अघोर भाग ६
“ सखा! अरे एवढ्या घाई घाईने कुठे निघालास रे... फक्त तुझ्या ताईशीच भेटशील होय? माझ्याशी नाही भेटणार का ?हा ?” आपल्या करड्या दानवी आवाजातच तो उद्गारला... दरवाजातून पाय आतमध्ये टाकताच सखाच्या नजर त्यांच्या पायावर पडली उंबरठ्यातून अगदी कोपऱ्यातून काहीतरी काळसर धुरासारख अगदी नजर चुकवून गोविंदपंताच्या पायाखाली उतरलं होत आणि पंताने त्याच्यवर आपला पाय ठेवत ते खालीच दाबले होते. दाबले होते कि काही दडवले होते देवच जाणो पण ते उंबरठ्यातून आत येताच वाड्याच्या कोपऱ्या कोपऱ्यात गारठ्याचा झुळूक पसरला तसा सावित्रीने इवलुश्या संध्याला आपल्या पोटाला बिलगून घेतल होत. कदाचित सावित्रीला त्याच भान होतच कि वाड्यात गोविंदपंत संध्या आणि तिच्या व्यतिरिक्त आणखीही कुणीतरी वावरायचं पण कधी नजरेस पडल नाही पंताच्या अनुपस्थितीत तर कधीच नाही...
सखारामने दारात उभ्या गोविंदपंताकडे पाहिले...आणि पाहतच राहिला त्याचे डोळे सताड उघडे पडले...सावित्रीच्या मात्र अंगातीलच आवसान गळून गेले... “ तो आला..” ती तोंडातच पुटपुटली...सखरामने देखील आपल्या हातातल्या पिशवीची मुठ आवळून धरली... गोविंदपंताच्या बोलण्यातला सूर सखाराम ओळखून गेला अगदी किचकट दात खात जणू त्याच येनच गोविंदपंताला खटकल होत त्या घाऱ्या डोळ्यात भयंकर क्रूरता उभारून येत होती.
“अं...पंत त..त तुम्ही ?”
“ अरे अरे...जीभ का जड जातेय रे तुझी...घश्यात काही घास अडकला का...कुर्डी कि पुरण अडकले रे...सख्य....च्च च्च सखाsss ...?” परत सूर लावून त्या करड्या आवाजात त्याने सखाच नाव घेतले...
“ नाही..तुमचीच ..तततुमचीच वाट पाहत होतो. आताच ताईला विचारल होत कि पंत कुठे गेलेत ? आता तुम्हीही भेटलात कुशल दिसताय...आता निरोप घ्यावा म्हणतोय मी...”
“ अरे आला आहेस तर आजची रात्र रहा ! जरा एक रात्र आमच्या सोबत हि घालवशील...तसेही आजच तारांगण पडणार नाहीये...अन मुहूर्तहि चांगला नाहीये हो...अमावस्या चालू आहे न...जंगलाच्या वाटेन कुठून जाणार रे तू....अतृप्त आत्मे फिरतात या” असे म्हणत पंताने आपली नजर वाड्यातल्या एक एक कोपऱ्यावर फिरवली आणि शेवटी सखावरती आणली...
“या...रानात...या रानात फिरतात रक्ताची चटक आहे त्यांना...ब्स्सस्स्स....तुझी काळजी वाटते हो मला..” आपली मान हालवत अन दोन्ही हात मागे बांधून पंत सखारामला एक अनामिक चेतावणी देऊ लागला..
“ सखा तू जा...! फक्त संध्याकाळ झालीय लवकर पोचशील...!” चाचपडतच सावित्री सखाला म्हणाली...
सावित्रीचा आवाज ऐकताच गोविंदपंतने सर्रकन भडकत्या नजरेने तिच्याकडे पाहिले जसे क्षणभर तर तिला असे वाटले आत्ताच अंगावर झडप मारेल...
“ नाही मी निघतो दाजी..!” सखारामने त्याला दुसऱ्यावेळी नकार दिला त्याच क्षणी गच्चकण दोन्ही हात सखरामच्या खांद्यावर ठेवले. अन ते जोरात दाबले तसे सखारामचे खांदे दुखायला लागले होते त्यामध्ये त्याच लक्ष वाड्याच्या दरवाज्याकड गेल नाही जो हळूहळू स्वतःच्या स्वतःच बंद होऊ लागला होता.सखारामने घश्यातच आवंढा रोखला...
पंताने आग्रह करून सखारामला एक रात्र वाड्यात मुक्कामाला ठेऊन घेतले...सावित्रीला त्याने रात्रीचा स्वयपाक करायला सांगितला होता. दोघेही चुलीजवळ सावित्री च्या जवळच स्वयपाक करत असताना पाटावर बसले होते. गोविंदपंत फक्त एकटक सखारामकडे पाहून हसत होते सावित्रीने भाकरी थापल्या आणि दोघांना वाढू लागली तेव्हा तिचे हात अगदी गारठून थरथर कापत होते.तिने सखारामने ते पहिले.. एवढा धाक एवढी धास्ती एवढी भीती त्या माणसाची कशासाठी अखेर अस काय ज्ञात झाल होत सावित्रीला त्याच्या बद्दल आणि माहित जरी असले तरी या नरकात एवढ्या भयान यातना का सोसत होती ती...कदाचित बंधिस्त होती नजरकैद होती.
नशिबाने एक मार्ग दाखवला होता. हातात मौका घवसला होता रात्रीच गाठोड बांधून तान्या संध्याला उचलून वाड्याच्या उघड्या दरवाज्याची संधी बघून सावित्री निघाली जंगलातून पायात काटे कुटे टोचत धावू लागली होती...धावता धावता मागे वळून पाहिले तेव्हा दिसले कि पूजा घरातल्या खिडकीच्या सळयामागे तो उभा होता रागाने लालबुंद झालेला...भयंकर किंकाळ करत सावित्रीच्या नावाने तिला पुकारत...
“ सावित्रे....! जाऊ नकोस सावित्रे दूर जाशील तर याला तुझ्या मागावर सोडेन....सावित्रे पावले थांबव सावित्रे...माघारी ये.. थांब! हीहीही...थांब तू अशी नाssssहि ऐकणार....” एवढच म्हणत त्याने आपल्या मागे पूजाघराच्या कोपऱ्यातल्या अंधारात पाहिले तिथे चांदीसारखे लुकलुकते दोन मोठे डोळे दिसत होते त्याच्या शरीराचा भयंकर आकार होता विद्रूप आजूबाजूला पसरलेले विखुरलेले मातलेले केस कानाच्या खाली पर्यत उगवलेले...पंतान काहीसा इशारा केला आणि ते तिथेच जागीच मागे सरकले आणि नाहीसे झाले...आज्ञा आदेश कि आणखी काही उच्चार...पण ते भयानक होते...वाड्या पासून दूर बरेच दूर धावत सावित्री गावच्या हद्दीजवळ आली होती...बगलेत इवलुशी संध्या रडत होती अंगावरच बोचके सांभाळत घामाने सावित्री पुरती भिजून गेली होती घसा धावून धावून कोरडा पडला होता. धावता धावता ती बरीच दूर आली होती आता श्वास घेण्यासाठी म्हणून ती जराशी थांबली होती. गावची हद्द समोरच दिसत होती आणि ती पार केली म्हणजे मिळवले पदराने तिने आपला अन संध्याचा घाम पुसला तिचे डोळे पुसलें...आता चालण्याचा निर्णय घेतला होताच तिने कि....
त्या जंगलात मागच्या झुडूप झुडुपातून एक भयंकर किनरी हास्याचा आवाज आला..”खिईहीही....” अगदी किन्नरच हसला जणू त्या आवाजात पण तो आवाज एकाच जागेहून नाही तर तो चारीही दिशाहून आला होता. सावित्रीच्या काळजात त्या आवाजाने धस्स झाले...सावित्रीने एक दीर्घ श्वास घेतला तिरकस नजरेने तिने आपल्या उजव्या हाताकडून मागे पाहिले.पण मागे तर अगदीच सामसूम दिसू लागल होत मग तो आवाज...सावित्रीने मनाचा भ्रम समजून समोर पाहिले तर अगदी तिच्या डोळ्यासमोरच ‘ते’ उभ होत पांढरेफकट डोळे अन त्यात बुभळांच्या नावाखाली बस एक काळा ठिपका होता. विद्रूप काटकुळा चेहरा...त्याच खरच रूप ते होते कि फक्त सावित्रीला एक चेतावणी म्हणून ते समोर आले होते. सावित्री तिथे जी बेशुद्ध पडली त्या नंतर चा तिचा डोळा उघडला तो घरातच...
***
जेवणे उरकून आवरून सावित्रीने एका खोलीत सखारामला गोधडी घोंगडी टाकून झोपायला जागा केली... तेव्हा संध्या स्वताच स्वतःमध्ये गुंग असायची खेळायची बागडायची सखा जवळून सावित्री उठायला तयार होत नव्हती संध्याला मांडीवर घेऊन ती कारणामागे कारण काढत त्याच्याशी बोलतच जात होती कदाचित ती वेळ ती वैरी रात्र घालवण्यासाठी एक केविलवाणा प्रयत्न करू पाहत होती. कदाचित तिच्या आईने सावित्रीने जे काही अनुबधीत होते ते फक्त स्वतःवरच घेतले होते करारच तो संध्याच्या केसालाही धक्का लावायचा नाही भले आयुष्यभर गुलामगिरी पत्करावी लागेल संध्याजवळ काहीही येऊ शकत नव्हत पण आता इतक्या वर्षांनी सावित्रीच्या अंतासकटच तो अलिखित करार हि नष्ट झाला होता. संध्या परत एकदा त्या अघोरी भूतकाळात पाउल ठेवायला आली होती.

वर्तमान
चला चला सगळे आपापल्या घरला चला...” कोण तरी एकजण मागूनच म्हणाला... तसे सरपंचांने त्यांना अडवले “हे बघा मी आता जे काय सांगणारे ते तुमी लोक ऐकणार नाही मी तरी सुद्धा विचारतोय तुम्हाला....थोड्या दिवसान सावित्रीताईच श्राद्ध हाय..” सरपंचाच बोलन झाले होते न होते तोच एक बाई म्हणाली.... “ या बया...आमाला बी बोलवन हाय का काय त्या वाड्यात ? नाय नाय...ए पोरानो चला घरला...त्या वाड्याच ऐकायचं सुदिक नग आम्हाला..चला र..” आपल्या पोरांना ती बाई पुढे ढकलत तिथून निघून गेली तसे तिच्या मागोमागच `बाकीचे लोक हि जाऊ लागले...
“आर ऐका तर माझ...ऐका जाऊ नका अस...” संध्याच्या मात्र हि गोष्ट ध्यानी नव्हतीच कि तिच्या आईचे श्राद्ध जवळ आले होते.. सखाराम मामा तिच्या जवळ आला आणि म्हणाला... “ पोरी मी आज सकाळी तार पाठवली अन ती एवड्या लवकर कशी भेटली तुला ?”
“तार ? कसली तार ? आम्हाला तर कुठलीच तार नाही आली...आणि मामा आम्हाला इथे आल्यानंतर कळतय कि आईच..”
“ तुम्हाला तार नाही भेटली ? मला काहीच कळत नाहीये पोरी ?विश्वास ? तुम्ही इथे आलेच कसे ?”
“मामा विश्वासच घेऊन आलेत आम्हाला इथे...”
“ ते सर्व मी तुम्हाला नंतर अगदी आरामात सांगेन...”
“ बर बर विश्वासराव ते सगळ राहुदे एवढा दूरचा प्रवास केलाय तुम्ही दमले असाल सगळे...हात पाय धून जेवून घ्या या ” सरपंच स्वतः पुढे येत म्हणाले...सखारामला बोलता बोलता त्यांनी अडवल होत..आणि घरी आलेल्या पाहुण्यांना पाहुणचार सादर केला होता.सरपंच आपल्या वाड्यात एकटेच राहायचे पत्नीचा एका विकृत आजारामुळे देहअंत झाला होता त्या नंतर एकटेपणाच नाना सरपंचाने गाववाल्यानं जोरजबरदस्ती केली नाही घरात जे पाहुणे आले त्याचं अगदी आपुलकीने आदरआतिथ्य केले पाहुणचार केला... जखोबा आणि बकुळा दोघांनीही मिळून जेवणाची तयारी केली जेवणे आटोपली...सरपंचाने त्यांचा दूरचा प्रवास पाहून त्यांना तत्काळ एक ऐसपैस अशी दिवाणखोली दिली पडल्या पडल्या तिघानाही झोप लागली...एका रात्रीची गोष्ट होती फक्त त्या नंतर बाकीचे मुक्काम त्यांनी आता श्राद्ध होई पर्यंत त्याच वाड्यावर करायचे ठरवले होते.
वऱ्हांड्यात बाज टाकून सरपंचा जखोबा अन सखामामा आकाशात तारांकन पाहत कसल्यातरी गोष्टी बोलत होते शोधत होते त्यातच सखाचा चेहरा पडल्यासारखा त्यांना दिसला... “ काय र सखा ? काय झाल ?”
“ जावाईबापूच अचानक इथ येन.. माझ आजच तार पाठवन..योगायोग तर नाहीच ह्यो...पण अस काहीतरी घडायचं बाकी राहीलय ज्याच्यामूळ नशीबच संध्याला इथ या गावात परत घेवून आलया...”
“ नियतीचा अन त्या विधात्याचा खेळ आजवर कुणाला कळला नाही सखा...इथून आता या आयुष्याला वळण आलय जे लिहीलय तिच्या नशिबात तेच होईल...अन साथीला विश्वासराव आहेतच..चल झोप आता..”
सरपंच झोपता झोपता खर सांगून गेले आता संध्या च्या आयुष्यात एक नवीन वळण आल होत नशिबाने तिला तिच्या भूतकाळात वीस वर्ष मागे आणले होते...इथे आता कोण शत्रू कोण मित्र कोण भक्ष्य आणि कोण भक्षक सर्व अनोळखी होत आणि आता सुरु झाला होता एक नवा अघोरी प्रवास. पुढे जे अनाहून घडणार होत त्याच्या पासून सर्वजण अगदी अनभिज्ञच होते... सखामामाने पाठवलेली तार इकडे एव्हाना पोचली होती आणि ती घरच्या पत्रपेटीत पडली होती. आज विश्वासला भेटायला जायचं होत हा विचार जयदेवाला आठवला त्याने तीच आपली गाडी काढली आणि त्यावरतीच विश्वासच्या घरी येऊन पोहोचला...पण आल्यानंतर त्याला घराला टाळे दिसून आले... “ अरे हे लोक कुठे गेले म्हणायचे...” जयदेव दारातच उभा होता तोवर पाउस सुरु झाला काहीवेळ आडोसा धरूनच तो थांबला तसा त्याचं नजरेस तो पत्राचा डबा पडला ज्याच्यात एक पत्र केव्हाच येऊन पडल होत आणि आता ते पावसामुळे भिजून गहाळ होणार होत.
क्रमश:
MARATHI HORROR STORY ALL PARTS ,BHAYKATHA AGHORI,वर्तमान

PART-1 , PART-2, PART-3 ,PART-4 , PART-5 , PART-6 , PART- 7, PART-8 ,PART-9
PART-10 ,PART-11 ,PART-12 ,PART-13,PART14,PART-15,PART-16, PART-17,END OF THE STORY -AGHOR-BHUTACHI GOSHT PART-18
No comments:
Post a Comment