त्यातूनच तो ओरडला.. “ संध्या ? ए पोरीsss...? जावईबापू..ओ..” असे ओरडत आणि हाका मारत सखाराम सरपंचाच्या वाड्यातून बाहेर पडला आणि त्यांच्या गाडीच्या मागे मागे धावू लागला...विश्वासने आरश्यात पाहिले तसे त्याला सखामामा गाडीच्या मागे धावताना दिसला...
-***
“सखा ? कोण म्हणायचं हे लोक ? अन इथ आपल्या गावात काय करताय ?” सखाने गाडी अडवली आणि त्या सर्वांना सरपंचच्या घरात घेऊन आला...तेव्हा वऱ्हांड्यातसगळे सरपंचासमोर उभे होते.
कोणाची गाडी एवढ्या रात्री सरपंचाच्या घरासमोर आली ते पाहायला...निम्मे गावकरी दारात जमा झाले होते आणि सरपंचाचे प्रश्न विचारणी सुरु झाली आणि त्या प्रश्नांना उत्तरे द्यायला सुरु केल्यानंतर मात्र बाहेर उभ्या गावकऱ्याच्या चेहऱ्यावर उत्सुकता तर कुठे अनोळखीपणा तर कुणाच्या चेहऱ्यावर भीती..जे गावातले जुने पुराने लोक होते त्यांच्याच चेहऱ्यावर भीती दिसून येत होती इकडे सरपंच आणि विश्वास दोघांच बोलन चालू होत खाली छोटी अनु बाहेर त्या लोकांना पाहत होती त्यांच्यामध्ये चाललेली कुजबुज गजबज या सर्वांकडे विचित्र नजरेने पाहणे.. काहीं काही तर म्हणत होते “ देवा कशाला आली हि इथ...आता काय खर नाय यांच...” विचारपूस नंतर सर्वाना समजून चुकले होते कि ती कोण होती.
क्रमश:
MARATHI HORROR STORY ALL PARTS ,BHAYKATHA AGHORI,“ ताई ? अग सावित्री ताई ? अग कुठेयस तू ?” भाऊबीजचा दिवस होता तो. सखाराम आपल्या बहिणीला आपल्या सावित्री ताईला भेटायला आला होता. परंतु वाड्याच्या अगदी उंबरठ्यावरच उभा राहून त्याने हाक मारली होती. पायचा अंगठा देखील आतमध्ये ठेवला नव्हता... “ अग बाई सखा आला वाटत...संध्या बघ मामा आलाय...जा लवकर..आत घेऊन ये त्याला..” संध्या बाहेर जाताच सावित्रीने आपल्या सुजलेल्या काळ्या निळ्या झालेल्या डोळ्यावर अन गालावर पदर झाकून घेतला.. अश्या अवस्थेत कस जाणार त्याच्या समोर...जनावरांच्या वरची हालत झाली होती त्या घरात राहून तिची. अगदी राक्षसाची गुलामगिरी पत्करली होती तिने. दारातच त्याने संध्याला धावत येताना पाहिले “ अरेरे आमची लाडकी आली...कशी आहे ग आमची सोनुली..? आणि ताई कुठेय ?” असे म्हणत सखारामने उंबरठा ओलांडला...आतमध्ये येताना जरा दबकूनच आला तो. आजूबाजूला नजर फिरवत त्याने कानोसा घेतला...जवळपास कोणी नव्हत. “ बाळा आई कुठ हाय?” सखा मामाने संध्याला विचारले...तसेच समोरच्या स्वयपाक घरातून सावित्री आपल्या तोंडावर पदर झाकून बाहेर आली... “ आलास तू ? एवढ उशीर कावून लावलास रे...चल बर लवकर...ओवाळून घेते तुला जेवून जा मग तुझ तू...”
सखारामला काहीक्षन समजलेच नाही आपण एवड्या दुरून आलोय आणि आपली बहिण आल्या आल्याच परत पाठवायची गोष्ट करतेय... पण सखा एका शब्दाने तिला काही बोलला नाही....आला तसाच त्याला तिने स्वयंपाकघरात नेले न बिछान्यावर न लोड न तक्या बसायला दिले...वाडा अगदी दिसायला टोलेजंग होता श्रीमंत होता परंतु त्यात रहाणारा तो मात्र....स्वतःच्याच घरात अगदी चोरासारख घाबरून दबून वावराव लागायचं..कधी रात्र होईल अन त्याच्या आगमनाआधी निद्रा येईल अस वाटायचं सावित्रीला.असो...
“ ताई काय झालय? अस पदरान तोंड का लपवते ?बघू काय झालय दाखव मला..”
“ काही नाही झाल एवढ भाकरी करताना वाफ लागली अन थोड भाजल...तू बस बर इथ...मला ओवाळून घ्यायचं तुला...” सावित्रीने सखारामला हातास धरून खाली पाटावर बसवले अन आरतीची थाळी तयार करून त्याला ओवाळू लागली.कुंकू तांदूळ माथ्यावर लावता लावता तिचे डोळे भरून आले होते एका हाताने तोंडाला तसाच पदर धरून बसली होती ती सखारामच्या नजरेतून ते काही चुकले नाही. औक्षण करायला मात्र तिला दोन्ही हाताची गरज होती सवयीनुसार तिने दुसरा हात पदरावरचा काढला न काढला तोच सखारामच्या नजरेस तिच्या चेहऱ्याची दिनवाणी अवस्था दिसली ते पाहून तर सखाराम जागीच हादरला...कारण सावित्रीच्या चेहऱ्यावरच्या जखमा काही साध्या सुध्या नव्हत्या कि भाजलेल्या खुणा नव्हत्या...कोणीतरी जोरदार सतत आघात करून ते घाव दिले होते तिला..जबडा पूर्ण सुजून गेला होता गालाचं हाडाला चीर पडली होती हातांवर मानेवर नखे दाते बुडालेले दिसून येत होते.ते पाहून तर सखारामच काळीजच धसले... “ ताईsss..! काय ग ह्ये ? कोण केल ? त्यांनी ? मी आत्ता बघतोच त्याच कुठय त्यो भटुरडा..”
“ सखा ! तुला माझी शपथ आहे तू अस काही करणार नाही... ! तू मला भेटायला आलास माझ्याशी बोल...”
“ ताई ग हे काय केलस का? अस का ? माझ हात नको ग बांधू अस...”
“ माझ्या नशिबाच्या वाटला जे आलय ते मलाच भोगाव लागणार हाय...सहन करतेय पण त्याच्या पल्याड जातय समद...रात्री बेरात्री वाड्याच्या कोपऱ्यातून घंटीचा आवाज ते भसाड मंत्र सखा अस वाटत जणू देवाला नाही तर...”
“ तर काय ताई ?”
“ देवाला नाही तर सैतानालाच बोलवान धाडत्यात...”
“मागच्या विहिरीत रात रातीला मड्याची अंघोळ... पूजाच्या घरात नुसती पिंड बांधलेली...अन ....चल तू जेवून घे बोलण्यात वेळ नको घालवू...त्ये यायच्या आतमध्ये जेव..” ताईच्या बोलण्याने सखाराम मात्र धास्तावून गेला होता...असा माणूस एक तर येडा असू शकतो नाहीतर राकीस....सखारामने छोट्या चीमुला अर्थात संध्याला मांडीवर घेऊन आपल्या बहिणीसोबत जेवण उरकले...आणि तसाच त्याने सावित्रीचा निरोप घेतला...चीमुला खाऊला काही पैसे देऊन तो वाड्याच्या ओसरीजवळ आला होताच कि समोरच उंबरठ्यावर ठ्य्य करून कोणाचा तरी पाय पडला त्या पायात तांब्याच कड होत.... “ह्हीही....”
दात विचकत जबडा फाकवत तो चौकटीत उभा होता दोन्ही हात मागे बांधून पायात धोतर...अंगात जागोजागी काळेभोर विकृत गोंदण काळ्या दाट भुवया मोठे वटारलेले लालभडक घारे डोळे. एक हि केस नव्हता माथ्यावर पण मागे एक जट गाठ मारून सोडली होती ती अगदी खांद्यावरून खाली अंगावर लोंबत होती. हसता हसता त्याने अचानक दात खायला सुरुवात केली.
***
वर्तमान स्थिती ***
रात्र जणू सर्वांच्याच विचारांनी घेरून निघाली होती. शांत झोप भेटली होती ती फक्त अनुला एवढ्याश्या जीवाला काय कळत कसले विचार आणि कसले अविचार. रात्र उलटली पावसाचे पडसाद उमटलेले स्पष्ट दिसून येत होते बाहेर रोडच्या बाजूनी झालेला चिखल रात्रभर लाईट नसण्याच कारण हि तेच होते कुठेतरी खांब पडून वीज गेली होती सूर्याने मात्र संप केला होता अजूनहि काळे ढगाळ वातावरण होते. संध्याने डोळे चोळत आपल्या पापण्या उघडल्या तसे तिला समोर विश्वास कपाटावरून काहीतरी काढताना दिसून आला तो बँग काढून खाली घेत होता. “ विश्वास हे काय करतोयस ? कुठे जातोयस का ?” संध्या झोपेतून उठत उद्गारली... “ मी नाही...आपण जातोय..” विश्वास म्हणाला... “ आपण ? कुठे ? कशासाठी ?”
“उठ...आवरून घे आणि अनुला देखील उठव...आणि दोघी आवरून घ्या पटापट...” “ हो पण आपण नेमके जातोय कुठे ते तरी सांगशील ?” त्यावर विश्वास तिच्याकडे पाहून बस एवढच म्हणाला “ वेकेशनसाठी जायचं आहे.” एवढ म्हणतच विश्वासने भरलेली सुटकेस बंद केली... निर्णय तातडीचा होता परंतु अत्यंत गरजेचा होता. घराला टाळे लावून विश्वासने संध्या अनु आणि बकुळाला देखील आपल्या सोबत घेतले... संध्याच्या या त्रासाच निदान तिच्या लहानपणीचे ते गूढ उकलण्यास निघाला होता. विश्वासने कोणालाच हि गोष्ट कळवली नव्हती. जयदेवासदेखील नाही अनिश्चितपणे विश्वास स्वतःच आपल्या बायको अन मुलीला संध्याच्या भूतकाळात घेयुन जात होता त्या काळाच्या ओघात न जाणे काय दबा धरून बसले असेल अन काय नाही. इकडून सरपंचाने होकार आणि मुदत दिली होती त्याला तुझ्या बहिणीच श्राद्ध उरकून घे तुझ्या भाच्चीला बोलवून. त्यानंतर त्यांनी जे काय ठरवायचे ते ठरवल होत. एक करारच होता तो. मिळालेल्या सवडीने सखाराम मामाने त्याच गावातून इकडे शहरात संध्याच्या सासरी अर्थात विश्वासच्या घरच्या पत्त्यावर तार पाठवली होती. योगायोग कि विधिलिखित होते परंतु आता जे घडणार होत त्याला टळ नव्हता. मजल दरमजल करत विश्वासने बरेच अंतर पार केले होते. रस्त्याने अध्येमध्ये जोरदार पाउस विजांचा कडकडाट ढगांच्या गर्जना असे निसर्गाचे रूप त्यांना पाहायला मिळाले...एव्हाना संध्याकाळ झाली होती आणि गाव हि जवळ आल होत पारगाव ते सखारामच गाव जिथे सखारामच राहत घर होत. गावात एक दुसऱ्या माणसाला विचारत विचारत विश्वास आणि संध्याने सखाराम मामाच घर शोधून काढले.. “ विश्वास इथे ? आपण इथे का आलोय ?” गावात पोहोचताच संध्याला तिथल्या आठवणी नजरेसमोर उभारताना दिसू लागल्या ती समजून गेली होती कि विश्वासने वेकेशन नाही तर संध्याला तिच्या मामाच्या घरी आणले होते. मागे बकुळा अनुला मांडीवरती घेऊन झोपी गेली होती. गावात आणि मामाच्या घराजवळ पोहोचता पोहोचता अगदी झाकळ पडायला आली होती. संध्याच्या प्रश्नाना उत्तरे देत म्हणाला “ संध्या तुझ्या या आठवणीच्या त्रासामागे नेमके कारण आणि त्याच मूळ शोधायला आलो आहोत आपण इथे.”
“पण ! विश्वास ?”
“ नाही संध्या! मला तुझी काळजी आहे तुझ्यासाठी नाही हे मी माझ्यासाठी आणि अनुसाठी करतोय...वेकेशनच समज न हे तू हं ?”
“ठीक आहे ! जसे तू म्हणशील तसेच..” संध्या खिडकीतून बाहेर गावातल्या ओळखी अनोळखीच्या भिंती निहळू लागली... विश्वासने गाडीचे दिवे लावले अंधार पडला होता...वाट शोधत येऊन शेवटी विश्वासने गाडी एका घरासमोर आणून थांबवली...समोरचा त्या घराचा दरवाजा पाहून संध्याच्या डोळ्यासमोर तिला तिचे अख्खे बालपण दिसू लागले...तो दरवाजा पाहताच तिच्या तोंडून उद्गार बाहेर पडले.. “ विश्वास ! हेच मामाचे घर जिथ माझ बालपण गेले...परंतु अगदीच लहानपण नव्हत ते. त्या आधीहि तिचे आयुष्य तिने आपल्या आईच्या कुशीत घालवले होते. आणि तेच हरवले होते. विश्वासने गाडीमधूनच हॉर्न वाजवला
“पोंsss...”
हॉर्न वाजवून काहीक्षण विश्वास थांबला पण कोणी दरवाजा उघडला नाही...परत दुसऱ्यावेळी त्याने हॉर्न वाजवला तेव्हाहि कोणाचा प्रतिसाद नाही आला विश्वास तिसऱ्यांदा हॉर्न वाजवणार होताच कि शेजारचा एक दरवाजा उघडला आणि त्यामधून एक बाई ओरडत बाहेर आली... “ काय रे कोण हाय एवड्या रातच कोण बोंबलत हाय र ?”
तसा विश्वासचा हॉर्नवर जाणारा हात थांबला आणि तो गाडीमधून खाली उतरला... “ आम्ही इथे सखाराम मामा ला भेटायला आलो आहे. कुठे आहेत ते ? कोणी दरवाजा उघडत नाहीये..”
“ त्यो इथ नाही. त्यो गेलाय पल्याड गावाला...रत्नापुरला...” बोलत बोलत ती बाई पुढे आली आणि दुरूनच गाडीमध्ये कोण बसल आहे वाकून पाहू लागली... “ कोण म्हणायचं पावण तुम्ही अन या सखाकड काय काम तुमच ?”
“ जरा म्हत्वाच काम आहे त्यांच्याकडे त्या गावाकडे जायचा रस्ता कुठून आहे तुम्ही सांगू शकाल का प्लीज ! आम्हाला अर्जंट आहे...”
“ अयो बाये ! अवो साहेब तुम्ही एवढ्या रातीला त्या गावची वाट विचारताय..बया बया रात झाली कि कोण त्या गावच नाव सुदा घेत नाय अन तुम्ही तिकड जायचं म्हणतास” गाडीमधून संध्या बकुळा आणि गाडीबाहेर उभा विश्वास त्या बाईकडे आश्चर्याने पाहू लागले...
“ म्हणजे ? अस काय आहे त्या गावात ?”
“ ओ साहेब हे बघा तुम्हाला जायचं तर रस्ता सांगते पूड जे होईल ते तुमच तुमी बघा... इथून सरळ बाहेर निघाला तर सडक लागेल तिथून दहा पंधरा मैलान गेलात कि एक कच्चा रस्ता दिसल पाटी हाय तिथ त्या गावाची...अन घाई करा जायचं हाय तर वार कावदान सुटल्यावर मग रस्ता दिसायचा सुदिक नाही...”
“बर ! बर ! ठीक आहे धन्यवाद !” विश्वास उद्गारला आणि गाडीत जाऊन बसला आणि त्या बाईने सांगितल्याप्रमाणेच त्यांनी रस्ता पकडला...आणि थेट त्या रस्त्याने निघाले...इकडे अनुला सांभाळत बकुळा देखील निजून गेली आणि पुढे संध्या देखील... विश्वासला या सर्वांची एवढी आबदा करायची नव्हती पण नाईलाज होता. मागे अनुला जाग आली तशी ती गाडीच्या खिडकीत येऊन बाहेरच दृश्य पाहू लागली अंधार किरर्र पडला होता बाहेर अगदी भूतासारखा व्हुई व्हुई करत वारा वाहत होता...आता गाडी गावाच्या मार्गाला लागली होती.अचानक कच्चा रस्ता पार करून गाडीने जंगलाचा रस्ता पकडला होता हळू हळू गाव जवळ जवळ येऊ लागल होत दुरूनच गावची दिवे कंदील लावलेली घरे दिसू लागली होती. रस्ता संपत आला होताच कि विश्वासला गाडीच्या दिव्यांच्या उजेडात विश्वासला एक माणूस रस्त्याच्या बाजूने चालत जाताना आढळून आला...अगदीच सडपातळ होता तो हडकुळ. गाडीचा दिवा त्याच्यावर पडताच त्याने गाडीकडे असे वळून पाहिले जसे त्याला त्या गाडीच्या दिव्याची अडचण झाली होती आणि रागाच्या भरातच आपला काना डोळा घेऊन त्याने वळून पाहिले...शहरातील गाडी पाहून “ अहह...कोण आल बाबा...”
असे म्हणत तो गाडीकडे पाहू लागला आणि हात करू लागला...परंतु तेव्हा विश्वासच्या मनात काय आले त्याने गाडी तिथे थांबवली नाही तो ओरडत राहिला... “ ए साहेब..! एय...साहेब...” गाडी त्याला ओलांडून पुढे गेली तेव्हा त्याची नजर गाडीत मागे खिडकीतून त्याला पाहणाऱ्या छोट्या अनुवर पडली...अनुची आणि त्याची अगदी नजरानजर झाली तिला पाहताच त्याच्या चेहऱ्यावर एक भयानक हस उमटले अगदी दात विचकत भुवया उंचावत अन ते डोळे मोठे करत...त्याच्या त्या भयंकर हास्याने अनु घाबरलीच आणि दचकून चटकन बकुळाच्या मांडीवर डोक ठेऊन झोपी गेली...
***
“ नाना आजच तार पाठवलीय एक दोन चार दिवसात त्यांना भेटल अन ते येतील माझ्याकड मग त्यांना घेऊन मी वाड्यावर जाईन काही दिवस राहून ताईच श्राद्ध उरकून जाईन मग त्याच्या नंतर तुमचाच वाडा तो.”
“ सखा..! तुला तर माहितीच हाय कि त्या वाड्याच्या माग का लागलोय आम्ही एवढ ते...सावित्री ताईची आख्ख्या गावाला द्या यायची पण त्या माउलीन एका शब्दान सुद्धा कुणाकड तक्रार केली नाय का आपल्या नवऱ्याबद्दल कुठ चाडी केली नाई..”
“काय करणार सरपंच माझ्या ताईच नशीबच अगदी वाईट होत व्हो....कसा निभाव लावला तिने तिलाच माहित...पण शेवटी गेलीच ती...”
सरपंच आणि सखा बोलण्यात गुंग होते कि तोच त्यांच्या दरवाजासमोर एक पिवळसर प्रकाश दिसून आला...सखाराम पायरीवरच बसला होता. तो पिवळा प्रकाश आणखीनच प्रखर होऊ लागला...तसा सखाराम जागचा उठला अन त्याच्या पाठोपाठ सरपंच सुद्धा... सरपंच आणि सखा दोघेही दरवाज्यात पडणाऱ्या त्या प्रकाशास निरखून पाहू लागले दोघे बघत होतेच कि तोवर भर्रकण एक गाडी दरवाज्याच्या बाहेरून गेली...
गाडी जात असतानाच सखारामची नजर गाडीत बसलेल्या संध्यावरती पडली...काही क्षणासाठी सखाराम दचकला आजच त्याने सकाळी तार पाठवली होती. बरेचसे विचार एकाच वेळी त्याच्या डोक्यात आले आणि त्यातूनच तो ओरडला.. “ संध्या ? ए पोरीsss...? जावईबापू..ओ..” असे ओरडत आणि हाका मारत सखाराम सरपंचाच्या वाड्यातून बाहेर पडला आणि त्यांच्या गाडीच्या मागे मागे धावू लागला...विश्वासने आरश्यात पाहिले तसे त्याला सखामामा गाडीच्या मागे धावताना दिसला...
-***
“सखा ? कोण म्हणायचं हे लोक ? अन इथ आपल्या गावात काय करताय ?” सखाने गाडी अडवली आणि त्या सर्वांना सरपंचच्या घरात घेऊन आला...तेव्हा वऱ्हांड्यातसगळे सरपंचासमोर उभे होते.
कोणाची गाडी एवढ्या रात्री सरपंचाच्या घरासमोर आली ते पाहायला...निम्मे गावकरी दारात जमा झाले होते आणि सरपंचाचे प्रश्न विचारणी सुरु झाली आणि त्या प्रश्नांना उत्तरे द्यायला सुरु केल्यानंतर मात्र बाहेर उभ्या गावकऱ्याच्या चेहऱ्यावर उत्सुकता तर कुठे अनोळखीपणा तर कुणाच्या चेहऱ्यावर भीती..जे गावातले जुने पुराने लोक होते त्यांच्याच चेहऱ्यावर भीती दिसून येत होती इकडे सरपंच आणि विश्वास दोघांच बोलन चालू होत खाली छोटी अनु बाहेर त्या लोकांना पाहत होती त्यांच्यामध्ये चाललेली कुजबुज गजबज या सर्वांकडे विचित्र नजरेने पाहणे.. काहीं काही तर म्हणत होते “ देवा कशाला आली हि इथ...आता काय खर नाय यांच...” विचारपूस नंतर सर्वाना समजून चुकले होते कि ती कोण होती.
क्रमश:
PART-1 , PART-2, PART-3 ,PART-4 , PART-5 , PART-6 , PART- 7, PART-8 ,PART-9
PART-10 ,PART-11 ,PART-12 ,PART-13,PART14,PART-15,PART-16, PART-17,END OF THE STORY -AGHOR-BHUTACHI GOSHT PART-18
No comments:
Post a Comment