अघोर भाग चौथा ***
अंधारातून तो तसा बाहेर त्या प्रकाशात आणि विश्वासच्या नजरेसमोर आला...त्याला पाहून अगदी खूप जुनी ओळख असल्यासारखे विश्वास च्या चेहऱ्यावर हास्य उमटले... “जयदेव ! हाहा.. what a pleasent surprise !” असे म्हणत विश्वासने त्याला मिठी मारली...अंगात काळा रेनकोटचा jacket काढत त्यानेहि विश्वासला आलिंगन दिले. “ विश्वास यार..माझा किती दिवसांनी भेटतोयस...” जयदेव उद्गारला...विश्वासच्या मनात दरवाजा उघडून बाहेर आल्यावर कदाचित शंका होती कि कोणी चोर दरोडेखोर तर नसेल पण ते तसे काही नव्हते बऱ्याच दिवसांनतर विश्वासचा मित्र त्याला शोधत शोधत इथे आला होता अगदी कॉलेजपासूनची मैत्री होती दोघांची त्यातल्या त्यात तो संध्याला देखील ओळखायचा विश्वासला जेवढ संध्याबद्दल माहिती होत तेवढच जयदेवला देखील
“ अग ऐकलेस का ? संध्या ? बघ कोण आलय ! बाहेर या काही प्रोब्लेम नाहीये...” तसे किचनमधून संध्या अनुला घेऊन बाहेर निघाली आणि तिच्या लागोपाठ बकुळादेखील... विश्वास जयदेवला घरात घेऊन आला...आणि संध्याच्या समोर त्याने त्याला उभे केले... संध्या काही क्षण त्याचा चेहरा निहाळत राहिली कि तोच तिचा चेहरा चमकला... “ अरे जयदेव तू ! इतक्या वर्षांनी अरे काय हे सरप्राईज कुठे होतास कुठे तू ? आणि आज असा अचानक...काही फोन नाही काही नाही...”
“ अग हो मला बसू तर द्या टॉवेल मिळेल का तुमच्या कार मागे गाडी पळवत पूर्ण चिंब भिजून गेलोय मी..”
संध्या एकवेळ समजलीच नाही कि तो नेमका म्हणाला काय ? विश्वासहि त्याला पाहून विचारात पडला अचानक त्याच्याही डोक्यात प्रकाश पडला... “ अच्छा ! अच्छा म्हणजे तो तू होतास जो मघाशी कारचा पाठलाग करत होतास.”
“ हो मग नाहीतर काय तुम्ही दोघ हॉस्पिटलमधून बाहेर निघालात आणि मी तिथूनच माझ्या मोटारसायकल वरती जात होतो आणि अचानक मला तुम्ही दोघे दिसलात.. मी यु टर्न घेऊन आलोच कि तुम्ही पुढे निघून आलात मी मागून हाका मारल्या पण एवढ जोराच वारकावदान सुटले कि तुम्हाला काही ऐकू गेले नाही मग मी म्हटलं कारच्या मागे मागे जाव तरच कळेल...आणि मग मी निघालो तुमच्या मागे आणि इथे आलो तर खिडकीत...अग संध्या टॉवेल देतेस का कि माझच पुराण ऐकताय तुम्ही...दोघे...” जयदेव म्हणाला तसा “ हो ...बकुळा जा टॉवेल घेऊन ये...वरतून लवकर..”
“ व्ह्य आणते बाईसाहेब...” असे म्हणत बकुळा वरती गेली टॉवेल घेऊन खाली आली आणि तिने जयदेवच्या हातात तो सोपवला...जयदेव उठून आपले केस कोरडे करू लागला. बकुळाने जयदेवला टॉवेल दिला तशी तिची नजर फ्लोरवरती गेली.. “ बाई..! हा फोटो फ्रेम खाली कसा पडला...” बकुळा झाडू घेऊन काचाचे तुकडे झाडू लागली...झाडू त्या फ्रेम ला लागतो न लागतो तोवर बाहेर एक कडाडून वीज चमकली ढगांमध्ये एक भयभीत करून टाकणारी गर्जना झाली आणि पुन्हा घरातील सर्व दिवे गेले..
“अरे देवा या लाईटस पण , मी आत्ता येते मेणबत्ती घेवून बकुळा तू थांब आत्ताच काच उचलू नकोस..” संध्याने घरात दोन चार ठिकाणी मेणबत्ती पेटवली एक किचनमध्ये एक हॉलमध्ये आणि तिसरी तिथे जिथे सोफ्यावर विश्वास आणि जयदेव होते. घरातला काळाकुट अंधार आता निमुळता झाला होता मेणबत्तीचा पिवळा तांबडा प्रकाश सर्वांचे चेहरे उजळवत होता. त्यातल्या त्यात काच उचलताना बकुळा म्हणाली...“बाईसाहेब...अस फोटोची काच तुटन काय शुभ नसतया बघा...नक्कीच कायतरी इपरीत घडणार हाय...” बकुळा काच उचलत बरळत होती. तसे जयदेव विश्वास संध्या तिघेही कान अकस्मातरित्या तिच्याकडे करून ऐकत होते.
“ अस काहीहि नसत...निव्वळ योगायोग असतात हे बकुळा मावशी...”विश्वास म्हणाला
“योगायोग न्हायत हे साहेब...संकेत हायत हे कसल तरी भारी संकट येणार दिसतय ...अन त्याची सुरुवात बी झालीय...” डोक्यावरचा टॉवेल बाजूला काढत जयदेव बकुळाकडे पाहत होता. मेणबत्तीचा प्रकाश त्या सर्वांच्या चेहऱ्यावरील भाव दर्शनास आणत होता
“ बकुळा काहीही बरळू नकोस...बाकीची कामे बघ ” विश्वास म्हणाला...
“ strange women!...” जयदेव तिला पाहून हसला आणि सोफ्यावर बसला... “मी आता जेवणाच बघते. आता अंधारातच जे काय होईल ते बनवते. चल बकुळा...” तसे ती तिथून गेली..
“काय मग कसा आहेस ? आणि कस कळले रे हे आमच घर आहे ते..”
“अरे घरासमोर गाडी उभी दिसली... पण लाईट्स नव्हते वाटत घरात, म्हणून मी खिडकीमधून डोकावून पाहिले तर...आतमध्ये मला कोणीतरी उभ दिसल अंधारात एवढ काही स्पष्ट दिसल नाही परंतु एक कि दोन स्त्रिया उभ्या दिसल्या मला..”
“ अच्छा ! ती संध्या असेल आणि दुसरी म्हणजे आमची हि बकुळा असेल...”
“ छे छे ! ती काय एवढी धिप्पाड नव्हती रे अगदी सडपातळ मध्यमवयाची वाटत होती...थोडीशी वयस्क असेल, पण मला ढगांच्या गर्जण्याच्या आवाजांनी आतमधल काही ऐकूच आले नाही... “ अरे अस कसे तू बकुळालाच पाहिले असणार कारण लाईट गेली होती तेव्हा संध्या खाली...एकटीच...” अचानक विश्वास थांबून विचारात पडला...मेणबत्तीच्या ज्योतीवर त्याची नजर टिकून राहिली... “ मी तर बकुळा आणि अनुला घ्यायलाच वरती गेलो होतो आणि संध्या तर एकटीच खाली होती मग याने कोणाला पाहिले?”
“ कदाचित पावसामुळे मला आतमधल ठीक दिसले नसेल. संध्याच होती वाटत तिथे उभी...आणि हे सोड रे या आपण कुठल्या गोष्टी बोलत बसलोय..” अनु धावत येऊन आपल्या बाबाजवळ येऊन बसली... “ हि तुझी मुलगी ? किती गोड आहे रे...काय नाव ग तुझ ?” “ अनुराधा...” अगदी लडिवाळपणे तीन तीच नाव सांगितले... “ हो का..बर मी तुला आज पासून स्वीट गर्ल म्हणेन ठीके....विश्वास तुझा संसार सुखाचा पाहून खूप बर वाटतय..बघ...आणि एक विचारायचं होत..”
“हो विचार न..” अनुला मांडीवर घेऊन विश्वास म्हणाला.. “ तुम्ही तिथे त्या हॉस्पिटलमध्ये काय करत होता ? सगळ ठीक तर आहे न ?”
“ हम्म...! होय ! थोडफार...!”
“ म्हणजे ? सांगशील का ?”
“ अरे खूप मोठी गोष्ट आहे आणि कदाचित त्यावर विश्वास न बसण्यासारखीच वाटेल तुला...”
“ अरे सांगून तरी बघ मला; सांगितल्याने मन हलके होते.”
“ तुला तर आमच्या लग्नाची गोष्ट माहित आहे कसे झाले तू हि होतास तिथेच उपस्थित..त्याच्या काही काळानंतर संध्याच्या बाबतीत विचित्र गोष्टी घडायला लागल्या...तिला काही स्वप्ने पडू लागली तिची अवस्था थोडीशी..”
“ मानसिकरित्या ? काय म्हणाले मग त्यावर डॉक्टर..”
“ तिथे हि जाऊन दाखवलय आम्ही दोघांनी पण त्या डॉक्टराजवळ देखील अजून विचित्र घडले...डॉक्टरांनी संमोहन हि वापरले पण त्यातून हि जास्त काही उमगले नाही त्यांना बस एवढ समजल आहे कि खूप आधी म्हणजे कदाचित लहानपणीच तिने काहीतरी डोळ्यांनी पाहिले आहे. त्याचा तिच्यावर परिणाम झाला आहे..” असे करत विश्वासने जयदेवसमोर त्याची सारी व्यथा मांडली... “ हम्म...असे आहे तर...खूपच गंभीर विषय वाटतोय...मग तुम्ही तिच्या त्या आठवणीबद्दल कोणाला तरी विचारायचं न कोणीतरी असेलच ज्याला या बाबतीत माहिती असेल कोणी न कोणीतरी असा व्यक्ती..”
विश्वास नकारार्थी मान हलवत होता कि नाही, नाही कोणी असा; तोच एका विचाराने त्याचे डोळे चमकले.. “ हो ! एक व्यक्ती आहे ! ज्याला संध्याबद्दल सर्व काही माहिती आहे..आणि तो व्यक्ती आहे सखाराम मामा”
“यु मीन सखामामा...तेच जे संध्याला होस्टेलवर भेटायला यायचे ज्यांना मी लग्नात पाहिलं होत ? तेच न ?”
“ बघ मी म्हटल नव्हत काहीतरी निदान निघेलच मार्ग सापडेलच मित्रा नशीब जेव्हा सर्व रस्ते बंद करत न तेव्हा दैव आपल्यासाठी एक न एक मार्ग मोकळा सोडतच...” जयदेव स्फुर्तेने म्हणाला...आणि तसेच झाले होते एक नवी दिशा भेटली होती कुठपर्यंत त्याच समस्याला अडचणीला गळ्यात घेऊन फिरणार कधी न कधी त्याच निदान तरी कराव लागेलच डॉक्टरांनी एकांतात घेऊन विश्वासला एक गोष्ट सांगितली होती कि “ लवकरात लवकर संध्याच्या या त्रासाच मूळशोधायला हव नाहीतर तिच्या मानसिक अवस्थेत गंभीर बिघाड होईल...आणि असे झाले तर अनुचे काय होईल?
“ चला जेवण तयार आहे...” विचारात गुंग विश्वासला एकटेपणा जाणवत होता परंतु जयदेवच्या येण्याने त्याला एक नवीन उत्साह आला होता कारण संध्याशी त्या गोष्टीबद्दल सारखी सारखी विचारपूस करणे त्याला बरोबर वाटत नव्हते कारण त्रास तिलाच व्हायचा...अपशकुनाच्या घटना संकेताने सामोरे येत होत्या संकेत एकास मात्र धोका एका वेगळ्याच व्यक्तीस होता. जयदेवावर विश्वास कसाही निर्भर राहू शकत होता अगदी डोळे बंद करूनहि जेवणे उरकल्यावर जयदेवाने नंतर येईन असा निरोप घेतला आणि घराबाहेर पडला... “ येतो मी विश्वास, लवकरच भेटू आपण”
“विश्वास तू मला सांगणार नाहीस पण मला जाणवतय काहीतरी अभद्र घडायच्या मार्गावर आहे...माझ्या डोळ्यांनी मी जे काही पाहिलं ते एक अनैसर्गिकच होत याची मला खात्री आहे...” जयदेव गाडीवरती jacket घालून विचारात गुंग होऊन गाडीवर निघून गेला...
“आता याचे मूळ फक्त आणि फक्त सखाराम मामाकडेच भेटणार आहे संध्या अनुला घेऊन गावकडे निघायची तयारी करावी लागणार...” विश्वास बेडवर अनु आणि संध्यासोबत पडल्या पडल्या विचारात गढला...
“ ती नक्की आईच होती कि माझा भ्रम, आणि तो आवाज, बाबांचा आवाज...नाही नाही..माझा भ्रमच असेल...आणि नसला तर....?” संध्याने आपले डोळे मिटले आणि अनुला जवळ घेऊन झोपी गेली...
“ राकीस , जखिण ,समंध भूत पिशाच्च दूर ठेव रे देवा बाप्पा...याचं रक्षण कर रे देवा महाराजा...” बकुळा मावशीने झोपण्यापूर्वी देवाकड हात जोडले आणि रक्षेची कामना केली.
***

“मालक...तुम्ही तार पाठवली होती नव्ह त्याला तो आलाय; सखाराम..” जखोबा नाना सरपंचाच्या कानात येऊन म्हणाला... “ठीक आहे. येऊ देत वऱ्हांड्यात बसव त्याला, मी आलो. अन बाकीचे लोक? ते जमलेत का समदे ?”
“व्ह..तुमच्या हुक्मावरून आजवर कोणी फिरलंय का ? समदे आलेत...” नाना सरपंचाच्या वरांड्यात गावतले काही मुठभर मोजके अन नामी लोक जमले होते. नाना सरपंचाने अचानकच रात्रीची बैठक बोलवली होती. आज त्यांना जो काय तो निर्णय घ्यायचा होता. पावसाने गावतली लाईट उडाली होती जखोबाने जागो जागी दिवे पेटवून ठेवले..येताना हि गावातल्या एक दोन लोकांनी कळप केला आणि सोबत एक एक कंदील घेऊन रस्ता काढत आले कोणी रात्र झाली कि एकटे फिरणे सहसा टाळायचेच..सर्व समूह च करून ते फिरायचे. “ये सखाराम..ये बस...”
“ बोला सरपंच कस काय बोलवन धाडल मला...? पुन्हा काय ?” सखाला अशी तातडीने तार आली होती कि तो हातातला घास टाकून इकडे निघाला होता. कारण या गावाचा अन त्याचा संबंध तेव्हाच तुटला होता वीस वर्षापूर्वी आणि अचानक अस बोलवने आले म्हटल्यावर त्याला मात्र धास्ती भरली होती.
सरपंच होय म्हणाले सरपंच समोर ओसरीवर बसले होते त्याच्याच पायरीवर सखा होता आणि खाली गाववाले बसले होते. “सखा...! आता आमच्याच्याने हे होत नाही बघ.. जसा जसा तो वाडा जुना व्हायला लागलाय तसा तसा त्याचा प्रकोप वाढायला लागलाय...” वाड्याच नाव काढताच तिथे बसलेल्या जमावात कुजबुज सुरु झाली. “ बाबो...सरपंचान याच्यासाठी बोलवल हाय का काय ?”
“ आवो सरपंच त्या जागेच नाव सुदिक काढू नका...पहिलं रातीला झोप तरी यायची अन आता रोज रातच्याला खिडकी आपसूक उघडायला लागली माझ्या घरची अन खिडकीतन तो वाडा नुसता दिसला तरी धास्ती भरायला लागली आता...” त्या जमावाटला एक जण म्हणू लागला त्यालाच साथ देत दुसरा उठला... “ मालक रातच्याला अजून सुद्धा तिथून जाताना त्याजा आवाज घुमतय...सावित्रे...सवित्रे म्हणून हाका मारलेल्या...” ते ऐकून मात्र खाली बसलेल्या लोकात भीतीचा एक गौप्यस्फोट झाला भीतीने जो तो शहारून निघाला.. “ मालक तुम्हीच काय तो निर्णय घ्या ह्यो सखा तर इथ कधी येत नाही...पण आम्हाला त्रास भोगाव लागतय मालक.... इडा हाय ती...! इडा !”
“सखा गावातले लोकाच ऐकाव लागल मला...एक तर तू तो वाडा पाडायला आम्हाला परवानगी दये नाहीतर आम्हाला दुसरा कायतर विचार कराव लागल...”
“ सरपंच मला ठाऊक नाय कि लोकांना त्याचा काय त्रास होतोय पण माझ्या बहिणीन तिच्या पोरीसाठी ठेवलेली शेवटची आठवण हाय ती. आता माझ्या बहिणीच श्राद्ध आलय...अन अजून तिला मुक्ती नाय भेटली...तिच्या पोरीच्याच हातन तिला मुक्ती भेटल...”
“ सखा! तुझ्यामूळ एकवेळ अख्खा गाव वाचलाय त्याच्या हातातून...म्हणून तुझा ऋणी आहे काय इच्छा आहे तुझी आमच्या निर्णयावर ?”
“ माझ्या बहिणीच श्राद्ध उरकूद्या तिला मुक्त होऊ द्या तिच्या पिंडाला एकदा कावळा शिवू द्या बस हीच इच्छा आहे..”
“ठीक आहे तर मग ठरल तर, बोलवून घे तिला...अन उरकून घे श्राद्ध पण एक सांगून ठेवतो सखाराम त्या वाड्यात अजून सुद्धा त्याचा वावर हाय..दक्ष रहा...दक्ष रहा...”
“ ठीक हाय सरपंच जस तुम्ही म्हणाल तस..पण आमच्या पैकी कुणीसुद्धा तिथ त्या वाड्याकड फिरकणार नाय..” तिथे बसलेले गावकरी बोलू लागले..
“ बर! या तुम्ही समदे ” हातावर हात चोळत सरपंचानी सखाराम वर नजर टाकली...कदाचित दोघानाही पुढे घडणाऱ्या घटनांच भाकीत लागल होत सरपंच जणू नजरेनेच सखारामला सावध करत होते...
दिस सरल अन रात उरल..
काळच्या तोंडचा घास बनल..
रक्ताचा पाट अन चीकलाची वाट
चौकन येऊन करल तो घात..
आता थकून मरून जगल कोण
सावज एकेर अन भक्षक चहोर
येईल अवसेची रात बनून अघोर.

क्रमश:
MARATHI HORROR STORY ALL PARTS ,BHAYKATHA AGHORI,PART-1 , PART-2, PART-3 ,PART-4 , PART-5 , PART-6 , PART- 7, PART-8 ,PART-9
PART-10 ,PART-11 ,PART-12 ,PART-13,PART14,PART-15,PART-16, PART-17,END OF THE STORY -AGHOR-BHUTACHI GOSHT PART-18
No comments:
Post a Comment